Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

(1) Different terminations of अपत्य means different tribal languages of the same stock. अपत्य शब्दाला लागणारे निरनिराळे प्रत्यय एकाच कुलातील निरनिराळ्या टोळ्यांच्या भाषा दर्शवितात.
(2) गोत्रापत्य means progeny of the गोत्र (गोत्राचे अपत्य).
(3) अनंतरापत्य is a later word (हा नंतरचा शब्द आहे).
(4) युवापत्य is a later word (हा नंतरचा शब्द आहे.)
(5) All the terminations are for masculine अपत्य. Hence patriarchal system prevalent. सर्व प्रत्यय पुल्लिंगी अपत्यांना लागणारे आहेत. म्हणून पितृप्रधान कुटुंबव्यवस्था रूढ.
(6) गौतमीपुत्रः, वासिष्ठीपुत्रः show matriarchal system (हे शब्द मातृप्रधान कुटुंबव्यवस्था दर्शवितात ). माद्रेय, कौंतेय, देवकीनंदन shows matriarchal system giving place to patriarchal system. पितृप्रधान व्यवस्था मातृप्रधान व्यवस्थेची जागा घेत असल्याचे हे चिन्ह आहे.
(7) Before अपत्य प्रत्यय s feminine nouns assume masculine forms and then the termination applies, which means that females were subordinate to males. अपत्य प्रत्ययापूर्वीं येणारी स्त्रीलिंगी नामे पुल्लिंगी स्वरूप धारण करतात आणि मग प्रत्यय लागतो याचा अर्थ स्त्रियांचे स्थान पुरुषापेक्षा कनिष्ठ होते.

लेखांक २८९                                                                          श्रीनरहरीप्रसन

राजाश्रिया विराजित राजमान्य राजश्री दिनकर रावजी भाऊ स्वामीचे शेवेसी

पोष्य सदासिव नायक सरदेसाई कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ ५ जिलकाद पर्यत श्री            कृपेकरून वर्तमान यथास्थित असे विशेष आपणाकडून पत्र येऊन कुशलार्थ कलत नाही तरी ऐसे नसावे निरंतर पत्री संतोषवीत असावे यानंतर कसबा संगमेस्वर येथे आमचा वडिलोपार्जित वाडा आहे त्याजवरील वरपल होते ते जळाले त्याआलीकडे लाकडी काम वाड्यावरी करून शाकारणी नहुती त्यास गुदस्ता एक सोपा बांधावयाचा उद्योग आरंभिला तेव्हा हा राजवाडा ऐसे सरकारात समजाविले त्यावरून आह्मीं सेख ताडेकर याजबरोबर पत्रे देऊन पुणेयासि तुह्माकडे व राजश्री बापूरावजी व वेदमूर्ति राजश्री बालभट हर्शे पुणेयासि गेले ते समई आह्मी वाड्याचा मजकूर श्रीमंताच्या कानावरि घालून घर बांधावयाविसी आज्ञा देऊन पाठवावी ऐसे सांगीतले होते त्यावरून त्याणी वेदमूर्ती राजश्री सदासिवभटजी नानल याजकडून श्रीमंताचे कानावरी घालून राजश्री माहादाजीपंत काले निसबत सरसुभा याणी परवानगी सांगीतली जे हजार रुपयांचा कतबा सरदेसाईयाणी आपला वाडा ह्मणोन त्याजपासून घ्यावा आणि चौकसी करून वाडा बांधावयासी परवानगी त्यास द्यावी याप्रो। जाली आहे ह्मणोन आपले लिहिले आले नंतर राजश्री परशुरामपतदादा याणी आह्मास बलाऊन नेऊन हजार रुपयाचा कतबा मागितला तेव्हा आमचा वादी कोण ह्मणोन त्यास पुसिले तेव्हां त्याणी उतर केले की सरकारातून चौकसी करावी ह्मणोन आज्ञा जाली आहे त्यावरून चौकसी करितो तेव्हा आमचा वाडा वतनी श्रीमत कैलासवासी सभाजी माहाराज किले रायगडाहून मोगलाचे अडचणीमुर्ले कबजीचे बुध्दीने जरोर निधोन संगमेस्वरी आले ते उन्हाळा जमात वाड्यानजीक होते पर्ज्यन्यकाल आला चहूकडे धामधूक ऐसी संधी पडिली त्यात आमचा वाडा मोठा पाहून आमचे वडीलयाजवल जाग मागोन वाड्यात येऊन अडीच (महिने) पर्यत राहिले पुढे शेख निज्याम सुभा मोगल कडून येऊन त्याणे हस्तगत करून नेलें ते समई वाडा आमचा जालिला व गावातील ढेवले फोडिली व देव बाटविले याप्रो। माहार्णव जाहाले मोगलाने प्रात काबीज केला कसब्यात गढी बांधिली प्रातास कौल दिल्हा तेव्हा आमचे वडील रगोबा नायक याणी वाडा बांधोन वस्ती केली वीस पंचवीस वर्षे नांदले त्याजवर त्याचा काळ जाहाला त्याचे पुत्र पाच वडील केशव नायक व गणोबा नायक व विसोबा नायक दादोबा नायक व अंतोवा नायक ऐसे नांदत असता नारायणराव घोरपडे कानोजी आंगरे यांजकडे सुवर्णदुर्गास हबशीयाणे शह दिल्हा तो उठवावा ह्मणोन कैलासवासी अमात्यपत याणी पाठविले होते

