Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

(५८) आरट्ट देशातील, वाहीक देशातील स्त्रिया मैथुनकाली स्वपरपुरुष विचार राखीत नाहीत, अशी शल्याची कर्ण निंदा करितो (कर्ण-४४) व अभद्र शब्द उच्चारतात. त्यांच्यात जारज प्रजेचे अतिशय प्रमाण असते (कर्ण-४४). शूद्रापासून अन्य स्त्रियांच्या ठिकाणी झालेले अधम ब्राह्मण तेथे आहेत. प्रस्थल, मद्र, गांधार, आरट्ट, खस, वसाति, सिंधुसौवीर, कारस्कर, माहिषक, कालिंग, केरल कर्कोटक, वीरक इत्यादी भ्रष्ट देशांची नावे कर्ण घेतो.

आरट्ट देशात बहिणीच्या मुलांना वारसाहक्क प्राप्त होतो. पुत्राना तो होत नाही (कर्ण-४५).

वाहीक देशात मनुष्य प्रथम ब्राह्मण बनतो. मग क्षत्रिय होतो. मग वैश्य होतो. नंतर शुद्र होतो, आणि शुद्राची नापितही होतो, पुनः ब्राह्मण होतो व ब्राह्मणांचा पुनः गुलाम बनतो. (कर्ण -४४). गांधार, मद्रक व वाहीक या देशातील लोक निंद्य आहेत (कर्ण-४४).

पंचनद देशातील लोक म्हटले म्हणजे कृतयुगातसुद्धा अधर्माचरण करणारे (कर्ण४५). कृतयुग was allअधर्म, and in such a युग वाहिका s were होत्या.

भिक्षा मागणे हे क्षत्रियांना लांछन आहे. व्रतांचा त्याग करणे हे ब्राह्मणांना लांछन आहे, वाहीक लोक भूतलाला लांछन आहेत व मद्रस्त्रिया स्त्रीजातीला लांछन आहेत (कर्ण ४५).

१. कन्यादूषण, २. देख संगम ३. देवसंगम, ४. षंढ, ५. Barter (विक्री) कन्याविक्रय, ६. hire out (भाड्याने देणे)-माधवी, ७. हकीकत ब्रह्मदेवाच्या पूर्वीची. maternal(मातृप्रधान) प्रजापतीपासून निराळी नीतिमत्ता सुरू झाली.
Patriarchal (पितृप्रधान). ८. स्वयंवराची चाल :-

मद्र देशात पिता, पुत्र, माता, सासू, सासरा, मामा, जावई, मुलगी, भाऊ, नातू व दुसरे बांधव, सोबती, पाहुणे, दासदासी ही सर्व एके ठिकाणी मिसळतात. त्या देशातील स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी स्वेच्छेने सहवास करतात, मग ते पुरुष त्यांच्या ओळखीचे असोत किंवा नसोत. भलती सलती गाणी गातात. मद्रदेशामुळे गांधारीचाही आचार बिघडला. मद्र देशातील स्त्रिया दारू पितात व वस्त्रे टाकून नागव्या नाचतात. वैवाहिक विधींनी स्त्री-पुरुषांचे संबंध नियत होत नाहीत व स्त्रिया मन मानेल त्य पुरुषाला नवरा करतात. स्त्रिया उंट किंवा गाढवाप्रमाणे नैसर्गिक उत्सर्ग करतात. मद्र देशातील स्त्रियांपाशी कोणी मद्य मागितले तर त्या कुले खाजवीत खाजवीत मद्य देणार नाही. वाटेल तर पुत्र किंवा पती देऊ म्हणतात. मद्र देशातील कुमारिका निर्लज्ज व अनाचारी असतात (कर्ण ४०).

म्लेंछ सर्व मानवजातीला लांछन, औष्ट्रिक म्लेंछांना लांछन, षंढ औष्ट्रिकांना लांछन, राजपुरोहित षंढांना लांछन (कर्ण-४५). सुराष्ट्रातील लोक संकरवृत्ती आहेत (कर्ण-४५).

