Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक २८८                                                                      

वडील रामोजी वाडकर हा चदर-रायासी
टोगाईने राहात होता याबदल त्यास
जिवे चदररायानी चिखलीस मारिला
त्याउपरी त्याचा लेक लुमाजी बाडकर
चदररायाचे धहसतीकरिता परागदा
होऊन गेला तो हि पलसोसी ता।
रोहिडखोरे येथे चदरायाचे स्वारीस
सापडला मारिला त्याचा लेक भिकजी
वाडकर आपला आजा हा मौजे नादगाऊ
ता। हिरडस मावळ येथे राहून नादत
होता तेथे एसजी वाडकर व रुद्रोजी
वाडकर व निलोजी वाडकर पाटील
मौजे मा।र व थान माबला व भिका
माहर इतके जाऊन भिकाजी वाडकराची
समजावीस करून गावास आणून
इनामाचे सेताचा टुकडा व वीस हात
घरठाणा व वीसा टकियाचे सेत
कुणबावियाचे इतके आपले तकसीमेचे
आपा आजा भिकजी वाडकर व जाउजी
वाडकर आपला बाप व आपण ऐसे
खात आलो असता एसजी वाडकर
ह्मणतो जे तुह्मास इनामाचे टुकडि-
यास व घरठाणियास व कुरबावियाचे
सेतास निसबती नाही म्हणून खलेल
केले आहे परतु आपण पाटीलाचा
तकसीमदार भाऊ खरा इनामतीचा
टुकडा व वीस हात घरठाणा व वीस
टकेचे सेत ऐसे आपण खात आलो
ऐसे गोतमुखे खरे करून देईन खरे
न करवे तरी दिवाणचा गुन्हेगार गोताचा
खोटा म्हणोन तकरीर लेहून
दिली ... .... १

रून याचे वडील व बा नाद होते
याने इनामाचे सेताची तकसीम कधी
नाही घर ठाणा मिरासीचा याच
हि ऐसे गोत खरे करून
दे रें न करावे त ठाणचा गुन्हेगार
व गोताचे खोटे म्हणून ऐसी तकरीर
लेहून दिल्ही १

येणेप्रमाणे हरदो वादियाच्या तकरीरा समस्त गोत हजीरमज्यालसीस मनास आणून हरदो वादियासि गोतानी विचारिले जे बापुजी वाडकराचा भोगवटा इनामतीचे सेतास व घरठाणेयास व सेतास किती वरशे जाहाला आहे त्यावरून एसजी वाडकराने सांगीतले जे बापुजी वाडकरास दाहा पांच वर्षे कुणबी ह्मणोन दिल्हे होते दाहा पांच वर्षे च खादले आहे याहून अधीक भोगवटा नाही

२९. देवगिरीच्या लढाईचा वृत्तान्त भविष्योत्तर पुराण, सह्याद्रिखंड व कौस्तुभ चिंतामणिग्रंथ ह्या संस्कृत ग्रंथांच्या आधारानें आपण प्राकृतांत देतों, असें विधान भगवान् दत्तानें केलें आहे. भविष्य पुराण म्हणजे आंध्रोत्तर कालचें म्हणजे शक तीन शें नंतरचा जो भविष्य काळ त्याचें पुराण म्हणजे प्राचीन इतिहासादि माहिती. भविष्य काळ सुमारें शक आठ शें पर्यंत गणिला गेला. भविष्या नंतरचें म्हणजे शक आठ शें नंतर. पासून आज पर्यंतच्या काळचें जें पुराण तें भविष्योत्तर पुराण. ह्या भविष्योत्तर पुराणाच्या अंतर्गत अशीं खंडें, उपपुराणें व माहात्म्यें शेकडों झालीं व प्रांतो प्रांतीं तीं निरनिराळीं झालीं. त्यांतून माहिती घेऊन आपण ही रचना केली असें भगवान् दत्त म्हणतो. देवगिरीचे यादव, ठाण्याचे शिलाहार, गोंव्याचे कदंब, घणदिवीचे नागरशा, चेऊलचे भोज व माहीमचे बिंब ह्या सहा घराण्यांचे पद्य इतिहास, चालुक्य, चौलुक्य, राष्ट्रौढ इत्यादि वंशांच्या किंवा त्यांतील प्रख्यात व्यक्तींच्या पद्य इतिहासां प्रमाणें, रचिले गेले असण्याचा संभव आहे. स्थानिक माहात्म्यांतून किंवा भविष्योत्तर पुराणाच्या स्थानिक प्रतींतून हि ह्या कुलांची हकीकत संस्कृत पद्यांनीं वर्णिली गेली असूं शकेल. पद्य काव्येतिहासा प्रमाणें ह्या घराण्यांचे गद्य इतिहास हि प्राकृत भाषांत लिहिले गेले असण्याचा संभव आहे. प्रस्तुत बखर बिंबादि घराण्यांचा प्राकृत इतिहास च आहे. तो जसा आज उपलब्ध झाला, तसा चालुक्य, यादव, होयसळ, कदंब, इत्यादि मध्ययुगीन राजघराण्यांचा हि इतिहास पुढेंमागें कदाचित् सांपडेल, असा प्रस्तुत बखरी वरून नुसता तर्क च बांधतां येतो असें नव्हे, तर निश्चय करतां येतो. कारण भगवान् दत्त भविष्योत्तर पुराणांतून देवगिरीच्या लढाईचें वर्णन आपण देत आहों असें स्पष्ट लिहितो. भगवान् दत्ताचें हें लिहिणें केवळ बाताड समजून भागणार नाहीं. कोणाला फसविण्या करितां कांहीं तो लिहीत नाहीं, तर पूर्वपरंपरा तत्कालीन म्हणजे तीन शें वर्षों पूर्वील लोकांना माहित करून देण्या करितां जाणून सवरून लिहितो, संस्कृत पुराणांच्या आघारानें आपण लिहीत आहों असें आश्वासन भगवान् दत्त देत असल्या मुळें, त्याचें हें विधान सत्य मानणें प्राप्त होतें. त्यानें पुराणें पाहून लिहिलें ह्यांत संशय नाहीं. परंतु पुराणांत व माहात्म्यांत व खंडांत ब-याच वास्तविक बाबी बरोबर ब-याच विसंगत बाबी हि दिलेल्या असतात, तेव्हां त्यांच्या वर विश्वसण्यांत बरेंच तारतम्य योजिलें पाहिजे एवढी एक बाब जितकी लक्ष्यांत बाळागणें अवश्य होतें तितकी त्यानें बाळगली नाहीं, असें त्याच्या कित्येक विधानां वरून दिसतें. उदाहरणार्थ, देवगिरीच्या लढाईचा वृत्तान्त जो त्यानें दिला तो बराच वास्तविक आहे. परंतु रामदेवराव जाधवाची जी वंशावळ त्यानें दिली ती अगदींच बारगळ आहे. भगवान् दत्त यादवांची वंशावळ येणेप्रमाणें देतो (पृष्ठें ८०।८१).(यादवांची वंशावळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

