Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
महिकावती (माहीम)ची बखर
ज्यांच्या वर स्वारी केली त्यांच्या ग्रंथांत स्वारी करणा-याचें नांव देखील नसावें, हें खरोखरच आश्चर्य होय. ही स्वारी मुदलांत च झाली तरी नसावी किंवा ती इतकी क्षुल्लक असावी कीं तिचा स्पर्श हि हिंदुस्थानाला झाला नसावा. दुसरें उदाहरण महमुदाच्या सोमनाथा वरील स्वारीचें. मुसुलमान तवारिखकार हिचें वर्णन करतात; परंतु हिंदू ग्रंथकार हिचा उल्लेख हि करीत नाहींत. बहिःप्रमाणा वर एकमेव अद्वितीय जोर दिला, म्हणजे ही असली आपत्ति उत्पन्न होते. बहि प्रमाणाची मातब्बरी मुळींच काढून टाकली, तर इतिहाससम कल्पित कादंब-यांचा वास्तविक इतिहासांत समावेश होतो. ह्या दुहेरी पेंचांतून निसटण्यास एक लंगडी युक्ति आहे. वस्तुसिध्यर्थ बहि:प्रमाण आवश्यक न मानतां, फक्त पोषक मानावें. साक्षीदार सुसंगत व मानव शक्यतेचीं विधानें करणारा असला म्हणजे त्याची साक्ष प्रमाण समजावी, मग त्या साक्षीला बहि:प्रमाण उपलब्ध असो नसो. असलें तर उत्तम च पाषेक होईल, नसलें तर नितांत मारक मात्र होणार नाहीं. ही दृष्टि प्रस्तुत बखरीच्या दुस-या, तिस-या, पांचव्या व सहाव्या प्रकरणांना लावितां, असें म्हणावें लागतें कीं त्यांत वर्णिलेले राजवंश व कुटुंबवंश माहीम प्रांतांत खरोखर च होऊन गेले. बखरींतील मजकुराच्या वस्तुप्रामाण्याची कसोट ही अशी सैल केल्यानें, प्रामाण्याची सिद्धि व्हावी तशी निर्भीड व कसोशीची झाली नाहीं, अशी रुखरुख मनाला डाचत शिल्लक रहाते. प्रामाण्य मर्जी प्रमाणें असें सैल करीत गेल्यास, वाटेल तें गबाळ वास्तविक इतिहास म्हणून खपलें जाईल व शास्त्रीय चिकित्सेला बट्टा लागेल. करतां, प्रामाण्याचा सैलपणा खपवून चालण्या कडे मन झुकूं न देतां, प्रस्तुत बखरींतील मजकुराला बहिःप्रमाणांचें पाठबळ मिळे तों पर्यंत तो मजकूर वास्तविक इतिहासाच्या सदरांत समाविशिण्याची घाई करणें योग्य होणार नाहीं. बिंबवंशीय राजे, नागरशादि राजे, भोंगळे, नायते राजे, बिंबदेव जाधव, इत्यादींचा उल्लेख आतां पर्यंत उपलब्ध झालेल्या बहिर्लेखांत कोठें हि आलेला नाहीं. तेव्हां, प्रस्तुत छापलेली ही बखर कल्पित कादंबरी म्हणून झिटकारून देण्यास कोणती हरकत आहे ? हरकती दोन आहेत. पहिली हरकत अशी कीं रूप, ढंग व हावभाव पहातां प्रस्तुत बखरीचा रंग कल्पित कथेचा दिसत नाहीं, वास्तविक इतिहासाचा दिसतो. दुसरी हरकत अशी कीं बहिःप्रमाणें म्हणून ज्यांना म्हणतात तीं ह्या बखरींतील मजकुरा संबंधानें अद्याप वरवर देखील उकरलीं, चापसलीं व हाताळलीं गेलीं नाहींत. पांचपंचवीस शिलालेख व ताम्रपट, अमदाबादच्या सुलतानांच्या कांहीं तवारिखा व पोर्तुगीजांचीं कांहीं टिपणें ह्यां पलीकडे बखरींत ज्या काळाचा व स्थळाचा इतिहास दिला आहे किंवा अनुमेय आहे तत्संबंधानें