मद्र गुरुपत्नीगमन, भ्रूणहत्या करतात (कर्ण-४५).

पृथ्वीवर वाहीक लोकांचे वास्तव्य पृथ्वीला कमीपणा आणते असे नारद व्यासांना सांगतात (शांति. ३२८).

शल्य म्हणतो :-अंग देशात बायकामुलांचा विक्रय होतो (कर्ण-४५).

(५४) मातेचे शव वृक्षास बांधून ठेवण्याची चाल सैबीरियात आदळते ( विराट ८-५ पृ. ११ a). पांडवांनी आपली शस्त्रे ठेवली तो शमीवृक्ष.

(५५) कीचकाच्या शवाबरोबर सैरंध्री जी द्रौपदी तिला जाळण्याकरिता नेतात (विराट- अ. २२ । २३). This custom was to carry everything loved by the dead. मृत व्यक्तीला जे प्रिय होते ते सर्व बरोबर नेण्याची चाल होती.

(५६) दौहित्रांनी मातामहाचा उद्धार : माधवीची कथा (उद्योग - २१)
पुत्रिकापुत्र.
Sons of daughters supported fathers of daughter. Sons were begotten from males of other clans. From this custom sprang the custom of considering कानीन s as sons. कानीन s were begotten on a daughter from a stranger at home.

मुलींची मुले मुलींच्या वडलांचा सांभाळ करीत. इतर टोळीतील पुरुषांचेपासून मुले होत. या चालीतूनच कानीन यांना अपत्य समजण्याची प्रथा अस्तित्वात आली. कानीन म्हणजे मुलीला घरीच बाहेरच्या पुरुषांपासून झालेले अपत्य.

(५७) पुत्र मातांशी रत होत आहेत, म्हणून दुश्चिन्ह (भीष्म-३).

(४५) जरत्कारू व अगस्त्य यांना आपले पितर उलटे लोंबत असलेले दिसले. अपत्य त्यांना पडू देत नाही. a horde which did not catch females from another horde came naturally to an end. दुस-या टोळीतून स्त्रिया पळवून न आणणारी टोळी सहाजिकच नष्ट होई (आदि. व वन - ९६)

(४५) युवनाश्व गर्भार राहिला व त्याची बरगडी फोडून मांधाता पुत्र जन्मला (वन १२६). इंद्राने मांधात्याला आपल्या तर्जनीने पाजिले. (convade) स्त्रीकर्मांनुकरण.

(४७) सोमकाने आपला पुत्र जंतू याचा होम केला (वन. १२७ - १२८).

(४८) कृतयुगांत सर्व चतुष्पाद धर्म येतात. त्रेतां यज्ञ सुरू झाला. द्वापारात तप व दान होते. कलींत भक्ती सुरू झाली (वन. १४९) यज्ञ व तप लोपली.

(४९) सप्तर्षीच्या स्त्रियांचा व अग्नीचा अन्योन्य समागम (वन. २५५ । २२६).

(५०) रावण वश न झालेल्या स्त्रीशी समागम करू शकत नाही (वन. २८०).

(५१) सुग्रीवाची स्त्री तारा त्याचा पराभव झाल्यावर सुखाने वालीकडे गेली आणि जय झाल्यावर पुन्हा निमूटपणे सुग्रीवाकडे आली (वन - २८०).

(५२) मातेचा पती मेल्यावर तिचे संरक्षण करणारा पुत्र, असे शब्द अश्वपती राजाच्या तोंडून निघाले. Mother's husband means any husband even other than the progenitor of the son- आईचा पती याचा अर्थ आपल्या मुलाचा पिता नसलेलाही कोणताही पती (वन २८३).

