Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्रीशके १५९० कीलक नाम संवत्सरे फाल्गुण वद्य तृतीया बुधवार ते दिवसी त्रिंबक विश्वनाथ यासि रखमाजी बापुजी व बाबाजी बापुजी व शिवाजी बापुजी व गोमाजी बापुजी लेहोन दिल्हे ऐसे जे मौजे मानवरीच्या कुळकर्णाचे भांडण रामाजी गावखंडेराव यासि लागले होते दिव्य केले खरे जाला तो वाद सागता पैके पडिले त्याणी तक्षीम आपणास द्यावयासी नाही पैकियाचे व्याज वाढेल आणि दोही गावास लिगाड लागेल ह्मणऊन सोनवरीचे कुलकर्ण व जोतीश पैकियाकरिता तुह्मास आपले खुषीने लेहोन दिल्हे यासि अर्थाअर्थी समध नाही एणेप्रमाणे असलपत्र

                                                    गोही

बहादुरखान वलद हबूबखान                                     मोकदम मौजे दिये
सिक्का                                                                निशाणी नांगर
सूद                                                                     मल वरटा
माव मेहतर                                                          जाव सुतार                                                        
बहिर परणा                                                          एस माळी
लखम साळवी                                                       मोतादिक माहार

एणेप्रमाणे निकालपत्र लेहोन दिल्हे त्यास साठी पासेष्ट वरषे होत आली तुमच्या वडिलाच्या लिहिल्याप्रमाणे आह्मी निमे वृत्ति पांचजण भाऊ अनभवीत आलो तुह्मी मागती आह्मासी उपद्वाप केला की माझे वडिली लेहोन दिल्हे परतु नातवान होते तुह्मी कुटुबपोषक होता हालीं आपला खर्च पडिला असेल तो व्याजसुध्दा घेऊन माझी वृत्ति मोकळी करणे ह्मणऊन प्रसग तुह्मी जगजीवन शामराज व बनाजी मोरेश्वर व रामचद्र गोविंद व खडो सिवदेव व गोविंद गोपाळ यासि केला एक दोनी सवाद मौजे दिये का। सासवड एथील पारीं जाले त्यावरी एकदोनीदा प्रसग मौजे वाघोली ता। हवेली प्रा। पुणे एथील पारी राजश्री पिलाजी जाधव मोकदम मौजे मजकूर याजपासी जाला परतु हा कजिया परिछिन्न वादे कोण्ही निवडिला नाही त्यावरी तुह्मी मौजे दिये का। सासवड एथील पारी बलात्कारे बनाजी मोरेश्वर यापासून कोण्ही भाऊ हजीर नसतां कळेल ते रीतीनें लेहोन घेतले त्याणी प्रसग पाहून लेहून दिल्हे लिहिले आत्मसतोषाचे नव्हे वरकड भाऊबद शब्द ठेवितील ऐसे जाणोन बनाजी मोश्वर याणे बिकलम जलम ऐसे सेवटी लेहोन कागदपारावरी यादव माळी पुणेकर व समस्त लोक याजपुढे ठेऊन घरास आला तोचगाव सोडून खडो सिवदेव याजकडे मौजे करदी प्रा। नेवासे एथे वर्तमान सागावयास आला तेथे वर्तमान सागितले राजश्री सभाजी जाधव दियात बसोन आपणास नेऊन रजावद नसता लेहून घेतलें मग आपण बिकलम जूलूम ह्मणून दहशत खाऊन गैरहजीर होऊन तुमचे भेटीस आलो त्यास पत्र दिक्कतीचे ह्मणून तुह्मी सभाजी माणकेश्वर यावरी कर्जाचे पेच ठेऊन त्याचे हातीचे दुसरे पत्र करून घेतले. आणिक्ष कुलकर्ण करावे तो रामचद्र गोविंद व गोविंद गोपाळ हे हकमाकडे किल्ले पुरधरास राजश्री बापुजी श्रीपत याजवळ जाऊन उभे राहिले आणि हकीकत सागितली की आपल्या वडिलास निंबाजीपताच्या वडिलीं खुसीने सोनोरीचे कुलकर्ण जोतीश तक्षीम लेहोन दिल्हे त्यास साठी पासेष्ट वरसे जालीं असता पत्रप्रमाणे आह्मी खात असता हाली निंबाजी याणी कज्या करून आपला भाऊ बनाजी मोरेश्वर व सभाजी माणकेश्वर या पासोन जैसे मनास मानेल तैसे लेहून घेतले दियामध्ये राजश्री सभाजी जाधव याची मालुमात करून पत्र लेहून घेतले आपणावरी जुलूम जाला तर आपला इनसाफ करावा मग राजश्री बापुजीपत बोलिले की इनसाफ पेस्तर करून तोवर असणे मग राजश्री बापुजीपतानीं सोनोरीकर पाटिलास चिठी पाठविली की सोनोरीचे भाडण निंबाजीचे व रामचंद्र गोविंद याचे पडिले त्यास इनसाफ पेस्तर होईल तोवरी कुलकर्ण-जोति-साचे काम तुह्मी चालवणे ऐसी खटपट रामचद्र गोविंद व गोविंद गोपाळ याणी करून तुमचा इतल्ला कुलकर्ण व जोतिसात होऊ दिल्हा नाही त्यावरी बनाजी मोरेश्वर व जगजीवन सामराज व भगवत सामराज व रामचद्र गोविंद हे ती ची वरषात एकामाघे एक मृत्यु पावले खडो शिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर हे कसालियामुळे पोट भरावयासी गगथडीकडे नेवासेप्राते गेले सोनोरीस गोविंद गोपाळ व जगजीवनपताची मुले धाकटी राहिली त्यावरी कज्या मोघम राहिला याजवरी खडो सिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर देशास आले देसी येऊन मूळ वृत्ती भुतोपताची पाच गाऊ नीरथडीचे दोनी पिढिया बापभाऊ खात होते तेथे आले तेथे जिवाजी साबाजी व माहादाजी चितामण व खडो नागनाथ व कान्हो केशव यासि वाद पडिला मग सातारा एऊन राजश्री नारो शकर पतसचिव जिल्हेदार यासी भेटून महादाजी चितामण हुजूर आणविला पचाइतीस स्थळ मौजे चादक समत हवेली प्रा। वाई हे थळ मागोन घेतले वाद फार सागितला ते प्रसगी माहादाजी चितामण वदला की पूर्वी परभुणियाचा वाद आपले वडिली सागितला शिरवळी दिव्य आपले वडिली केले त्याबद्दल खर्च जाला तो व्याजसुध्दा देणे व आजीपर्यत वतनामुळे पडझड पडली तो हिशेब वारणे त्याप्रमाणे गोताने आज्ञा केली की हे वारावे आणि आपली तक्षीम खावी