एक हि साधन अद्याप प्रकाशांत आणलेलें नाहीं. शिलाहार, अमदाबादेचे सुलतान व पोर्तुगीज ह्यांच्या संबंधानें बखरींत जो मजकूर दिला आहे त्याला ताम्रपट, तवारिख व टिपणें यांचा बहिःप्रमाणां दाखल पडताळा आहे. हे तीन लोक माहीम प्रांतांत वावरून गेले एतद्विषयक संशय नाहीं. बिंबवंशीय राजे, भोंगळे, नायते राजे व नागरशादि राजे ह्यांच्या संबंधानें तेवढा बहि:पुरावा नाही. शक १०६० नंतर तीन शें वर्षांत हे राजे माहीम प्रांतांत होऊन गेले असें बखरीचें म्हणणें आहे. माहीम प्रांत व त्यांतील हे राजे इतके कोनाकोप-यांतील आहेत कीं उपलब्ध झालेल्या तुटपुंज्या बहि:प्रमाणांत त्यांचा उल्लेख न आढळल्यास तेवढ्यानें संशयाच्या डोहांत गटंगळ्या खात बसण्याचें कारण नाहीं. प्रस्तुत बखरीच्या प्रकाशनानें पृथ्वी वरील एका चिमुकल्या टापूंतील राजकीय हालचाली पहिल्यांदा च उजेडांत येत आहेत. त्यांचा पडताळा शोधून काढिला पाहिजे. तत्कालीन इमारती, तलाव, देवळें, नाणीं, ताम्रपट, शिलालेख, इत्यादींचे अवशेष जे जमीनींत गाडून गेले असण्याचा संभव आहे ते खणत्या लावून उकरून काढिले पाहिजेत. तसेंच तत्कालीन पोवाडे, गाणीं, कागदपत्रें हुडकलीं पाहिजेत. आणि इतकें हि करून जर बहि:प्रमाणें बाहेर आलीं नाहींत, तर प्रस्तुत बखरींतील हकीकतीला बहिःप्रमाणांची पुष्टि मिळत नाहीं म्हणून हताश झालें पाहिजे. हा खटाटोप जो पर्यंत झाला नाहीं, तो पर्यंत बखरींतील मजकूरा वर मर्यादित विश्वास ठेऊन चालण्या खेरीज गत्यन्तर नाहीं.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(१९) हृदा यत्तष्टान् मंत्रान् अशंसन् (१-१२-६७-२).
Utters मंत्र s engraved on the heart (हृदयात कोरलेले मंत्र म्हणतो).
(२०) नरः पितु र्न जिव्रे र्वेदो भरन्त (१-१२-७०-५)
as men take property from their old father. माणसे पित्या.
पासून संपत्ती घेतात त्याप्रमाणे.
(२१) अर्यो भागं=अरेः भागं (१-१२-७३-५).
अरेः आगतं अर्य-वैश्यांना अर्य म्हणतात. once inimical (एकेकाळी
शत्रू).
(२२) यज्ञै रथर्वा प्रथमः पथ स्तते (१-१३-८३-५)
ततः सूर्यो व्रतया वेन आजनि ।।
आ गा आजद् उशना काव्यः सचा।
यमस्य जातं अमृतं यजामहे ।।
अथर्वन् first invented the यज्ञ (अथर्वन् ने प्रथम यज्ञ शोधला).
(२३) ग्रावा यत्र वदति कारुः उक्थ्यः (१--१३-८३-६).
(२३-अ) रुद्रस्य सूनवः रुद्रासः, रुद्रपुत्राः, (१-१४-८५-१/२) सूनु = हूनु.
गोमातरः, पृश्निमातरः, दिवस्पुत्राः, रुद्रियाः.
(२३-ब) भयन्ते विश्वा भुवना मरुद्भ्यः राजान इव
त्वेषसंदृशो नरः (१-१४-८५-८)
see this whole सूक्त on मस्त s.
(२४) यस्य वाजिनो अनु विप्रं अतक्षत (१-१४-८६-३).
(२५) दक्ष हा अदितीचा बाप, अदिति ही दक्षाची कन्या व अदिति ही दक्षाची
आई, असे अष्टक १० अध्याय ७२ वर्ग ४ यांत सांगितले आहे.