ताम्रपट व शिलालेख यांत यादवांची जी वंशावळ दिलेली आपणास विश्वसनीय म्हणून माहीत आहे ती हून भगवान् दत्तानें दिलेली ही वंशावळ अगदीं भिन्न आहे. भगवान् दत्तानें कोठली तरी वंशावळ कोठें तरी जोडून दिली. पृष्ठ ८९ वर रामदेवरावाची दुसरी एक वंशावळ पांचव्या प्रकरणाच्या कर्त्यांने दिली आहे ती अशी:- (पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ही हि वंशावळ भगवान् दत्तानें दिलेल्या वंशावळी इतकी च विचित्र आहे. तात्पर्य, भगवान् दत्ताला व पांचव्या प्रकरणाच्या कर्त्याला रामदेवराजाच्या म्हणून ज्या वंशावळी वाटल्या त्या त्या राजाच्या नाहींत. ह्या स्थलीं भगवान् दत्त व पांचव्या प्रकरणाचा कर्ता हे सपशेल घसरले. घसरगुंडी वरून स्पष्ट होतें कीं दत्तादि लेखकांच्या पुढें यादवांचा विश्वसनीय इतिहास किंवा वंशवेल नव्हता. यादव सोमवंशी होते, भगवान् दत्त लिहितो त्या प्रमाणें सूर्यवंशी नव्हते, रामराजाचा बाप जयसवन नव्हता, इत्यादि आणीक किती तरी विसंगतपणा दत्ताच्या वंशावळींत भरला आहे. करतां दत्ताच्या लेखाच्या ह्या भागा वर विश्वास ठेवणें सर्वतो प्रकारें जड जातें.

(३) अटीची लग्ने - शंतनू व गंगा यांचे लग्न, अट : माझ्याविरूद्ध कांही बोलू नये, (आदि. ९८). बोलल्यास निघून जाईन. स्त्रीची अट : स्त्री मातेच्या जागी. जरत्कारूची अट : विरुद्ध गोष्ट करू नये व तिच्या भावाने तिचे पोषण करावे, नाही तर सोडून जाईन. पुरुषाची अट : स्त्री भावाच्या जमावात राही. this is paternal filiation. [हे पित्यापासून अपत्यत्व]. पुत्रोत्पत्तीपर्यंत भीमाने हिडिंबेशी राहण्याची अट घातली (आदि - १५५). पुत्रोत्पत्तीपर्येंत अर्जुन मणिपूरच्या चित्रांगदेपाशी तीन वर्षे राहिला (आदि - २१५).

 * दिवसाढवळ्या सर्वांदेखत समागम : पराशर व सत्यवती (आदि-६३)
रणजितसिंग (Letournaou, page 41 ) [लेटार्नों, पृ. ४१]

उतथ्यपुत्र दीर्घतमाने सर्व लोकांसमक्ष स्त्रीसमागम करण्यास आरंभ केला (आदिपर्व - १०४. पृ. २३२ b).
मैथुन एकान्तात करावे. (शांति - १९३).

 * वसिष्ठाची मुलगी शतरूपा त्याच्याशी पती मानून राहिली (हरिवंश - अं. २) modern incest. [आधुनिक रक्तसंबंधी नात्यात सुरतसंबंध]
इंद्राने आपला निपणतु जनमेजयाची स्त्री वपुष्टमा इजशी गेला. (हरिभविष्यपर्व अ. ५) व तो अपराध जनमेजयाने सहन केला.

 * दहा प्रचेत्यांनी व त्यांचा पुत्र सोम याने मारिषेच्या ठायी गर्भ स्थापून दक्ष प्रजापती निर्माण केला. (हरिवंश अ. २).
 * सोमाचा दौहित्र किंवा मुलगा दक्षप्रजापती याने आपल्या कन्या आपला बाप किंवा आजा सोम यास दिल्या (हरिवंश - अ. २, पृष्ठ ७), जनमेजय येथे शंका करतो की हे असे व्यभिचारी कृत्य कसे झाले ? त्याला वैशंपायनाचे उत्तर की ही प्राचीन चाल आहे ( हरिवंश पृ. ७).
  * ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी ब्रह्मदेवाला दिली. तिच्यापासून नारद झाला ( हरिवंश अ. ३ पृ. ८).

(४) लग्न वयोमान : गंगा शंतनू हून बरीच वडील होती. राधा कृष्णाहून वडील होती.

