Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखाक ३००
१७२१

श्री
यादी बाबा श्रीधर नरसिपुरकर याचे तीर्थरूपानी आपला भाऊ देशातरास गेला होता तो आणिला त्यास विभाग देऊन परस्परे जननाशौच मृताशौच धरीत आले याज विसी पत्र रगभट याज पाशी आहे हाली रंगभट याची स्त्री निवर्तली तिचे अशौच न धरीत ह्मणोन नरसिपुरी खटला पडला सबब बाबा श्रीधर याणी क्षेत्रास येऊन विनति केली की आमची वशावळ पाहून शास्त्रार्थ आह्मास सागावा ऐसे बोलिले त्याज वरून वशावळीची चौकशी करिता ज्याणे वशावळ दिली त्याणे च वशावळ खोटी ह्मणोन लेहून दिल्हे त्याज वरून पूर्ववत् अशौच धरावे असे सागितले असता अशौच धटाई करून धरीत नाहीत सबब सरकरसमत बहिष्कारपत्रे लिहिली त्याप्रमाणे चालत आले हाली परस्परे समजोन अन्नोदकव्यवहार करू लागले ते समईं आह्मी आक्षेप केला जे रगनाथभट हा तुमचा गोत्रज होय अथवा न होय हे लेहून देणे अनतर प्रायश्चित्त करोन अन्नोदकव्यवहार करणे हे न ऐकता परस्परे धटाई करोन व्यव्हार करितात याचा बदोबस्त करावा

लेखाक २९९
१७२१ भाद्रपद वा। १३

श्री नकल
वेदमुहूर्ति राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण व राजकीयग्रहस्तसमुदायवा। नरसिपुर यास श्रीमत्करहाटकक्षेत्रस्त समस्तब्राह्मणकृतानेकनमस्कार व आशीर्वाद उपरि बालभटबीन मनभट व बापा श्रीधर वा। मा।र याणी क्षेत्रास येऊन विदित केले जे रगभट बीन दादभट याची स्त्री निवर्तली तिचे अशौच आह्मी धरिले नसता आमचे अर्धलीचे भाऊ याणी धरिले ह्मणोन त्यास आणून चौकशी करावी त्याज वरून बाळाजी मुकुद प्रभृति समस्त त्याचे भाऊ क्षेत्रास आणून विचारिले जे बाबा श्रीधर व त्याचे घरबधु याणी अशौच धरिले नसता तुह्मी अशौच धरिले त्याचे कारण काय त्याज वरून त्याणी उत्तर केले जे पूर्वी पासून अशौच परस्परे धरीत आलो व हाली वैहिवाट हि चालते अशौच धरावयाची आहे ह्मणोन आह्मी व बाबा श्रीधर याचे घरभाऊ गोविंदभट अरे व अनत भट अरे याणी अशौच धरिले व बाळाजी शामजी या पासी आदिमालिका होती ती बाबा श्रीधर याज पासी देऊन आठ दाहा वर्षे जाहली असता बाबा श्रीधर प्रभृति समस्त अशौच आज पर्यंत परस्पर धरीत आले हाली बाळाजी शामजी याणी आदिमालिकेची याद खोटी ह्मणोन आपले भावाच्या साक्षी घालून पत्र लेहून दिले त्याज वरून बाबा श्रीधर यास विचारले जे तुह्मी रगभट बिन दादभट याचे वृधीक्षय वडिला पासून आजपर्यत धरिले व हाली सोडिले या दोहीचे कारण काय ते लिहून देणे त्याचे उत्तर न करिता व निष्कृति न करिता क्षेत्राहून निघोन गावास गेले तरी मशारनिले क्षेत्रास येऊन कृतकर्माची निष्कृति करीत तो पर्यत त्याचे भाऊ जितक्यानी सुतक धरिले नाही त्याचे येके पक्ति अन्नोदकव्यवहार न करणे व भोवर गावास हि या प्रमाणे सागणे शके १७२१ भाद्रपदवा। १३ बहुत काय लिहिणे हे नमस्कार

