Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
महिकावती (माहीम)ची बखर
चांद्रसेनीय ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ चांद्रसेनिसंबंधक जो तो. चंद्रसेनस्य अपत्यं चांद्रसेनिः असा चांद्रसेनि या शब्दाचा अर्थ होतो. चंद्रसेन नामें कोणी राजा. त्याचा पुत्र चांद्रसेनि. तत्संबंधक जो तो चांद्रसेनीय. चांद्रसेनीय कायस्थ म्हणजे चंद्रसेन राजाचा पुत्र जो चांद्रसेनि त्याचे कायस्थ म्हणजे कुळकरणी. हा चंद्रसेन राजा कोण ? उत्तरकोंकणीय शिलाहारांच्या वंशांत अगदीं शेवटलें नांव सोमेश्वर शिलाहाराचें येतेंह्. हा सोमेश्वर शिलाहार शक ११७१ व शक ११८१ त हयात होता. ह्याचा प्राण व राज्य यादव चक्रवर्ती जो देवगिरीचा महादेव (शक ११८२-शक ११९३) त्यानें घेतलें. सोम म्हणजे चंद्र व सोमेश्वर म्हणजे चंद्रसेन. सोम, चंद्र, इंदु, शशांक, हे एका च नांवाचे व अर्थाचे प्रतिशब्द ग्रंथकार व कवि सररहा योजत. असें दिसतें कीं सोमेश्वर ऊर्फ चंद्रसेन शिलाहारानें आपल्या पुत्राच्या अधिकारी खालीं, इतर सर्व आधार सुटल्या वर, कायस्थां करवीं आपला राज्यशकट चालविण्याचा उपक्रम केला. सोमेश्वर शिलाहाराचे सर्व अधिकारी कायस्थ जातींतील व्यक्ती झाले. कायस्थांच्या साहाय्यानें सोमेश्वर शिलाहार राज्य करीत असतां, त्याचा प्राणान्तक पराभव महादेव यादवानें केला. त्या वेळीं सोमेश्वराच्या ताब्यांत पेण, पनवेल, महाड इत्यादि कोंकणप्रांत राहिला होता. माहीम वगैरे उत्तरे कडील प्रांत नागरशा कडे हेाते. सोमेश्वराच्या पेण, पनवेल, महाड या प्रांतांत कायस्थ जे एकदा स्थापित झाले ते अद्याप पर्यंत त्या प्रांतांत बाहुल्यानें वसती करून आहेत. महादेव यादवानें सोमेश्वर शिलाहाराचें राज्य खालसा केल्या नंतर, रामचंद्र यादवाच्या कारकीर्दीत बिंबदेव यादव आपल्या पातेणे सरदारांस घेऊन माहीम प्रांत आक्रमून राहिला व कायस्थांची जागा पातेण्यांनीं भरून काढिता झाला. सोमेश्वर शिलाहाराच्या कारकीर्दीस कायस्थ लोक गांवोगांवचे दहा पंधरा वर्षे प्रभू म्हणजे इजारदार व मोकाशी झाले होते. त्यांच्या जागीं बिंबदेवाचे पातेणे सरदार तीस चाळीस वर्षे प्रभू झाले. ठाणे, पेण, चौक व महाड या च लहानश्या टापूंत चांद्रसेनीय ऊर्फ सोमेश्वरीय कायस्थ प्रभू कां सांपडतात व माहीम प्रांतांत च तेवढे पातेणे प्रभू कां सांपडतात, ह्या बाबींचा खुलासा हा असा आहे. कायस्थांचें व पातेण्यांचें विळ्याभोपळ्या एवढें सख्य कां त्याचा हि उलगडा वरील तपशिला वरून उत्तम होतो. कायस्थांचें पातेण्यांनीं उच्चाटण केल्या मुळें, पातेण्यांच्या संबंधाच्या लिखाणांत कायस्थां संबंधानें किंचित् उल्लेख करणें प्रसंगप्राप्त झालें. कायस्थांना येथें च सोडून, पातेण्यांच्या प्राचीन इतिहासाचा धागा पुन: धरूं. पातेणे प्रभू पैठण, चांपानेर वगैरे प्रांतांतून कोंकणांत आले ही हकीकत बखरींत आली च आहे. प्रभू हें पद पातेण्यांना केव्हां व कसें प्राप्त झालें हें हि बखरींच्या अनुरोधानें आपणास कळून चुकलें. आतां पातेणा व पाठारा हीं दोन विशेषणें ह्या लोकांच्या नांवा मागें कां लागतात त्याचा शोध करूं. सध्यां पाताणी असा उच्चार प्रचारांत बाहुल्यानें आढळतो. परंतु हा अपभ्रंश अर्वाचीन आहे. प्राचीन उच्चार पातेणा होता. पाताणा हा उच्चार खरा व प्राचीन धरून, पातानप्रस्थ ह्या ग्रामनामा वरून पाताणा व पाठारा हे शब्द व्युत्पादण्या कडे माझी प्रवृत्ति पूर्वी झाली होती. परंतुं, प्राचीन उच्चार पातेणा असा एकारयुक्त आहे, हें जेव्हां तोंडी व लेखी पुराव्यानें माझ्या ध्यानांत आलें तेव्हां पातानप्रस्थ ह्या ग्रामनामा वरून व्युत्पत्ति सिद्ध करण्यानें काम भागणार नाहीं हें स्पष्ट होऊन चुकलें. बृहदारण्यकोपनिषदाच्या चवथ्या अध्यायाच्या तृतीय ब्राह्मणाच्या परिसमाप्तीस खालील दोन कंडिका आहेतः--
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८५ श्री १६४४ भाद्रपद शुध्द १३