पळशे ब्राह्मण म्हणजे पलाशी ब्राह्मण. पलाश म्हणजे मगध देश. तो मूळचा देश ज्यांचा ते पलाशी ब्राह्मण म्हणून महाराष्ट्रांत प्रख्या पावले. यद्यपि हे शुक्लयजुर्वेदी होते तत्रापि महाराष्ट्रांतील पुरातन शुक्लयजुर्वेद्यांच्या हून ह्यांचा आचार व चालीरूढी देशभिन्नत्वा मुळें भिन्न होत्या. असे हे पातेणे प्रभू व पळशे ब्राह्मण रामदेवरावाच्या विश्वासाचे एक च एक पात्र झाले. तो तो धंदा करण्यास अपात्र अशा लोकांचा संग्रह करणा-या इतर प्राचीन व अर्वाचीन संभाजी, बाजीराव, वगैरे राजपुरुषांची जी दैन्यावस्था झाली ती च रामदेवरावाची झाली. हें व्यंग ओळखून अल्लाउद्दीनानें रामदेवरावा वर स्वारी केली व दातीं तृण धरून शरण यावें अशा अर्थाचीं पत्रें लिहिलीं. त्यांचा स्वीकार रामदेवरावानें व त्याच्या पातेण्या सरदारांनीं केला नाहीं हें सांगावयाला नको च. अल्लाउद्दीन एकाएकीं अवचित् देवगिरी वर येऊन उभा राहिला. व त्याच्या आगमनाची वार्ता हि रामदेवरावाला नव्हती, वगैरे मुसलमानी तवारिखकारांचे उद्गार बखरींतील माहितीशीं जुळत नाहींत. अल्लाउद्दीन येत आहे, ही खबर रामदेवाला होती. आपल्या प्रभू सरदारां सह शत्रूला तोंड देण्याची रामदेवरावानें तयारी केली. वृद्धविष्णुगोत्री भुरदासप्रभु वानठेकर याला रणवट बांधिला म्हणजे मुख्य सेनाधिकार दिला. भुरदासप्रभूचा पुत्र चित्रप्रभु ह्याज कडे दुय्यम सैन्याधिकार होता. अल्लाउद्दीनानें आपल्या हसन व हुसेन या दोन मुलां सह देवगिरिदगडातळवटीं येऊन, जवळच्या शाखानगरांत तळ दिला व खुद्द शहरास वेढा घालण्याच्या तो तयारीस लागला. दोन्हीं सैन्यांची लढाई जुंपली. सुमध नांवाचा रामदेवरावाचा एक प्रधान होता त्यानें अल्लाच्या हसननामक पुत्रास ठार केलें. हुसेन भावाच्या मदतीस आला त्याचा वध भुरदासपुत्र जो चित्रप्रभु त्यानें केला. तुर्कसैन्यांत एक च बोंब झाली. अल्लाउद्दीन- ज्याला बखरकार महमद म्हणतो, कदाचित् अल्लाचें महमद नांव असावें -त्वेषानें चालून आला. त्याची व भुरदासप्रभूची खणाखणी होऊन भुरदासप्रभू धारातीर्थी पावन झाले. तेव्हां चित्रप्रभू अल्ला वर भयंकर मेघा प्रमाणें लोटला व त्याचें सैन्य त्यानें उधळवून माघारें परतविलें. ह्या हल्ल्या सरशीं अल्लाउद्दीनाला आपल्या गोटाचा आश्रय करावा लागला. म्लेच्छांचा पराभव झाला. परंतु, तेवढ्यानें अल्लानें धीर सोडिला नाहीं. परत फिरलेले लोक पुनः जमा करून व शिलकेंतील लोक बरोबर घेऊन, मारीन किंवा मरेन अश्या निश्चयानें तो युद्धास पुन: सज्ज झाला. ह्या दुस-या लढाईंत रामदेवराव व त्याचे पातेणे सरदार यांचा पराभव झाला. पळापळ सुरू होऊन, रामदेवरावाचा अल्लाउद्दीनानें वध केला. देवगिरीच्या युद्धाचा असा हा वृत्तान्त बखरींत दिला आहे. पैकीं रामदेवरावाच्या वधाचा वृत्तान्त खरा नाहीं. बाकीची हकीकत मुसलमानी हकीकतीशीं बरीच जुळते. पहिल्या चकमकींत हिंदूंस जय आला व दुस-या चकमकींत मुसुलमानांस जय आला, ही बखरींतील हकीकत तवारिखांतील हकीकतीशीं सुसंगत आहे. तीन शें वर्षां नंतर, केवळ ऐकींव माहिती वरून या हून जास्त तपशील भगवान् दत्ताला देतां येणें शक्य नव्हतें. घटका चहूं मध्यें रामदेवाचें राज्य सुलतान अल्लाउद्दीनानें घेतलें म्हणून पांचव्या प्रकरणाचा कर्ता म्हणतो. चार घटकांत राज्य घेतल्याचा हा उल्लेख इतर हि कांहीं मराठी टिपणांतून सांपडतो. त्या वरून दिसतें कीं ही पुढें एक म्हण च पडून गेल्या सारखी झाली. एका लढाईंत आणि चार घटकांत ज्याचें राज्य शत्रूला घेतां आलें त्याच्या बाजूला देशांतील पिढीजात संस्थानिक, सरदार, मुत्सद्दी, वजनदार पुरुष व सामान्य जन ह्यां पैकीं, फारसें कोणी नव्हतें, हें स्पष्ट च झालें. एका खडकीच्या लढाईंत चार च घटकांत बाजीरावाचें राज्य इंग्रजानें जसें घेतलें व बाजीरावाच्या बाजूला संस्थानिक व सरदार वगैरे कोणी हि जसें नव्हतें, तो च प्रकार शक १२१६ त सहा शें वर्षों पूर्वी महाराष्ट्रांत घडून आला.