(२६) मातृ र्जनयत स्वधाभिः lay with his mothers (मंत्र १ - अनुवाक १५ - सूक्त ९५ - ऋचा ४) बहवीनां गर्भो.
(२७) व्राधतश्चित् (१-१५-१००-९)
वृध्= वृद्ध = व्राधत्
भृ= भर्तृ= भ्रातृ
(२८) अपां तोकस्य तनयस्य (१-१५-१००-११) sons & grandsons of अप्. अप् पासून झालेल्या आपिः mothers.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
पुराणि, त्रिपुर, शंबर, व्यंस, पित्रु, रौहिण, कुयवं.
(८) मिमीहि श्लोक मास्ये पर्जन्य इव ततनः ।
गाय गायत्र्य मुक्थ्यम् ( १-८-३८-१४) तोंडात श्लोक तयार करा व तो मोठ्याने म्हणा व मधुर गान गा.
(९) होतारं विश्ववेदसं सं हि त्वा विश इन्धते । (१-९-४४-७)
समिंधते kindle (पेटविणे) हा पहिला अर्थ, worships पूजा करतो हा दुसरा अर्थ, परंतु पहिला अर्थच घेतला पाहिजे.
(१०) तक्षत् यत् ते उशना सहसा सहो,
विरोधसी मज्मना बाधते शवः ( १-१०-५१-१०)
when उशना with his genius carved your prowess it filled both earth & heaven (जेव्हा उशनाने स्वतःच्या बुद्धीने तुझे सामर्थ्य कोरून काढले तेव्हा त्यामुळे पृथ्वी आणि आकाश भरून गेले).
(११) त्वष्टा चित्ते वावृधे शवःततक्ष वज्र मभिभूत् योजसम् (मं १-अ-१०-५२ -७) त्वष्टा himself carved out your triump and chipped of the वज्र brilliant. the defeating enemies वृध to cut, वर्धकिः = सुतार.
(१२) करंज, पर्णय, वंगृद ह्या असुरांची नावे १-१०-५३-८ यात येतात.
(१३) अर्चो शक्राय शाकिने (१-१०-५४-२) शाक लोकांचा उल्लेख.
(१४) नर्य, तुर्वीति, तुर्वर्श, वय्यं, एतश, रथ (१-१०-५४ -६).
(१५) अस्मा इदुस्तोमं सं हिनोमि रथं न तष्टेव तत्सिनाय (१-११-६१-४).
(१६) अस्मा इदु ग्ना श्चिद्देवपत्नी रिन्द्रायार्क महिहत्य ऊषु: (१-११-६१-८)
women saw the exploits of इंद्र. knew how to weave letters into patterns (स्त्रियांनी इंद्राचा पराक्रम पाहिला. त्याला शब्द ओवीबद्ध करावयाचे माहीत होते).
(१७) आपो न धीरो मनसा सुशस्त्यो गिरः समंजे विदथेषु आभुवः (१-११-६४-१) मनसा गिरः समंजे I cleave together words in mymind annoint together (मी माझ्या मनांत शब्द एकत्र करतो व गुंफतो).
(१८) जारः कनीनां पतिर्जनीनां (१-१२-६६-४) lovers of girls.
