श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसुवी.
विनती विज्ञापना, छ २० माहे षाबानचे सरकारचे पत्र सादर जालें तें छ १ माहे रमजानी पावले. त्यांत नवाबाकडुन स्वराज्य प्रकर्णी जावसालाचे फैसलै होणे येविषई राजश्री रघौतमराव व बाबाराव यांस आज्ञा जाली की दाह। वर्ष जाबसाल होतच आहे. हल्ली तुह्मीं नवावाकडे जाऊन सरकारचे जा(ब) सालाचे फडचे होत ते करणे, याप्रों आज्ञा जाली. उभयतांनीं नवाबाकडील परावनगी येण्याची विनंती केली. त्यास परवानगी पाठविण्याावसी। आज्ञा येसीयास या प्रकर्णी सरकार आज्ञेप्रमाणे मुषीरुलमुलुक यांसी बोलणे जालें त्या प्रकर्णी पत्रे लिहून रवानगी करितो. रा छा १३ रमजान है। विज्ञापना.
र।। छ १६ माहे रमजान रवानगी डाकेवरुन.