लेखांक २८७ श्री १६६० कार्तिक वद्य १३
नकल १/९
मा। नव बंद रास
माहाराज राजश्री सिवाजी राजे
शके १६६० कालयुक्त नाम संवत्सरे कार्तिक शुध त्रयोदसी इंदुवार ते दिवसी निंबाजी बावाजी पानसी यांसि
वंश माणको विश्वनाथ
१ खंडो सिवदेव
१ लक्ष्मण माणको
---
२
गोविंद गोपाळ वंश लग ०
उध्दव विश्वनाथ १
सदर्हू पांच जण भाऊ वंश विसाजी परशराम पानसी सुहुरसन तिसा सलासीन मया अलफ कारणे लेहोन दिल्हे पत्र ऐसे जे पूर्वी मौजे सानवरी ता। कर्हेपठार प्रा। पुणे एथील आपले कुलकर्ण व जोतीश पुरातन त्यावरी रामाजी बिन कृष्णाजी इहीन-गावजी गाव-खडेराऊ मुतालीक आपले वडिली ठेविला होता तो वृत्ति आपली ह्मणऊन वादास प्रवर्तला त्यास यासी वाद घालावयाचे प्रसगी तुमचे वडील रखमाजी बापुजी व बावाजी बापुजी व शिवाजी बापुजी व गोमाजी बापुजी चतुर्वर्ग बंधूस आमचे वडील त्रिबक विश्वनाथ व मोरो विश्वनाथ व माणको विश्वनाथ व गोविंद विश्वनाथ व उध्दव विश्वनाथ पाच जण बधु याणी पुसिले की वतनावर रामाजी वाद्या उठिला त्यास यासी वाद घालावयासी सामील होणे आणि समापत्रात नाव घालणे ह्मणऊन विचारिले ते समयी तुमच्या वडिली उत्तर केले की आह्मास वाद सागावयासी अनकूल पडत नाही आमचे नाव समापत्रात न घालणे वृत्ती साधली तर तुह्मी च खाणे मग याच घरभावानी विचार करून घरभावानी च समापत्र केले आणि रामाजी गावखडेरायासी वाद घालावयासी उभे राहिले कितेक दिवस ठाणियात वाद जाला त्यावरी राजगडीचे मुकामीं माहाराज राजरी राजेसाहेबाचे दरबारीं वाद पडिला त्यास रामाजी गावखडेराव खळवाद्या मालुमात बहुत ऐसे असोन आमचे वडिली वाद बहुत घातला कसाले सोसिले सेवट माहाराजसाहेब याणी मौजे मोहरीस श्रीअमृतेश्वरी दिव्य करावयासी गोविंद विश्वानाथा बा। अष्टप्रधानाचे कारकून व हुजरे देऊन पाठविले गोविंद विश्वनाथ याणीं दिव्य केले खरा जाला वाद्या खोटा जाला मौजे मजकूरचा जानोजा बिन बाउजी काळा हमशाही गोताखेरीज समाकुल पाढरीसखेरीज होऊन रामाजी गाव खडेरायासी भेऊन एकलियाने त्याचे सारिखी गोही दिल्ही होती त्यास माहाराज राजेसाहेब याणीं गोतमुखे व पाढरीचे मुखे मनास आणिता पानसी खरे व दिव्य केले त्या मध्ये खरे निघाले मग वृत्तीचा महजर गोविंद विश्वनाथ याच्या नावे करून दिल्हा आणि जानोजीमजकूर याची जीभ कापावयास माहाराज राजेसाहेब याणीं हुकूम केला मग गोविंद विश्वनाथ याणीं रदबदल करून मिरासभाऊ ह्मणऊन जीव कापीत होते ते सोडविली यास खर्च उदड जाला व अवरगाबादेचा हि खर्च जाला व महजरात हि खर्च जाला व देशमुख व देशपाडे व गोतखर्च हि बहुत जाला ऐसा खर्च करून महजर घेऊन व समस्त भाऊ ऐसे गावास आले ते समई तुमचा चुलता रखमाजी बापुजी व तुमचे तीर्थरूप बावाजी बापुजी बोलाऊन पुसिले की पेशजी तुह्मी गाढेपाइकी करून वादास सोबत न दिल्ही आह्मी वडिलाचे पुण्यप्रतापे दिव्यी खरे जालो खर्चवेच मोबलग करून महजर करून आणिले तर आपले निमे तक्षिमेचा खर्च पडिला आहे तो सावकाराचा देणे आणि आपली तक्षीम निमे खाणे ते समई तुमच्या चुलतियानी व बापानी उत्तर दिल्हे आपणास टक नाही कष्टमेहनत केली व खर्च हि केला दिव्य केले ईश्वरे तुह्मास वृत्ति साध्य केली यश दिल्हे तरी तुह्मी आपली तक्षीम जोतीश कुलकर्ण निमे खाणे ह्मणऊन खुषरजावदीने हस्ताक्षरे पत्र लेहोन दिल्हे पत्र बिता।