I goad (आजामि) with a goad (अजन्या) मी अंकुश दाखवून प्रेरित करतो.-away from father and mother, so that you be in my power and act according to my mind. आई आणि वडील यांचेपासून दूर, कारण त्यामुळे तू माझ्या ताब्यात राहशील, माझ्या मनाप्रमाणे वागशील.

(२०२) अथर्ववेद चतुर्थ कांड यात "ब्रह्मजज्ञानं " या पहिल्या सूक्ताचा विनियोग सांगताना सायण खालील वाक्य लिहितो :-

" विवाहे चतुर्थिकाकर्मणि 'ब्रह्मजज्ञानं' इत्यनया वरः अंगुष्ठेन प्रजननदेशं तुदति । सूत्रितं (कौ. १०-५) हि ब्रह्मजज्ञानं इत्यंगुष्ठेन व्यवस्करोति ।”
The bridegroom scratched the valva of the bride with his finger. वर आपल्या बोटांनी वधूची जननेंद्रिये खाजवतो.

(२०३) Girl enjoyed by three before she is enjoyed by the husband. पतीबरोबर संभोग होण्यापूर्वी तीन पुरुषांनी उपभोगिलेली स्त्री.

सोमजुष्टं ब्रह्मजुष्टं अर्यम्णा संभृतं भगम् ।।
धातु र्देवस्य सत्येन कृणोमि पतिवेदनम् ॥ २ ॥

अथर्ववेद-द्वितीयखंड, षष्ठानुवाक-पंचमसूक्त-द्वितीया ऋक्. भग is enjoyed by सोम, ब्रह्म and अर्यमन् ; by the divine धातर. I choose my husband now (आता मी माझा पती निवडते).

(२०४) They ate semen as mentioned several times in भारत. अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी रेत प्राशन केले. संवत्सरं स्त्रियं अनुपेत्यशुक्तयां रेत आनीय तंडुलमिश्नं अश्राति (कौशिक सूत्र ३-५) Semen was mixed with boiled rice of course & eaten.

(२०५) Infanticide male मुलांची हत्या : In the भारत आणि हरवंश, आदिपर्व, there is story of a प्रजापति who having many wives had his sons carried away by नारद. भारत, हरिवंश, आणि आदिपर्व यात एका प्रजापतीची कथा आहे. त्याला पुष्कळ बायका असतात आणि तो आपल्या मुलांना नारदाला घेऊन जाऊ देतो. he begot 1000 sons on his wives. त्याला त्याच्या स्त्रियापासून १००० पुत्र होतात.

(b) कंस killed 7 sons of वसुदेव for fear the male child might kill him (कंस) & usurp the गादी and right over all the wome. of the tribe. वसुदेवाच्या मुलाने आपल्याला ठार मारून आपली गादी बळकावूं नये व आपल्या टोळींच्या सर्व स्त्रियांवर हक्क प्रस्थापित करू नये म्हणून कंस त्यांच्या सात मुलांना मारतो.