लेखाक २९८
१७२१ भाद्रपद वा। १३ बाळबोध

।। श्रीकृष्ण॥

बजभट्ट बिन मनभट्ट व बापा श्रीधर यानी क्षेत्रास येउन विदित केले जे रगभट्ट बिन दादभट्ट याची स्त्री निवर्तली तीचे आशौच अह्मी धरिले नसता अमचे अर्धलीचे भाउ यानी धरीले ह्यणोन त्यास आणोन चौकशी करावी त्याज वरून बाळाजी मुकुद प्रभृति त्याचे भाउ क्षेत्रास आणोन विचारिले जे बाबा श्रीधर व त्याचे अर्धलीचे घरबधु याणी आशौच धरले नसता तुह्मी अशौच धरले त्याचे कारण काय त्याज वरून त्यानि उत्तर केले जे पूर्वी पासोन अशौच धरीत अलो व हल्लि वहिवट ही आशौच धरावयाची चालत आहे ह्मणोन अम्ही व बाबा श्रीधर याचे घरभाउ गोविंदभट्ट अरे व अनतभट्ट अरे यानी आशौच धरिले व बाळाजी शामजी याज पाशी आदिमाळिका होती ती बाबा श्रीधर याज पाशी देऊन आठ दहा वर्षे जाहलि असता बाबा श्रीधर प्राभृति समस्त आशौच आजपर्यत धरीत आले ह्मणोन अह्मी धरिले हल्लि बाळाजी शामजी याणि आदिमाळिकेची याद खोटी ह्मणोन अपले भावाबदाचा साक्षी घालून पत्र लिहून दिल्हे त्याज वरून बाबा श्रीधर यासी विचारिले जे तुह्मी रगभट्ट बिन दादभट्ट योच वृद्धिक्षय वडिला पासोन आजपर्यंत धरिले व हल्लि सोडिले या दोहिचे कारण काय ते लेहून देणे त्याचे उत्तर न करीता व निष्कृति न करीता क्षेत्रा हून निघोन गावास गेले तर मा।रनिल्ले क्षेत्रास येऊन कृतकर्माचि निष्कृति करीत तो पर्यत त्याचे भाउ जितक्यानी सूतक धरिले नाही त्याचे येकपक्ति अन्नोदकव्यवहार न करणे व भोवर गावास हि या प्रमाणे सागणे शके १७२१ भाद्रपद वा। १३ बहुत काय लिहिणे हे नमस्कार

वेदमूर्ति राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण व राजकीय ग्रहस्तसमुदाय वास्तव्य नरसिपुर यास श्रीमतक-हाटकक्षेत्रस्थ समस्त ब्राह्मण कृतानेक नमस्कार व आसीर्वाद उपरी

लेखाक २९७
१७२१ श्रावण वा। १३

श्री
यादी बाबा श्रीधर नरसीपुरकर यास पुरशीस सु।। मया
तैन अलफ छ २७ रा।वल अजमासे

१ रंगाचार्य याची स्त्री निवर्तली तिच्या सुतकाचा गर्गशा पडोन क्षेत्रास आला त्यास रगाचार्य याचे वडील गावात होते किंवा देशातरास गेले ऐसे असल्यास गेला त्या पुरुषाचे नाव काय बाहेर किती वर्षे होते गावात आला तो पुरुष कोण त्याचे नाव काय येऊन किती वर्षे जाहली आल्या तागाईत आजपर्यत जाताशौच व मृताशौच याची वहिवाट कसी करीत आला हे सांगावे

लेखाक २९६
१७२१ श्रावण वा। ८

श्री तालीक
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी

सेवक बाळाजी शामजी साष्टाग नमस्कार लिहून दिल्हा कागद ऐसा जे पेशजी सन सलास तिसैनात तासगावी होतो त्या समई बाबा श्रीधर तेथे आले त्या समईं आह्मी काही कागदपत्र पाहात होतो त्या वेलेस ही वशावलीची याद सापडली ती भटजीस आह्मी बोललो की ही याद काय आहे ती पाहणे ह्मणून त्याचे आगा वर टाकली त्यानी नेहली तासगावचे मुकामची याद बाबाश्रीधर याज पाशी दिल्ही ती वशावल ह्मणून बाबाश्रीधर शामभट बिन दादभट याचे सुतकनिवृत्ति करू लागले ते समई यादीची चौकशी केली परतु आमच्या सर्वा भावाच्या मते जे जिवाजी व्यकटेश यानी याद जवळ असता सुतक शामभट बिन दादभट याचे सुतकनिवृत्ति केली नाही सबब यादववशावलीची खोटी तेरीख छ २१ रा।वल सन मया तैन व अलफ हे लिहिले सही हस्त अक्षर बाळाजी शामजी
१ भाऊभट बिन जिऊभट जोशी क्षेत्रनरसिपुर पत्रा प्रमाणे मान्य
१ बाळभट बनि मुकुदभटपत्रा प्रमाणे मान्य
१ आपाभट बिन मुकुदभट जोशी क्षेत्र मा।र
१ भाऊ नारायणभट क्षेत्रनरसिपुर पत्रा प्रमाणे मान्य
१ नारायणभट बिन अण्णभट क्षेत्रनरसिपुरकर