लेखांक २८७                                                                      श्री                                                                     १६६० कार्तिक वद्य १३  
                                                                                                                                                                          नकल १/९ 
                                                                                                                                                                          मा। नव बंद रास

माहाराज राजश्री सिवाजी राजे

शके १६६० कालयुक्त नाम संवत्सरे कार्तिक शुध त्रयोदसी इंदुवार ते दिवसी निंबाजी बावाजी पानसी यांसि

वंश माणको विश्वनाथ
१ खंडो सिवदेव
१ लक्ष्मण माणको
---

गोविंद गोपाळ वंश                           लग ०
उध्दव विश्वनाथ १

सदर्हू पांच जण भाऊ वंश विसाजी परशराम पानसी सुहुरसन तिसा सलासीन मया अलफ कारणे लेहोन दिल्हे पत्र ऐसे जे पूर्वी मौजे सानवरी ता। कर्‍हेपठार प्रा। पुणे एथील आपले कुलकर्ण व जोतीश पुरातन त्यावरी रामाजी बिन कृष्णाजी इहीन-गावजी गाव-खडेराऊ मुतालीक आपले वडिली ठेविला होता तो वृत्ति आपली ह्मणऊन वादास प्रवर्तला त्यास यासी वाद घालावयाचे प्रसगी तुमचे वडील रखमाजी बापुजी व बावाजी बापुजी व शिवाजी बापुजी व गोमाजी बापुजी चतुर्वर्ग बंधूस आमचे वडील त्रिबक विश्वनाथ व मोरो विश्वनाथ व माणको विश्वनाथ व गोविंद विश्वनाथ व उध्दव विश्वनाथ पाच जण बधु याणी पुसिले की वतनावर रामाजी वाद्या उठिला त्यास यासी वाद घालावयासी सामील होणे आणि समापत्रात नाव घालणे ह्मणऊन विचारिले ते समयी तुमच्या वडिली उत्तर केले की आह्मास वाद सागावयासी अनकूल पडत नाही आमचे नाव समापत्रात न घालणे वृत्ती साधली तर तुह्मी च खाणे मग याच घरभावानी विचार करून घरभावानी च समापत्र केले आणि रामाजी गावखडेरायासी वाद घालावयासी उभे राहिले कितेक दिवस ठाणियात वाद जाला त्यावरी राजगडीचे मुकामीं माहाराज राजरी राजेसाहेबाचे दरबारीं वाद पडिला त्यास रामाजी गावखडेराव खळवाद्या मालुमात बहुत ऐसे असोन आमचे वडिली वाद बहुत घातला कसाले सोसिले सेवट माहाराजसाहेब याणी मौजे मोहरीस श्रीअमृतेश्वरी दिव्य करावयासी गोविंद विश्वानाथा बा। अष्टप्रधानाचे कारकून व हुजरे देऊन पाठविले गोविंद विश्वनाथ याणीं दिव्य केले खरा जाला वाद्या खोटा जाला मौजे मजकूरचा जानोजा बिन बाउजी काळा हमशाही गोताखेरीज समाकुल पाढरीसखेरीज होऊन रामाजी गाव खडेरायासी भेऊन एकलियाने त्याचे सारिखी गोही दिल्ही होती त्यास माहाराज राजेसाहेब याणीं गोतमुखे व पाढरीचे मुखे मनास आणिता पानसी खरे व दिव्य केले त्या मध्ये खरे निघाले मग वृत्तीचा महजर गोविंद विश्वनाथ याच्या नावे करून दिल्हा आणि जानोजीमजकूर याची जीभ कापावयास माहाराज राजेसाहेब याणीं हुकूम केला मग गोविंद विश्वनाथ याणीं रदबदल करून मिरासभाऊ ह्मणऊन जीव कापीत होते ते सोडविली यास खर्च उदड जाला व अवरगाबादेचा हि खर्च जाला व महजरात हि खर्च जाला व देशमुख व देशपाडे व गोतखर्च हि बहुत जाला ऐसा खर्च करून महजर घेऊन व समस्त भाऊ ऐसे गावास आले ते समई तुमचा चुलता रखमाजी बापुजी व तुमचे तीर्थरूप बावाजी बापुजी बोलाऊन पुसिले की पेशजी तुह्मी गाढेपाइकी करून वादास सोबत न दिल्ही आह्मी वडिलाचे पुण्यप्रतापे दिव्यी खरे जालो खर्चवेच मोबलग करून महजर करून आणिले तर आपले निमे तक्षिमेचा खर्च पडिला आहे तो सावकाराचा देणे आणि आपली तक्षीम निमे खाणे ते समई तुमच्या चुलतियानी व बापानी उत्तर दिल्हे आपणास टक नाही कष्टमेहनत केली व खर्च हि केला दिव्य केले ईश्वरे तुह्मास वृत्ति साध्य केली यश दिल्हे तरी तुह्मी आपली तक्षीम जोतीश कुलकर्ण निमे खाणे ह्मणऊन खुषरजावदीने हस्ताक्षरे पत्र लेहोन दिल्हे पत्र बिता।