(१११) सप्तपदी होण्याच्यापूर्वी लग्न पूर्ण झालेले समजत नाहीत. Experimental (प्रायोगिक ).

(कै. राजवाडे यांनी "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या विषयावर लिहिलेली ही टिपणे आहेत. वरील १११ आकड्यांच्या पुढच्या आकड्यांचे टिपण सापडत नाही. यापुढे एक इंग्रजी टिपण आहे ते देऊन त्यापुढे २०१ आंकड्यापासून २०५ आकड्यांपर्यंतचे टिपणे दिले आहे. नंतर इतर काही टिपणे देऊन मग वेदांतर्गत टिपणे दिली आहेत. पुढे लग्नसंस्था या मथळ्याखालील टिपण दिले आहे. संपादक ).

(१०७)
(1) One woman marrying five brothers. एका स्त्रीचा पाच भावांशी विवाह-द्रौपदी-पांडव.

(2) One man marrying seven sisters, एका पुरुषाने सात बहिणींशी विवाह करणे.
(कृष्णाचा पिता वसुदेव) (वसुदेव father of कृष्ण-हरिवंश विष्णुपर्व अध्याय १०१).

(3) Four sisters marrying four brothers.
चार बहिणींचे चार भावांशी विवाह.

(4) One woman marrying more than one males not brothers.
एका स्त्रीचा बंधू नसलेल्या एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह.

(5) One man marrying more than one females not sisters.
एका पुरुषाचा बहिणी नसलेल्या एकापेक्षा अनेक स्त्रियांशी विवाह.

(6) One man marrying one waman.
एका पुरुषाचा एका स्त्रीशी विवाह.

(7) A man of any race marrying a woman of any race.
कोणत्याही वंशातील पुरुषाचा कोणत्याही वंशातील स्त्रीशी विवाह

(२०१) Forced abduction, बलात्काराने हरण :
आजामि त्वा अजन्या परि मातुस्थोपितुः ।
यथा मम क्रतावसो मम चित्तमुपायसि ।।५।।
अथर्ववेद-तृतीय कांड अनुवाक ६ सूक्त ५.

(९८) कृष्णाने १६००८ नारी विवाहविधीने वरिल्या (हरि ६०).

(९९) पुण्यक व्रतात स्त्रिया त्यांच्या भर्त्यांपासून विकत घेऊन आचार्यास उदकपूर्वक द्याव्या. नंतर द्रव्य देऊन आचार्यापासून त्या स्त्रिया परत घ्याव्या (हरि ७९).

(१००) गौरीशंकराच्या चित्रमय मूर्ती, लाकडी मूर्ती, दगडी मूर्ती ब्राह्मणास द्याव्या (हरि ७९).

(१०१) ब्रह्मदत्तला २०० ब्राह्मण, १०० क्षत्रिय, १०० वैश्य व १०० शूद्र मिळून पाचशे स्त्रिया होत्या (हरि ८३).

(१०२) प्रत्येक संगमाच्या वेळी त्यांच्या कन्या कुमारी असल्यासारख्या होतील (हरि ८३ ).

(१०३) निकुंभाच्या वज्रनाभ नामक भ्रात्याची प्रभावती कन्या प्रद्युम्नाने हरण केली. सबब निकुंभाने भानुमती नामक भानु यादवाच्या कन्येचे अपहरण केले (हरि ९०). बाणासुराची कन्या उषा अनिरुद्धाने वरिली (हरि १२८).

(१०४) सुपुर, विपुर, वृत्र, शुष्ण हे देश आहेत. सुपुरवासी असुर (हरि ९३, पृष्ठ ४६१).

(१०५) कुमारीपतिः, कुमारी म्हणजे काय ? दुर्वासाने असुरकन्या प्रभावतीला (प्रद्युम्नाच्या स्त्रीला) अखंड सौभाग्य व कौमार्य दिले (हरि ९४).

(१०६) अश्वमेध यज्ञात यजमानपत्नी मृत घोड्यापाशी निजते (हरि भविष्यपर्व५).