(५३) कुंतीने सूर्याला आव्हान केले तेव्हा तिला रजोदर्शन झाले नव्हते, ती अप्रौढ होती. परंतु, लगेच रजोदर्शन होऊन ती समागमेय झाली (वन - ३०६). यावरून This shows that immature girls cohabited with men, वयात न आलेल्या मुलींचा पुरुषाशी संबंध होई असे दिसते.
सूर्योपभोगानंतर कुंती कुमारीच म्हणजे अक्षतयोनि राहिली.
(वन - ३०७) सूर्य म्हणतो, कन्या शब्दाची व्युत्पती कम् धातूपासून झाली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. तिजवर कोणाचाही अधिकार नाही. अधर्म नाही. स्त्रिया व पुरुष यामध्ये आडपडदा नसणे हीच लोकांची मूळची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार कृत्रिम आहेत. तू जरी माझ्याशी समागम केलास तरी कुमारीच राहशील.

(३४) सुभद्राहरण कृष्ण व युधिष्ठिर यांच्या अनुमतीने व सर्व यादवांच्या अनुमतीने होते (आदि २२०).

(३५) जरा नामक नरमांसभक्षक राक्षसीने दोन शकले असलेले जरासंध नामक बालक चवाट्यावरून ओढीत नेले (समा - १७ - पृ. ५१ b). हेच राक्षस महारादि लोकांचे पूर्वज असावेत.

(३६) माहिष्मती नगरीतील स्वच्छंद स्त्रिया (सभा ३१).

(३७) पती कोणत्याही स्थितीत असला तरी स्त्रीवरची त्याची सत्ता नाहीशी होत नाही असे भीष्म म्हणतात (सभा - ६७)

(३८) कुलाचा अधिपती त्यांतील व्यक्तींचा मालक व व्यक्तींच्या पुण्याचा व तपाचा अधिकारी असतो. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्राणाचाही अधिकारी असतो (सभा - ७०) असे भीम द्रौपदीला सभेत आणली असता म्हणतो.

(३९) मालक जिंकिला गेल्यावर त्याची कुलांतील व्यक्तींच्या प्राणावरील मालकी उडते असे भीम प्रतिपादितो (सभा - ७०)

(४०) धृतराष्ट्राला प्रजापति म्हटले आहे (सभा - ७५). सप्त प्रजापति. प्रज शब्द जुनाट मराठी लेखातून येतो.

(४१) Incest रक्तसंबंधी नात्यात सुरतसंबंध : ऊर्वशी ही पौरव वंशाची जननी अर्जुनावर कामासक्त झाली. ती म्हणाली, अप्सरास कसलाच प्रतिबंध नाही. पुरूच्या वंशातील जे पुत्र अथवा नातू इंद्रलोकी येतात ते आमच्याशी रमतात, तथापि ते अधर्म्य नसते. परंतु अर्जुनाने तिची ही याचना मान्य केली नाही. Incest wa8 unknown to अप्सरा s, रक्तासंबंधी नात्यात सुरतसंबंध माहीत नव्हते. तेव्हा ऊर्वशीने शाप दिला की तू षंढ होशील (वन, ४६). पुरूरव्याला उर्वशीपासून ७ पुत्र झाले (हरि. २५).

(४२) नलदमयंती : इंद्र, अग्नी, यम आणि वरुण या देवांपैकी एकास दमयंतीने वरावे असे नल म्हणतो. अर्यमन् , पूषन् , वरुण यांचा उल्लेख अश्वलायन् गृह्यसूत्रात येतो (१, खं. ७ सूत्र १३). ह्यांच्यापासून सुटका होऊन मनुष्यवराला नवरी मिळावी व मिळते. एके काळी देवांशी विवाह करणे मनुष्यांना अभिलषणीय वाटे, याचे हे चिन्ह राहिलेले आहे.

(४३) यज्ञात ऋत्विजांकडून प्रजोत्पादन, यालाच अयोनिज प्रजा म्हणत असत (द्रौपदी, इ. इ. इ.).

(४४) लोपामुद्रा अगस्त्याची मुलगी. हिला विदर्भराजापाशी ठेवून, उपवर झाल्यावर हिचे अगस्त्यानेच पाणिग्रहण केले (वन. ९६ । ९७ । ९८). Incest.