यस्त्वा भ्राता पति र्भूत्वा जारो भूत्वा निपत्यते ।। प्रजां यस्ते जिघांसति तमितो नाशयामसि ।
(अध्याय १० - अष्टक १६२ - वर्ग ५) Brothers or owners or lovers lay with women भ्राता, पती किंवा जार होऊन इत्यादी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
तेथील शह उठऊन माघारे आले ते समई सावर्डे माहालापासून लुटीत आले कसबा संगमेश्वर येथे वीस दिवस तळ दिल्हा कसबा लुटिला तेव्हापासून कसब्याचे लोक वराघाटे जाऊन बाहेर प्रातात जाऊन राहिले ते अद्यापी गावी आले नाहीत तेव्हापासून कसबा खराब पडिला माहाला दाहा वर्षे उज्याड होता त्याजवर श्रीमंत कैलासवासी श्रीपतराव प्रतिनिधीयाणी आमचे चुलत आजे विसोबा नायक याजला सातारेयासी बोलाऊन नेऊन माहाल भरावयाविसी कौल दिल्हा त्याजवरून माहाल भरिला आणि प्रचीतगडी मुलें माणसे होती ती कसब्यात आणून वाडा बांधोन राहिले माहालचा कारभार दाहा बारा वर्षे त्याणी केला पुढे माहाल श्रीमत कैलासवासी कान्होजी आंगरे सरखेलयाणी श्रीपतराव याजकडून इजारा करून घेतला असे दोहो वर्षांनी विसोबा नायक कसब्यात वारले त्याची स्त्री समागमे गेली. अंतोवा नायक होते तेहि एक वर्षानंतर विशालगडास गेले केशव नायक पुतण्ये वाड्यात ठेविले होते त्यास रत्नागिरी शेखोजी आंगरे याणी घेतली तेव्हा केशव नायक कुलाब्यास गेले तेथून येऊन रत्नागिरीस घर बांधोन राहिले कसब्यातील वाड्यात बिराडू ठेविले होते त्याचे हातून आग लागली किंवा कांबळ्या चाकर वाड्याचे उस्तवारीस ठेविला होता त्याचे हातून आग्न लागोन वाड जलाला ऐसी लोकांची बोली आहे त्यास अजमासे पनास वर्षा आलीकडे होतील वाडा जलाला परंतु वाड्यानजीक बाग व वाड्याचे इमारतीचे रखवालीस चाकर नेहेमी घरे बांधोन वाड्यापुढे आहेत व सिमग्याचा मान आमची वस्ती वाड्यात नाही तथापि चालत आहे येविसीचा करीना आलाहिदा राजश्री परशुरामपंत याजवल लेहून दिल्हा आहे त्यावरून सर्व अर्थ आपल्या ध्यानात येईल कसब्यातील वाडा आमचा येथे च वडीलाची वस्ती चाकर कुणबिणीची सभोवती वाड्यापुढे घरें आहेत कसब्यात नादणूक याजमुळे वाडा मातबर बाधिला आहे. कसब्याखेरीज खासगत वतनी गांव व सुभ्यास कारभारामुले जाणे पडे व कारभारी नेहमी राहात याजमुळे वाडे बांधिले आहेत ते हाली वाडे आहेत परंतु त्याची इमारत व आवार व बागेतील जुनी झाडे आहेत ते वाडे
महिकावती (माहीम)ची बखर
३०. ताम्रपट व शिलालेख यांतील वंशावळीशीं दत्ताची वंशावळ पडताळून पहातां, ती भाकड ठरते. मुसुलमान तवारिखकारांनीं वर्णिलेल्या देवगिरीच्या लढाईच्या वृत्तान्ताशीं भगवान् दत्तानें दिलेला वृत्तान्त पडताळून पहातां, तो बराच विश्वसनीय मानतां येतो. म्हणजे पडताळ्या खेरीज दत्ताच्या शब्दा वर बिनधास्त विश्वसितां येत नाहीं. बखरींच्या प्रामाण्या संबंधानें भगवान् दत्त हा एक साक्षीदार आहे. त्याचें प्रामाण्य ढासळल्या वर, अशी शंका येत्ये कीं केशवाचार्यादि बाकीचे साक्षीदार तरी कितपत विश्वसनीय आहेत ? पडताळ्या खेरीज त्यांच्या साक्षी वर कितपत विश्वास ठेवावयाचा ? साक्षीदार प्रमाणबद्ध व सुसंगत बोलत असला व इतर बाह्य साक्षीदारांच्या जबानीशीं त्याची जबानी जुळत असून ती मानवी शक्यतेच्या टापूंतील असली, म्हणजे साक्षीदार विश्वसनीय व वस्तुकथक समजण्यास फारशी हरकत नसते. पडताळा पहाण्यास