ते लिहिले कैसे मोडते मग तुह्मी उभयतानी निकाल काढिला की तुमचे वडिली पूर्वी निरथडीचे पाच गाव सदर्हू सुरळीत केले त्यावरी भोगवटा पडला नाही त्यावरी कितेका दिवसा त्या वृत्तीचा खडोपती खर्चवेच करून जीर्णोध्दार केला त्यामध्ये आपली तक्षीम खर्च दिल्हियाने पोहचते पूर्वी व हाली खर्चवेच आपणाकडून पावला नाही यास्तव तेथील साहावी तक्षीम तुमची आमची ठरली त्यापैकी निमे तक्षीम तुमची व निमे आमची धाकुटपणाची आपली त्यापैकी निमे पांचा गावीचें कुलकर्ण व जोतीश चौथी तक्षीम तुह्मां पाचा भावास दिल्ही असे आणि मौजे सोनोरीचे जोसपण तुह्मापाशी निमे आपले तक्षिमेचे मागोन घेतलें त्याप्रमाणें तुह्मी मान्य केलिया तुमच्या वडिलाचे केले व आमच्या वडिलाचे लिहिले प्रमाण राहिले व भोळी वगैरे पाचा गावीचा खर्चवेच तुह्मी व तुमचे वडिलीं केला विभाग तक्षीमप्रमाणे आह्मी द्यावा तो हि तुह्मापासून आह्मी भाऊपणियाच्या नात्याने मागून घेतो ह्मणून तुह्मी आह्मास निर्मळ चित्त करून बोलिला त्यावरी आह्मी त्रिवर्ग भाऊ प्रसगी होतो एकत्र बसोन विचार केला की निंबाजीपत व बाजी निंबाजी हे भाऊपण्याने ऐसा निकाल काढितात तो भाऊपणियावरी दृष्टक्ष देऊन मान्य करावा मग खडो शिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर व गोविंद गोपाळ या त्रिवर्गाने तुह्मास समत दिल्हे जे तुह्मी भाऊ आहा जे तुमच्या विचारास आले ते आह्मीं मान्य केले आह्मी त्रिवर्ग बोलिलो की मौजे सोनोरीचे कुलकर्ण व जोतीश तुमची तक्षीम निमे तुमच्या वडिलानी आमच्या वडिलास खर्चाबाबत लेहून दिल्ही त्यापैकी जोशपण तुह्मी आपले मागितले ते तुह्मास तुमचे निमे तक्षिमेचे दिल्हे व कुलकर्ण तुमचे तक्षिमेचे निमे आपणास वडिलाच्या लिहिल्यापैकी राहिले तें आपण घेतले भोळी वगैरे पाचा गावीची साहावी तक्षीम आमच्या घराणियाची त्यापैकी निमे तुमची पोहचते त्यापैकी तुह्मी आह्मास निमे तक्षीम कुलकर्ण व जोतीश दिल्हे ते आह्मी घेतले व निमे तुमची तक्षीम जोतीश कुलकर्ण आह्मी तुह्मास दिल्हे साहाव्या वाटियात चौथी तक्षीम करार जाहाली व साहाव्या वाटियात तुह्माबाबत चौथी तक्षीम आह्मा पाचास खर्चाबाबत राहिली व सोनोरीचे कुलकर्ण निमे तुह्माबाबत आह्मा पाचा भावास करार राहिले व भोळीचा खर्च तुह्मास भाऊपणियाकरिता सोडिला असे व सोनोरीचे जोतीश तुमचे मोकळे केले असे ऐसा सौरस तुमचा आमचा जाहाला मग तुह्मी आह्मी ऐसे घरात समजोन राजश्री मल्हार तुकदेव व राजश्री माहादाजी आबाजी पुरधरे देशपाडिये कर्यात सासवड याजपासी येऊन वृत्तात सागितला की घरामध्ये आह्मी भाऊपणियाने समजलो सदरहू करार तपसीलवार उभयतां निवेदित केला वेगलाले त्याणी नेऊन पुसिले त्यास करारास तफावत वचनात न पडला मग त्याणी उत्तर दिल्हे की भाऊपणियाने घरात तुह्मी समजलेत बहुत उत्तम केले या कराराप्रमाणे तुह्मी आपले पत्र निंबाजी बावाजीस लेहून देणे आणि निंबाजीचे तुह्मी पत्र लेहोन घेणे ऐसे त्याणी सागितले त्यावरी तुह्मी आह्मी घरास आलो विचार मानस आणिता पत्रे परस्परें असावी वृत्तीचा कारभार पुढे पुत्रपौत्रादिवशपरपरेने चालिले पाहिजे आणि सोनोरीचा व पाचा गावीचा तुमचा आमचा गरगशा वारे तो ऐसे परस्परे सुरळीतपणे पत्रे घ्यावी ऐसा निश्चय जाला मग हे पत्र तुह्मास आह्मी आपले खुशरजावदीने लेहून दिल्हे आणि तुमचे पत्र आह्मी खुशरजावदीने लेहून घेतले सदरहू निवाडियाप्रमाणे तुह्मी व आह्मी वर्तावे भोळी वगैरे पाच गावी सावे तक्षिमेत चौथी तक्षीम ठरवली भोळीचा खर्चवेच तुह्मी आह्मापासून सोडऊन घेतला सोनोरीच्या खर्चाबदल कुलकर्ण निमे तुमचे तक्षिमेचे तुह्मी आह्मास दिल्हे सोनोरीचे निमे भटपण तुमचे आह्मी मोकळे केले असे याउपर तुमचा व आमचा सोनोरीचा व पाचा गावीचा तक्षिमेबाबत व खचविचाबाबत कजिया राहिला नाही यासी कोण्ही अन्यथा वर्तणूक करील तरी त्यास श्री कुलस्वामीची शफत उभयपक्षी असे याउपर वतनाची पडझड पडेल ते तक्षीमप्रमाणे तुह्मी देणे व तक्षीमप्रमाणे आह्मी देत जाऊ उत्पन्न होईल ते तक्षीमप्रमाणे तुमचें तुह्मी घेत जाणे आमचे आह्मी घेत जाऊ आमचे कागद हरकोणा भावाबदाचे हातीचे व वडिलाचे वेळेचे देखील बनाजी मोरेश्वर व सभाजी माणकेश्वर जे काही तुह्माजवळ अगर कोठे दुसरे ठाई असतील ते तुह्मी माघारे द्यावे ऐसा करार केला कालकला कोठे चुकोन अगर तगाफलीने राहिले तरी ते रद्द असेत तुमचे कागदपत्र जे आपणाजवळ या कजियाबाबत असतील ते हि रद्द असेत हाली तुमचे पत्र घेतले व आह्मी पत्र दिल्हे त्यामध्ये तुमच्या वडिलाचे पत्र सोनोरीबाबत उगवले ह्मणून ते पत्र माघारे द्यावे ऐसा करार जाहाला सालीनहाल कोठे राहिले तरी ते रद्द असे हाली तुमचे पत्र तुमच्या पुत्राचे दस्तूरचे लेहून घेतले व हे पत्र तुह्मास लेहून दिल्हे आमच्या बुडातील भाऊ वश रामाजी परशराम व वश कृष्णाजी परशराम याचा तुह्मासी काही कथळा नाही ते व आह्मी आपले निमेमध्ये वाटणीप्रमाणे समजोन खाऊ व तुह्माबाबत सोनोरीचे निमे कुलकर्ण व भोळी व पाचा गावीचे तुमचे निमेपैकी निमे खर्चाबाबत आह्माकडे ठरावले ते विसाजी परशराम याचा वश असेल तो खाईल तेरीख छ ११ माहे साबान बिकलम खडो शिवदेव पानसी कुलकर्णी व जोतशी देहाय मजकूर अजे माणको विश्वनाथ सही

नकलल बिदस्तूर लक्ष्मण माणकेश्वर पानसी कुलकर्णी
जोतिशी देहाय मजकूर वंश विसाजी परशराम


