Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
संस्कृत भाषेचा उलगडा
एकाच जुनाट भाषेत दोन्ही प्रकारची रूपे होत नसत. तर दोन निरनिराळ्या पूववैदिक जुनाट भाषांपैकी एकीत दृशि रूप होई व दुसरीत दृष्टी रूप होई. ति हे परस्मायक सर्वनाम आहे व इ हे आत्मनायक सर्वनाम आहे, हेही लक्षात धरले पाहिजे. आत्मनायक इ सर्वनाम कर्मणि लुङ् च्या प्रथमपुरुषाच्या एकवचनी येत असते. ते तेथे का येते याचाही उलगडा इ च्या या आत्मनायकत्वावरून होतो. अलंभि, आदायि, आर्ति, अगोपि, अगामि, अकारि या कर्मणि लुङ्च्या रूपात ही आत्मनायक इ सार्वत्रिक आहे. तात्पर्य गमि आणि गंति अशी प्रथमपुरुषाच्या एकवचनाचीं लटांत रूपे अतिजुनाट पूर्ववैदिकभाषेंत होत. धातू संबंधाने बोलावयाचे म्हणजे ही गमि व गंति रूपे पाणिनीच्या फार पूर्वींपासून योजण्याचा प्रघात होता. तोच प्रघात पाणिनीने साहजिकपणे उचलला. गमि आणि गन्ति या रूपांच्या धर्तीवर गछति, नयति, भवति इत्यादी अर्वाचीन रूपेही पाणिनि योजितो ते ठीकच आहे. गमि हे आत्मनायक एकच रूप आपणास माहीत आहे, बाकीची आठ रूपे कशी चालत त्याची कल्पना होत नाही. परंतु प्रथमपुरुषाचे अनेकवचन गमिरे असे होत असावे. गंति हे परस्मायक रूप ज्या गम् धातूचे जाहे त्याची बाकीची रूपे लटात येणेप्रमाणे चालत :
गम्मि गम्ब: गम्म:
गंसि गंध: गंध
गंति गंत: गमंति,
कृ धातू परस्मैपदीं असा चाले
कृमि कृव: कृम:
कृषि कृथ: कृथ
कृति कृत: क्रंति
भू परस्मैपदीं असा चाले
भूमि भूव: भूम:
भूसि भूथ: भूथ
भूति भूत: भ्वति
जन् परस्मैपदीं येणेप्रमाणे चाले
जन्मि जन्व: जन्म:
जंसि जंथ: जंथ
जंति जंत: जनंति
संस्कृत भाषेचा उलगडा
६४ तर मग प्रश्न असा येतो की पाणिनी ज्यांना सार्वधातुक व आर्धधातुक म्हणतो त्यांच्यांत जर धातूंची निर्भेळ साधी अंगे अपवादादाखल केवळ तुरळक सापडतात, तर ती साधी निर्भेळ अंगें मुबलक कोठे सापडतील? ती साधी व निर्भेळ अंगे कोणत्या पूर्ववैदिक भाषेत कधी प्रचलित होती? ती प्रचलित होती याला पुरावा व गमक काही आहे की नाही? धातूंच्या साध्या निर्भेळ अंगांना काडीचाही विकार न होता, प्रत्यक्ष किंवा परोक्ष सर्वनामे लागून निर्माण झालेलीं रूपे कोठे सापडतील? अशी रूपे पाणिनीय संस्कृत भाषेत राहिली तरी आहेत काय? इत्यादी एकच अर्थाचे अनेक प्रश्न संशोधकापुढे उभे राहतात व समर्पक उत्तरांची वाट पहातात. या प्रश्नांना उत्तर असे की मूळ धातूला गुण, वृद्धी, प्रारंभी मध्ये किंवा अंती कोणताही आगम न होता किंवा आदेश न होता, परोक्ष किंवा प्रत्यक्ष सर्वनामे लागल्याची उदाहरणे पाणिनीय सूत्रात काही