                                      आबू नाखवें राज्य केलें वर्षे १२, १११६
                                      पाणी सावंत    "    "     "   १३, शक ११२८
                                      हंबीरखान       "    "    "    २७, शक ११४१
                                      सुरंगन           "    "    "    ३२, शक ११६८
                                      नसीलखान     "    "    "    ३६, शक १२००
                                      हंबीरखां         "    "    "     ४०, शक १२३६
                                      डफरखां          "    "   "     ३०, शक १२७६
                                     मलिक थुरदार  "    "   "     १०, शक १३०६
                                     मकसीदसीर आरबा "   "     ३५, शक १३१६

नायत्या राजांच्या नंतर वीस वर्षे माहीम प्रांतांत भोंगळे यांनीं दंगा केला. तदनंतर पंधरा वर्षांनीं अमदाबादेचा सुलतान जो अहमदशहा त्याचा सुलगा डफरखां ऊर्फ जफरखां ह्याच्या ताब्यांत माहीम गेलें. हा प्रसंग शक १३५१ त घडला. (Bombay Gazeteer, History of Gujarat, page 239). अहमदशहा शक १३६३ त वारला. ६ बद्दल १ बखरींत चुकीनें पडला आहे. डफरखां ऊर्फ जफरखां यानें माहीमास २५ वर्षे राज्य केलें व शक १३७६ त तो एकाएकीं वारला. डफरखां नंतर, माहीमची कमावीस अमदाबादेचे सुलतान स्वतःच्या अंमलदारां करवी घेऊं लागले. अमदाबादेच्या सुलतानांची वंशावळ बखरकार अशी देतो:- (सुलतानांची वंशावळ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ह्या नांवां पैकीं २, ३, ५ व ६ नंबरची नांवें ओळखतां येण्याची पंचाईत पडत्ये. दाउद अहमद याला आमदस्या बखरकार म्हणत असल्यास, नंबर सहाचें नांव कल्पनासृष्टींतून वस्तुसृष्टींत येऊं शकेल, तोगिलखां म्हणजे तातारखां व पेरोजस्या म्हणजे अहमदशहा जर असेल, तर नंबर २ व ३ च्या नांवांची हि संगति लागते. बाकी राहिलें नंबर ५ चें बहादूरशहा हें नांव. घियासुद्दीन मुहमदशहा च्या मृत्यू नंतर व दाउदशहा च्या राज्यारोहणा पूर्वी गडबड होऊन नंबर ५ चा बहादूरशहा कांही दिवस गादीनशीन झाला असल्यास, नंबर ५ च्या नांवाची हि विल्हेवार सुरळित होते. शक १४४८ त मुजफरशहा वारल्या नंतर, त्याचा मुलगा शिकंदरशहा अमदाबादच्या गादी वर बसला. परंतु त्याचा खून होऊन, त्याचा भाऊ माहामदशहा तख्तनशीन झाला. बहादूरशहा हिंदुस्थानांत पीराच्या भजनीं होता तो ह्या च सुमारास गुजराथेंत आला व त्यानें माहामदशहाला ठार मारून गादीचा ताबा घेतला. ह्याच्या कारकीर्दीत ठाणेकोंकणा वर अमदाबादच्या सुलतानांची सत्ता स्थिर झाली. माहीम प्रांतांतील क्षुद्र देसाईदेसले आपसांतील मानापमानाचीं क्षुल्लक भांडणांचीं गा-हाणीं मुसलमान आधका-यां कडून फैसल करून घेण्यांत गुंतले होते. राजकीय महत्त्वाची किंवा अधिकाराची आकांक्षा त्यांच्या स्वप्नीं हि राहिली नव्हती. वसईस बहादूरपुरा बहादूरशहानें वसविला, मलिक अलाउद्दीन नामें सरदाराला बाहादूरशहानें विसामागड तांदुळवाडीचा किल्लेदार केलें. त्यानें गडा खालीं बुराणपुर नांवाचें नवें गांब स्थापिलें आणि गडाच्या दक्षिणेस अमदानगर किराडची वसाहत केली.

D Fraser in a book publisbed this year gives a photograph of a brigand buried alive by order of a governor of Ispaban; the present writer had an interview with another persian governor in 1901, who was said to have cut a prisoner to pieces, and a photograph is said to have been taken of the same process in the market-place of a Persian city. In independent Moslem states such practices were common; to our sensitive minds the perusal of most chronicles in Moslem languages is in consequence harrowing. Hand-cutting, wbich is the legal punishment for theft, can scarcely be regarded as other than mutilation, and it is strange that the Prophet should have paintained it. That this still exists in Persia is attested by travellers: "Such horrible punishments, ” says Miss Ella Sykes (in I910), as being plastered up alive, being crucified or blown from a cannon, are practically punishments of the past; but a petty thief is still liable to have his hand severed." The punishment assigned by law for abandoning Islam is death. सोम देसल्या वर असा सूड उगविल्या नंतर, भागडचुरी मलिकाच्या जोरा वर देसलकी करूं लागला. तो देशांतील रयतांना मान्य हेाई ना. चहूं गावींचे भलेभले लोक एकत्र मिळून पापरुताचा मुलगा दादरुत देसला यास भेटले. भागडचुरींचा भाऊ कमळ. चुरी याज वर हल्ला चढविला. भागडचुरी हरबादेवीच्या यात्रेस गेला होता, त्याला गांठून घायाळ केलें. भागडचुरीनें कांदरडाह्यांत उडी घेतली. तेथें होडी वर गोम तांडेला होता. गोम तांडेल्यास सीमल म्हात-यानें भागडचुरीला मारण्यास सांगितलें. जर आपली कन्या देशील व जातींत घेशील तर मारतों, म्हणून तांडेल्यानें उत्तर केलें. तें सीमल म्हात-यानें मान्य केलें. तेव्हां गोम तांडेल्यानें भागडचुरीस वर्मी पालकोयती हाणिली आणि पाण्यांत उडी टाकून वल्ह्याचा चुडा मारिला. भागडचुरी मुक्ती पावला. कामगिरी बद्दल, गोम तांडेल्यास देसल्यांनीं आपल्या जातींत घेतलें व दरण्याची कन्या दिली. गोत्र कश्यप ब्राह्मणीं दिधलें.