                                               गोही

त्रिंबकराव माणकेश्वर आ।                             पत्रप्रमाणे साक्ष मलार तुकदेव व
देशमुख पा। शिरवळ                                   माहादाजी आंबाजी पुरंधरे जोतिसी व
                                                              कुलकर्णी का। सासवड व देसापांडिये
                                                              कर्यात मजकूर

२८. बखरीच्या दिव्यानें किंचित् उजेड ज्या आणीक एका बाबी वर पडलासा वाटतो तिज कडे आतां वळूं. अल्लाउद्दीन व रामदेवराव यादव यांच्या मध्यें जें देवगिरीस युद्ध झालें त्याचें वर्णन भगवान् दत्तानें केलें आहे (पृष्टें ८३-८८). भगवान् दत्तानें ही ओवीबद्ध हकीकत सुमारें शक १५०० नंतर लिहिली. म्हणजे देवगिरीच्या लढाईची ही हकीकत लिहून आज शक १८४६ त सुमारें साडेतीन शें वर्षे झालीं. कोणत्या हि मराठी बखरींत देवगिरीच्या ह्या लढाईचा वृत्तान्त दिलेला नाहीं, तो प्रस्तुत बखरींत दिला आहे, हा ह्या बखरीचा विशेष आहे. देवगिरीची लढाई शक १२१० त झाली म्हणून बखरींतील पांचव्या प्रकरणाचा कर्ता लिहितो. भगवान् दत्त चौथ्या प्रकरणांत युद्ध केव्हां झाले तें सांगत नाहीं. तेव्हां शक १२१० हें वर्ष त्याला मान्य होतें किंवा नव्हतें तें स्पष्ट होत नाहीं. शक मान्य असो किंवा नसो, लढाईचा वृत्तान्त साडेतीन शें वर्षा पूर्वी भगवान् दत्तानें लिहिला, म्हणजे युद्धोत्तर सुमारें तीन शें वर्षांनी लिहिला, एवढें खरें आहे. शक १२१६ त राया बिंबानें सालरेमोलेर, नंदनबारें, ह्या मार्गानें गुजराथे वर स्वारी केली असें पांचव्या प्रकरणाचा कर्ता लिहितो. त्या अर्थी देवगिरीची लढाई शक १२१६ त झाली असली पाहिजे, हें उघड आहे. कारण, अल्लाउद्दीनाला माळव्याच्या बाजूनें पायबंद देण्या करितां बिंबदेव गुजराथेंत उतरला होता. शक १२१० त देवगिरीची लढाई होऊन सहा वर्षांनीं म्हणजे शक १२१६त पायबंद देण्याचा प्रकार घडण्यांत कोणती च सयुक्तता दिसत नाहीं. सबब, देवगिरीच्या युद्धाचा शक मूळांत म्हणजे पांचव्या प्रकरणाच्या मूळ प्रतींत शक १२१६ असला पाहिजे. सहाच्या आंकड्या बद्दल चुकीनें नक्कलकारानें पूज्याचें चिन्ह लिहिलें व शक १२१६ बद्दल शक १२१० हा आंकडा नकलेंत नमूद करून ठेविला, असें म्हटल्या शिवाय गत्यंतर नाहीं. आंकड्यांच्या चुक्या नक्कलकारानें ह्या बखरींत अनेक केल्या आहेत, हें प्रस्तुत प्रस्तावनेच्या तिस-या रकान्यांत दाखवून दिलें च आहे. मूळ जुनाट प्रत फार पुसट झाल्या मुळें, नकलकाराच्या हातून आंकड्यांच्या चुक्या होणें अत्यन्त सुलभ झालें होतें. सहाच्या आंकड्याचे दोन्ही बाजूचे फरफाटे पुसून व घासून जाऊन, मधलें गोंडगोळें नकलकाराला शून्या सारखें दिसलें व शून्य म्हणून तें तसें त्यानें लिहून ठेविलें. तात्पर्य, देवगिरीच्या लढाईचा शक १२१६ मूळ प्रतींत होता व तो मुसलमान तवारीखकारांनीं दिलेल्या कालाशीं जुळतो. भगवान् दत्तानें लढाईचा शक यद्यपि दिला नाहीं, तत्रापि तपशिल दिला आहे. रामदेवराव जाधव याचें व ब्राह्मणांचें कांहीं निर्दिष्ट कारणां वरून वितुष्ट वाढलें. महादेव जाधवाच्या कारकीर्दीत हेमाद्रि पंडितानें आपला चतुर्वर्गचिंतामणि नामक धर्मग्रंथ रचिला. त्यावरून दिसतें कीं देशांत व्रतें व उद्यापनें यांचें राज्य ऐन भरभराटींत आलें. भरभराट सहन न होऊन देशांत ब्राह्मणेतरांचीं पाखंडें माजलीं. तीं धुमसत धुमसत रामचंद्रदेवाच्या कारकीर्दीत प्रचंड पेटलीं, मानभावादि जातिसंस्थाद्वेष्टीं पाखंडें रामदेवराव जाधवाच्या अमदानींत विशेष प्रख्यातीस आलीं हें सुप्रसिद्ध आहे. पाखंडांच्या शिकविणीनें कित्येक अत्याचारी लोकांनीं देवालयांतून रुद्रलिंगें उपटून टाकलीं. ह्या अधर्म्य कृत्यांचें खापर ब्राह्मणांनीं राजाच्या माथीं मारिलें. त्याचा राग येऊन रामदेवरावाच्या हातून ब्रह्महत्येचें पातक घडलें. ब्रह्महत्येचा परिणाम काय झाला असेल त्याचा अंदाज होण्या सारखा आहे. बरेच सनातनधर्माभिमानी मराठा क्षत्रिय संस्थानिक व सरदार ब्राह्मणांचा कैवार घेणारे होते. ते रामदेवरावा पासून फुटून निघाले. ब्राह्मण तर राजाच्या विरुद्ध होते च. हरिहरादि देव रामदेवरावा वर कोंपले व वसिष्ठादि गुरूंनीं त्याच्या दरबाराचा त्याग केला. राजा असा अधर्मी व अनाचारी बनल्या मुळें, ज्यांच्या आधारा वर राज्याची इमारत मुख्यत्वें करून उभारलेली होती, ते आधार रामदेवरावाच्या राज्याचे नाहींसे होऊन, शत्रूंच्या भक्ष्यस्थानीं पडण्यास योग्य अशी अवस्था रामदेवास प्राप्त झाली. सामान्य शूद्र, उन्मत्त क्षत्रिय किंवा आचारहीन ब्राह्मण यद्यपि पाखंडपोषक विशेष प्रयास न पडतां बनूं शकले, तत्रापि कुशाग्र बुद्धि व अप्रतिहत शौर्य ह्यांच्या आधारा वर स्थिरावणा-या राज्यसंस्थेचे पोषक ते बनूं शकले नाहींत. महाराष्ट्रांतील पिढीजात क्षत्रियांनीं व ब्राह्मणांनीं सोडून दिलेल्या रामदेवरावानें अशा विपन्न स्थितींत पातेणे प्रभू व पळशे ब्राह्मण यांच्या साहाय्यानें राज्य चालविण्याचा व संरक्षिण्याचा संकल्प केला. पातेणे प्रभू यद्यपि जातीनें क्षत्रिय होते, तत्रापि धंद्यानें प्रत्येनस् व प्रतीहारी म्हणजे पोलीस व रखवालदार होते. उच्च सेनापतित्व करण्याचें कसब त्यांना नवीन होतें.