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ४९ शुभंकृत नाम संवत्सरे भाद्रपद शुध त्रयोदसी मंदवार क्षत्रिकुलावतंस श्रीराजा शंभु छत्रपति स्वामी याणी समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री कान्होजी आंगरे सरखेल यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री नारो कृष्ण उपनाम जोशी शांडिल्य गोत्र हे स्वामीच्या राज्यातील पुरातन सेवक या राज्यात निस्टेने सेवा केली त्याउपर सेवा सोडून आपला काल सार्थक व्हावा याकरिता स्नानसध्या करून ईश्वरभजनी लागले याची योगक्षेमाची अनुकूलता करून दिधल्याने स्वामीस व स्वामीच्या राज्यास श्रेयस्कर याकरिता विशालकडचे मुकामी कैलासवासी थोरले स्वामी कसबा मुरूड ता। पचनदी प्रा। दाभोल पैकी त्कारी दाभोली लारी ४०० च्यारसे पुत्रपौत्री वृती पूर्वी राजश्री सिवाजी राजे दाजी याणी दिल्ही प्रस्तुत नारो कृष्ण याणी वैकुंठवास केला त्याचे पोटी सतत नाही याकरिता त्याचे भाव राजश्री माहादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण व पुतणे राजश्री बालाजी माहादेव व रामचंद्र माहादेव व कृष्णाजी माहादेव याणी विनति केली व पत्रे आणून दाखविली सदरहू च्यारसे लारीची वृती आपणास उतरोतर चाले ऐसी आज्ञा करावी त्यावरून सदरहू वृती यासि पुत्रपौत्रादिवसपरंपरेने करार करून हे आज्ञापत्र तुह्मास सादर केले आहे तरी तुह्मी हे वृत्त यास नेमून देउनु वंसपरंपरेने चालवणे साल दर साल ताजा सनदेचा उजूर न करणे या सनदेची प्रती लेहून घेउनु मुख्यपत्र माहादाजी कृष्ण गोविंद कृष्ण व बालाजी माहादेव व रामचंद्र माहादेव व कृष्णाजी माहादेव व श्रीधर गोविंद याजवल भोगवटियास परतोन देणे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असो
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८४ श्री १६४४ भाद्रपद शुध्द १३
नकल
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४९ शुभकृत नाम संवछरे भाद्रपद शुध्द त्रयोदसी सोमवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपति स्वामीयाणी मुद्राधारी व कारकून किले सुधागड यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री माहादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण उपनाम जोतिशी गोत्र शांडिल्य सूत्र आश्वलायन हे स्वामीचे पुरातन सेवक तीर्थरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामीपासून बहुत नेष्ठेने सेवा केली व तीर्थस्वरूप राजश्री संभाजी राजे काका याची सेवा केली व त्याउपर तीर्थरूप राजश्री कैलासवासी स्वामी चजीस असता ताम्राचे सकट प्राप्त जाले ते समई माहादाजी कृष्ण हे सताजी घोरपडे व जाधवरायासमवेत फौजा घेऊन गेले तेसमई विशेषात्कारे सेवा केली याकरिता यावरी राजश्री कैलासवासी स्वामी कृपालू होऊन चजीचे मुकामी यास मोजे खवली ता। पाली हा गाव कुलबाब कुलकानु खेरीज हकदार व इनामदार करून जलतरुपाषाणिनिधिनिक्षेपसहित हाली पटी व पेस्तरपटी देखील इनाम अजरामर्हामत देऊन सनदा दिल्या त्यावरी मा।रनिलेनी व त्याचे पुत्र राजश्री बालाजी माहादेव याणी राजश्री सिवाजी राजे दाजी याची सेवा केली त्याजवरून त्याणी हि मौजे मजकूर यास इनाम चालवावयासी आज्ञा करून पत्रे दिल्ही त्याप्रमाणे गाव यास इनाम चालत च आहे ऐशास माहादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण बालाजी माहादेव व रामचद्र माहादेव व कृष्णाजी माहादेव हे स्वामीचे एकनिष्ट सेवक याबाबे बालाजी माहादेवयाणी वडील- वडलापासून स्वामीचे सेवा एकरूप निष्टेने केली व हाली करीत आहेत याचे चालवणे स्वामीस आगत्य याकरिता तीर्थरूप राजश्री कैलासवासी स्वामीनी मौजे खवली ता। मजकूर हा गाव चजीचे मुकामी माहादाजी कृष्ण यास इनाम वशपरपरेने इनाम दिल्ह्याप्रमाणे स्वामीनी हि चालवावयाची आज्ञा करून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मी मौजे मजकूर यास पुत्रपौत्रातिद वशपरपरेने इनाम चालवीत जाणे या पत्राची प्रती लेहून घेऊन असल पत्र भोगवतटियास परतोन देणे निदेश समक्ष (सिका)
रुजु
सुरु सूद बार
सिका सिका
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८३ श्री १६२९ आषाढ वद्य ८
कृष्णराऊ ठाणेदार खटाऊ वगैरे
सुरत महजर बतारीख २१ माहे रबिलोवल सु॥ सन १११७ हाजीर मल्यालसी बितपसील
सुभानजी घाटगे हा। देसमुखी का। लावगुण
माणाजी फडतरे देशमुख पा। खटाऊ