(१०७) गोत्र All the women of one tribe are the wives of all the men of another tribe.
(एका टोळींतील सर्व स्त्रिया दुस-या टोळींतील सर्व पुरुषांच्या बायका).

(१०८) दक्षाच्या कन्या २७ सोमाला etc., groups of sisters are marrying of one husband. येथे अनेक बहिणी एकाच पतीशी विवाहबद्ध होतात. Letournaou 299 base. लेटार्नो २९९.

(१०९) पुत्रिकापुत्र-is a trait of maternal filiation. ही मातृसंततीची प्रथा आहे. Letournaou 310.

(११०) दिति-दैतेयः दैत्यः, अदिति, आदितेयाः, आदित्यः वैनतेयः, आंजनेयः, कौंतेयः, राधेयः, भाद्रेयः, सौभद्रः. These show maternal filiation. हे मातृसंततीची प्रथा दर्शवितात.

(८७) यौधेय हे नृगाची संतती (हरि -३१).

(८८) बलीला संतती त्याची स्त्री सुदेष्णा हिला दीर्घतप नामक ऋषीपासून झाली (हरि -३१).

(८९) पुरुकुलोत्पन्न राजे व कुशिक कुलोत्पन्न ऋषी त्यांचे आपसात संबंध झालेले आहेत. (हरि - ३२).

(९०) यदुवंशीय महिष्मान् राजाने माहिष्मती वसविली. (हरि -३३, पृष्ठ १०२ b) प्रथम ही नगरी कर्कोटक नागांची होती ती कार्तवीर्य अर्जुन यदुवंशी याने जिंकली व तीत मनुष्यांची वस्ती केली (हरि - ३३ ). सहस्त्रार्जुन रावणाचा समकालीन. हा सहस्त्रार्जुन भार्गवराव परशुराम याचे हातून मेला. परशुराम रामाचा समकालीन. मृत्तिकावती व शुक्तिमती ही दोन नगरे नर्मदेवर यादवांनी वसविली (हरि -- ३६ ). माहिष्मती, करवीर वनवासी (क्रौंचपूर).

(९१) सुतनु व वडवा या कृष्णपिता वसुदेव याच्या परिचारिका म्हणजे भोगांगना होत्या (हरि-३५). शिवाय १४ पत्न्या वसुदेवाला होत्या.

(९२) विदर्भाची स्त्री त्याच्या अगोदर निदान १६ वर्षांनी वडील होती (हरि. ३६, पृ. ११०). प्रद्युम्नाने हरण केलेली शंबुर असुर स्त्री मायावती त्याच्याहून २०/२५ वर्षांनी वडील होती (हरि १०७).

(९३) अपत्यवध-देवकीचे सात पुत्र कंसाने मारिले (हरिवंश).


(९५) कृष्णाभिषेककाली इंद्राने मथुरेतील गणिकांना इतर नागरिकांप्रमाणे शंभर सुवर्णभाग काढून ठेविले (हरि ५५).

(९६) शक, तुषार, दरद, पारद, शृंगल, खस, पल्हव, हैमवत इत्यादि म्लेंच्छ (हरि ५७).

(९७) कृष्णाने रुक्मिणीला हरण केले तेव्हा मोठे घनघोर युद्ध झाले व कित्येक लोक ठार झाले. म्हणजे अद्याप हरणक्रियेला केवळ रूढीचे व देखाव्याचे रूप आले नव्हते (हर ५९). यावरून कृष्णकालीन संस्कृतीचा अंदाज होतो.

(७६) ब्राह्मणाच्या अवकृपेमुळे शक, यवन, कांबोज व इतर क्षत्रिय जाती शद्र झाल्या. ब्राह्मणांच्या अवकृपेमुळे द्राविड, पुलिद, उशीनर, कोलिसर्प व इतर क्षत्रियजाती शूद्र झाल्या (अनुशासन - ३३).
ब्राह्मणाच्या अवकृपेमुळे मेकल, द्राविड, लाट, पौंड्र, शबर, बर्बर, कान्वाशिर, किरात, यवन व इतर क्षत्रियजाती शूद्र झाल्या (अनुशासन - ३५).