त्यास पूर्वी आमचे वडिली विसाजी परशराम याणी अठरा होन दिल्हे होते ते त्याचे आगी लाविले व त्रिबक विश्वनाथ याणी सौम्य सवत्सरी सोनवरीचे दिव्य जालियावरी दुसरे वर्षी मौजे भोळीस येऊन परभुणियाच्या दिव्याबदल खर्चाचा हिसेब करून होन सत्तावन ठराविले त्यास त्रिबकपती रगावा पानसी त्याच्या घरातील भाऊ याबराबरी घोडा विकावयासी रत्‍नागिरीस यात्रेस पाठविले त्याबा। होन सवासे त्याकडे होते व इनामाचे खत सोडविले होते त्यास त्रिबकपती या पैकियाचे व्याज व मुदत हिसेब केला त्याणी सत्तावन होनाचा व्याज मुदल हिसेब केला ऐसा कज्या वाढला मग पाचा गावातील निमेचा भाऊ काकाजी राम व भोळीचे पाटील व बारा बलुते श्रीसिध्देश्वराचे देउळी निरेचे काठी बसून कज्या निवडिला मग त्रिबक विश्वनाथ यासी अवघियाणी पदर पसरून घोडियाचा पेका सवासे होन होते ते खर्चाबदल सत्तावन होनाचे ऐवजी देविले व इनामबा। खत मोघम त्रिबकपताचे ठेविले आणि पाढरीचे साक्षीने पत्र करून घेतले पाचा गावामद्ये एक वाटा वडील घर साबाजीपत व मल्हार राम याचा व एक वाटा त्रिबक विश्वनाथ याचा व एक वाटा तिसरा कुमाजी बापुजी याचा एकून निमेमध्ये तिघे भाऊ वशभाऊ अनुक्रमपरनाळकेने खावे ह्मणून पत्र दिल्हे ते पत्र बजिनस आह्मी गोतादेखता माहादाजी चितामण व खडो नागनाथ यास दाखविले त्याची साक्ष गोतमुखे पुरली मग गोतन्याये दिव्याचा खर्च उडाला मग महादजी चितामण बोलिला की या पत्रास बहुत दिवस जाले त्यावरी तुमचा भोगवटा नाही राजकामुळे आह्मास नागवणा व पडी पडिलिया मिरासपटिया व इनामतिजाई पडिली तो हिसेब करून वारणे आणि आपली साबी तक्षीम खाणे मग गोतानी हिसेब मनास आणून आह्माकडून त्याचे पडीचा पैका देविला तो मारफात गणेस गगाधर कुलकर्णी मौजे चादक आह्मी माहादाजी चितामण याचे पदरी घातला काही राहिला होता तो सवे च खडो नागनाथ याची आई पार्वतीबाई काशीस गेली तो त्याजवळ दिल्हा आणि आपली तक्षीम खरी करून घेतली त्याचे पत्र जिवाजी साबाजी व माहादाजी चितामण व खडो नागनाथ याचे करोन घेतले व जिल्हेकडील पत्रे करून घेतली त्यासी खर्च सातारा बसला व भावास हि गावी जाऊन बहुमान केला आणि पत्रे श्रीरवळनाथाचे देउळी त्याजवळून घेतली देह बि॥

पा। सिरवळ                        ता। नीरथडी पुणे
१ मौजे भोळी                       १ मौजे तोडील
१ मौजे तोडील                     १ मौजे लोणी
१ मौजे गुणप                     ----
---                                    २

एकूण पांच गांवी सहावी तक्षीम करार वंशमालिकेने खरी करून घेतली त्यावरी खंडो सिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर श्रीमंत राजश्री बाजीराऊ पडित प्रधान यासि मौजे खडेराजोरी प्रात मिरज या मुकामी भेटून सागितले की आपला व निंबाजी बाबाजीचा सोनोरीच्या वतनाचा कज्या निवडला नाही तर निंबाजीपतास हुजुर आणून त्यास व आह्मास गोत देऊन बरहक्क मनसुबी करविली पाहिजे त्यावरून तुह्मास राजश्री पतप्रधान याणी पत्र पाठऊन लष्करास बोलाऊन आणिले तुह्मास व आह्मास गोत राजश्री मल्हार तुकदेऊ पुरधरे व राजश्री माहादाजी आबाजी पुरधरे देशपांडिये कर्यात सासवड हे नेमून दिल्हे हरदो जण या गोतास रजावद जालो सासवडीहून सोनोरीसनिध आमचे वशपरपरेस सासवडकर वाकीक आणि दियाचे देशपाडे आमचे मायथळ आहेत दिवाणीने हे गोत नेमून दिल्हे त्यास आह्मी उभयता मान्य असो ऐसे बोलोन तुह्मी व आह्मी सासवडकर पुरधरे देशपाडिये याजवळ आलो तुमचा आमचा करीना त्या उभयतानी मनास आणून ते उभयता बधू बोलिले की तुह्मी गोतमुखे निवाडियास राजी आहा की भाऊपणियाने घरी समजता हे गोष्टीचा विचार करून सागणे गोतात निवाडियास रजावद असाल तरी तैसे च सागणे घरी समजणे असेल तरी आपला विचार दृढ करून समजणे मग तुह्मी आह्मी ऐसे घरास आलो परस्परे भाऊ- पणियाने आपल्या आपणात सवाद केला त्यास तुमच्या व तुमच्या पुत्राचे मते व आह्मास खडो शिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर व गोविंद गोपाल याचे विचारे समजाविशीचा प्रसग निघाला तुह्मी बोलिलेत की मौजे सोनवरीचें कुलकर्ण व जोतीश आपले वडिली आपली निमे तक्षीम तुमच्या वडिलास खर्चाबाबल लेहून दिल्ही आहे ते खरी त्यामधून तुह्मी आह्मास निमे जोतीश आमचे तत्रिमेचे मोकळे करून देणे व कुळकर्ण निमे आमचे तक्षिमेबाबत आहे ते तुह्मी सोनीरीच्या खर्चाबद्दल तुह्मी घेणे ऐसे बोलिलेस त्यावरी आह्मी त्रिवर्गांनी तुह्मासी उत्तर केले की, आमच्या वडिलास तुमच्या वडिली आत्मखुशीने आपली तक्षीम खर्चाबाबत लेहून दिल्ही आहे