आहेत. अमुक धातूला अमुक होते असे सांगताना पाणिनी धातूंचा निर्देश चार पाच प्रकारांनी करतो. ब्रुवो वचि:, रुळ: प: भियो षुक् या सूत्रात ब्रू, रुह् व मी हे धातू जसेच्या तसे नामे म्हणून षष्ठयन्त चालविले आहेत. धातूंची निर्देश करण्याचा हा एक प्रकार इकागाम करून रञ्जि, शदि, रभि, गमि असा धातूचा निर्देश, करण्याचा दुसरा प्रकार ह्न आणि लट्च्या प्रथमपुरुषाच्या एकवचनाने धातूचा निर्देश करण्याचा तिसरा प्रकार, जसे तनोते विंभाषा, तिष्ठते रित् या तिसऱ्या प्रकारात तीन तऱ्हा आहेत. एक तऱ्हेत तनोति, तिष्ठत्ति अशी पाणिनीय भाषेत चालू असलेली सविकरण रूपे येतात. दुसऱ्या तऱ्हेत सर्ति, अर्ति अशी गुणीभूत यङ्लुक्ची जुनाट रूपे येतात आणि तिसऱ्या तऱ्हेत कोणताही विकार न होता लट्च्या प्रथमपुरुषाच्या एकवचनाचा ति प्रत्यय मूळ धातूला लावून धातूचा हंति, अस्ति, ऋति, कृति, सृति, भूति, सूति, वक्ति, रव्याति, अत्ति असा निर्देश केलेला आढळतो. पैकीं तनोति तिष्ठति व सर्ति अर्ति; ही रूपे शदि रमि गमि व अस्ति कृति वक्ति या रूपांहून अर्वाचीन कारण विकृत आहेत. तेव्हा सर्वात जुनी व साधी ऊर्फ अविकृत रूपे म्हटली म्हणजे १) शदि रमि गमि आणि २) अस्ति कृति वक्ति ही होत. अस्ति कृति वक्ति यामधील ति हे सर्वनाम सर्वप्रसिद्ध आहे. शदि, रमि, गमि यामधील इ हे सर्वनाम इतके प्रसिद्ध नाही, कारण ते अतिजुनाट आहे. ति व इ ही सर्वनामे जुनाट काळी कोणत्याही धातूला लागत. जसे वक्ति रूप होई, तसेच वचि हेही रूप होई, गमि गंति, रमि रंति, शकि शक्ति, दृशि दृष्टि, अशी दोन्ही प्रकारची रूपे होत.
संस्कृत भाषेचा उलगडा
आता पाणिनीचा पहिला व दुसरा लुङ् परामशार्थ घेऊ. पहिल्या लुङांत अम् व म; स तम् त: त् ताम् उस् किंवा अन् असे प्रत्यक्ष प्रत्यय आहेत. दुसऱ्या लुङांत अम् आव आम; अस् अतम् अत; अत् अताम् अन्; असे परोक्ष अजादि प्रत्यय आहेत. दोन्ही प्रकारातील काही धात्वंगे पूर्ववैदिक यङ् किंवा यङ्लुक् किंवा लिट् यांचे संक्षेप आहेत, काही धातू साधे निर्भेळ आहेत. पाणिनीने दोहोंची खिचडी एकत्र केलेली आहे.
येणेप्रमाणे परोक्षाकरता असे दिसून आले की, पाणिनी ज्याला लुङ् म्हणतो तो वस्तुत: पूर्ववैदिक यङ्, यङ्लुक्, सन्नन्त, लेट् व साधे धातू यांचा लङ् आहे. येथेही धातूंची पाणिनीय पहिला व दुसरा लुङ् निर्भेळ साधी अंगे तुरळक सापडतात. बहुतेक भरणा मिश्र अंगांचाच आहे.
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
कृष्णियः = कान्ह्या
कृष्णिलः = कान्हुला
राम = रामडा, रामा, राम्या, रामुला
विष्णु = विनुटला, विष्ण्या ]
इ. इ. इ.