(७७) स्त्रिया अन्योन्याश्रय करून व्यभिचार करतात (अनुशासन - ३८). असे पंचचूडा अप्सरा नारदास सांगते.

(७८) उत्तरकुरूत स्त्रिया स्वच्छंदाने वागतात व नरनारीमध्ये मत्सर बुद्धी वास करीत नाही. (अनुशासन - १०२).

(७९) ज्येष्ठ भ्रात्याची प्रशंसा (अनुशासन - १०५).

(८०) उतथ्याची भार्या वरुणाने पळविली व भोगिली. नंतर वरुणाला शिक्षा करून उतथ्याने आपली बायको परत आणून तिच्यासह तो सुखे नांदू लागला (अनुशासन - १५४).

(८१) मनू आपली मुलगी इला इजशी समागम चाहू लागला (हरिवंश - १०).

(८२) विश्वामित्राच्या स्त्रीने आपला पुत्र त्याच्या गळ्याला दोरी लावून विकावयास काढिला (हरिवंश - १२).

(८३) यवन, पारद, कांबोज, पल्हव व खस हे गण म्हणजे आयुधोपजीवी संघ होते (हरि - १४). शक अर्धे डोके मुंडीत, यवन व कांबोज सबंध डोके मुंडीत, पारद मोकळ्या जटा ठेवीत व पल्हव दाढ्या ठेवीत. कोली सर्प, महिष, दीर्घ, चोल व केरळ ह्या लढाऊ गणांच्या धर्माचा उच्छेद सगराने केला. खस, तुषार, चोल, मद्रक, किष्किंधक, कौंतल, वंग, साल्व व कौंकणक यास सगराने जिंकिले.

(८४) जन्हूची मुलगी गंगा हिने जन्हू आपला बाप याला पती केले (हरि-२७).

(८५) गाधिराजाची मुलगी सत्यवती ऋचीक ब्राह्मणाला दिली होती. ऋचीकाने दोन चरू सत्यवतीला व तिच्या आईला दिले. अदलाबदल झाली व गाधीला ब्राह्मण स्वभावाचा मुलगा झाला व सत्यवतीला क्षत्रिय स्वभावाचा मुलगा झाला. येथे स्त्रियांची अदलाबदल सासरा व जावई यांच्यात झालेली स्पष्ट दिसते, जावई सासूकडे गेला व सासरा मुलीकडे गेला.

(८६) सर्व गोत्र प्रवर्तकांत अत्रीचा मान श्रेष्ठ, यज्ञात आत्रय ब्राह्मणाला स्वतंत्र दक्षणा देतात. स्वस्त्यात्रेय (हरि - ३१ पुरुवंशाची कथा.)

मित्रसह राजाने वसिष्ठाला मदयंती नामक आपली प्रिय स्त्री अर्पण केली, त्यामुळे तो तिच्यासह स्वर्गलोकास गेला (शांति. २३४).
शिबीने आपला औरस पुत्र ब्राह्मणाला दान दिला (शांति. २३४).

(७०) वसिष्ठ, ऋष्यश्रृंग, काश्यप, वेद, तांड्य, कृप, काक्षिवत् , कमठ, यवक्रीत, द्रोण, आयु, मतंग, दत, द्रुमद, मात्स्य इत्यादी ऋषी अशुद्ध योनीत जन्मून तपाने मूळ पित्याच्या वर्णाला पोहोचले (शांति. २९६) i. e. (1) The males i. e. fathers claimed the male children, (2) Where mothers claimed the children, the वर्ण of the children was that of the mother. (3) Sometimes the children belonged to a caste lower than that of the mother and other than that of the father. i. e, neither father nor mother claimed the child. (1) paternal family (2) maternal family and (3) out-caste family.
म्हणजे (१) पुरुष पुत्रसंततीला पिता आपली म्हणे; (२) जेथे माता अपत्यावर हक्क सांगत तेव्हा अपत्यांचा आणि आईचा वर्ण एकत्र असे; (३) कांही वेळेला अपत्याची जात आईच्या जातीपेक्षा खालची असे आणि बापाच्या जातीपेक्षा वेगळी असे म्हणजे माती किंवा पिता यापैकी कोणीही अपत्यावर हक्क सांगत नसत; (१) पितृप्रधान कुटुंब, (२) मातृप्रधान कुटुंब, (३) जातिबाह्य कुटुंब.