(२५) पुरुषांनी अनेक स्त्रिया केल्या तरी अधर्म होत नाही, असे ब्राह्मणस्त्री म्हणते (आदि. १५८ बकासुरवध).

(२६) देवलोक व पितृलोक. गंगानदी देवलोकांत अलकनंदा हे नाव प्राप्त झाली आहे व पितृलोकात वैतरणी हे नाव मिळविती झाली आहे. पितृलोक म्हणजे where ancient fathers lived (जेथे पूर्वज रहात).

(२७) वसिष्ठाला शंभर पुत्र होते (आदि १७४). विश्वामित्राला शंभर पुत्र. धृतराष्ट्राला शंभर पुत्र. polygamy. बहुपत्नित्व. आहुकाला शंभर पुत्र (सभा - १४, पृ. ४५ b). सगराला ६०,००० पुत्र ( वन. १०६). सोमकाला शंभर भार्या (वन. १५८) व शंभर पुत्र. कुवलाश्वाला २१,००० पुत्र होते (वन. २०२).

(२८) ग्लेंच्छ : पल्हव, द्राविड, शक, यवन, शबर, किरात, बर्बर, सिंहल, खस, चुबक, पुलिंद, चीन, हूण, केरल (आदि. १७५).

(२९) नरमांसभक्षण : कल्माषपाद राजा राक्षस होऊन नरमांसभक्षक झाला (आदि - १७६). हिडिंब नरमांसभक्षक होता. कालेय दैत्य ऋषी भक्षण करीत (वन - १०२).

(३०) अयोध्येच्या कल्माषपादाने आपली पट्टराणी आपले पुरोहित जे वसिष्ठ त्यांजकडे पाठविली व गर्भाधान करून घेतले.

(३१) अग्रजन्मत्वाचा अधिकार : अर्जुनाला युधिष्ठिराने द्रौपदीशी विवाह करण्यास सांगितले असता, अर्जुन म्हणतो, आपला युधिष्ठिराचा विवाह प्रथम झाला पाहिजे नंतर क्रमाने इतर भावांचा (आदि-१९१). आम्ही धाकटे भाऊ आपले दास आहो. नकुल सहदेवांनी भिक्षा मागून आणिलेली धर्माच्या स्वाधीन केली. धर्म ज्येष्ठ सबब गुरु.

सुंद उपसुंदाला म्हणतो, मी वडील आहे, तेव्हा तिलोत्तमा माझी भार्या आहे (आदि-२१२). ज्येष्ठ बंधू, त्याच्या पूर्वी लग्न करणार कनिष्ठ बंधू व ती स्त्री, ही तिन्ही पतित होत. (शांति-१६५).

(३२) परतंत्र वैश्य म्हणून द्रुपद म्हणतो (आदि. १९२, पृ. ३८८ b).

(३३) राजगृह येथील अंबुवीच राजाचे राज्य त्याच्या महाकीर्ण अमात्याने आटोपले (आदि. २०४). ही कथा शुंगांच्या राज्याची आठवण करून देत्ये.