कान्होजी [ कृष्णादित्य = कन्हू (कन्ह चें ममतादर्शक)+ जी = कान्होजी ] (आदित्य पहा)
कान्ह्या [ कान्हुला पहा ]
काळिंदे [कालिंदि] ( दासींचीं नांवें पहा)
काळूबाई [ काल ( विशेषनाम ) = काळूबाई. व्द्याश्रयकाव्य-४-५१ ]
कुशा [ कौशिकः = केसिआ = कुशा ( पुरुषनाम ) ]
कुशी [ केशिकी = केसिइ = कोशी = कुशी ( स्त्रीनाम)]
केरू [केयूरक = केरू (Proper name) ]
कैके [ केतकि ] ( दासींचीं नांवें पहा)
कोंडू- हा शब्द कानडी कोंड म्हणजे घेणारा या शब्दापासून निघाला आहे. ताम्रपटांतून वातापिकोंड, मदिरैकोंड, म्हणजे बदामी शहर घेणारा, मदिरै घेणारा, असे समास येतात.
कोंड = कोंडू (ममतादर्शक). (ग्रंथमाला)
कोंडूबाई [ कुण्डा (विशेषनाम ) = कोंडूबाई व्द्याश्रयमहाकाव्य-४-५१ ]
खंडोबा - हेमचंद्र हरस्कंदै या संस्कृत द्विवचनाचें हरखंडा असें प्राकृत रूप देतो. खंडा हें अनेकवचन आहे; कां कीं प्राकृतांत प्रायः द्विवचन नाहीं. तात्पर्यं स्कंद या संस्कृत शब्दाचें प्राकृत रुप खंड असें होतें. त्याचें ममतादर्शक मराठी रूप खंडू व प्राशस्त्यदर्शक मराठी रूप खंडोबा. म्हणजे महाराष्ट्रांत जेजुरी, पाली वगैरे ठिकाणचे जे खंडोबा आहेत ते मूळचे स्कंद होत. स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी. कार्तिकस्वामीचें देऊळ पुण्याच्या पर्वतीस आहे, तें स्कंदाचें म्हणजे खंडोबाचें च होय. इतकें च कीं, पर्वतीवरच्या त्या देवाचें नांव संस्कृत आहे व जेजुरीच्या देवाचें नांव प्राकृत आहे. स्कंद ही देवता वीरांची व योद्ध्यांची फार पूर्वीपासून आहे. स्कंदाला सेनानी हें अपरनाम आहे. त्याची उपासना वीर करितात. महाराष्ट्रांतील सर्व जातींचे मराठे (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, रामोशी वगैरे) खंडोबा हें आपलें कुलदैवत कां समजतात तें वरील उद्घाटनावरून समजणार आहे. खडोवा हें शिवदैवत आहे, असें कित्येक लोक समजतात, तें अर्थात् निराधार आहे. स्कंदपुराणांत स्कंदोपासकांची म्हणजे खंडोबाच्या उपासकांची माहिती सांपडते. (भा. इ.१८३२ )
संस्कृत भाषेचा उलगडा
आता पाणिनीचा सहावा लुङ् पृथक्करणार्थ घेऊ :
मूळ यम्, रम्, छो, नम् असे धातू. त्यांची सन्नन्त अंगें यियँस्, रिरंस्, चिच्छास्, निनंस्, आद्य अक्षरांचा लोप होऊन यंस् रंस्, छास्, नंस् यांना इ व लेट् चा सिप् लागून यंसिष्, रंसिष्, छासिष्, नंसिष्, पुढे लङ् चा अडागम व प्रत्यय, तात्पर्य, पाणीनीचा
पाणिनीचा सहावा लुङ् सेट् पाणिनीचा सातवा लुङ् अनिट् सहावा लुङ् म्हणजे सनन्त धातूंच्या लेट् चा लङ् आहे. मिळून चवथा, पाचवा, सहावा व सातवा लुङ् हे चारी लुङ् पूर्ववैदिक लेट् चे लङ् आहेत.
आता पृथक्करणार्थ पाणिनीचा तिसरा लुङ् घेऊ. हा बोलनाचालून अभ्यस्त आहे. अभ्यस्त असण्याचे कारण असे आहे की णिजन्त अंगाशी यांचा व्यवहार आहे. चुरादि व णिजन्त धातू मूळचे यङ् व यङ्लुक् चे अवशेष आहेत, हे मागे दाखवून दिलेच आहे. हे णिजन्त धातू यङ् व यङलुक् यांच्या स्थितीत असताना यांची परोक्ष म्हणजे भूतकालीन म्हणजे लङ् ची रूपे अभ्यस्त साहजिक असत. पुढे ही परोक्ष भूतकालीन अभ्यस्त रूपे तेवढी पाणिनीय संस्कृतात राहिली आणि अभ्यस्त धातूंचे संक्षेप चुरादि वर्गात साधे व साळसूद म्हणून मोडू लागले. त्यामुळे चुरादि वर्गातील धातूंची लङ् ची रूपे अचूचुरत्, अचीकथत्, अबीभवत् वगैरे अभ्यस्त झालेली पाहून सकृद्दर्शनी अचंबा वाटतो, परंतु या रूपांचा इतिहास व पूर्वपरंपरा कळली म्हणजे अचंब्याचे पर्यवसान समाधानात होते.
