Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३०७
१७२१॥२२ सुमार
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री माणिक दीक्षित उबराणी व तात्या दीक्षित गिजरे स्वामीचे सेवेसी
विद्यार्थी सदाशिवभट नदा साष्टाग नमस्कार विज्ञापना ऐसी जे रेटरे बु॥ येथे राजश्री बाळाजी वेकाजी कुलकर्णी याचे घरी मुज पचमीची आहे व बाळाजी जिवाजी याचे घरी गर्भादान आहे ते दिवशी नरसिहपुरचे ब्राह्मणश्रेष्ठ येऊन दगा करणार तेव्हा ग्रहस्त खर्चाचे पेचात येतात त्यास सरकारातून रोखा होऊन बदोबस्त करावा पचमीचे आत काय करणे ते करावे नाही तरी ते आपले कार्य सिद्धी करून जातील मी निघोन आपणा कडे येईन याप्रो। वो बाबा श्रीधर याचे निरोप आले मुलाबाळाचे बोलणे नाही मुख्यामुख्याचे च आहे याज करिता विनति लिहिली आहे बहुत काय लिहिणे कृपा करावी हे विज्ञापना पत्राचे उत्तर सत्वर पाठवावे त्याचे मारामारी पर्यंत वेव्हार होणार माझे पारपत्य होऊन आपल्यास अपेश येईल कळावे हे विज्ञापना
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८० श्री १६०२ चैत्र शुध्द ५
राजमान्य राजश्री जाबजी कृष्ण प्रभू हवालदार व कारकून पेठ पाटगांव गोसावी यांसी -
स्नेहांकित गणोराम सुभेदार व कारकून सुभा परागणे कुडाळ व माहालानिहाय अनुक्रमे विनंति सु॥ समानीन अलफ पेठ मजकुरी सात पांच वरसें गलबलियाकरितां वसात करून नव्हते हाली श्री बावा येऊन राहिले यासाठी पेठ मामूर जाली त्याचेया प्रसाधे दिवाणीचा मामला खोबरे सुपारी खारिका होते. त्यास श्रीस्वामीस दुकान त्यांच्या नांवे त्यांस दिलियाने विशेष चालणार. याकारणे पेशजी तंबाकूचे गादीचे दुकान होते तेथे, हाली गादी नाही. याबदल ती दुकान स्वामीस देवविले आहे. ते स्वामीच्या स्वाधीन तुरुतगिरीचे हवाले करवणे. ते हरकोणी तेथे ठेवितील बावाचे नावे दुकान चालेल. त्या दुकानास महसूल न घेणे. वेठी ऊठ त्याचे दुकानी जो त्याचा असेल त्यासे न घेणे हा कागद तालीक लेहोन घेऊन असल देणे. छ ३ माहे रबिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३०६
१७२१ । १७२२
श्री
यादी नरसीपूरकर याचे
१ प्रथम बापाजी श्रीधर व + + + उभयता आले ते बापूचार्य घळसासी यानी सखाराम दी॥ ढवलीकराचे घरास घेऊन आले ते समयी रामभट विदार व तमणजोशी बैसलो होतो त्यानी वर्तमान सागितले की आमचे बाप भाऊ सुतक धरितात त्यास आमचे ह्यणे
१. दुसरे दिवशी आह्मा कडे आले की सात जण अर्धेलीचे भाऊबद यास पत्र पा। आणावे ह्मणून बापू घलसासी यानी सागितले त्या वरून पत्र सदर्हूचे नावचे लि॥
१ बाबाचार्य घलसासी याचे समाचारास गेलो होतो ते समयी रामाजी मुकुद आले त्यानी सागितले की बाबा श्रीधर सुतकी आहेत एक पक्ती बसणार नाही याचे प्रमाण काय लेहून देणे उभयतानी लिहून दिल्हे त्याज वर रामाचार्य बोलिले बाबा श्रीधर यास तुह्मी अशौची आमचे घरास येऊ नये त्या समयी तात्या जोशी व बाळभट गिजरे व वासुदेवाचार्य विदार असामी दोन होत्या या प्रमाणे बाबाचार्य हि ह्यणाले राहू नये
१ बाबाचे घरी बि-हाड होते ते समयी त्या समस्तानी सागून पा। जे नरसीपूरकर यास जेवायास न बोलावणे त्याज वरून त्याणी सागितले जे वेघळे जेवतात
१ व्यकटाचार्य टोणपे याचे घरी समाराधना जाहली ते समयी टोणपे घलसासी यानी उभयतास पक्तीतून काढिले
