श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १।४।१७९४
विज्ञापना म्हैसाजं. मुलील मुलुक ह्मणत होते की मदारुल'महाला यांस पहिल्याने कोणते गोष्टीचा नेट फार येत असतो. प्रस्तुत स्वस्थतेचा समय पाहून जुरत धरली. यखादा फंद उभा राहिला ह्मणजे सर्व विसरून नरम पडतात. आतां हुषार जाले. रावसिंदे यांचा काल जाला बखेडे पडतील. पाहावें. तिकडील पुरवणी करितां करितां पुरे होईल. त्यावेगळ घरांत ( घरांत ) दौलत आहे किती दिवस स्वस्थता राहील? नाना प्रकारचे अंदेषे येऊन वारद होतात, दक्षण आमची असे आम्ही ह्मणवीत असतां टिषु सुलतान याचा उत्कर्ष त परियंत आमची दक्षण अश्या ह्मणण्याचा भाव आह्मांस कोटें होता है ईश्वराचे कृपे करून त्याचे पारिपत्य जालियावर आमची दक्षण असे शब्द आतां तोंडावाटे निघु लागले. याचे उत्तर त्यांस दिलें कीं ‘श्रीमताचे दवलतीस हा दोष निवडून द्यावा असे नाही, याप्रत्वी ( पृथ्वी ) वर जे रिया, सत करतत. सर्वांवर ईश्वराची इच्छा गालब आहे. ईश्वर कोणते वेळेस काय करील हा भरंवसा कोणीच मनांत आणु नये हे खरे. या प्रों बोलणें जालें, रा, छ, १६ रजमान हे विज्ञापना.