संस्कृत भाषेचा उलगडा
चवथ्या व सातव्या लुङांत सर्व प्रत्यय सादि आहेत. पाचव्या लुङांत या सादि प्रत्ययांना आदौ इडागम लागतो, कारण पाचव्या लुङांतील सर्व धातू सेट् असतात. एकूण अर्थ असा की, चवथ्या, पाचव्या व सातव्या लुङांत सर्व धातू सेट् असतात. एकूण अर्थ असा की, चवथ्या, पांचव्या व सातव्या लुङांत सर्व प्रत्यय सादि आहेत. पैकी चवथा व पाचवा लुङ् यांचे प्रत्यय अम् व म स् तम् त आणि त् ताम् उस् असे आहेत आणि सातव्या लुङाचे प्रत्यय अम्, आव, आम, अस् अतम् अत आणि अत् अताम् अन् असे आहेत. म्हणजे सातव्या लुङाचे प्रत्यय अजादि आहेत म्हणजे परोक्ष आहेत आणि पाचव्या व चवथ्या लुङाचे प्रत्यय प्रत्यक्ष आहेत. या परोक्ष व प्रत्यक्ष प्रत्ययांना लुङांत सुडागम होतो असे पाणिनी सांगतो. परंतु हा सुडागम वस्तुत: काय आहे याचे अभिज्ञान पाणिनीला झाले नाही. हा सुडागम जो आहे तो वस्तुत: लेट् चा सिप् आहे. सिब्बहुलं लेटि, म्हणून पाणिनीय सूत्रच आहे. तात्पर्य, लेटांतील स् व लुङांतील स् एकच आहेत. इतकेच की ते एक आहेत ते पाणिनीला ओळखता आले नाही.
संस्कृत भाषेचा उलगडा
६३ आता आर्धधातुकात साध्या धातूंची काय हालहवाल आहे तो शोधू आर्धधातुकांपैकी तनादि व चुरादि धातूंच्या उगमाचा विचार वर झालाच आहे. तसेच, कर्मणि व प्रयोजक धातूंरूपांचाही विचार प्रत्येकी दिवादि व चुरादि धातूंच्या विवेचनाबरोबर झाल्यासारखाच आहे. दिवादि धातूं परस्मैपदी आहेत व कर्मणि धातू आत्मनेपदी आहेत इतकाच फरक; बाकी दोहोंचाही गम यङ् आहे. चुरादि धातू म्हणजेच प्रयोजक धातू, प्रयोजकात व चुरादिकात भेद एवढाच की हेतुत्वाची कल्पना प्रयोजक धातूंत जागरूक असते आणि चुरादिक धातूंत अतिपरिचयाने अस्तास गेलेली असून फक्त मूळ स्वार्थ तेवढा शिल्लक रहातो. आर्धधातुकांपैकी लिटाची रूपे अभ्यस्त असल्यामुळे साधेपणाचे ढोंगही त्यांना करता येण्याची सोय नाही. सन्नन्त अभ्यस्त जोडधातू आहे. आशीर्लिङ् व लिङ् बोलून चालून जोडधातू आहेत, तेव्हा साधेपणाच्या कामी त्यांचे नावही घेण्याचे कारण नाही. राहता राहिला लुङ् लुङाचे एकंदर ७ प्रकार पैकी ज्यांना लुङाचे चवथा, पांचवा व सातवा प्रकार म्हणतात ते तिन्ही वैदिक अथवा पूर्ववैदिक लेट्चे भूतकाल आहेत. येथे पूर्ववैदिक लेट् म्हणजे काय ते सांगितले पाहिजे. जसे णिच्, लिट्, सन् व यङ् किंवा यङ्लुक् हे स्वतंत्र अंगे तयार करून लट् व लङ् आणि शतृ व शानच् वगैरे प्रत्यय घेतात त्याप्रमाणेच पूर्ववैदिककाली लेट् म्हणून पाणिनी ज्या लकाराला म्हणतो तो