१ समस्त वादे मिळाले पचाइतीस प्रारभ जाहला ते समयी बाळाजी शामजी आणविला आणि वशावळ खोटी ह्मणून लि॥ दिल्हे आहे त्या वरून आमचे पचाईतपैकी काही जण मिळोन त्यास पत्र करून दिल्हे ह्मणोन खटला पडला
समस्त पैकी पचाइतीस हजर
१ बाजी भिकाजी १ माहादेव जोशी
१ गोपाल दी॥ १ अण्णा दीक्षित
१ गोपाल दीक्षित उब्राणे १ रामभट विदार
१ नागोबा अण्णा १ सिनापा घलसासी
१ नरसोबा नाना १ नागोबा ढवळीकर
१ बालभट गिजरे १ तात्या जोशी
१ चिमणा जोशी १ रामचार्ये घळसासी
१ शकरभट गिजरे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३०५
१७२१ सुमार बाळबोध
श्री
वास्तव्य
राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री विठलराव अबा सोनकिरे यासि
समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशळ लिहीत जावे विशेष अपण पत्र पाठविले ते पाले लिहिला अर्थ ध्यानास आणिला त्यास बाबा श्रीधर व त्याचे बधु असामी साहा याचा व रगभट् बिन दादभट् या उभयताचा वृद्धिक्षयाचा खटला पडोन उभयता क्षेत्रास आले त्यास उभयताचे मनास आणिता बाबा श्रीधर याचे हतून वशावळीची पुरवणी जाली नाही सबब पूर्वी पासोन वृद्धिक्षय धरीत आले असता हली रगभट् याची स्त्री मृत्यु पावली तीचे सूतक चौकशी पाहता ठिकाण काही लागत नाहि त्या वरून रगभट् बिन दादभट यानी समस्ता पाशी सागीतले जे वशावळीच्या पत्राचा विचार अवघा तुह्यास ठाउक अहे त्या वरून हे पत्र तुह्मास लिहिले आहे तुह्मी प्राचीन पुरुष माहित अहात हे वशावळीचे पत्र बाबा श्रीधरापाशी अहे ते कोठे जाहले हे सत्यपूर्वक उत्तर लेहून पाठवावे ये विषयी श्रीकृष्णवेणीची व ब्राह्मण्याची तुह्मास शफत असे ब्राह्मण्याचा विषय आहे उभयताची भीड न धरिता सत्य असेल ते च लिहावे त्या प्रमाणे केले जायील
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३०४
१७२१ सुमार
श्री
यादी बाबा श्रीधर नरसीपूरकर याचे तीर्थरूपानी आपला भाऊ देशातरास गेला होता तो आणिला त्यास विभाग देऊन परस्परे जननाशौच मृताशौच धरीत आले याज विसी पत्र रगभट याज पाशी आहे हाली रगभट याची स्त्री निवर्तली तिचे आशौच न धरीत ह्मणोन नरसिपुरी खटला पडला सा। बापा श्रीधर याणे क्षेत्रास येऊन विनती केली की आमची वशावळ पाहून शास्त्रार्थ आह्मास सागावा असे बोलिले त्याज वरून वशावलीची चौकशी करिता ज्याणी वशावल दिल्ही त्याणी च वशावळ खोटी ह्मणोन लेहून दिल्हे त्याज वरून पूर्ववत् अशोच धरावे असे सागितले असता अशोच धटाई करोन धरीत नाही सा। सरकारसमत बहिष्कारपत्रे लिहिली त्या प्रमाणे चालत आले हाली परस्परे समजोन अन्नोदकव्यव्हार करो लागले ते समयी आह्मी आक्षेप केला जे रगभट हा तुमचा गोत्रज होय अथवा न होय हे लेहून देणे अनतर प्रायश्चित्त करून अन्नोदक व्यव्हार करणे हे न ऐकता परस्परे धटाई करून व्यव्हार करितात याचा बदोबस्त करावा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३०३
१७२१ सुमार