लेखाक २९५
१७२१ श्रावण शु।। १४ बाळबोध

श्री तालीक
जबानी बजभट जोशि व बाजी जोशि व अमचे बधु नरसिपुरकर लेहून दिल्हि जबानी ऐशी जे रगभट बिन्न दादभट याची स्त्री निवर्तली तिचे सुतक निमेचे बधु यानि धरिले बाळाजी मुकुद प्रभृति धरिले ह्यणोन तुह्मा पासि क्षेत्रकराडास अलो त्याज वरोन अपण पत्र पाठविले साताच्या नावाचे त्या पैकि मात्र अले त्यास त्याचे बोलणे अमच्या दशाहातील बंधु अतोबा अरे व दादोबा अरे व गोविंदभट अरे प्रभृति त्याचे बधु जोशि दशाह सूतकी बैसले आहेत त्यास परतु त्याचे दशाहातील होयत किंवा नव्हेत अह्मास ठाउक नाहि गोविंदभटाचे अमच त्रीरात्र अह्मी हे खरे करून देउ मित्ति शके १७२१ श्रावणशुत्ध १४ हे लिहिले सहि हस्ताक्षर बापाजी जोशि पत्र प्रमान्य बजंभट

लेखाक २९४
१७२१ श्रावण शु॥ १४ बाळबोध

श्रीनरहरिप्रा।। तालिक
जबानी भाउ जिवाजी व रामाजी मुकुद जोशि नरसिगपुरकर लेहून दिल्हे जबानी एशि जे रगाचार्य बिन्न दादभट जोशि याचि स्त्री निवर्तली तीच्या सुतकाचा गर्गशा पडोन बजंभट व त्याचे बंधु तुह्मापाशी क्षेत्र कराडास अले याज वरून आपण क्षेत्राहून साताचा नावाचे बाळाजी मुकुद व भाऊ जिवाजी व आमचे बधु यास पत्र अले याज वरोन अह्मी क्षेत्रात अलो त्यास आपण विचारिले किं बजभट याच्या दशाहातील बधू कोण्ही सूतकी बैसले अहेत किंवा नाहि हे सागावे त्यास अतोबा अरे व दादोबा अरे व गोविंदभट अरे प्रभृति त्याचे बधु जोशि दशाह सूतकी बैसले अहेत हे खरे करोन देउ मित्ति शके १७२१ श्रावणशु १४ हे लिहिले सहि हस्ताक्षर भाउ जीवाजी पत्र प्रमाणे रामाजी मुकुंद

लेखांक २७८                                                                      श्री                                                                     १४६६ फाल्गुन वद्य ११                                                                          

