[ १६४ ] श्री. १७४२.
श्रीराजा शाहूछत्रपति
हर्षनिधान । बाळाजी बाजी-
राव मुख्यप्रधान ।
राजश्री फत्तेसिग बावा गोसावी यासीः - सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलकृत राजमान्य
स्नेll बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित गेले पाहिजे विशेष मौजे साडेगाव व मौजे बोरी पा । आवढें हे दोन्ही गांव आपणाकडून मुकासे राजश्री कृष्णराव पंडित अमात्य याजकडे आहेत तरी पेशजीपासून चालत आल्याप्रमाणे चालवणें ह्मणून हरदु गावास आपली ताकीद पत्रे देऊन पंडित मानिलेकडे गाव सुरळीत चालत ते केले पाहिजे रा। छ १० सफर बहुत काय लिहिणें. लोभ असो दिल्हा पाहिजे हे विनति.
लेखनसीमा.