२५. भागडचुरीचा असा अंत झाल्या वर निका मलिकाला लोकांची मोठी जरब बसली. लोकांच्या तंत्रानें थोडे बहुत वागल्या खेरीज निभाव लागणें कठिण असें जाणून, वृत्त्या, मानपान, वगैरे ज्यांच्या त्यांज कडे निका मलिकानें जाहीर रीतीनें चालू केल्या, इतकें च नव्हे तर नागरशाच्या माहीमच्या गादी वर नागरशाचा पुत्र लाहूरशा यास बसविलें, लाहूरशानें माहीमास राज्य नऊ वर्षे केलें. पृष्ट ५० त नऊचा आंकडा नकलकारानें बरोबर लिहिला आहे, परंतु पृष्ट ६२ त दोहोंचा आंकडा चुकीचा दिला आहे. लाहूरशाच्या नऊ वर्षांच्या अमदानी नंतर, निका मलिकानें माहीमचें राज्य शक १२७९ त नायत्या राजांच्या स्वाधीन केलें. हे राजे मूळचे प्रतिलोभ हिंदू होते, परंतु ते पुढें मुसलमान बनले. जन्मानें व कुळानें देशी आणि धर्मानें मुसलमानी असे हे दुरंगी राजे हिंदू देसल्यांस हि मानवले व निका मलिकास हि आवडले. ह्या नायत्या राजांची वंशावळ बखरकार येणें प्रमाणें देतो:-

२३. नागरशाचें ठाणेंकोंकणचें राज्य मुसुलमानांनीं काबीज केल्या वर, गुजराथ व महाराष्ट्र ह्या देशांत शक १२७० नंतर नांव घेण्यासारिखें प्रतिष्ठित असें स्वतंत्र हिंदू राज्य एक हि राहिलें नाहीं. हिंदू राज्यें नष्ट होण्याचें कारण बखरकार देतो तें मासलेवाईक आहे. बखरकार म्हणतो, कलियुगांत असा प्रकार होणार अशी भाक लक्ष्मीनारायणानें कलीस दिली होती. ती भाक १२७० शकांत पूर्णपणें खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषि बद्रिकाश्रमास गेले. वसिष्ट राजगुरु कांहीं काळ मागें राहिले होते त्यांनी हि पाठ फिरविली. त्या मुळें सूर्यवंशी व सोमवंशी यांची शस्त्रविद्या लुप्त होऊन म्लेच्छांचा व कलीचा जय झाला !

२४. म्लेच्छांचें राज्य झालें तेव्हां निरुपाय होऊन ठाणेंकोंकणांतील सूर्यवंशी व सोमवंशी कौल घेऊन सामान्य रयत बनून राहिले. नागरशा राज्यभ्रष्ट झालेला देखून, त्याचा शत्रू जो भागडचुरी त्याचा आनंद गगनांत मावे ना. तो निका मलिकास येऊन भेटला. त्यास देशाची जमी सांगितली. महाल, परगणे, खापण, गावें, वोळी, हवाले, मसाले, हाट, बकाल, आदाय, खर्च, इत्यादींचा सर्व तपशील भागडचुरीनें निका मलिकास समजाऊन दिला. मलिक मेहेरबान होऊन त्यानें भागडचुरीला हुजूरमजलीसीपदस्थ केलें. सर्व कारभार भागडचुरीच्या सल्ल्यानें चाले. मग भागडचुरीनें पूर्वीचीं वैरं उकरून काढलीं. त्याने भाइंदरकर पाटलां वर कुभांड रचिलें कीं सरकारपैक्या पैकीं ह्यांनीं ३२००० बत्तीस हजार सजगणीची अफरातफर केली. मलिकानें पाटलास बंदीखानीं घातलें. तेव्हां ज्याच्या भावाच्या स्त्री वर जुलूम करण्याच्या आरोपा वरून भागडचुरीला पलायन करावें लागलें होतें त्या सोमदेसल्यानें पाटलांच्या वतीनें दिवाणांत पैसा भरला व पाटलांस बंधमुक्त केलें. हा पहिला डाव फसलासा पाहून, भागडचुरीनें निका मलिकाचे कान भरिले कीं, हा सोमदेसला फार लुच्चा व चढेल माणूस आहे, त्यास दस्त करावा. निका मलिकानें सोम ठाकुराला नाहक सोळा हजार दाम दंड ठोठाविला. तो सोम देसला कांहीं केल्या देई ना. सबब, निका मलिकानें त्याची देसलकी अमानत करून ती भागडचुरीस देऊं केली. परंतु सोम ठाकूर व त्याचा भाऊ पायरुत हे पुरातन देसले जीवंत असतां, देसलकीला हात लाविण्याची भागडचुरीची प्राज्ञा नव्हती. तेव्हां भागडचुरीनें मलिकास कळविलें कीं सोम ठाकूर व पायरुत यांस जीवें मारिल्या बिगर, देसलकीचा कारभार सुरळित चालणार नाहीं. निका मलिकानें दिल्लीस पातशाहास कागद लिहिला कीं सोम ठाकूर देसला मोठा लांचखाऊ कुफ्राणदार असामी आहे, त्याला दस्त केल्या वांचून देशाची मशागत होत नाहीं. त्या वरून पातशाहानें सोम देसला व पायरुत यांना दिल्लीस बोलावून घेतले व तेथें त्यांचे प्राण हरण केले. पापरुताची खाल काढिली. सोमदेसल्याचें पोट चिरून, आंतड्याची वात वळून व चर्बीचें तेल जाळून, त्याचा दिवा लाविला. असल्या क्रूर व पाशव शिक्षा मुसलमानी राज्यांत दिलेल्या अद्याप हि आढळतात. त्या कालीं तर त्यांचा हरहमेश प्रचार होता. Margoliouth आपल्या Mohommnedanism ह्या पुस्तकाच्या १०३ व्या पृष्टा वर येणें प्रमाणें लिहितो:-