(७१) अगिरा, कश्यप, वसिष्ठ व भृगु ही चारच गोत्रे प्रथम होती (शांति.२९६).

(७२) श्वशुरगृही सदा राहिले पाहिजे या अटीवर दुर्योधनराजाने आपली मुलगी सुदर्शना अग्नीला दिली (अनुशासन - १).

(७३) नरकः क्षुद्रः नरः नरकः । नरकाः यत्र संति सः नरकः देशः ।।

(७४) पुत्रिकापुत्राला म्हणजे तुला मी माझी कन्या देतो व तिला तुजकडून जो पुत्र होईल तो माझा, ह्या पुत्राला देवपितृकार्यांत पाचारू नये (अनुशासन - २३).
the cause is plain that son is not of the direct blood of his grandfather. याचे कारण स्पष्ट आहे की मुलगा आपल्या आज्याच्या प्रत्यक्ष रक्तसंबंधातील नव्हता.

(७५) मातंगाला बहुत तप करूनही ब्राह्मण होता आले नाही (अनुशासन - २७. २८. २९).
वीतहव्यराजा एका क्षणात ब्रह्मर्षी झाला (अनुशासन - ३०).

(५९) प्राकश्रृंगवान बृद्धकन्या नामक वृद्ध कुमारिकेस अशी अट घालितो की, मी तुजसमागमे फक्त एक रात्र राहीन. त्याप्रमाणे राहून, ती वृद्धकन्या गेली (शल्य.५२).

(६०) शंख आणि लिखित :-ज्येष्ठ बंधूच्या अनुमतीशिवाय फळे खाल्ली म्हणून लिखिताचे हात राजाकडून तोडविले (शांति-२३).
Primogeniture Right of (अग्रजाधिकार).

(६१) स्त्रिया रजोदर्शनाने शुद्ध होतात (शांति-३५). ही कल्पना भारतीयात अगदी वन्यावस्थेपासून आहे. तेव्हा पिता, माता, इत्यादी संबंध त्यांच्यात झाले नव्हते, तेव्हापासून ही कल्पना अस्पष्टपणे त्यांच्यात होती. पुढे अनेक स्त्रियांवर एका पुरुषाची मालकी झाल्यावर त्यांपैकी कोणी व्यभिचार केल्यास पुरुष वरील कल्पनेने समाधान मानून घेत.

(६२) तीनही वर्णांची संतती ब्राह्मणाच्या योगाने संकीर्ण झालेली आहे. शूद्राची देवता प्रजापती म्हणजे रक्तसंबंध असलेल्या टोळीचा मालक किंवा नेता Master or leader of the consanguinous clan. ब्राह्मण हा सर्व वर्णांचा प्रजापती आहे (शांति-६०), ब्राह्मण ज्येष्ठ व श्रेष्ठ आहे (शांति-७२).

(६३) यवन, किरात, गांधार, चीन, शबर, बर्बर, शक, तुषार, कंक, परहव, आंध्र, मद्रक, पौंड्र, पुलिंद, रमठ, कांबोज हे सर्व आणि ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यापासून उत्पन्न झालेले वैश्य व शुद्र या जातीचे संकीर्ण वर्ण हे धर्माचरण कसे करतील? या दस्यूंनी सर्वांची शुश्रूषा करावी, पितृयज्ञ करावे, वापी खणाव्या, पाणपोया, शय्या, ब्राह्मणांना दाने द्यावी–पाकयज्ञ करावे व ब्राह्मणक्षत्रियांच्या यज्ञात दक्षिणा द्यावी (शांति-६५).

(६४) क्षत्रियापासून निषादीच्या ठायी झालेला निषाद भारतधर्मी झाल्याची हकीकत (शांति-१३५). आर्यानार्य संकराची उन्नती कशी झाली असेल ते या कथेवरून समजते.