इतर साक्षीदार नसले, तर साक्षीदार प्रमाणबद्ध, सुसंगत व कालशक्य बोलत असला म्हणजे त्याला इतिहासकक्षेंत प्रवेश्य समजतात. बखरींत एकंदर सहा प्रकरणें आहेत. पैकीं पहिल्या व चवथ्या पद्य प्रकरणांचा कर्ता जो भगवान् दत्त त्याला बिनचूक विश्वसनीय साक्षीदारांच्या सदरांतून आपण काढून टाकला. बाकी राहिले दुस-या, तिस-या, पांचव्या व साहाव्या प्रकरणांचे कर्ते. त्यांतून तिसरें प्रकरण यद्यपि केशवाचार्यानें अंशतः लिहिलें आहे,तत्रापि त्यांत केशवाचार्या नंतरच्या संस्कारकानें बराच ज्यादा मजकूर जोडला आहे. दुसरें प्रकरण सबंद केशवाचार्याचें आहे आणि तें येथून तेथून सर्व प्रमाणबद्ध व सुसंगत आहे. तिसरें प्रकरण हि असेंच प्रमाणबद्ध व सुसंगत समजण्यास हरकत नाहीं. पांचवें व सहावें हीं दोन्हीं प्रकरणें प्रमाणबद्धता व सुसंगतता ह्या दोन्ही बाबतींत पाप करीत नाहींत. तस्मात् प्रमाणबद्धता, सुसंगतता व मानवी शक्यता ह्या तीन बाबीं संबंधानें हीं चारी प्रकरणें इतिहासकक्षेंत प्रवेश्य समजावीं लागतात. मुसुलमान, पोर्तुगीज, रामनगरकर व पट्टेकर यांच्या संबंधानें जो मजकूर बखरींत आला आहे त्याला मुसुलमान व पोर्तुगीज तवारिखकारांच्या लिहिण्याचा पडताळा हि आहे. करतां बखरींतील मुसुलमानादिकां संबंधीची हकीकत स्थूलमानानें वास्तविक घडलेली धरून चालण्यास हरकत नाहीं. मुसुलमान, पोर्तुगीज, रामनगरकर व पट्टेकर कोंकणांत वावरून गेले, ही बाब तरी विश्वसनीय व इतिहासकक्षेंतील आहे, हें पडताळ्यानें सिद्ध आहे. प्रमाणबद्धता, सुसंगतता व मानवी शक्यता ह्या तीन अंतर्गत पुराव्यांनीं मुसुलमानादिकांचें कोंकणांतील अस्तित्व विश्वसनीयतेच्या टापूंत येतें आणि मुसुलमान व पोर्तुगीज लेखकांच्या बहि:पुराव्यानें तें अस्तित्व वास्तविकत्वा प्रत पोहोचतें. अंतर्गत पुराव्यानें हकीकतीचा इतिहासकक्षेंत फक्त प्रवेश होता व बहि:पुराव्यानें हकीकतींत वर्णिलेल्या व्यक्ति व त्यांचीं कार्ये वास्तविकतेच्या साक्षात् रूपास पोहोचतात. केशवाचार्यादि साक्षीदार अंतर्गत पुरावा प्रमाणबद्ध, सुसंगत व मानवी शक्यतेंतील देतात. तेव्हां त्यांचें लिहिणें म्हणजे लिहिण्यांतील व्यक्ति व त्यांचीं कृत्यें इतिहासकक्षेंत प्रवेश करण्यास पात्र आहेत, हें स्वच्छ ठरतें. ह्या दृष्टीनें बिंबवंशीय राजे, नागरशादि राजे, भोंगळे, नायते राजे, बिंबदेव जाधव, इत्यादि व्यक्ति व त्यांचीं कार्ये इतिहासशक्य आहेत, एवढे कबूल केल्या शिवाय सुटका नाहीं. परंतु ह्या व्यक्ति व त्यांचीं कार्ये वास्तविक घडलीं अश्या सिद्धीच्या कोटीस चढण्यास केवळ अंतर्गत पुरावा पुरा पडत नाहीं, त्याला बहिःपुराव्याची अपेक्षा रहात्ये. ताम्रपट, शिलालेख, मुसुलमानी तवारिखा, प्रवासवृत्तें, काव्यें किंवा अन्य सजातीयविजातीय संस्कृतप्राकृत लेख ह्यां पैकीं कशाचा च पडताळा बिंबवंशीय राजांच्या किंवा नागरशादि राजांच्या बखरींत दिलेल्या कथां संबंधानें किंवा हकीकती संबंधानें उपलब्ध नाहीं. बिंबवंशीयादि राजे उत्तर कोंकणांत होऊन जाणें शक्य आहे. परंतु ते साक्षात् झाले व वावरून गेले, असें ठाम म्हणण्यास बहि:पुराव्याच्या अभावीं सकृद्दर्शनीं मोठी अडचण पडत्ये. काल, स्थल, व्यक्ति व तपशील ह्यांनीं बिनचूक सजवून गेल्या महिन्यांत पुणे शहरांत अमक्याचें राज्य झालें, अशी