लेखांक १६० विष्णु १६१३
०॥ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो बाजी भोसले मोकदम मौजे वेळुवळी सुरली व पिपरी सा।कोरगौ रामराम विनंती सु॥ इसने तिसैन अलफ तुह्मापासून उ॥ पैके खतावरून लेहून घेतले होते चावर ३ तीन घेतली होती त्यास तुह्मी पैके रा। अंताजी नाईक पिसाल देशमूख प्रा। वाई व चापसेटी सेटिया कसबे वाई याचे गुजारतीने पैकेआमचे दिल्हे वतन लेहून घेतले होते ते तुमचे तुह्मास करार होय आह्मास काही तुमच्या वतनासी समंध नाही देशमुखाचे गुजारतीने लिगाड लिहिले तुमच्या वतनासी काही समंध नाही तुमचा घरी कागद वतनाचा घेतला होता तो रद असे तुह्मासी काही लिगाड नाही कलले पाहिजे
कृपा असो दीजे हे विनंति