ऐसे एसजी वाडकराने सांगीतले त्याउपरी बापोजी वाडकरास विचारिता बापुजी बोलिला जे तीनी पिढ्या आपण इनामतीचे सेत व घरठाण वीस हात व वीसा टकेचे कुणबावियाचे सेत इतके आपले आजे यासी समजाऊन आणिले यावरी चाळीस पनास वर्षे सदरहूप्रा। इनाम व घरठाणा व कुणबावियाचे सेत खात आहो हे खरे ऐसे दोघानी करीना सांगितलियावरी समस्त गोतानी हरदो वादियास विचारिले जे बापुजी वाडकर इनामतीचे सेत व घरठाणा व कुणबावियाचे सेत खातो हे हमशाही गावगनाचे पाटीलास दखल आहे की नाही त्यावरून दोघे वादे बोलिले जे हमशाही पाचा सा गावीचे पाटील वाडकर ते हि भाऊ होते त्यास व मौजे मा।रीचे बलूतेयासी ठावके त्यावरून गोतानी हरदोजणास विचारिले की हमशाही गावीचे पाटील व मौजे मा।रीचे बलुतेपैकी जे गावी हाजीर असतील ते गोही देतील त्याचे गोहीस राजी आहा की नाही त्यावरून दोघे वादे सिवधडे पाटीलाचे व मौजे मा।रीचे बलूतेयाचे गोहीस रजावद होऊन राजीनामा लेहोन दिला जे सिवधडे पाटील व गावीचे बलूते जे शफतपूर्वक गोही सागतील त्याप्रमाणे वर्तोन त्यास नामुकुर होऊन तरी दिवाणचे गुन्हेगार गोताचे खोटे ऐसा राजीनामा लेहोन दिल्हा त्यावरून रा। तिमाजी यमाजी मु॥ न्यायाधिशयानी रा। अनाजी जनार्दन सुभेदार प्रात वाई याकडे कागद लेहोन देऊन हरदो वादेयास सुभेदाराकडे पाठविले जे श्री कृष्णातीरी हमशाही सिवधडे पाटील व मौजे मा।रीचे बलूते याचे गोहीस हरदो वादे राजी जाले आहेत तुह्मी माहालचे सुभेदार आहा हमशाही पाटील व बलूते मिळऊन श्रीकृष्णातीरी शफतपूर्वक गोही विचारून लेहोन पाठवणे त्यावरून हरदो वादे सुभेदाराकडे गेले मोनिलेनी मौजे बोरगाऊ खुर्द ता। जोरखोरे येथे

येणेप्रमाणे गोत मिळऊन त्याचे माथा श्री ची शफत घालून विचारिले जे सत्य काय ते सागणे त्यावरून अवघियाचे मते कमा माहर व रामा माहर व खेला माहर व नागोजी घडसी मिरासीदार मौजे मा।रयाचे माथा श्रीची शफथ घातली यानी गोही सागीतली जे बापुजी वाडकर याचा आजा नादगावी होता तेथे एसजी पा। व निलोजी पा। वाडकर मौजे मा।र व भिकमाबला व भिकनाक माहर मौजे मजकूर इतकीयानी समजाऊन चिखलीस आणून विसा टकेचे सेत व इनामाचा टुकडा व घरठाणा वीस हात इतके देऊन त्याची समजाविसी करून गावास आणिले त्या तागाईत बापुजी वाडकर याचा आजा व बाप व बापुजी वाडकर ऐसे खात आले आहेती परतु यानी तकसीमदार ह्मणुन समजाविला की काय ह्मणुन समजाविला आहे आपणास कळले नाही ह्मणोन गोही दिल्ही म्हणुन रा। अनाजी जनार्दन सुभेदार प्रात वाई याचा कागद थळ मजकुरी हाजीर मज्यालसीस गोतानी वाचून मनासी आणिला कलम १

(१७) उजवी मांडी मुलीची, डावी मांडी स्नुषेची
(आदिपर्व ९७ पृ. २१७ b)
प्रतीपाची कथा - गंगा उजव्या मांडीवर येऊन बसली.

      २              ३          ४           १
(१८) कुल, गण व पक्ष, अन्वय (आदि. ६६ पृ. १४७ b)

(१९) प्रतीपाने मुलगी गंगा मुला (शंतनू) करिता पसंत केली. त्यात शंतनूचे मत बिलकुल घेतले नव्हते (आदि. ९८).