या हुजूर राघो सखदेऊ व मलार बुलगो देशपांडये पा। खटाऊ यासि लिहून दिधला सुरत मजलश ऐसी जे तुह्मामधे व विसाजी कासी व विठल बापोजी अथर्वेदी यामधे पा। मजकूरचे देसापाडयेपणाचा कथळा लागोन तुह्मी दिवाणात उभे राहिलेत आणि तुह्मी आपली हकीकत जाहीर केली की परगणेमजकूरचे देशपाडयेपण व गांवकुलकर्ण देह सुमार १८ अठरा व जोतिसी देह १७ सतरा आपली मिरास आपले वडील अनभवीत आले दरमियाने खान अजम अबरखान याचे कारकीर्दीस विसाजी कासी व विठल बापोजी याचे वडील आमचे वतनास मुजाहीम जाले ते वखती त्याचा व आमचे वडिलाचा वेव्हार किलेखजाम जाला तेथें अथर्वेदी खोटे जाले आमचे वडील खरे मग तेथील थलपत्र घेऊन आमचे वडील गावास आले त्यावर परगणे मजकूरचे देशकाचा महजर जाला तो महजर व आणीख देसमुखाचे कागद आपणाजवळी हाली आहेत ते साहेबी मनास आणून बरहक्क निवाडा केला पाहिजे ह्मणून जाहीर केले त्यावरून अबरखानाचे वखतीचा महजर व देसमुखाचा कौल व शर्तनामा ऐसे कागद व हकीकत मनास आणून तुह्मास व त्यास गोत दिधले गोताने तुमचे महजर व कागदपत्र व हकीकत व अथर्वेदियाची हकीकत मनास आणून तुह्मा हरदो ववादियास श्री कृष्णेची क्रिया नेमिली आण हरदूजणाचे राजीनामे घेऊन राजश्री राघो मुरार दिवाण व परगणेमजकूरचे देसक व परगणे हयअल देसमुख व देशपाडये व मोकदम गावगणा याबरोबर तुह्मा दोघा वादियास देऊन श्री कृष्णातीराम नजीक श्री सिवनाथदेऊ का। रहिमतपूर क्रियेस नेमून पाठविले थलस जाऊन परगणेमजकूरचे पटेल व गोत यांनी दशरात्र व पंचरात्री लिहून घेऊन दोघे वादी श्री कृष्णेत उभे केले आणि पटेलास व गोतास दिवाणे हुकुम केला की तुमचा वतनदार देसपाड्या जो कोण खरा असेल त्यास हाती धरून बाहेर काहाडणें ह्मणून हुकूम केला त्यावरून पटेल व बाजे गोत परगणेमजकूर यानीं जाऊन विसाजी कासी व विठल बापोजी यास हातीं धरिले आणि माघारे मुरडले ते वेळेस अडखलोन कृष्णेत च पडले बितपसील
कृष्णाजी उबल पाटील मोकदम राचपा मेहतर सदी का। खटाऊ १
मौजे दरूज १
एणेप्रमाणे दोघेजण अडखलोन पडिले तेव्हा च तुह्मी कुल मजालसीस जाहिराना केला परतु कोणे खातरेस आणिले नाहीं त्यावर दसरात्र-पंचरात्रीमधे त्यास क्रिया लागली बितपसील
अथर्वणास क्रिया लागली → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
एणेप्रमाणे क्रिया लागली ते मनास आणून रुगवेदी यास व अथर्वणास रांगणियास रवाना केले असे हा सुरत महजर लिहून दिल्हा सही मोर्तब सूद
महिकावती (माहीम)ची बखर
२०. राज्यभ्रंशा नंतर व प्राणहरणा नंतर प्रतापशाचें नांव हि काढण्याचें कारण बखरकाराला राहिलें नाहीं. त्याच्या पातेणे सरदारांचें हि नांव ह्या नंतर बखरींत कोठें आलेलें नाहीं. त्या वरून दिसतें कीं, हे पातेणे प्रभू कसे तरी माहीम बेटांत जीव कंठून कालक्रमणा करीत असावे. शक १२१६ पासून शक १२५४ पर्यंतचीं ३८ वर्षे पातेणे प्रभू माहीम बेटांत मोठ्या ऐश्वर्यानें नांदले. तदनंतर ते जे कायमचे खालावले त्यांतून त्यांनीं पुढें आजपर्यंत राजकीय दृष्ट्या वर डोकें म्हणून कधीं च काढिलें नाहीं. सरदारकी सोडून अथवा सरदारकी सुटून कायमचें कारकूनमत व कारकूनवृत्ति त्यांनीं स्वीकारिली, असा विलाप केशवाचार्यानें केलेला बखरींत नमूद आहे. पातेणे ऊर्फ पातेणे प्रभू शक १२१५ त उत्तरकोंकणांत बिंबदेव जाधवाच्या अनुषंगानें आले ही बाब निश्चित असल्या मुळें, कायस्थ प्रभूंच्या उत्तरकोंकणांतील आगमनकाला प्रमाणें पातेणे प्रभूंच्या आगमनकाला संबंधानें कोणत्या हि प्रकारची अनिश्चितता नाहीं. शक १२१५ पूर्वी कोणी हि पातेणा प्रभु उत्तरकोंकणांत नव्हता, इतर जातींचे प्रभू होते, परंतु पातेणे प्रभू नव्हते. प्रभू म्हणजे काय तें येथें सांगितलें पाहिजे. प्रभु म्हणजे गांवचा इजारदार, जमीदार किंवा मोकासदार. हा प्रभु नांवाचा अमलदार राजानें नेमिलेला असे. ग्रामाधिकारी जो ग्रामस्थापनारंभींचा ग्रामकूट ऊर्फ गाउंडा तो स्वयंभू असून, त्याची वृत्ति वंशपरंपरा चालणारी असे, राजदत्त नसे, इतकेंच नव्हे तर लोकदत्त हि नसे, प्रभुपणा राजदत्त असल्या मुळें, त्याची शाश्वती राजाच्या मर्जी वर राही. राजा दुर्बल झाला असतां किंवा राजक्रांति झाली असतां, प्रभु वंशपरंपरात्वाचा हक्क सांगण्या कडे प्रवृत्ति दाखवी. परंतु ती प्रवृत्ति नवा राजा ताबडतोब खोडून काढी. तत्रापि कित्येक इजारदार व त्याचे वंशज वैशिष्ट्या करितां किंवा बडेजावी करितां, प्रभुपणाचा अधिकार हातून गेला असतां हि, आपल्या नांवा पुढें प्रभू हें उपपद आडनांवा