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री रघुनाथ भट मिरगुडे ज्योतिषी सोनकिरे या प्रति समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटक नमस्कार विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावे विशेष बाबा श्रीधर व त्याचे भाऊ असामी सहा व रगभट बिन दादभट या उभयताचा वृद्धिक्षयाचा खटला होऊन बाबा श्रीधर क्षेत्रास आले क्षेत्रस्थानी बाबा श्रीधर यास विचारिले जे रगभट याचे घरची वृद्धिक्षय तुह्मी वडिला पासून धरीत आला असता हाली का धरीत नाही याचे कारण काय त्यास बाबा श्रीधराने उत्तर केले जे बाळा शामजी याज पाशी वशावळीची याद होती ती आह्मास दिल्ही त्या वरून क्षयवृद्धि करीत नाही त्यास वशावळीची समस्त क्षेत्रस्थानी न धरिता गावा मध्ये व्यवहार करू लागले या करिता पचाईतमुखे व गोतमुखे उभयताचा निवाडा होय तो पर्यत बाबा श्रीधर व त्याचे भाऊ असामी सहा यासि अपक्त केले असे त्यास पूर्वी बहिष्कारपत्रे क्षेत्रस्थाची व श्रीमत पतप्रतिनिधीची गेली आहेत आपणास कळावे या उपरी आपण व आपले ग्रामस्त सुद्धा बाबा श्रीधर व त्याचे भाऊ असामी सहा याचे पक्तीस अन्नोदकव्यवहार करू नये
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७९ १५५१ वैशाख शुध्द ३
मशहुरल हजरती राजश्री विठल दतो सुबेदार सुबा ता। जाउली प्रती राजश्री जिजाआऊ दंडवत सु॥ सलास चेपगीर गोसावी जटाधारी याचा इनाम हुमगावी आहे झाडे आहेत ह्मणऊन हुजूर मालूम केले तरी याचे काम बाद कुणबियानी जैसे चालविले आहे तेणे प्रमाणे हाली तुह्मी कुणबियास लेहोन गोसावियाचे चालवणे त्यास
(पुढे गहाळ)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३०२
१७२१ सुमार बाळबोध
त्यास विचारिले जे तुह्मी मिरजेस जाऊन सिद्धात काय केला तो अह्मास क्षेत्रस्थाचे विद्यमाने समजाऊन द्यावा अह्मी हि क्षेत्रस्थ सागतील त्या प्रा। करू ऐसे ह्मणत अस्ता सर्वास न समजता एकदोघा पासोन घरात शुद्धपत्र घेऊन समस्तास न विचारता वाद्याशी मारामारी करून परभारा पळोन गेले नतर अरे प्रभृति सरकारात जाऊन अपले वृत्त निवेदन करून ते शुद्धपत्र दाखवून भोवरगावी वगैरे कोठे एक पक्ति अन्नोदकव्यवहार करावा ह्मणोन खटला करितात ह्मणून ऐकतो त्याज वरून हे पत्र लिहिले असे तरि बाबा श्रीधर याणी घरा मध्ये एका दोघा पासोन शुद्धपत्र नेले ते खोटे तरि त्याशी अन्नोदकव्यवहार न कर्णे त्यास योग्य चतुवर्ग बधु नीमेचे व घरबधु येकत्र होउन ग्रामस्थाचे विद्यमाने वशावळ खरी करून मग आशौच सोडावे हे काही मिरजकर यानी न करिता पत्रे करून दिल्ली ते सर्वास मान्य होत नाही या स्तव चौघे बधु येकचित्ते करून परस्पेरे वशावळ समजोन घेत तावत्काल पर्यत हे साहा जणा सर्वकर्मबहिष्कृत असेत ज्या ग्रामी ज्यास भेटतील त्याणी साहा आसामीच्या घरच्यास स्पर्श आदिकरून कोणताही व्यवहार करू नये साहा घरचे शरीरसबधाचे अगत्यवादास्तव याशी चोरून व्यवहार केल्यास त्यास क्षेत्राहून बहिष्कार पडेल हे स्पष्ट समजोन वर्तणून करणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
श्रीमतकरहाटकक्षेत्रस्थसमस्तब्राह्मणकृतानेकनमस्कार व अनुक्रमे आशीर्वाद उपरि वेदमूर्त्ति रगभट बिन्न दादभट्ट ज्योतिषी नर्शिपूरकर याची स्त्री प्रसूत होऊन मृत्यु पावली तीचे वृत्धिक्षयाशौच न धरिता वो। बाबा श्रीधर ज्योतिषी नर्शिपूरकर क्षेत्रास येऊन विदित केले जे आपले निमेचे भाउ बाळाजी मुकुद प्रभृति यानी रगभट्टाचे स्त्रीचे आशौच धरिले त्यास क्षेत्रास बोलाऊन विचारावे त्याजवरून बाळाजी मुकुद प्रभृति आणविले त्याची चौकशी करीता बाळाजी शामजी यानी बाळाजी श्रीधर या पाशी पेशजी आदिमाळिकेची याद दिल्ही होती ती बाळाजी शामजी यानी खोटी ह्मणोन आपले भाउ बाळाजी मुकुद प्रभृतिच्या साक्षी घालून पत्र लेहून दिल्हे त्याज वरून बाबा श्रीधरास विचारिले जे तुह्मी रगभट्ट याचे स्त्रीचे आशौच न धरीले त्याचे कारण काय त्याचे उत्तर न करिता क्षेत्राहून निघोन गेले सबब बाबा श्रीधर याचे भाउ साहा असामी बितपशील