(६५) Cannibalism नरभक्षण प्रथा :-अगस्त्य मुनींनी क्षुधाक्रांत झाल्यामुळे वातापि राक्षस भक्षण केला (शांति-१४१). नृशंस माणसे मारणारा (mankille) नृ + शंस् = to kill.

(६६) मृताकरिता अश्रुमोचन, ऊर बडविणे इ. इ. ह्या चाली रानटी देशातील स्मारक आहेत. एका टोळीने दुस-या टोळींतील माणसे मारिली म्हणजे त्यांचे आप्तइष्ट रडत. ज्या मृतांना आप्तेष्ट नसत त्यांच्याकरिता कोणी रडत नसे. सबब, रडणे हा आप्तेष्टांचा धर्म म्हणजे समाजमान्य रूढी झाली.

(६७) रजस्वला समागम करणारे पातकी होत. शूद्र स्त्रीबरोबर बारा वर्षे राहणारा, जिच्याशी आपला विवाह झाला नाही तिला शय्येवर घेणारा, गुरुस्त्रीगमक, व्यभिचारी स्त्रीस श्वानाकडून भक्षवावी (शांति. १६५).

(६८) नग्न परस्त्रीचे अवलोकन करू नये, धर्माशी अविरुद्ध असे मैथुन करावे व तेही एकांतात करावे (शांति.१९३).

(६९) युवनाश्व राजाने आपल्या प्रिय स्त्रिया ब्राह्मणांना दिल्याने त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती झाली (शांति. २३४).

बालोजी वाडकर पाटील मौजे बोरगाउ बु। ता। जोरखोरे हा बुढा पाटील वाडकराची अदी बुनियादी त्यास दखल आहे. त्याचे गोहीस हरदो वादे राजी पहिले होऊन राजीनामेमध्ये बालोजी वाडकर गोही देईल त्याप्रमाणे दोघानी वर्तावे ऐसे होते माहालच्या सुभेदारानी गोहीया मनास आणिल्या त्यामध्ये बालोजी वाडकर पाटील मौजे बोरगाउ हा तेथे हजीर नव्हता याबदल त्यास थळ मजकुरी पेठ पारामध्ये आणून श्री वर्धायानीचे देवलापुढे त्यास उभे करून नरककुड वोढून बेतालीस त्याचे पूर्वजाची शफत व श्रीचा अंगारा बेल माथा ठेऊन समस्त गोतानी हाजीर मज्यालसीस विचारिले त्यावरून शफतपूर्वक बालोजी वाडकर पा। मौजे बोरगाउ बु। याने सांगीतले जे बापुजी वाडकराचा वडील रामोजी वाडकर ह्मणुन मौजे चिखलीस पाटील तकसीमदार होता तो चंदराउ जाउलीस होते यासी ठोगाही वर्तत होता याबदल चंदररायानी स्वारी घालून त्यास जिवे मारिले त्याउपरी त्याचा लेक लुमाजी वाडकर गाव सोडून परागदा होऊन मौजे पलसोसी ता। रोहीडखोरे येथे जाऊन राहिला होता त्या गावावरी हि चदररायाची स्वारी जाली होती तेथे लुमाजी वाडकर सापडला तो हि तेथे जिवे मा।रिला त्याउपरी त्याचा लेक भिकजी वाडकर हा धाकटा होता हा जाऊन मौजे नांदगाव ता। हीरडस मावळ येथे राहिला होता तेथे कितेक दिवस होता हे वर्तमान चिखलीकर वाडीकरास कळलियावरी एसजी वाडकर व रुद्राजी व निलोजी पा। वाडकर व भान माबला व भिका इतके जणानी जाऊन त्यास आण शफत देऊन त्यास विसा टकेचे सेत व इनामतीचा टुकडा तकसिमेचा व वीस हात घरठाणा ऐसा देऊन त्याची समजाविसी करून गावावर आणून ठेविला त्या दिवसापासून इनामतीचा टुकडा व वीसा टकेचे सेत व वीस हात घरठाणा ऐसे आनभवीत आला चाळीस पनास वर्षे भोगवटा चालिला त्या उपरी कितेका वर्षानी बापुजी वाडकराचे वेलेस एसजी वाडकराने कथला केला जे तुज इनामतीचे सेत व घरठाणा व विसा टकेचे सेत देत नाही त्यावरून बापूजी वाडकर गाव सोडून मोगलाईत गेला त्याउपरी मुलूक वोस जाला आदीमध्ये एसाजी वाडकर व गोमाजी वाडकर व मालजी वाडकर व रुद्राजी वाडकर हे जाऊन राहिले तेथे मागती बापुजी वाडकराने बालोजी वाडकरास अवघिया भावबदास एक ठाई करून प्रसग केला जे वखती आष्टीमध्ये रुद्राजी वाडकर याचे घरी जेवण होते तेथे जेवयाचे वेलेस अवधियानी एसजी वाडकरास ह्मटले जे बापुजी वाडकराची समजावीश करिता बरे आहे तेव्हा तानाजी मालुश्रा पा। मौजे गोडवली व रायाजी पा। मौजे मालदपूर व कानोजी सिदा पा। मौजे असेगाव व मौजे मा।रचे वाडकर भाऊ इतकियादेखत एसजी वाडकराने बापूजी वाडकरास इनामतीचा टुकडा व वीसा टकेचे सेत व वीस हात घरठाणा इतके देऊन आपण शफत देऊन त्यास हाती धरून समजाविले ते समई बापुजी वाडकर कागदपत्र मागत होता तेव्हा आपण बालोजी वाडकर बोरगावकर बोलिला जे जीत कागदपत्र आह्मी भाऊ आहो तुझे पूर्वापार इनामाचे सेत व वीस टकियाचे सेत व घरठाणा तुज दिले तुझे तू खाऊन व सुखरूप असणे यास कोणी कथला करावयास निसबत नाही ऐसे बोलोन समजाविशी केली त्याप्रमाणे गावास आलेवरी बापोजी वाडकराचे स्वाधीन इनाम टुकडा व विसा टकेचे सेत व घरठाणा केला इतके आपणास दखल आहे ह्मणुन शफत देऊ गोही दिल्ही