भारतीय विवाह-संस्थेचा इतिहास
(या लेखाकरिता कै. वि. का. राजवाडे यांनी केलेली टिपणे)

(१) कुटुंब

गोत्र गोत्रनाम आत्रेयः
कुल–कुलनाम अत्रे



कुलपती : मुनीनां दशसाहस्त्रं योन्नदानादि पोषणात् ।।
अध्यापयतिविप्रर्षि रसौ कुलपतिः स्मृतः ॥ १ ॥
कुल या शब्दाचे दोन अर्थ :

(२) माता * व्यास - पराशर ऋषी व सत्यवती कुमारी यांचा पुत्र व्यास
पिता कानीन (आदि-६३). नंतर शंतनूचा विवाह त्याच सत्यवतीशी
पुत्र झाला. पुमान्स्, पुपुवस , पुपुमस् -

शंतनूला गंगेपासून कुमारीपासून सत्यवतीशी विवाह होण्यापूर्वी भीष्म झाला. भगिनी, भ्राता, पती, स्त्री, नृ, नर, नरी -
विचित्रवीर्याच्या धर्मपत्न्या अंबिका व अंबालिका यांच्या ठायी विचित्रवीर्य मेल्यानंतर व्यासांनी धृतराष्ट्र व पांडु हे दोन पुत्र उत्पन्न केले व दासीपासून विदुर झाला.
This is maternal filiation. [हे मातेपासून अपत्यत्व].

२७. येथें प्रस्तुत बखरींत दिलेला राजकीय इतिहास संपला. शक १०६० तील प्रताप बिंबाच्या आगमना पासून शक १४६० च्या सुमारास पट्टेकरास फिरंग्यांनीं स्थानभ्रष्ट करी तों पर्यंतची हकीकत बखरकारानें जी वर्णिली आहे ती वरून दिसतें कीं ह्या ४०० चार शें वर्षांत (१) बिंबराजे, (२) नागरशाहि राजे, (३) बिंब देवादि यादव राजे, (४) नायते राजे, (५) दिल्लीचे मालक, (६) अमदाबादचे मलिक, व (७) फिरंगी अश्या सात परंपरा राज्य करणा-यांच्या माहीम प्रांतांत झाल्या. पैकीं मुसुलमान वे फिरंगी राज्यकर्त्यांची माहिती आजपर्यंतच्या देशी व विदेशी इतिहासकारांनीं दिलेली सर्वांच्या परिचयाची आहे; परंतु, बिंबकुलीन राजे, नागरशादि राजे, यादव राजे, नायते राजे, भोंगळे वगैरे राज्यकर्त्यां संबंधानें नाममात्रे करून देखील माहिती आजपर्यंतच्या देशीविदेशी इतिहासकारांना फारच अल्प होती, किंबहुना मुळीं च नव्हती म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. बिंब, बिंबस्थान हे दोन शब्द ठाणेंकोंकणांतील पळशे ब्राह्मणांच्या हकीकतींतून आलेले ओझरते व पुसट असे कर्णपथा वर पडत. ह्या शब्दांच्या पाठी मागें व आसपास केवढा थोरला इतिहासप्रांत लिकून राहिलेला आहे, त्याचा पत्ता हि इतिहासकाराना आजपर्यंत नव्हता. नापत्ता असलेल्या ह्या इतिहासप्रांताच्या आड येणारा पडदा प्रस्तुत बखरीच्या प्रकाशनानें दूर सारला जाऊन, इतिहासरंगभूमी वरील एक अज्ञात चित्रपट खुला होत आहे. तो पाहून सहृदय वाचक बखरीचा पत्ता लावणा-या व ती हस्तगत करणा-या दिवेकरांना दुवा देतील यांत संशय नाहीं. बखरीची ही एक च प्रत सध्यां उपलब्ध आहे. आणीक कांहीं प्रती सांपडत्या तर बखरींतील ब-या च को-या जागा भरून निघत्या व बरे च अपपाठ टाळतां आले असते. उदाहरणार्थ, पृष्ट ९१ पासून ९६ पर्यंतच्या प्रामोत्पन्नांतील किती तरी चुकलेले आंकडे बरोबर देतां आले असते व किती तरी बेरजा शुद्ध मांडतां आल्या असत्या. प्रत्यन्तराच्या अभावीं सदर चुक्या व अपपाठ जसे चे तसे छापणें अपरिहार्य झाले. ओवीबद्ध बिंबाख्यानांतील पाठांशीं तुलना करून दोहोंतील अपपाठ दुरुस्त होण्या जोगे जेवढे आढळले त्यांची याद येणें प्रमाणें:- (खालील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)

बेरजा कितपत बरोबर असतील त्या असोत. प्रस्तुत बखरींत व बिंबाख्यानांत दिलेले आंकडे कित्येक स्थलीं परस्परंभिन्न ज्या अर्थी आहेत, त्या अर्थी मूळ बखरींत मूळचे आंकडे दोहों ठिकाणच्या आकड्यांहून क्वचित् निराळे असण्याचा संभव आहे आणि क्वचित् दोहों पैकीं एकांतील आंकडे बरोबर असण्याचा संभव आहे. बिंबाख्यानाच्या व बखरीच्या आणीक पांच चार जुन्या प्रती जेव्हां मिळतील तेव्हां ह्या बाबीचा लागला आहे त्या हून जास्त निश्चित तपशील लावतां येईल. तत्रापि स्थूल मानानें दिले आहेत ते आंकडे खरे मानून गांवोगांवच्या प्रस्तुतकालीन जमाबंदीशीं तुलना करतां येण्यास येक साधन उपलब्ध झालें आहे, एवढें तरी समाधान मानण्यास जागा झाली, हा कांहीं लहान सहान फायदा नव्हे. अगदींच अंधार होता, तेथें आतां किंचित् उजेड झाला !