१ बाळभट्ट बिन्न नर्शिभट्ट १ बजभट्ट बिन्न मनभट्ट
१ शामभट्ट बिन्न पाडुरगभट्ट १ बाजीभट्ट बिन्न वासुदेवभट्ट
१ अपाभट्ट बिन्न जनार्दनभट्ट १ बाबा व बाप्पा बिन्न श्रीधरभट्ट
या साहा असामी यानी आशौच धरिले नाही त्यास बहिष्कारपत्र पू्र्वी पाठविले आहे ते पहाता सर्वार्थ ध्यानात येयील या नतर बाबा श्रीधर यानी मिरजेचे पत्र आणोन क्षेत्रस्थास शुत्धपत्र मागु लागले त्यास शुत्धपत्र न द्यावयाचे कारण बाबा श्रीधर याचे वडील व हेहि खुद आजपर्यत रगभट्टाचे घरिचे आशौच धरीत आले हल्लि बाबा श्रीधर याचे घरभाउ गोविंदभट्ट अरे व अनतभट्ट अरे व निमेचे भाउ बाळाजी शामजी व बाळाजी मुकुद प्रभृति यानी आशौच धरिले असता बाबा श्रीधर घरभाउ असामी सहा यानी आशौच धरिले नाही ह्मणोन शुत्धपत्र दिल्हे नाही त्याज वरून बाबा श्रीधर श्रीक्षेत्रपालाचे देवालयी उपोषण करू लागले ते समयी त्याचे निमेचे भाउ रामाजी मुकुद व घरभाउ गोविदभट्ट अरे समुदायसुत्धा येऊन बाबा श्रीधरास विचारिले जे मिरजे मध्ये समस्त ब्राह्मण यानी रगभट्ट याचे घरचे आशौच धरावे कि न धरावे हा ठराव करून पत्र आणिले ते अह्मास न समजाविता क्षेत्रा मध्ये उपोषणे करावयाचे कारण काय मिरजेत अह्मि विद्यमानी नसता जो ठराव जाहला तो समस्त क्षेत्रस्थाचे व नर्शिपुरकर समस्त ब्राह्मण याचे विद्यमाने अह्मास समजाऊन द्यावा ऐसे ह्मणत असता बाबा श्रीधर यानी त्याचे उत्तर न करीता त्यासी मारामार करून घरा मध्ये येका दोघा जणा पासून शुत्धपत्र गुप्त घेऊन गेले आणि नर्शिपुरी व भोवरगावी एकपक्ति अन्नोदकव्यवहार करावयास प्रवृत्त जाहले ह्मणोन ऐकितो त्याज वरून हे पत्र तुह्मास सादर केले असे तर बाबा श्रीधर घरभाउ असामी साहा यानी आशौच न धरिले त्याची निष्कृती क्षेत्रा मध्ये नर्शिपुरकर समस्त ब्राह्मण याचे विद्यमाने होय तोपर्यत बहिष्कृत असे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३०१
१७२१
श्रीकृष्णाककुद्यतीप्रीतिसगमो जयति
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री समस्त ब्राह्मण ज्योतिषी कुळकर्णी व ग्रामाधिकारी व राजकीय ग्रहस्थसमुदाय देहाय क्षेत्रे व ग्राम बितपशील
१ करवीरक्षेत्र १ कुरुदवाड
१ सगम माहुली उभय तीरस्थक्षेत्र १ हरीपूर
१ किले मचद्रगड १ वैराज्यक्षेत्र
१ मालखेड १ कोळेनर्शिपूर
१ काले १ मिरज१ काशेगाव १ अष्टे
१ नेर्ले १ वाळवे
१ कापूसखेड १ भिलवडि
१ पेठ १ तासगाव
१ रेटरेबुद्रुक १ इसलामपूर
१ रेटरेखुर्द १ उरूण
१ रेटरे धरणाचे १ बाहे
१ शेरे १ बोरगाव
१ अटके १ शिराळेठाणे
१ टेभू १ ब्रह्मनाळ
१ मसूर १ वागीकर्यात
१ अउध १ कालगाव
१ कडेगाव १ सातारा
१ तारगाव १ रहिमतपुर
१ कोरेगाव १ पाल
१ उब्रज १ कुरुली
१ मायणी १ ह्मसवड
१ पढरपुर १ वडगाव
१ शिर्टे १ बिचूद
१ येडे १ रेटरे
१ शेणोलि १ शूर्पालय
१ पलूस वगैरे १ वाडे सागडि
१ खटाव
याशि प्रति