२२. तांडेलानें भागडचुरी मारून त्याचें शिर कापिलें म्हणून वरील कलमांत जें निरूपण आलें आहे तें खरें नव्हतें. भागडचुरी कांहीं एक दुखापत न होतां जो निसटला तो लपूनछपून कांहीं दिवस होता. नंतर त्यानें कारस्थान आरंभिलें. नाथराव शिंदा नांवाचा नागरशाचा एकांगवीर असा जमातदार होता. त्याचा व ठाकूर नांवाचा दुसरा एक सरदार होता त्याचा कथळा पडला. वाद मानपाना संबंधीचा होता. नाथराव म्हणे कीं ठाकूर तिस-या मानाचा नसून चवथ्या मानाचा आहे. ठाकूर म्हणे कीं आपण तिस-या मानाचे आहोंत. तिस-या मानाच्या सरदारास चवथ्या मानाच्या सरदारा च्या आधीं टिळा विडा इत्यादि देणग्या देण्याची वहीवाट लौकिक समारंभांच्या प्रसंगीं त्या काळीं असे व त्या मानपानाचा अभिलाष सरदारमंडळी मोठ्या औत्सुक्यानें धरीत. नाथराव शिंद्याचें व ठाकुराचें हें मानापमानाचें भांडण इतक्या विकोपास पोहोंचलें कीं नाथरावानें आपल्या जमातदारीच्या अधिकारांत ठाकुराचा तिसरा मान काढून टाकीला. ह्या कृत्या बद्दल नागरशानें नाथरावाचा धिःकार केला, त्या मुळें असंतुष्ट होऊन नागरशाचें व नाथरावाचें वैमनस्य पडलें. ह्या वैमनस्याचा फायदा भागडचुरीनें घेतला. भागडचुरीनें वडनगरच्या मलिकाशीं अगोदर च संधान बांधिलें होतें. त्या कडे त्यानें नाथरावाला फितवा घेऊन जाण्याची सल्ला दिली. नाथराव कागाळी घेऊन वडनगरास गेला. वडनगरच्या मलिकानें नागरशा कडे नाथरावाचा कैवार घेणारा एक भाट पाठविला. वडनगरचा मलिक म्हणजे दिल्लीचा पातशाहा जो महमद तुघलघ त्याचा हस्तक. भाट कोंकणांत नागरशाच्या दरबारीं आला व पातशाहाच्या बिरुदांची नामावळी म्हणता जाला. म्लेच्छ राजाची ती नामावळी त्या देशाभिमानशून्य व धर्माभिमानशून्य भाटाच्या तोंडची ऐकतां च नागरशाचा पुत्र जो त्रिपुरकुमर त्याच्या पायाची आग मस्तकास पोहोंचली. पहिल्या नागरशाच्या पुत्राचें नांव जसें त्रिपुरकुमर होतें तसें ह्या दुस-या नागरशाच्या पुत्राचें नांव हि त्रिपुरकुमर च होतें. त्रिपुरकुमरानें त्या भिकार भाटाचें नाक कापून त्याला गांवा बाहेर हाकून दिलें. भाट दिल्लीस गेला. पातशाहास सर्व वृत्तान्त कळला. त्यानें निका मलिक नामें सरदाराला बारा शें घोड्यां निशीं नागरशा वर पाठविलें. रात्रिच्या थंड समयीं चालावें व दिवसा दबा धरून बसावें, असें करीत करीत, पायगांवचे मोरिया वरून नौकांनीं संभुजे वर मालिक उतरला. तेथून बारा खाड्या वलांडून निका मलिक कान्हेरसि आला. तेथें युद्ध होऊन, नागरशाच्या फौजेचा पराभव झाला. तेथून ठाणें काबीज केलें. शिंवां वर उतरला. माहिमास गेला. तेथें नागरशाची राणी होती. तिशीं दहा घटिका युद्ध होऊन, निका मलिकानें राणी मारली. राजा नागरशा वाळुकेश्वरीं होता. त्याची व मलिकाची गांठ भायखळ्यास पडली. थोर युद्ध झालें. नागरशा मारिला गेला. एणें प्रमाणें निका मलिकानें ठाणेंकोंकणचें राज्य घेतलें. शक १२७० त ठाणें कोंकणांत तुर्काण झालें.