दाखल जोडीत व त्या जोडीच्या आड कोणी फारसा येत नसे. सध्यां पारशांत ब्राह्मणांत व इतर जातींत घराण्याच्या मूळ संस्थापकाच्या धंद्याचें नांव-बाटलीवा कूपर; देशपांडे, पंडित, पुराणिक--ज्या प्रमाणें आडनांवा दाखल व्यक्तिनांवा पुढें जोडतात; त्या प्रमाणे च पूर्वी मूळपुरुषानें कधींकाळीं केलेल्या प्रभुपणाचा दर्शक जो प्रभु शब्द तो आपल्या नांवा पुढें कित्येक घराणी माहीम प्रांतांत लावतात. ही घराणीं बिंबदेव जाधवाच्या काळीं सर्व पातेण्यांचीं हेातीं, सबब सर्व पातेणे आपणास प्रभु म्हणवितात आणि वैशिष्ट्या करितां पातेणे प्रभू ही संज्ञा धारण करतात. कारण जवळच्या पेण, पनवेल व महाड प्रांतांत प्रभू हें उपपद चांद्रसेनीय कायस्थ हि आपल्या जातीला लावतात. पातेणे हे ज्या प्रमाणें माहीमप्रांतीं गांवांचे प्रभू शक १२१५ नंतर बिंबदेव जाधवाच्या कारकीर्दीत झाले, त्या प्रमाणें पेणपनवेलमहाडप्रांतांत कायस्थ हे केव्हां तरी तत्रस्थ गांवांचे प्रभू झाले. एणे प्रमाणें उत्तरकोंकणांत दोन प्रकारचे प्रभू अस्तित्वांत आले; पातेणे प्रभू व कायस्थ प्रभू. पातेणे प्रभू म्हणजे पातेणे जातीचे प्रभू व कायस्थ प्रभूं म्हणजे कायस्थ जातीचे प्रभू. राजापूरप्रांतीं कित्येक क-हाडे ब्राह्मण प्रभु उपपद धारण करणारे आहेत; परंतु तें उपपद देसाई या आडनावांच्या पाठी मागें जोडलें जातें, स्वतंत्रपणें आडनांव म्हणून किंवा जातिनाम म्हणून योजिलें जात नाहीं. प्रभुदेसाई हें आडनांव क-हाड्यात आहे. गांवचा प्रभुपणाचा अधिकार ज्या देसायांच्या पूर्वजांनी कधींकाळीं भोगिला त्यांचे वंशज आपणांला प्रभुदेसाई म्हणवितात. सर्व क-हाड्या ब्राह्मणांना प्रभुपणाचा अधिकार केव्हां हि मिळाला नसल्या मुळें, प्रभु हें उपपद क-हाड्यांत जातिवाचक झालेलें नाहीं. परंतु मूळचे कोंकणांत आलेले सर्व पातेणे व सर्व कायस्थ कोंकणांतील गांवांचे एके काळीं प्रभू झाल्या मुळें, प्रभू व पातेणे आणि प्रभू व कायस्थ ह्या शब्दांचें सामानाधिकरण्य झालें. प्रभु हें नांव ज्या प्रमाणें अधिकाराचें वाचक होतें त्याच प्रमाणें कायस्थ हें हि नांव एका कनिष्ट अधिकाराचें वाचक होतें. काय म्हणजे गांवचा वसूल. काया वर स्थापिलेला जो अधिकारी तो कायस्थ. कायस्थ प्राचीन कालीं ब्राह्मण वगैरे वाटेल त्या साक्षर जातीचे असत. शक ११०९ च्या परळ येथील दुस-या अपरादित्याच्या शिलालेखांत वालिग पंडित नांवाच्या ब्राह्मणाला कायस्थ हें विशेषण लाविलेलें आहे. तात्पर्य कायस्थ म्हणजे कुळकरणी ऊर्फ कुलकरणिक. इतर जातींच्या कायस्थां पासून स्वत:स विशेषिण्याची अपेक्षा जेव्हां प्रभु कायस्थांस भासूं लागली, तेव्हां त्यांनीं आपल्या नांवा पाठी मागे दुसरें एक विशेषण जोडलें. तें विशेषण चांद्रसेनीय हें होय.
महिकावती (माहीम)ची बखर
१९. एणे प्रकारें मुलूख आबादान करोन बिंबदेव जाधवानें राज्याची बंदिस्ती केली व माहीम जागा उत्तम रम्य स्थळ देखोन तेथें राजधाम स्थापिलें, बिंबदेवास दोन स्त्रिया. प्रथम राणीचें नांव नागरसिद्धि. द्वितीय राणीचें नांव गिरिजा. दोन पुत्र. वडिल पुत्राचें नांव प्रतापशा. धाकट्या पुत्राचें नांव पुरशा. शक १२१७ त माहिमास बिंबदेवानें राजधानी स्थापिली. बखरींत (पृष्ट ८९) राजधानी स्थापण्याचा शक १२२७ दिला आहे तो चुकला आहे, तेथें शक १२१७ पाहिजे. कारण, बिंबदेव शक १२१६ पासून ९ वर्षे १ मास व १४ दिवस राज्य करून शक १२२५ त शांत झाला. ह्या च बिंबदेवाचें नांव मुसुलमानी तवारिखांत भीमदेव म्हणून लिहिलें असल्याचा भास त्या तवारिख वाचणा-या आधुनिक इंग्रज लेखकांस झाला. कारण बिंब ह्या शब्दाचें फारसींत ज्या अक्षरांनीं अवतरण केलें जातें त्या अक्षरांचें वाचन बिंब, बीम्ब, बीम, भीम, असें चार सहा प्रकारांनीं होण्याचा संभव आहे. शक १२२५ ते बिंबदेव वारल्या उपर, त्याचा ज्येष्ठ पुत्र प्रतापशा गादी वर आला. प्रतापशा गादी वर आला तेव्हां वृद्ध रामदेवराव जाधव दक्षिणापथाचा नामधारी सम्राट होता. चेऊल ऊर्फ चंपावती येथे रामदेवरावाहून हि वृद्धतर असा नागरशा सत्तर ऐशीच्या घरांत गेलेला असून त्याचा पुत्र त्रिपुरकुमर यानें पन्नाशीचा उंबरठा नुकता च वलांडला होता. नागरशाचा दुसरा पुत्र केशवदेव त्रिपुरकुमरा हून चार पांच वर्षांनीं लहान असून, त्याचा नागरशा