 २६. अश्या प्रकारें अमदाबादच्या सुलतानांचें बस्तान ठाणेंकोंककणांत बसत चाललें असतां, महमूदशहा बेगडा याच्या कारकीर्दीत शक १४२२ त पोर्तुगालाहून फिरंगी दोन तारवें घेऊन या प्रांतीं आले. एका तारवाचें नांव सिनोर देस्कोर व दुस-याचें बोजिजुझ. कप्तानाचें नांव लोरेस लुइस देताव्र, येतां च कोची बंदर कबज केलें. तेथोन गोवें घेतलें. नंतर शक १४३४ त फिरंगी दवण प्रांतास आले. आमदरफ्ती करूं लागले. नफ्याचें आमिष दाखवून वसईस फेतोरी म्हणजे फ्याक्टरी ऊर्फ आडतबाजार घातला. उदीमा मुळें बहुत हासल होईल या मतलबानें फिरंग्यास वसईस दांडाळ्या तळ्या जवळ जागा मांडवी उभारण्या करितां दिली. तळ्या वर नागेशतीर्थाचीं आयतीं भिंताडें होतीं त्यांची मजबुती करून फिरंग्यांनीं वसती केली. आमदानी करीत चालले. प्रीतीचीं लक्षणें बहुत दाखविलीं. वर्षे तीन पावें तों विश्वास उत्पन्न करून फेतोरीची अधिकोत्तर मजबुती करीत चालले. भांडीं म्हणजे जंगी तोफा सोळा फेतोरी वर आणून ठेविलीं. नंतर गोमताचळाहून म्हणजे गोंव्याहून हळूच आरमार आणिलें. प्रांताच्या मुसलमान सुभेदारास गोड भुलथापा देऊन जहाजावर बसवून मार्गी दगा दिला. तसे च दवणेस उतरले. मारामारी करोन दवण घेतली. नंतर यावत् माहीम बिंबस्थान पावें तों सर्व कोंकणकिनारा काबीज केला. वसईस फेतोरी वर आलमेद कप्तान होता त्यानें हा सर्व डाव रचिला. त्या दिवसा पासोन फिरंग्यांची काबजात झाली. सुलतानाचें व मुसलमानांचें फिरंग्यां पुढें काहीएक चाले ना. पातशहा पराभव पावला. रयत लोकां पैकीं व वाणी उदम्यां पैकीं ज्यास जें पाहिजे तें देवून सर्वत्र आबादीआबाद केलें. धर्म ज्याचा त्यास चालता केला. अशीं २५ वर्षे गेलीं. नंतर खरें स्वरूप दाखविण्यास प्रारंभ केला. दहशत घातली कीं हिंदू किंवा मुसुलमानी धर्मानें जो चालेल त्याला गिरफ्तार करून गोव्यास पाठऊं. त्या भयानें कित्येक परागंदा झाले. कित्येक गोमांतकास धरून नेले. तेव्हां सगळ्यांस फिरंगी ह्या शब्दाचा वाच्यार्थ कळला. प्रांतांत अशी दहशत बसविल्या वर व स्थिरस्थावर केल्या वर फिरंग्यांनीं शेजारच्या रामनगरच्या संस्थानिका कडे दृष्टि फेकिली. प्रतापशा जाधवाची एक राख होती. तिचा पुत्र देवशा. त्याचा पुत्र रामशा. त्या रामशानें पुंडाई करून, सह्याद्रिकिना-याचे १५७ गांव कबजांत घेतले व त्या प्रांताचें नांव राम नगर ठेविलें (शक १२९४ सुमार). त्याचे वंशज रामनगरास राज्य करीत असतां, त्यांच्याशीं फिरंग्यांची घसघस सुरू झाली. फिरंग्यांशीं भांडतां पुरवत नाहीं असा अनुभव येऊन, रामनग-या तहास आला. फिरंग्यांनीं जे गांव घेतले त्यांची चौथाई रामनग-यास मिळावी, असा तह झाला. रामनग-याचा जव्हारचा कोळी उमराव होता. त्यानें ह्या संधीचा फायदा घेऊन फितवा केला व कित्येक गांव मारून काढिले. कोळ्याचें बळ अधिकोत्तर जाणोन, रामनग-या गप्प बसला. तेव्हां पासून कोळी जव्हारीस स्वतंत्र राज्य करूं लागला. रामनगर व जव्हार येथील संस्थानिकां प्रमाणें फिरंग्यांच्या शेजारास पट्टेकर राजा होता. त्याज कडे १६० गांव होते. त्यांपैकीं फिरंग्यांनीं दांडगाईनें व जोरावरीनें प्रथम ७६ गांव होता खालीं घातले. तेव्हां पट्टेकर सल्ल्यास आला. तहानें आणीक ६२ गांव फिरंग्यांस मिळाले आणि फक्त २२ गांव पट्टेकरा कडे राहिले. ते हि बावीस गांव छिनावून घेऊन व सर्व तह धाब्या वर बसवून, फिरंग्यांनीं शेवटीं पट्टेकरास संस्थानभ्रष्ट केलें. शक १४२२ व शक १४३४ हे ह्या बखरींतील काळ पोर्तुगीज बखरकारांनीं व टिपणकारांनीं दिलेल्या काळाशीं ताडून फरक दिसतो. ह्या फरकाचीं कारणें काय असतील तीं खुलासेवार शोधून काढण्यास ज्यास्त तपशीलवार टिपणें मिळण्याची जरूर आहे.