सात हातांची काठी व बारा काट्यांचा बिघा भागडचुरीनें चालू केला. चार फ-यांचा एक हारा दर देान बिघ्यास राजभाग ठरविला. एक शे अठ्ठावीस बिघ्यांचा एक चावर केला." या प्रकारें जुनी त-हा मोडून नवीन त-हेने कमावीस करूं लागला. दादाजी कोंडदेव, चतुर साबाजी, इत्यादींचीं नांवें प्रख्यात मोजणीदार म्हणून महाराष्ट्रांत सर्वतोमुखीं आहेत. त्या नांवांत भागडचुरीचें नांव हि घेण्या सारखें आहे. आपल्या नवीन मोजणीनें भागडचुरीनें बिघ्यांची संख्या वाढविली आणि दोन फ-यांच्या ऐवजीं चार फ-यांचा हारा करून, सरकारी उत्पन्न निदान तिप्पट तरी चढविलें. स्वामिकार्या तत्पर व हितार्थी म्हणून नागरशानें भागडचुरीची प्रतिष्टा परा कोटी प्रत नेली. ते समयीं, ईश्वरी इच्छा, ऐश्वर्याचा माद चढून भागडचुरांची बुद्धि फिरली. जमीनीचा सारा बेसुमार वाढविल्या मुळें भागडचुरी आधीं च लोकांद्विष्ट झाला होता. तशांत अलीकडे तो स्त्रीव्यसनीं पडला. भल्याभल्यांच्या स्त्रियां वर बलात्कार करूं लागला. कित्येकां पासून अनीतीनें द्रव्य उकळण्याचा त्यानें सपाटा चालविला, गा-हाणीं राया पाशीं पोहोचलीं. परंतु राजाची हि क्षति भागडचुरी बाळगीत ना सा झाला. शिक्षा लावावी, तर जीवास उदार म्हणून राजा हि मनीं दचके. होतां हेातां भागडचुरी इतका बेफाम झाला कीं मालाडचा लोकप्रिय देसला जो सोम त्याच्या भावाच्या लावण्यसंपन्न स्त्री वर त्याची नजर गेली. तिला बलात्कारानें हरण करण्याचा घाट भागडचुरीनें घातला. सोमदेसला, त्याचा बंधू व घरांतील सर्व पुरुष त्यानें बंदखानीं कोंडिले अणि त्या स्त्रीस काढून आणण्यास शिपाई धाडिले. इतक्यांत ही बातमी कळून, सोमदेसल्याच्या आप्तेष्टांनीं त्या स्त्रीस कु-हारास रातोरात नेली. हा प्रकार ऐकून भागडचु-यानें त्या स्त्रीच्या भ्रतारास रागानें ठार मारिलें व कु-हारास शिपाई पाठविले. तेथून ती स्त्री भाइंदरास माहेरीं गेली. चार महिन्याची गरोदर होती. भागडचुरीच्या भयानें मातृपक्षीयांनीं तिला आपल्या मामाच्या घरीं भिवंडीस पाठविली. तेथें ती प्रसूत होऊन पुत्र झाला. तो बारा वर्षांचा झाल्या वर, त्यास आपल्या पित्याच्या वधाची व भागडचुरीच्या अधमपणाची हकीकत मातृमुखें कळली. तेव्हां भाऊबिरादरांचा जमाव करून त्या मुलानें भागडचुरीला ठार मारतों म्हणून नागरशास कळविलें. नागरशास तें च हवें होतें. भागडचुरीची वासलात कोणी लाविल्यास त्याला ती हवी च होती. सोमवारच्या दिवशीं महडदेवीची यात्रा होती. देवीदर्शनास भागडचुरी जिव्हाळ्याचे बारा स्वार घेऊन गेला. त्याच्या वर त्या मुलानें व त्याच्या साथीदारांनीं हल्ला केला. दोन स्वार जागच्या जागीं च ठार झाले. राहिलेले भागडचुरी सह जे पळाले ते पायउतारा होऊन खाडींत पोहोंत चालले. खाडींत होड्या होत्या त्यां वरील एका तांडेलास मुलानें हटकिलें कीं, जर तो भागडचुरी मारशील तर मागशील तें देईन. तांडेल बोलता झाला कीं, मला आपल्या जातींत घ्याल तर भागडचुरीस ठार करतों. प्रसंग तसा च जाणोन मुलानें तांडेलाची अट कबूल केली. तेव्हां तांडेलानें पालकोयती हाणोन भागडचुरी यमसदनास पाठविला, तांडेलानें भागडचुरीचें शीर कापून त्या मुलास दिलें. तें घेऊन सर्व लोक मुक्तेश्वरीं आले. खुशाली करों आदरिली. कांहींक धर्म कलो. जातिभोजन घातलें. सूर्यवंशी व सोमवंशी पानावर बसले. तों तो तांडेल सोंवळे नेसान तेथें आला व म्हणों लागला कीं, भाष उत्तीर्ण करणें. मंडळींत कुजबुज सुरू झाली कीं कैवर्तकास जातींत कसा घ्यावा व पंक्तीस बसूं कसा द्यावा ? हो ना करतां करतां मंडळींनीं त्या कैवर्तकास पंक्तीस घेतलें व जातींत सरता केलें. नंतर मंडळी राजदर्शनास गेली. भागडचुरी मारिला म्हणून राजानें त्या मुलाचा बहुत सन्मान केला. परंतु तांडेलाशीं पंक्तिव्यवहार केला इतकें च नव्हे तर त्यास जातींत सरता केला, हें ऐकून नागरशानें मंडळीस दोष दिला व कैवर्तकाच्या पंक्तीस बसणा-या व त्याला जातींत घेणा-या सर्व लोकांचीं यज्ञोपवीतें काढून टाकविलीं. ही हकीकत शक १२६७ च्या सुमारास घडली.

लढवय्ये लोक पाहारे - क-याचा धंदा, लढण्याचा धंदा न मिळाल्यास, करतांना कालोकालीं दृष्टीस पडतात.उदाहरणार्थ, मालोजी व बाबाजी भोसले. हे प्रथम दारवठेकाराचा धंदा करीत, हें सुप्रसिद्ध आहे. तात्पर्य, पातेणे ऊर्फ पाठारे प्रभू हे मूळचे लढवय्ये लोक होते व हे पोलिसाचा व पाहारेक-याचा धंदा करीत असत. बिंबदेव जाधवानें ह्या लोकांना देवगिरी प्रांतांत असतांना आपल्या तैनातींत खास रक्षणा करितां ठेविले व कोंकणा वर स्वारी करण्याच्या प्रसंगीं कोंकणांत आणिले. कोंकणांत आल्या वर गांवोंगांवचे हे प्रभू झाले. हें प्रभूपण त्यांनीं फक्त ३८ वर्षे भोगिलें आणि उच्च मुत्सद्देगिरी किंवा उच्च शिपायगिरी करण्याचें कौशल्य आंगी असावें तसें नसल्या मुळें किंवा उत्कट प्रतिबंध आडवे आल्या मुळें, हे उत्तरोत्तर अगदीं खालावत गेले. कायस्थ प्रभूंची हि अशी च दुर्दशा झाली. सोमेश्वर शिलाहाराच्या दहा पंधरा वर्षांच्या अमदानींत उदयास येऊन हे पेणपनवेलमहाड प्रातांत गांवगन्ना प्रभू झाले व दहा पंधरा वर्षे प्रभूपण भोगिल्या वर जे खालावले व इतिहासांतून अदृश्य झाले ते पुनः मराठेशाहींत किंचित् उदयास आले. ह्या दोघां हि प्रभूंचा उत्कर्षकाल अनुक्रमें पंधरा व अडतीस वर्षांचा अल्पावधिक असल्या कारणानें ह्यांना धुरंधर, जैवन्त, रणदिवे, चौबळ, धराधर, समर्थ, इत्यादि भपकेबाज उपपदें कशीं व कधीं मिळालीं ह्या बाबीची आठवण हि बुजून गेली आणि प्रस्तुत बखरीचा टेंकू जर न मिळता तर हे कोण व कोठील ह्या बाबीचा पत्ता हि न लागता. भरतखंडांतर्गत सह्याद्रिखंडातील समुद्रतीराच्या पन्नास शंभर मैलाच्या टापूंत धूमकेतुवत् किंचित्काल चमकून कालाच्या व अनितिहासाच्या काळोखांत ह्यांची आदि जी शेकडों वर्षे लपाली ती प्रस्तुत बखरीच्या व केशवाचार्यादींच्या कृपाप्रसादानें पुनः आधुनिक इतिहासादर्शांत प्रतिबिंबायमान होत आहे.

