लेखांक २८६ श्री १६५१ फाल्गुन शुध्द ४
राजश्री देसाई व देशपांडे वर्तमान व भावी सुभा प्रांत दाभोल गोसावियांसि
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य
श्नो सेखोजी आंगरे सरखेल रामराम सु॥ सलासीन मया व अलफ राजश्री नारो कृष्ण उपनाम जोशी शाडिल्य गोत्र हे स्वामीच्या राज्यातील पुरातन सेवक सेवा एकनिष्टेने केली त्याउपरी सेवा सोडून आपला काल सार्थक व्हावा याजकरिता स्नानसध्या करून ईश्वरभजनी लागले याची योगक्षेमाची अनकूलता करून दिधल्याने स्वामीच्या राज्यास श्रयस्कर याकरिता विशालगडचे मुकामी कैलासवासी छत्रपति स्वामी याणी कसबा मुरुड ता। पचनदी प्रा। मजकूरपैकी लारी दाभोली लारी ४०० च्यारसे लारी पुत्रपौत्री वृती करून दिल्ही प्रस्तुत नारो कृष्ण याणी वैकुठवास केला त्याचे पोटी सतत नाही याकरिता त्याचे भाउ राजश्री माहादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण व पुतणे राजश्री बालाजी माहादेव व कृष्णाजी माहादेव व नातू नारो रामचद्र याणी हुजूर जाऊन विनति केली श्रीमंत राजश्री छत्रपती स्वामींची राजपत्रें आणिली व हाली राजश्री बालाजी माहादेव कुलाबाचे मुकामी येऊन रदबदल केली त्यावरून कसबे मा।री वृत्तीपत्र लारी च्यारसे करून द्यावा त्यास कसबे मजकुरी बहुतेक वतनदारांची सेते सदरहू लारीची बेरीज न भरे याजकरिता बेरिजेची भरती करून दिल्ही असे
कसबे मुरुड येथील खुदवाडी नि॥ मौजे कुंभवे ता। जालगाव येथील खराब
माहादेव केसमाजी थथे याजबा। निमे जमीनपैकी नेमून देणे लारी दाभोली
आगर मा।रनिले- कडे आहे तो आगर लारी २७५
यांजकडील असे त्या आकारपैकी
लारी १२५
एकूण च्यारसे लारींची वृती करून दिली असे यासि पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने करार करून हे पत्र तुह्मास सादर केले असे सदरहूप्रो। वृती चालवणे साल दरसाल ताजा सनदेचा उजूर न करणे या सनदेची प्रती लेहून घेऊन मुख्यपत्र बालाजी माहादेव व नारो रामचंद्र व कृष्णाजी माहादेव व श्रीधर गोविंद यास भोगवटियास परतोन देणे जाणिजे रा। छ ३ माहे साबान