(२०) उतथ्याचा धाकटा भाऊ बृहस्पती उतथ्याच्या ममता नामक स्त्रीजवळ कामुक बुद्धीने गेला. संभोग देण्याची तिची हरकत नव्हती. परंतु ती गर्भार होती. सबब तिने हरकत घेतली (आदि. १०४)

देवरधर्म नियोगाची चाल.
( २१) बलिराजाने संतानोत्पादनार्थ दीर्घतमा ऋषीला घरी बाळगले. सुदेष्णेपासून दीर्घतम्याच्या वीर्याने अंग, वंग, कलिंग, पुंडू व सुम्ह असे पुत्र झाले (आदि. १०४). नियोगाची चाल म्हणून भीष्मांनी ही कथा सांगितली आहे.

(२२) काही थोडे द्रव्य देऊन एखादा ब्राह्मण बोलावून आणावा व त्याच्याकडून क्षेत्रामध्ये प्रजोत्पादन करून घ्यावे, म्हणून भीष्म सांगतात (आदि. १०५).
शरदंडायनाने आपल्या भार्येस पुत्रोत्पादन करण्यास सांगितले. तिने राजमार्गावर जाऊन एका ब्राह्मणास आमंत्रण दिले व त्या ब्राह्मणाकरवी पुत्रोत्पादन केले (आदि. १२०).

वडील दिराकडून पुत्रोत्पादन करावे (आदि. १२०).
सौदासाने आपल्या मदयंती स्त्रीला वशिष्ठाकरवी पुत्रोत्पादन करण्याची आज्ञा केली (आदि. १२२). यवनराजाने गार्ग्याकडून स्वस्त्रीचे ठायी कालयवन निर्मिला (विष्णुपुराण हरि - ३४).

(२३) मानस प्रजा, शवापासून प्रजा (आदि. १२१). व्युषिताश्वाची कथा. There was a myth current from very ancient times that children could be begot from the dead body of a husband. मृत पतीच्या शरीरापासून पुत्रप्राप्ति होऊ शकते अशी अतिप्राचीन कालापासून चालत आलेली कल्पना होती.

(२४) *  (आदि-१२२) अतिप्राचीन कालीन विवाहनीती. स्त्रिया अनियंत्रितकौमारावस्थेपासून मैथुन-उत्तर कुरूंत म्हणजे तिबेटात हाच धर्म आहे म्हणून पांडू सांगतो. विवाहमर्यादा प्राचीन नाही. तिचा स्थापक श्वेतकेतू . ब्राह्मण श्वेतकेतूच्या मातेचा संभोगार्थ हात धरतो. त्याचा श्वेतकेतूस राग येतो व तो मर्यादा घालतो की (१) परपुरुषसंगत्याग, (२) परस्त्रीसंगत्याग, (३) पुत्रप्राप्त्यर्थ पतीच्या अनुज्ञेने परपुरुषसंग. श्वेतकेतूचा बाप उद्दालक म्हणतो की स्त्रियांनी स्वैरसंग करणे हा धर्म म्हणजे मान्य प्रचारच आहे.

(१६)

१. दक्ष प्रजापती

२. कन्या x कश्यप-कन्येचे नाव अदिति
३. विवस्वान्
४. मनु
५. इला
६. पुरूरवा - ऊर्वशी
७. आयु
८. नहुष
९. ययाति             यादव       यवन        भोज       म्लेंच्छ      पौरव
                          यदु,        तुर्वसु,        द्रुह्यु,       अनु,       पुरु
१०. कुरू x कौसल्या
१२. जनमेजय x अनंती (मधुकुल)
१३. प्राचिन्वान x अश्मकी (यादव कुल )
१४. संयाति x वरांगी दृषद्वानाची मुलगी
१५. अहंयाति x भानुमती कृतवीर्याची मुलगी
१६. सार्वभौम x सुनंदा केकय
१७. जयत्सेन x सुश्रूवा विदर्भ,
१८. अर्वाचीन xमर्यादा विदर्भ
१९. अरिह x अंगदेशाची राजकन्या
२०. महाभौम x सुयज्ञा प्रसेनजिताची मुलगी
२१. अयुतनायी xकामा पृथुश्रव्याची मुलगी
२२. अक्रोधनx करंभा कलिंग
२३. देवातिथी x मर्यादा विदेह
२४. अरिह x सुदेवा अंग
२५. ऋक्ष x ज्वाला तक्षककन्या
२६. मतिनार x सरस्वती देशस्थ सरस्वती
२७. तंसु x कलिंग कन्या
२८. इली x रथंतरा
२९. दुष्यंत x शकुंतला
३०. भरत x काशेयी सार्वसेनी
३१. भुमन्यू x विजया दशार्ह
३२. सुहोत्र x सुवर्णा इक्ष्वाकुवंशीय
३३. हस्तिन् x यशोधरा त्रिगर्त. हस्तिनापूर वसविणारा
३४. विकुंठन x सुदेवा दशार्ह
३५. अजमीढ x कैकयी, गांधारी, विशाला, ऋक्षा १२० मुलगे.
३६. संवरण x तपती विवस्वानाची मुलगी
३७. कुरु x शुभांगी दशार्ह
३८. विदुर x सांप्रिया मधु
३९. अनश्वा xअमृता मगध
४०. परीक्षित् x सुयशा
४१. भीमसेन x कुमारी कैकेय
४२. प्रतिश्रवा x ०
४३. प्रतीप x सुनंत शिबिकन्या