२१. शक १२५४ त प्रतापशा जाधवाचा पेणपनवेलादि प्रांत नागरश्यानें आपल्या राज्यास जेव्हां जोडला, तेव्हां भोंवतालील परिस्थिति एणे प्रमाणें होती. देवगगिरीचें यादवांचें साम्राज्य शक १२४० त मुसुलमानांच्या हातीं जाऊन १४ वर्षे लोटलीं हेातीं. अणहिलपाटणचें वाघेल्यांचें राज्य शक १२२० त मुसुलमानांच्या कबज्यांत जाऊन ३४ वर्षे झालीं होतीं. सोमेश्वर शिलाहाराचा वध महादेव यादवाच्या हस्तें होऊन व शिलाहारसत्ता शक ११९० च्या सुमारास कायमची नष्ट होऊन साठा वर कांहीं वर्षे गेलीं होतीं. गोव्याच्या कदंबांची रियासत शक ११९० च्या सुमारास च नष्ट झाली. उत्तरकोंकणांत माहीम, ठाणे व चेऊल येथें राज्य करणारा नागरशा तेवढा देशी संस्थानिकां पैकीं किंवा आतां स्वतंत्र राजां पैकीं शिल्लक राहिला. खालतीं दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरीं विजयानगरास संगम राज्य स्थापण्यास लागून दहा पांच ष झालीं असतील नसतील, असें सर्वत्र तुर्काण प्रवर्तमान झालें असतां, शक १२५४ त नागरशा ठाणेंकोंकणांत राज्य करूं लागला. प्रतापशा जाधवाशीं लढतांना ज्या सरदारांनीं कष्टमेहनत बहुत सोशिली व पराक्रम विशेषात्कारें केला त्यांना नागरशानें बहुता प्रकारें गौरविलें. आंधेरीकराला छत्री दिधली. वारणें व वांदरे नांवाजिले. साहारकर व पालवणकर हे हातसांखळ्या (सोन्याचीं कडीं) पावले. जैतचुरी नांवाचा राजाचा पाळकपुत्र होता, त्यानें गेल्या युद्धांत पराकाष्ठेची बहादूरकी गाजविली, सबब यास दळाची नाइकी दिली व येसाव्या भोंवतील चौफेर बंदरकीचा मामला सुपूर्द केला. कालान्तंरानें हा जैतचुरी इतका फुशारून गेला कीं, येसावें तो आपल्या च मतें प्रवर्तवूं लागला व नागरशाला विचारीत ना सा झाला. जैतचुरीचा पुत्र भागडचुरी नामें होता. तो तर बापाहून हि कांकणभर जास्त चढेल निपजला. " दालिबंद नाय कवडा यशवंत होता. बहुता युद्धां मध्यें जयो पावला. म्हणोन रायानें सेनाधिपति केला. तेणें कितीएक कार्ये रायाचीं बहुते प्रकारें उत्तमान्वयें यथापुरुषार्थी सिद्धि पावविलीं. ऐसें जाणोन राया नागरशानें त्यास साष्टीचा कारभार दिधला. त्यानें जमीनीची मोजणी केली.

                                               " तद् यथा राजानं आयान्तं उग्रा: प्रत्येनसः सूतग्रामण्यः
                                                अन्नैः पानैः आवसथैः प्रतिकल्पन्ते अयं आयाति अयं
                                                आगच्छति इति; एवं ह एवंविदं सर्वाणि भूतानि
                                                प्रतिकल्पन्ते इदं ब्रह्म आयाति इदं आगच्छति इति ।। ३७ ।।
                                                तद् यथा राजानं प्रयियासन्तं उग्रा: प्रत्येनस: सूतग्रामण्यः
                                                अभिसमायन्ति; एवं एव इमं आत्मानं अंतकाले सर्वे प्राणाः
                                                अभिसमायन्ति यत्र एतद् ऊर्ध्वोच्छासी भवति ।। ३८॥"

                                                                                अर्थ
ज्याप्रमाणें येणार येणार म्हणून येणा-या राज करितां अन्न, पाणी व तंबू यांची तयारी उग्र, प्रत्येनस् , सूत व ग्रामणी करतात; त्या प्रमाणें हें ब्रह्म येत आहे, हें आलें, असें म्हणून सर्व भूतें एवंविदा करितां तयारी करून असतात ।। ३७ ॥
ज्या प्रमाणें जाणा-या राजा पुढें उग्र, प्रत्येनस् , सूत व ग्रामणी एकत्र गोळा होतात; त्या प्रमाणें, अंतकालीं प्राणी उर्ध्वश्वासी होतो तेव्हां आत्म्या पुढें सर्व प्राण गोळा होतात ।। ३८ ॥