साक्षात् घडलेल्या इतिहासा सारखी एखादी कादंबरी एखादा कादंबरीकार निर्माण करूं शकेल. कालस्थलादींचा चोख निर्देश करणारे असले कादंबरीकार यूरोपांत सध्यां विद्यमान आहेत. अशी एकादी इतिहाससम कादंबरी कोण लीलेनें पांच शें वर्षां पूर्वीं लिहून ठेविली आणि सर्व धाग्यादो-यांचा नापत्ता होऊन पांच शें वर्षां नंतर ती लेखी कादंबरी कोण्या संशोधकाच्या हातीं पडली, तर ती इतिहाससम कल्पित कादंबरी, केवळ अंतर्गत पुरावा वस्तुप्रामाण्याला पुरा आहे असें समजल्यास, वास्तविक इतिहास म्हणजे साक्षात् घडलेला इतिहास म्हणून मान्यता पावण्याचा संभव च नव्हे तर निश्चय आहे. उलट पक्षीं बहि:पुराव्या खेरीज कोणती च हकीकत खरी मानावयाची नाहीं असा हट्ट धरल्यास, बहि:पुरावा ज्या संबंधानें उपलभ्य व उपलब्ध नाहीं त्या सर्व वास्तविक बाबी कल्पित कादंब-यांच्या सदरांत ढकलल्या जाण्याची निश्चितता आहे. उदाहरणार्थ, अलेक्झांडरची सिंधुनदा वरील स्वारी घ्या. हिचें वर्णन ग्रीक ग्रंथकारांनीं लिहून ठेविलें आहे. हा अंतर्गत पुरावा झाला. परंतु हिंदू ग्रंथकारांनीं हिचा व हिचा कर्ता, जो अलेक्झांडर त्याचा नाममात्रें करून हि उल्लेख सुद्धां केला नाहीं. म्हणजे ह्या स्वारीला बहिःपुरावा नाहीं.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
वेदान्तर्गत टिपणे
(०) वस्त्रेणेव वासया मन्मना शुचिं (१-२१-१४०-१) writing on cloth (कापडावर लिहिणे).
(५) एक श्वरन् उपशाकेमि रिन्द्र = हे इंद्र शाकेभिः एकः उपचरन् ।
येथे शाक लोकांचा उल्लेख आहे, कारण पुढील अर्धात सनकांचा उल्लेख आहे. सनक हे वृत्रानुचर होते.
(६) सं अर्यो गा अजति यस्य वष्टि । अर्य may mean वैश्य (अर्य याचा अर्थ वैश्य असणे शक्य आहे). (७) (१) हलीबिश, शुष्ण, वृत्र, सनक who were अनुचरs of इंद्र, सप्त
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(६) कंस brother of देवकी kills sons of देवकी, for fear they might usurp his thrown. देवकी lives with कंस with her husband i. e. the husband was Sub-ordinate i. e. there was a tribe where husbands had to live in the tribe of the wife and the ownership of the children belonged to the brother of the wife, which clearly shows that at a previous stage of development there was मल्याळ
polyandry in the कंस & कृष्ण tribe -slowly the tribe was coming out of matriarchy to patriarchy, but by stage. The heritage belonged to the sons of the Sister.
आपले सिंहासन घेतील या भीतीने कंस आपली बहीण देवकी हिच्या मुलांना ठार मारतो. देवकी आपल्या नव-याबरोबर कंसाच्या घरी रहाते म्हणून नव-याचे स्थान दुय्यम. म्हणजे अशा टोळ्या होत्या की ज्यात नव-याला पत्नीच्या टोळींत रहावे लागे आणि मुलावर पत्नीच्या भावाचा अधिकार असे. यावरून हे स्पष्ट होते की, विकासाच्या आधीच्या टप्प्यात कंस आणि कृष्ण यांच्या टोळींत मल्याळ बहुपतित्व रूढ होते. हळू हळू टोळी मातृप्रधान समाजातून पितृप्रधान व्यवस्थेकडे येत होती, परंतु टप्प्याटप्प्याने वारसा बहिणीच्या मुलाकडे असे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(१) प्रजापति ष्ट्वा नियुनक्तु मह्यभ् (पारस्कर-कांड १ कंडिका ८ वाक्य ८).
