श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसवी..
विनंति विज्ञापना. निर्मळ वगैरे माहाल बाबत स्वराज्याचा यैवज नवाबाकडून सालाबाद अवरंगाबादेवर तनखा येतो त्याप्रमाणे सन १२०२ सालची बाकी व सन १२०३ सालचा येवज येणे याजकरितां दौलास निकड केली की सालें गुजरोन गैली सरकारचे यैवजाची तुनखा द्यावी. दौलांनी राजाजीस तनखा बा। यैवज जफरुदौला या माहोलचा देणे किती याचा फर्द करून समजावणे म्हणोन सांगितले. राज्यांजीनी फर्द तयार करून दिली, सन १२०२ साल पैकीं दीड लक्ष आलेसे हिशोबी पेशजी तनखा यैवजी दिल्ले ते वजा करून सन १२०३ पैकी आलेले हिशेब दीड लक्ष द्यावयाचे जमा करून सालाबादी तेरा हजार सरंजामी वगैरे याजकडे दुसाला देतीबार सवीस दजार दौनसे व परवणी, लोहगांव, आवढे, ठाकळी, पांचळेगांव वगैरे महालांत स्वराज्याकडील अमलदानी वसूल येक लाख सताव स हजार आठसे घेतला आहे. तो वजा करून बाकी एवज राहिला त्याची तुनखा। तयार करून देवितों वैसे याचे बोलणे.' याचे उत्तर आह्मीं कैलेंक जफरुदौला बाबत महाल यैवज सरकारांत येतो. परभारें माहाल सरंजामी वगैरे सरकारचे अंमलदारांनी यैवज घेण्याची आज्ञा सरकारांतून नाही. त्या पक्ष स्वराज्याकडील अमंलदार पैका घेणार नाहीत. कोण मामलेदाराने यैवज घे. तला त्याच्या रसीदा दाखवल्या ह्मणजे सरकारांत विनंती लिहिता येईल याचे ह्मणेक श्रीमंताकडील म मलेदारांनी येवज जबरदस्तीने घेऊन रसीदा अ. म लस दिल्या नाहीत. रोशनखां वगैरेंनी पत्रे व यैवज दिल्याचे जमाखर्च पाठविले आहेत त्यावरून हे लिहिले? आम्हीं सांगितले की रसीदाच नाहींत त्या पक्षीं मामलेदारांनी यैवज घेतला कशावरून समजावें ? दौलाचे बोलण्यांत की आह्मीं रोसनखा वगैरे जागिरदारास इनामतनामे पाठविले आहेत, की ज्या कमाविसदारांनी महाल यैवज घेतला त्याजपासोन रसीदा घेऊन पाठेवणे. रसोदा आणविल्या. येतील. या प्रमाणे याचे बोलणे. त्यास सदरह प्रों, वैवज वजा करून तनखा दौवतात त्यास थे विषई आज्ञा जसी होईल त्या प्रमाणे मांस बोलण्यात येईल. राछ १७ रमजान हे विज्ञापना,