सदरहूप्रमाणे गोही मनास आणुन थल मजकुरीने गोतानी निवाडा केला जे बापुजी वाडकर जरी बिराना कुणबी असता तरी त्यासजी वाड- कराने पहिले त्याचे आज्यास इनामाची तकसीम सेत का देता घरठाणा का देता दुसरे दाहा पाच वर्षे च खात होता ह्मणत होता त्यास हमशाही पाटीलाची व गावीचे बलूत्याची गोही तीन पिढिया चालीस पनास वर्षे भोगवटा चालिला आहे ऐसी गोही गुदरली व बापुजी वाडकर म्हणजे रामोजी वाडकर पाटील तकसीमदार चिखलीस होता त्यास व त्याचा लेक लुमाजी वाडकर त्यास चंदररायानीं जिवे मारिले त्याबदल परागदा होउन गेला होता लुमाजी वाडकराचा नातु बापुजी वाडकर ऐसे बालोजी वाडकर पा। मौजे बोरगाव बु॥ याने शफत क्रिया देऊन साक्षी दिल्ही व मौजे मजकूरचे बलूतेयानी साक्षी दिली ऐसे दोनी गोही खरी गुदरली ऐसे असता एसजी वाडकर बापुजी वाडकरास कुणबी बिराम ह्मणतो हे गैर-माकुल बापुजी वाडकर ह्मणजे चिखलीकर पाटील याच भाऊ खरा पहिलेपासून इनामतीचे सेताचे तकसिमेचा टुकटा व वीसा टकेचेकुणबावियाचे सेत व घरठाणा वीस हात जे खात आला आहे त्याप्रमाणे त्याचे त्यास देणे ऐस गोतानी एसजी वाडकरास बरहक निवाडून सागीतले त्यावरून एसजी वाडकर हा हि समजोन कबूल आत्मसतोषे केले बापुजी वाडकर वादास (ख) रा जाहाला एसजी वाडकर खोटा जाला ऐसा निवाडा थल मजकूरचे गोतानी बर हक रून प्रमाणे महजर करून दिल्हा हा लिहिला महजर सही