(२) पांडव हे तिबेटातून आले. कौरव हे काश्मीरातून आले. पांडवांत Polyandry (बहुपतित्व) होती. कौरवांत Polygamy (बहुपत्नित्व) होती. पांडवांत शिवाय प्रत्येक भावाला निराळी बायको होती, म्हणजे पृथक् लग्ने करण्याची चाल पडत चालली होती. कौरवांत एका गांधारीला १०० पुत्र झाले; व ते कुंभात रुजत ठेविले होते. कुंभ म्हणजे घट, एक घर, अनेक स्त्रियांपासून धृतराष्ट्राला जे पुत्र झाले ते सर्व पट्टराणी जी गांधारी तिचे समजले जात. गांधारीला कन्या एकच होती. म्हणजे कन्याहत्या कौरवांत होती हे उघड झाले.
(३) पंजाबात Marriage (विवाह) फार स्वैर असे. ते कां ? तर पूर्वेकडील जे कौरव-पांडव त्यांच्याहून नंतर पंजाबातील आर्य पंजाबात शिरले व त्यांच्यात कौरवपांडवांच्या इतकी सुधारणा अद्याप लग्नाच्या बाबतीत झाली नव्हती. अनेक टोळ्या निरनिराळ्या संस्कृतीच्या व कालाच्या अंतराअंतराने हिंदुस्थानात शिरल्या, त्याला हे प्रमाण आहे.
(४) नृप= Feeder of leading men. नेत्यांना पोसणारा.
नृनाथ=One who is obsequeously obliged by नृ s. नरनाथ,
नंतर उपकृत केला गेलेला.
राजन् = One who entertained नृ s. आतिथ्य करणारा feudal words; when leaders were beseeched and followers were rewarded. सरंजामशाही समाजातील शब्द. जेव्हा नेत्यांना विनंती केली जाई आणि अनुयायांना बक्षिसे दिली जात.
पृथ्वीपति, पार्थिव, भूपति lords of earth, dominins.
(५) गोविंद = Obtainer of cows - गाई मिळविणारा.
गोपाळ= Protector of cows–गाईचे रक्षण करणारा.
कृष्ण = One who loots.- लूटमार करणारा.
हरि=One who lifts cattle.-जनावरे चोरणारा.
देवकीनंदन=Son of देवकी (देवकीचा पुत्र), mother name
आईचे नाव.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
७. ननंदृ who sympathised with the girl, who was forcibly carried away from one horde to another. (एका टोळीतून दुस-या टोळीत बळजबरीने नेलेल्या मुलीबद्दल सहानुभूती बाळगणारी).
८. यातृ-workers, co-workers with the girl forcibly carried away. बळजबरीने नेलेल्या मुलीबरोबर काम करणारे सहकारी.
९. श्वश्रू (F)- who directed the dogs against ran away foreign girls from the horde. टोळीत बाहेरून आलेल्या व पळून जाणा-या मुलीच्या मागे कुत्रे सोडणारी. श्वशुर (M ) who directed the dogs (कुत्री सोडणारा).
(१०) भ्रातृ who supported the horde & brought provisions to the horde. टोळीला पोसणारा आणि टोळीसाठी अन्नसामग्री आणणारा.
(११) भर्तृ= हर्तृ who forcibly abducted girls. मुलींना बळजबरीने पळविणारा.
(१२) भार्या = हार्या one abducted पळवून नेलेली.
(१३) देवृ - One who pities & sympathises with the co-wife. सवतीबद्दल दया आणि सहानुभूती दाखविणारी.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
१. पितृ (पा-पालन करणे) == पालन, रक्षण करणारा Protector and fighter of the horde.
२. मातृ (मा-मोजणे )= अन्न मोजून देणारी distributor of food, grain & flesh to the different families in the horde who lived in a long wigwam,
३. दुहित ( milk-maid) of the horde, टोळींतील दूध काढणारी स्त्री.
४. स्वसृ who followed her own people and married her own brothers. आपल्याच लोकांत राहणारी आणि आपल्या बंधूशीच विवाह करणारी.