त्या दोन कंडिकांत उग्र, प्रत्येनस्, सूत व ग्रामणी, ह्या चार कामदारांचा निर्देश केलेला आहे. ग्रामणी म्हणजे गांवाचा गावुंडा, मुख्य पुढारी इत्यादि. सूत म्हणजे रथकार, भाट, उग्र म्हणजे लढाऊ शिपाई. आणि प्रत्येनस् म्हणजे चोराचिलटांचा बंदोबस्त करणारा पोलिस. शंकराचार्य ह्या शब्दांचा असा अर्थ देतातः--उग्रा: जातिविशेषाः क्रूरकर्माणो वा । प्रत्येनस: प्रति प्रति एनसि पापकर्मणि नियुक्ताः प्रत्येनसः तस्करा-दिदंडनादौ नियुक्ताः । सूताः चे ग्रामण्यः च सूतग्रामण्यः । सूता: वर्णसंकरजातिविशेषाः। ग्रामण्य: ग्रामनेतारः । ग्रामणी अन्नपाण्याचा पुरवठा करी; सूत तंबू, रथ वगैरेंच्या दुरुस्तीच्या कामीं उपयोगी पडे; उग्र रखवालदारीचें कार्य संपादी; आणि प्रत्येनस् चोराचिलटां पासूनचें भय निवारी. उग्राः, प्रत्येनसः, सूताः, ग्रामण्यः हे सर्व शब्द अनेकवचनी आहेत. तेव्हां उघड च झालें कीं, शिपाई, गांवचे पुढारी, दागदुजी करणारे रथकार व पोलीस हे राजाची सरबराई करणारे लोक अनेक असत. ब्रहदारण्यकोपनिषद्रचनाकालीं ग्रामणी व प्रत्येनस् ह्या कामदारांच्या जाती बनल्या नव्हत्या. त्या कालीं सूत व उग्र ह्यांच्या देखील जाती बनल्या होत्या किंवा नाहीं, हें निश्चयानें सांगवत नाहीं; बहुशः जाती बनल्या नसाव्या. शंकराचार्य सूत व उग्र हे संकरजातिवाचक शब्द आहेत म्हणून म्हणतात. परंतु स्वकालीन अर्थ उपनिषत्कालीन शब्दांना लाविण्याची ते चुका करीत आहेत, हें उघड दिसतें. ग्रामणी, सूत, उग्र व प्रत्येनस् ह्या चार शब्दां पैकी प्रत्येनस् ह्या शब्दाशीं सध्यां आपणास कर्तव्य आहे. प्रत्येनाः ह्या शब्दा चा मराठींत अपभ्रंश पातेणा असा झाला आहे. असा त्य चा ते प्रांतिक, अशिष्ट व प्राचीन मराठींत होतो. प्रत्येक=प्रतेक, अत्यन्त=अतेन्त, सत्य=सते, इत्यादि अपभ्रंश स्टेफेन्स च्या खिस्तपुराणांत हवे तितके सांपडतील आणि अशिष्ट लेाकांत तर अद्याप हि ऐकूं येतात. तात्पर्य, पातेणा हा शब्द प्रत्येनस्-प्रत्येनाः ह्या जुनाट संस्कृत व वैदिक शब्दाचा अपभ्रंश आहे. प्रत्येनस् म्हणजे पोलिस शिपाई. पातेणे ह्या शब्दाच्या जोडीचा च पाठारा हा शब्द आहे. हा शब्द प्रतीहार: या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. प्रतीहार:=पडीहारा=पाठारा. प्रतीहार म्हणजे दारवठेकार, द्वाररक्षक, पाहारेकरी. पातेणे पोलिसाचें जसें काम करीत तसा च पाहारेक-याचा हि धंदा करीत. सबब, हे लोक आपणाला पातेणे जसे म्हणवीत तसे च पाठारे हि म्हणवीत. पालिसाचा व पहारेक-याचा धंदा करणारे हे लोक आयुधजीविसंघां पैकीं असत.

लेखांक २८६                                                                      श्री                                                                     १६५१ फाल्गुन शुध्द ४                                                                                                                                                        

राजश्री देसाई व देशपांडे वर्तमान व भावी सुभा प्रांत दाभोल गोसावियांसि

2 1 अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य

श्नो सेखोजी आंगरे सरखेल रामराम सु॥ सलासीन मया व अलफ राजश्री नारो कृष्ण उपनाम जोशी शाडिल्य गोत्र हे स्वामीच्या राज्यातील पुरातन सेवक सेवा एकनिष्टेने केली त्याउपरी सेवा सोडून आपला काल सार्थक व्हावा याजकरिता स्नानसध्या करून ईश्वरभजनी लागले याची योगक्षेमाची अनकूलता करून दिधल्याने स्वामीच्या राज्यास श्रयस्कर याकरिता विशालगडचे मुकामी कैलासवासी                छत्रपति स्वामी याणी कसबा मुरुड ता। पचनदी प्रा। मजकूरपैकी लारी दाभोली लारी ४०० च्यारसे लारी पुत्रपौत्री वृती करून दिल्ही प्रस्तुत नारो कृष्ण याणी वैकुठवास केला त्याचे पोटी सतत नाही याकरिता त्याचे भाउ राजश्री माहादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण व पुतणे राजश्री बालाजी माहादेव व कृष्णाजी माहादेव व नातू नारो रामचद्र याणी हुजूर जाऊन विनति केली श्रीमंत राजश्री              छत्रपती स्वामींची राजपत्रें आणिली व हाली राजश्री बालाजी माहादेव कुलाबाचे मुकामी येऊन रदबदल केली त्यावरून कसबे मा।री वृत्तीपत्र लारी च्यारसे करून द्यावा त्यास कसबे मजकुरी बहुतेक वतनदारांची सेते सदरहू लारीची बेरीज न भरे याजकरिता बेरिजेची भरती करून दिल्ही असे

कसबे मुरुड येथील खुदवाडी नि॥                           मौजे कुंभवे ता। जालगाव येथील खराब
माहादेव केसमाजी थथे याजबा। निमे                     जमीनपैकी नेमून देणे लारी दाभोली
आगर मा।रनिले- कडे आहे तो आगर                     लारी २७५
यांजकडील असे त्या आकारपैकी
लारी 
१२५

एकूण च्यारसे लारींची वृती करून दिली असे यासि पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने करार करून हे पत्र तुह्मास सादर केले असे सदरहूप्रो। वृती चालवणे साल दरसाल ताजा सनदेचा उजूर न करणे या सनदेची प्रती लेहून घेऊन मुख्यपत्र बालाजी माहादेव व नारो रामचंद्र 286व कृष्णाजी माहादेव व श्रीधर गोविंद यास भोगवटियास परतोन देणे जाणिजे रा। छ ३ माहे साबान

                                                                           269 1