नामें करून पुत्र वयांत आलेला असावा. वृद्ध नागरशानें आपली एक मुलगी स्नेहवृद्धि स्तव प्रतापशास दिली होती. तथापि ह्या शरीरसंबंधानें चंपावतीकराचा व माहीमकर प्रतापशाचा वैरभाव शांत न होतां, तो जास्त च दुणावत चालला होता. वर्धमान वैरभावाचें कारण असें होतें कीं प्रतापशाचा आजा जो रामदेवराव जाधव त्याचा नूर अल्लाउद्दीनानें इतका कांहीं उतरला होता कीं तो अल्लाउद्दीनाचा कारभार देणारा क्षुद्र मांडलिक बनला होता. अर्थात् संकटसमयी कोंकणच्या प्रतापशाला साहाय्य करण्याची ताकत त्याच्या ठाईं फार च अल्प होती. पारडें असें फिरल्या मुळें नागरशा व त्रिपुरकुमर यांनीं एक कुरापत काढिली. येडक-मेढालगड नांवाचा प्रतापशाचा एक डोंगरी किल्ला त्रिपुरकुमरानें व केशवदेवानें आपला मेव्हणा जो प्रतापशा त्या जवळ मागितला. प्रतापशानें ही मागणी फेटाळून लावली. लढाईला हें कारण बस्स होऊन त्रिपुरकुमरानें प्रतापशाच्या प्रांता वर स्वारी करण्याची जंगी तयारी केली. प्रतापशाची ह्या वेळीं लढाईंची जशी साधनासिद्धि असावी तशी नव्हती. सबब रामदेवराव जाधवा कडे त्यानें मदत मागितली. रामदेवराव जाधवानें जीवननाईक सांवखेडकर व हेमपंडित यांना प्रतापशाच्या मदतीस कोंकणांत पाठविलें. त्यांचा पुरा मोड त्रिपुरकुमरानें माहुलीच्या मैदानीं केला. ह्या वर प्रतापशा व रामदेवराव जाधव यांनी पुनः सैन्याची दिन चार जुनाट प्रती जेव्हां सांपडतील तेव्हां खरे आंकडे कोणते तें निश्चित सांगतां येईल. जमवाजमव चालविली. द्वादश प्रभू नावाणिक पाचारून त्यांना त्यांच्या समुदाया सह प्रतापशानें युद्धार्थ सजविले. परंतु सजवणूक मना जोगती न झाल्या मुळें, प्रतापशा सैन्या सह सायवनांतील जो गड गगनमहाल त्याच्या आश्रयास गेला. नागरशा पुढें प्रतापशानें कच खादिली. इतक्यांत रामदेवराव अणहिलपट्टणच्या जयसिंगास मदतीस घेऊन आला. जयसिंग ह्या नांवा संबंधीं एक बाब येथें लक्ष्यांत ठेविली पाहिजे. अणहिलवाडचा प्रख्यात राजा जो सिद्धराज त्याचें एक बिरुद जयसिंह हें होतें. हें बिरुद प्रस्तुत बखरकार अणहिलवाडच्या प्रत्येक राजाला लावितो. सम्राट् रामदेवराव, अणहिलपट्टणचा जयशिंग व प्रतापशा, ह्या तिघांचे सैन्य नागरशा व त्रिपुरकुमर यांच्या वर चढाई करून आलें. तें विसामागड मणोरमहालीं पैलदेंच्या तांदूळवाडीस येऊन ठेंपलें. तेथून त्या सैन्यानें प्रतापपुर काबीज केलें. शेवटीं आंधेरीच्या रानांत दोहों कडील सैन्याची टक्कर झाली. मोठें तुंबळ युद्ध उद्भवलें व रामदेवराव जयसिंग व प्रतापशा ह्यांचा पूर्ण पराजय होऊन नागरशा व त्रिपुरकुमर यांनीं थोर विजय संपादिला. हा प्रसंग शक १२३२ च्या आधीं केव्हां तरी घडला. पुढे थोड्याच वर्षांनीं म्हणजे शक १२३२ च्या सुमारास रामदेवराव जाधव मृत्यू पावला. त्या मुळें प्रतापशाचा एक मोठा आधार गेला. ह्या च सुमारास चेऊल ऊर्फ चंपावतीचा नागरशा व त्याचे पुत्र त्रिपुरकुमर व केशवदेव वारून, दुसरा नागरशा चेऊलच्या गादी वर आला. दुस-या नागरशानें माहीमच्या प्रतापशास रेटीत रेटीत अगदीं रडकुंडीस आणून आस्तआस्ते केवळ धुळीस मिळविलें. शेवटीं नागरशानें प्रतापशाच्या प्रजेंत भेद पाडिला. बिंबदेव जाधव व प्रतापशा जाधव यांनीं आपल्या बरोबर जे पातेणे प्रभु सरदार आणिले त्यांना राज्यांतील मोठमोठे सर्व अधिकार देऊन टाकिले. तशांत, जातिशुद्धतेकरितां देसल्यांचीं यज्ञोपवीतें प्रतापशानें छेदिलीं होतीं, त्या मुळें पूर्वीचे देसाई, देसले, पाटील, पाटल्हारे केवळ निर्माल्यवत् बनले. ह्या असंतुष्ट देसल्यांना व पाटल्हा-यांना नागरशानें फितवून आपल्या कच्छपीं लाविले. देसले व पाटील ह्यांच्या द्वारा देशाचा वसूल येत ना सा होऊन, प्रतापशा व त्याचे प्रभु सरदार अन्नाला मोताद झाले. अश्या विपन्न स्थितीस पोहोचलेल्या प्रतापशाचें राज्य अखेरीस शक १२५४ त नागरशानें कायमचें खालसा केलें. शक १२४० त देवगिरिच्या जाधवांचें राज्य मुबारिक खिलजीनें रसातळास पोहोंचविलें होतें च. तदनंतर १४ वर्षांनीं प्रतापशा जाधवाचें माहीमचें राज्य चेऊलच्या नागरशानें स्वतःच्या राज्यास जोडिलें. " या प्रकारें नागरशानें प्रतापशाचें राज्य विना कष्टीं स्वहस्तगत केलें." राज्यभ्रंशा नंतर प्रतापशाला देसल्यांनीं आपलीं जानवीं तोडून टाकिलीं म्हणून ठार केलें.