५०. जनमेजय x वपुष्टमा
५१. शतानीक व शंकुकर्ण x विदेहकन्या
५२. अश्वमेध दत्त

(१२) मनूपासून ब्राह्मण व क्षत्रिय झाले. वर्णव्यवस्था मनूपासून. क्षत्रियांत इला ही स्त्री लढाऊ झाली ( आदि. अ. ७५). रेत व शोणित या उभयतांचेही आधान इलेनेच केले. चतुर्धर म्हणतो की इलेला बुधापासून पुरूरवा झाला व तिने पुरूरव्याला राज्य दिले म्हणून मातृत्व पितृत्व इलेकडेच आले.

(१३) अ - पुरुष याचक किंवा भिक्षा स्त्रीची मागतो, याची उदाहरणे अनेक आहेत. पुरुष याचक Man proposer. शर्मिष्ठेने ययातीजवळ ऋतुभिक्षा, गर्भाधानाची भिक्षा किंवा याचना केली. स्त्री याचक Woman proposer (आदिपर्व ८२).
ब-सखीचा जो पती तोच तिच्या दुस-या सखीचा पती अशी चाल होती (आदि. ८२). दासी दोन प्रकारच्या (१) सखी दासी व (२) परिचारक दासी.
A man became husband to all the associates and followers of the chief girl. दासी s were the property of the chief girls & when the chief girl became wife & property of the husband, her दासी s also became property of the husband (आदि. ८२),
प्रमुख कन्येच्या सख्या आणि सेविका या सर्वांचा पुरुष पती होई. प्रमुख कन्येच्या दासी या तिची मालमत्ता असत आणि जेव्हा प्रमुख कन्या नव-याची पत्नी आणि मालमत्ता बने तेव्हा दासीसुद्धा त्या नव-याची संपत्ती बनत (आदि. ८२).

(१४) शास्त्राने उपभोग्य म्हणून ठरविलेली कामुक स्त्री जर एकांतात भोग मागेल तर तो तिला दिला पाहिजे, नाही तर तो धर्मदृष्टीने भ्रूणहत्या करणारा होतो असे नीतिवेत्ते म्हणत आले आहेत (आदि. ८३ पृष्ठ १९१ a). उलूपी अर्जुनाला म्हणते की मदनार्त स्त्रीची इच्छा पुरविणे एक रात्र समागम हा अधर्म नाही (आदि. २१४).

(१५) ययाति तुर्वसूला शाप देतो, गुरुदारेशी रत होणारे व पशूंसारखे ज्यांचे आचार विहार आहेत असे म्लेंच्छ लोक (आदि ८३ पृष्ठ १९२ b). उच्चवर्णाच्या स्त्रियांशी जेथे नीच वर्णाचे पुरुष रमतात असे अंत्यज (आदि. ८३ पृष्ठ १९२ b).