                                                                                                                                                                             १/७                                                                                                                                                        

                                                                                         नकल अर्वाचीनीकृत

स्वस्ति श्री शके १४६६ क्रोधी संवछरे फालगुण वदि ११ सोमे तदीनी हरबाजी परचुरे याचे पुत्र बेबुल माहाजनी व हरबा व विठल हे त्रिवर्ग परस्परे विभक्त जाले याचे विभाग स्थित ऐसी हे त्रिवर्ग एकवट आसता गोहागरच्या व्यापारानिमित्य दिवाणे धरिले दंड घेतला व गावची बाकी घेतली व गाव उंटास वाटप लाविला तेणेनिमित्य द्रव्य व सोन रूप व उदकप्रवृती जितुका अर्थ होता तितुका विकून दिवाणास दिल्हा हे इतुके हि देऊन नपर दिवाण न फिटे च रूप आह्मास बहुसाल जाले व गाव उस आह्मासी घातला या गावाचा व रुणाचा वाटा विठलासी विवाह जाला नाही आणि लेकरू व अप्राप्‍त ह्मणुन गाव व रूणाचा वाटा घातला नाही रूणासी व गावासी संमंध नाही म्हणून तांबे व कासे व गुरे याचा व मासे विठलासी दिल्हे नाही तांबे कासे जे होते ते दुवर्गास मासे वाटून घेतले विठलासी तांब्या गडू एक वाटी एक इतुके विठलासी दिल्हे आता गुरांचे वाटे बैल काजू व चिचोरा व पोकळा व मुढा व गाय काली व तिचे वासरू व रेडिया दोन इतुके बेबुल माहाजनीयाचा वाटा दिल्हा चपनवटिका व रोट व गुणा व व ह्मैस १ एक व गाय मोठी व कालीचे वासरू १ एक इतुका वाटा हरीस दिल्हा विठलासी बैल तांबवे झडुं व कसरा व तांबी पाडी १ इतुका विठलासी दिल्हा कण जे काही होत ते त्रिवर्गास कोश वाटून घेतले अता वाडियाचे वाटे लक्षणेलकडेचा वाटा बाळ जोसी याच्या उतरेकडेचा वाटा तो हरबासी दिल्हा त्या वाटियाचे उतरलता वाटा बेबुल माहाजनी यासि दिल्हा गोविंदभट देवलयाचे सेजारीचा असे वाडियाचे विभाग जाला आता मोठी बावी ती राहाटाची ते तिन्ही राहाट तिही वर्गाचे व विठलाचे वाटियातून साल बावी ते विठलाची व दिल्ही बेबुल माहाजनी याचे वाटियातून राहाट एकाची बावी दुवर्ग खणोन बाधून द्यावी सेरी धरणे बावी वाटिलिया आता घरे बेबुल मानीयाचे विटिया वलेघर ते बेबुल मानीयास च दिल्हे हरबाचे विटियावले घर ते हरबास च दिल्हे विठलाचे वाटियावरील घर नाही ह्मणून विठल वेगला रिघो लागले तेव्हा घर त्रिवर्ग बांधोन द्यावे ऐसे रीति घराचे वाटे धरिले जुने घरची सारी सुसरी मादूस मोठी व अतुक व याचा हा बेबुल (अपूर्ण)

लेखाक २९३
१७२१ श्रावण शु॥ १४ बाळबोध

श्री तालिक
जबानी बजभट जोशि बापाजी जोशि व अमचे बधु नरसिपुरकर लिहुन दिल्हि जबानी ऐसि जे रगभट बिन दादभट याचि स्त्री निवर्तली तीच सुतक निमेचे बधु यानि धरिले बाळाजी मुकुद प्रभृति धरले म्हणोन तुम्हा पासी क्षेत्रक-हाडास अलो त्याजवरून अपण पत्र पाठविले साताच्या नावाचे त्यापैकी येक मामाच अले त्यास त्याच बोलणे अमच्या दशा हा बधु अतोबा अरे व दादोबा अरे व गोविंद अरे प्रभृति त्याचे बधु जोशि दशाहसुतकी ले अहेत त्यास परतु त्याचे दशाहातील होत किंवा नव्होत अम्हास ठाउक नाहि गोविदभटाचे अमचे त्रिरात्र अम्ही हे खरे करून देउ मिति शके १७२१ श्रावण शुध्ध १४ पत्र लिहिले सहि हस्ताक्षर बापाजी जोशि

पत्र प्रमान्य बजभट

लेखाक २९२
१७२१ श्रावण शु।। १४ बाळबोध

श्रीनरहारिप्रसन्न तालिक
जबानी भाउ जिवाजी व रामाजी मुकुद जोशि नरसिपुरकर लिहुन दिल्हे जबानी ऐशि जे रगाचार्यबिन्न दादभट जोशि याचि स्त्रि निवर्तली तीच्या सुतकाचा गर्गशा पडोन बजभट व त्याचे बधु तुह्मापासि क्षेत्र क-हाडास अले याज वरून अपण क्षेत्राहून साताचा नावाच बाळाजी मुकुद व भाउ जिवाजी व अमचे बधु यास पत्र अले याज वरून अह्मी क्षेत्रास अलो त्यास अपण विचारिले कि बजभट याच्या दशाहतील बधु कोणी सुतकी बैसले अहेत किंवा नाहि हे सागावे त्यास अतोबा अरे व दोबा अरे व गोविंदभट अरे प्रभृति त्याचे बधु जोशि दशाहसूतकी बैसले आहेत हे खरे करून देउ मिति शके १७०२१ श्रावण शुद्ध १४ हे लिहिले सहि हास्ताक्षर भाउ जिवाजी
पत्र प्रमाणे रामाजी मुकुंद