महिकावती (माहीम)ची बखर
कालान्तरानें उत्पन्नाच्या उत्पादना संबंधानें व वांटणी संबंधानें, न्यायाच्या न्याय्यान्याय्यत्वा संबंधानें आणि बलिष्ट शत्रूंशी झगडण्याच्या सामर्थ्यासामर्थ्या संबंधानें, ग्रामस्थांत भांडणें, तंटे वगैरे असंतोष उद्भवून किंवा बलिष्ट अस परचक्र येऊन, ग्रामसंस्थाबाह्य अश्या परकीय वरिष्ट सत्तेचा स्पर्श व पगडा निर्माण झाला आणि त्या बलिष्ट सत्तेला ऊर्फ बलिष्ट राजाला गांवच्या कृषीवल व कारू यांनीं निर्मिलेल्या संपत्तींतून वांटा देणें आवश्यक झालें. राजदाय ऊर्फ सरकारदेणें म्हणून एक नवीन बाब उत्पन्न झाली. प्रस्तुत बखरींत (पृष्ट ९२।९३।९४।९५।९६) ह्या सरकार - देण्याचे चार भाग सांगितले आहेत; (१) खुद्द राजभाग, (२) धर्म, (३) सीळोत्तर व (४) नगद, पैकीं पहिले तीन भाग सरकारभाताच्या पोटांत समविष्ट होत. उदाहरणार्थ, ९२ व्या पृष्टा वरील दहावें गांव जें पोवै त्याच्या उपजेची रक्कम अश मांडिली आहेः-पोवै सरकारभात मुडे ६८ राजभाग मुडे ५६ धर्म ४ सीळोत्तर ८ नगद दाम ३००. ह्यांतील राजभाग ५६ + धर्म ४ + सीळोत्तर ८ मिळून सरकारभात एकंदर मुडे ६८ होतें. ६८ मुडे भात पोवै गांवांतून सरकाराला मिळे. पैकीं ४ मुडे धर्म व ८ मुडे सीळोत्तर वजा जातां राजांच्या वाट्याला ऐन भात मुडे ५६ रहात. नगद दाम ३०० हे कारू वरील सरकारदेण्याचें एकंदर द्रव्य होय. राजा हा दंडाधिकारी व राज्याचा प्रधान अंश, सबब तत्पोषणार्था कडे राजभागांचा विनियोंग होई. तडीतापसी, अतीथअभ्यागत, शास्त्रीपंडित, भटभिक्षुक, ग्रामदेवपूजक, इत्यादींच्या निर्वाहा कडे धर्म ह्या सदरा खालीं पडणा-या दायाचा विनियोग होई. जननमरण इत्यादि संस्कारांची वासलात लावणारा जो ग्रामजोशी तो गांवचा वृत्तिवंत असे, म्हणजे ग्रामस्थां बरोबर ग्रामस्थापनेच्या वेळी स्वयंभू अवतरलेला असे. त्याचा निर्वाह ग्रामस्थांच्या द्वारा हेाई, राजद्वारा होत नसे. तडीतापसी, शास्त्रीपंडित इत्यादि योगी, विद्वान् वगैरे उच्च संस्कृतीचे जे प्रतिनिधि त्यांचा चरितार्थ राजद्वारा सरकारी उत्पन्नांतून हाई. ठाणेंकोंकणांतील समुद्रकांठचे जे गांव तेथील खाजणांतून पावसाचें व समुद्राचें खारेंगोडें पाणी आंत घेण्यास किंवा बाहेर काढून लावण्यास चर करावे लागतात, बांध घालून दरवाजे ठेवावे लागतात व ते दरवाजे दगडांनीं बंद करावे लागतात किंवा दगड काढून मोकळे करावे लागतात. ह्या कृत्याला शिलोत्तार ही प्राचीन संज्ञा असे. शिलोत्तार ह्या शब्दाचा मराठी अपभ्रंश शीळोत्तर. शीळोत्तराचें काम करणारा जो माणूस तो शिळोत्तरा पाटील. हा पाटील ग्रामनिर्मित नसे, राजनिर्मित असे व ह्याचा निर्वाह सरकारांतून होई. निर्वाहाच्या दायाला शीळोत्तर ही संज्ञा असे. शिळोत्र असा हि उच्चार प्रचारांत आहे. शिलोत्तार म्हणजे बांधाच्या दरवाज्यांतील शिळा बसविण्या बद्दल किंवा काढण्या बद्दल जें उत्तार म्हणजे उतरण्याचें शुल्क म्हणजे कर तो. नगद दाम ह्या शब्दांतील दाम म्हणजे सजगाणी व सजगाणी म्हणजे फद्या. दाम, सजगाणी व फद्या हीं नाण्यांचीं तीन नांवें ह्या बखरींत येतात. चाळीस दामांचा एक रुपाया. रुपायाचे त्या कालीं ८० पैसे धरीत. अर्थात् दाम दोन पैश्यांचा होई. सजगणी व फद्या हीं दोन्हीं नाणीं त्या कालीं दोन पैश्यांचीं असत. हीं तिन्हीं नाणीं शुद्ध तांब्याचीं किंवा प्रायः मिश्र धातूंचीं असत. मुडा त्या कालीं त्या प्रांतांत २५ मणांचा असे. सध्यां कोळंबा भाताचा मुडा पेणपनवेलप्रांतीं २५ मणांचा धरतात. पोवै गांव त्या कालीं ९०० दाम राजाला कारूं वरील कर म्हणून देई, रुपयांत बोलावयाचें म्हणजे २२ १।२ साडे बावीस रुपये देई. पोवै गांव सरकारांत ६८ मुडे भात भरी. सरकार जमीनीच्या एकंदर उत्पन्नाचा षष्ठांश घेई. तेव्हां पोवै गांवाचे त्या कालीं भाताचें एकंदर उत्पन्न ४०८ मुडे म्हणजे सध्यांच्या वसिमणी ५१० खंडी असे. प्रस्तुत बखरींत एकंदर १२५गांवांच्या उपजेची वगत दिली आहे. तींत सरकारभाताचे जे राजभाग, धर्म व शीळोत्तर असे तीन वांटे दिले आहेत त्यांचे आंकडे बरेच ठिकाणीं चुकलेले आहेत. बिंबाख्यानाची एक लेखी प्रत मज जवळ आहे ती वरून खरे आंकडे सत्ताविसाव्या रकान्यांत देण्याचा थोडाबहुत प्रयत्न केला आहे. परंतु, बखरीच्या आणीक कित्येक गांवांच्या वहिवाटदारांचीं नांवे बखरींत नमूद आहेत, ब-याच गांवांचीं नाहींत. हा हि तपशील बखरीच्या आणीक प्रती हातीं आल्या खेरीज पुरा करतां येणार नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८२ श्री १६२९ माघ शुध्द ५