(५) सहगमन : मृताबरोबर स्त्री, गाय व मालमत्ता जाळीत असत. माद्रीने पांडूशी सहगमन केले. अग्निहोत्र्याबरोबर त्याचा अग्नी, यज्ञपात्रे, गाय किंवा शेळीं जाळींत व क्षत्रिय असल्यास धनुष्य मोडून जाळीत. स्त्री, अग्नी, यज्ञयात्रे ही जाळीत (आश्वलायन गृह्यसूत्र, अ. ४).

(६) गुरुतल्पगमन : उत्तंकाची कथा (आदिपर्व अ. ३). आश्रमस्त्रियांनी गुरुपत्नीचा ऋतू शांत करण्यास सांगितले. म्हणजे एके काळी स्त्रियांची ऋतुशांती वाटेल त्या पुरुषाने करण्याची पद्धत होती. म्हणजे अनिर्बेध लैंगिक संबंध promiscuity होते, नंतर शिष्यानेही ऋतुशांती करण्याची पद्धत होती, नंतर गुरुतल्पगमन अधर्म्य समजू लागले.

(७) गंधर्व, अप्सरा व ऋषी यांचा शरीरसंबंध : विश्वावसु गंधर्व व मेनका अप्सरा यांच्यापासून प्रमद्वरा झाली. ती रुरूची स्त्री झाली. गंधर्व व अप्सरा स्वापत्यांस वाटेल तेथे सोडून देत. प्रायः ऋषींच्या आश्रमासन्निध सोडून देत. Savages deserted their new-born children. रानटी लोक आपल्या नवजात अपत्यांना टाकून देत (आदिपर्व-अध्याय ८).
Temporary marriages. गौतम ब्राह्मण व जानपदी अप्सरा यांच्या क्षणिक समागमापासून कृप व कृपी झाली. (आदि. १३०). भरद्वाज व धृताची अप्सरा यांजपासून temporary तात्पुरत्या समागमाने द्रोणाचार्य झाला (आदि. १३०). व्यास व धृताची पासून शुक (शांति - ३२४).

(८) रुरूने आपले अर्धे आयुष्य सर्पदष्ट व मृत प्रमद्वरेला देऊन जिवंत केले (आदि. अ. ९).

(९) जरत्कारू प्रतिज्ञा करतो की स्वनामधेय कन्या आपल्या नावाची कन्या वरीन (आदि. अ. १३). जरत्कारू ब्राह्मण जरत्कारू नागीण यांचा शरीरसंबंध. गरुडाच्या तोंडात गेला ब्राह्मण व त्याची कोळीण स्त्री (आदि. २९).

(१०) व्यासास जनमेजयाने मधुपर्क व धेनू अर्पण केली (आदि ६०). परंतु अवध्य म्हणून त्यांनीं ती धेनू सोडून दिली. परंतु आश्वलायन गृह्यसूत्रात, पशुकल्पात व शूलगवकल्पात गाय वध्य म्हणून सांगितले असल्यामुळे गोवध व्यासानंतरही चालू होता असे दिसते.

(११) विश्वामित्र ऋषी व मेनका अप्सरा आपले मूल शकुंतला टाकून देतात. प्राचीन भारतात अपत्यांना उघड्यावर टाकण्याची आणि टाकून देण्याची प्रथा. Exposure and abandonment of children in ancient India.
Temporary marriage ? तात्पुरता विवाह ? संकल्प समागम ? दृष्टी समागम ? अल्पावधिक समागम. गांधर्व विवाह हा प्रथमारंभी अल्पावधिक होता. नंतर परस्परसंकेत एवढीच खूण गांधर्वसंबंधाची राहिली.
विश्वामित्र व मेनका यांचा समागम निदान दहापाच दिवस तरी झाला - दुष्यंतशकुंतलेचे गर्भाधान एकदोन घटकाच झाले (आदिपर्व अध्याय ७२, ७३, ७४).