तहनामा चिरंजीव राजश्री शिवाजीराजे यांसी प्रती राजश्री शाहूराजे यानी लिहून दिल्हा सु॥ समान मया व अलफ राज्याभिषेक शक ३४ विरोधिकृत संवत्सरे माघ शु ५ ई॥ अरुण महान संगम दक्षण तीर कुल दुतर्फा मुलख दरोबस्त, देखील ठाणी व किल्ले तुह्मास दिल्हे असेत.......कलम
(१) ई॥ वारणा नदी उत्तर तीर व वारणा व कृष्णा या संगमा पासून तहद् निवृत्तिसंगम तुंगभद्रा पावेतो उत्तर तीर दरोबस्त, देखील गड ठाणी, व मिरज प्रांत, व विजयपूर प्रांतीची ठाणी, दरोबस्त देखील नद्या तुह्मा कडील अंमल व ठाणी असतील तीं, आमचे स्वाधीन करावीं.......कलम
[१] वारुणा व कृष्णा संगमापासून दक्षण तीर तहद निवृत्तिसंगम तुंगभद्रा पावेतो दरोबस्त, देखील गड ठाणी, तुह्मास दिल्ही असेत........कलम
[२] कोंकण प्रांत साळसी अलिकडे तहद पंचमहाल अकोलें पावेतों दरोबस्त तुह्मांकडे दिल्हे असेत..........कलम
[३] सेवक लोक लहान मोठे सुध्दा दरोबस्त याणी आजवर आज्ञेत लागू हुकुमानी चाकरी केली त्यांसी मागील अपराध मनात न आणता येथून पुढे मात्र जिकडील तिकडे चांगले प्रकारे करावे व इकडील बेइमान चाकर तुह्मी ठेवू नये, तुह्माकडील आह्मी ठेवू नये........ कलम
सदर्हू् प्रमाणे आह्मी चालूं. यासी अंतराय होणार नाही. मोर्तब असे शिक्क्याचे.
महिकावती (माहीम)ची बखर
१८ बिंबदेव जाधवानें ठाणेंकोंकणपैकीं जो प्रांत ताब्यांत आला त्याचे १५ महाल केले व तेथें देशसंरक्षणार्थ खालील प्रमाणें सैन्य ठेविलें.
(पुढील तक्ता वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)
" एवं ग्रामसंख्या ४४४ ' म्हणून बखरींत म्हटलें आहे. परंतु वर दिलेल्या गांवांची संख्या ४३४ भरते तेव्हां गावांच्या ह्या आंकड्यात दशं चा एकाचा आंकडा नकलकारानें कोठें तरी खाल्ला हें उघड आहे. पृष्ट ४२ वर नागरशाच्या सैन्याची संख्या दिली आहे, तिच्याशीं बिंबदेव जाधवाच्या सैन्याच्या संख्येशीं तुलना केली असतां, असें दिसतें कीं नागरशाच्या सैन्याच्या तिप्पट चौपट सैन्य बिंबदेव जाधवा पाशीं होतें, ह्या चौपट सैन्याच्या जोरा वर बिंबदेव जाधवानें नागरशा व त्रिपुरकुमर ह्यांच्या सैन्याला नामोहरम केलें, त्रिपुरकुमराला चेऊल प्रांताच्या दक्षिणेस हाकून दिलें व मुंबई, माहीम, साष्ठी, सुपारे, इत्यादि उत्तरे कडील सर्व प्रांत काबीज करून तेथें आपले हस्तक व सरदार जे पातेणे प्रभू त्यांची स्थापना केली. सरदार व सैन्य याची व्यवस्था लावल्या वर बिंबदेव जाधवानें आक्रमण केलेल्या प्रांताची उपज म्हणजे उत्पन्न ऊर्फ महसूल ठरवून टाकिला. उपजाच्या दृष्टीनें प्रांतांतील गांवांचे दोन वर्ग होत. सरदारांना सैन्याच्या खर्चा करितां दिलेले मोकासे गांवाचा पहिला वर्ग आणि सरकारांत ठेविलेल्या गांवांचा दुसरा वर्ग. मोकासे गांवाचें उत्पन्न मोकासदारानें आपल्या हाता खालील सैन्याच्या खर्चा पुरतें घेऊन, राहिलेली बाकी राजाला म्हणजे सरकाराला मसाला द्यावी लागे. मोकासगांवांना खोतीगांव असें दुसरें नांव आहे. दोन्हीं नांवें मुसुलमानी आहेत. मुसुलमानी अमला पूर्वी मोकासगांवांना किंवा खोतीगांवांना अधिकारीभोगग्राम ही संज्ञा असे. भोगग्राम दोन प्रकारचे. वृक्ष, काष्ट, तृण, उदक, निधिनिक्षेप, गिरी, नदनदी, ह्यांच्या सुद्धां व चाट, भट, कर, शुल्क, इत्यादि सर्व उपद्रवां पासून मुक्त असें जें दान त्याला धारादत्त भोगग्राम म्हणत. ह्या धारादत्त ग्रामदानाला मुसुलमानी अमलांत इनामगांव ही संज्ञा मिळाली. सैन्याच्या किंवा इतर पेशाच्या पोषणार्थ जमिनीचें व करांचें उत्पन्न भोजकानें घेऊन, बाकीचें शिल्लक उत्पन्न सरकारांत ज्या गांवांचें भरावें लागे त्यांना अधिकारीभोगग्राम म्हणत. धारादत्त भोगग्रामांवर राजाचा कोणता हि हक्क नसे व ते आचंद्रार्क चालावयाचे असत. अधिकारी भोगग्रामां वर राजाची पूर्ण सत्ता असून, ते राजाच्या खुषी वर नियमितकालपर्यंत त्या त्या अधिका-या कडे चालत. दत्त ग्रामां व्यतिरिक्त जे ग्राम ते खुद्द सरकाराच्या अंमला खालीं असत. सरकारी गावांचें उत्पन्न दोन त-हेचें असे, (१) लागवडी खालील क्षेत्रांचें उत्पन्न व (२) जलतरुतृणपाषाणांदिकांचें उत्पन्न. हीं दोन्हीं उत्पन्नें मिळून गावांची वार्षिक संपत्ति होई. ह्या संपत्तीच्या दोन वाटण्या होत, (१) एक ग्रामस्थांची वाटणी व (२) दुसरी सरकारची वाटणी. ग्रामस्थांच्या वाटणीला वृत्ति म्हणत व सरकारच्या ऊर्फ राजाच्या वांटणीला राजभाग म्हणत. ग्रामस्थ म्हणजे गावांतील संपत्युत्पादक कृषीवल व कारू. कृषीवल जमीनीची लागवड करून धान्यसंपत्ति निर्माण करीत आणि कारू सुतारकी, लोहारकी इत्यादि धंदे करून शिल्पसंपत्ति कमावीत, कृषीवलांना कारूंची जरूर पडे व कारूंना कृषीवलांची जरूर पढे. सबब कारूंना कृषीवल धान्याचें बलुतें देत व कारू कृषीवलांना आपल्या शिल्पांची मदत करीत. कारुकृषीवलांच्या ह्या देवघेवींत राजाचा बिलकुल हात नसे. ही देवघेव अनादिसिद्ध समजत, कोण्या राजानें निर्माण केलेली समजत नसत. ही देवघेव ग्रामसंस्था स्थापने बरोबर स्वयंसिद्ध असल्या मुळें शेतकरी, सुतार, लोहार, न्हावी, परीट, भट, इत्यादि वृत्तिवंताच्या वृत्त्या, अनादिसिद्ध स्वयंभू समजल्या जात. अर्थात् राजाचीं राजपत्रें किंवा पातशाहांच्या सनदा वृत्तिवंतांच्या वृत्तिसंबंधानें निघण्याची शक्यता च नसे. सर्व वृत्तिवंत मिळून गांवची पंचाईत बघे. ती गांवचा उत्पन्न, विनिमय, न्याय, युद्ध, इत्यादि-सर्व कारभार स्वयंभू अनादिसिद्ध पहात असे. पंचाइतीच्या निकाला वर तपासणी, मंजुरी, किंवा फिरवाफिरव एतत्संबंधीं अधिकार दुस-या कोणत्या हि सत्तेचा नसे. कां कीं, ग्रामपंचाइति हून वरिष्ट सत्ता मूळारंभीं म्हणजे ग्रामसंस्थास्थापनारंभी मुदलांत च दुसरी कोणती हि नव्हती.
महिकावती (माहीम)ची बखर
हे बारा सरदार नामांकित घराण्यां पैकीं होते. ह्या खेरीज इतर पुरो जे देशोदेशीचे आले त्यांचीं नांवें एणे प्रमाणें:---
(नांवे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)
हे राजे सवितासूर्यवंशी शके १२१५ त म्हणजे बिंबदेव जाधवाच्या पूर्वी एक वर्ष कोंकणांत आले. ह्या ४२ सरदारांना एक वर्ष अगोदर ठाणेंकोंकणा वर स्वारी करण्यास पाठवून, नंतर शक १२१६ त बिंबराजा स्वतः ठाणेंकोंकण काबीज करण्यास उद्युक्त झाला. या उपर म्हणजे शके १२१६ नंतर कांहीं सोमवंशी सरदार आले त्यांची यादी:--
(यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)
"या खेरीज दालिबंद म्हणजे सशस्त्र प्रभु सवितासोमवंशी बहुत कोंकणी आले" त्यांचीं नामाभिधानें सांगतां ग्रंथ वाढेल म्हणोन मुख्य जें कांहीं ते सांगितले. वरील यादींत जीं चौपन्न नांवें सरदारांची आलीं आहेत तीं सर्व ज्यांना पातेणे उर्फ पाताणे ऊर्फ पाठारे प्रभु म्हणतात त्यांचीं आहेत. हे सर्व बिंबदेव जाधवाच्या अनुषंगानें शक १२१५ व १२१६ नंतर ठाणेंकोंकणांत आले. शक १०६० त प्रताप बिंबाच्या बरोबर जीं ६६ खुमें व कुळें सूर्यसोमवंशी सरदारांचीं व इतरांचीं आलीं तीं शक १२१५ त आलेल्या पातेण्या प्रभूच्या कुळांहून अगदीं निराळीं हें सांगावयास नको च. तसेंच, प्रताप बिंब, मही बिंब, केशव बिंब, ह्या नांवांत जो बिंब शब्द आला आहे तो व बिंबदेव जाधव ह्या नांवांत जो बिंब शब्द आला आहे तो परस्परा हून अगदीं भिन्न अर्थांचे वाचक आहेत हें हि सांगावयाला नको च. शक १०६० त आलेल्या प्रताप बिंबाच्या नांवांतील बिंब शब्द आडनांव वाचक आहे व शक १२१६ त आलेल्या बिंबदेव जाधवाच्या नांवांतील बिंब शब्द व्यक्तिनामवाचक आहे, हें आतापर्यंतच्या कथानका वरून वाचकांनीं ताडलें च असेल. व्यक्तिवाचक बिंबशब्द व आडनांववाचक बिंबशब्द या मधील अर्थाची भिन्नता लक्ष्यांत न आल्या मुळें, कित्येक ग्रंथकारांच्या व लेखकांच्या लेखांत घोटाळ्याचीं अनेक विधानें आलेलीं दृष्टीस पडतात. त्यांचा परामर्श घेऊन कालक्षेप करण्यांत किंचिन्मात्र हि फायदा नसल्यानें, त्यांच्या कडे दुर्लक्ष्य करणें उचित दिसतें --