लट्, लङ्, लोट्, लिङ् वगैरेंचे प्रत्यय घेत असे. म्हणजे साधे मूळ धातू आणि णिच्, लिट्,सन् व यङ् किंवा यङ्लुक या जोड किंवा अभ्यस्त धातूप्रमाणेच लेट् हे एक स्वतंत्र प्रकरण असे व त्याला लट्, लङ्, लिङ् इत्यादी प्रत्यय होत असत. पूर्ववैदिककाली लेट् चा असा प्रकार होता. पुढे वैदिककाल आला. त्यात लेट्चे राज्य थोडे अव्यवस्थित झाले व त्याचा प्रचार किंचित कमी कमी होत होत पाणिनीय संस्कृतांत लेट् अजिबात लुप्त किंवा बंद झाला. फक्त लुङ् मधील चवथ्या, पाचव्या, सहाव्या व सातव्या प्रकारात तेवढा लेट् राहिला. परंतु हा लेट् चा लङ् आहे हे पाणिन्यादि संस्कृत वैय्याकरणांना ओळखता सुद्धा येईना. ओळखता न येण्याची कारणे दोन असू शकतील; १) पाणिन्यादि वैय्याकरण मंद व मूढमति होते, किंवा २) पूर्ववैदिकभाषा व वैदिकभाषा यांच्यात व पाणिनीय भाषा यांच्यात इतका थोर काळ गेला असावा की कशाचे मूळ काय आहे हे सहजासहजी कळण्यास मार्ग राहिला नव्हता. हा दुसरा अभ्युपगम स्वीकार्य दिसतो. पूर्ववैदिककाल व पाणिनीयकाल यांच्यात कालाचे महदन्तर होते इतकेच नव्हे तर वैदिककाल व पाणिनीयकाल यांच्यातही दोन तीन हजार वर्षांचे अंतर असावे, असा तर्क करावा लागतो. पूर्ववैदिककाल व पाणिनीय काल यांच्यात तर पाच चार हजार वर्षाचे अंतर असावे, अस्त तर्क करणे अपरिहार्य होते. अन्यथा सबंध लेट् च्या लेट् स्मृतीतून व व्यवहारातून नाहीसा होण्यास नीट कारण देता येत नाही. काल कितीही लहान मोठा असो, इतके खरे की पाणिनीयकाली लेट् ह्न चा प्रघात भाषेतून गेला होता व लेट् ची जी काही रूपे पाणिनीय भाषेत राहिली होती ती लेट् ची आहेत हे कुशाग्रबुद्धीच्या पाणिनीसारख्या वैय्याकरणांनाही ओळखता येत नव्हते. पूर्ववैदिकभाषेतील लेट् ची काही अंगे येथे देतो, त्यापासून लङ् ची रूपे कशी साधतात ते दाखवितो आणि लेट्ं च्या लङ्ं ला पाणिनी लुङ् म्हणतो हेही स्पष्ट करतो :
संस्कृत भाषेचा उलगडा
६२ येणेप्रमाणे सार्वधातुकांतील दाही वर्गातील धातूंचे परीक्षण झाले. त्यात आपल्याला असे कळून आले की अदादिवर्गातील काही थोडे धातू व भ्वादिवर्गातील तुरळक धातू व तुदादिवर्गातील काही थोडे धातू वगळले असता, बाकी पाणिनीय धातुपाठातील एकोनएक धातू सार्वधातुकात चालण्यात साधे नाहीत. पूर्ववैदिक सनन्त, यङ्, यङ्लुक् किंवा नामधातू यांचे संक्षेप आहेत. हे संक्षेप व अपभ्रंश पाणिनीला ओळखता न आल्याकारणाने, जेथे जेथे चमत्कारिक व वां डी रूपे भेटली, तेथे तेथे असा वाकडेपणा होतो हे तो नमूद करून समाधान मानतो. ब्रू धातू ब्रूमि, ब्रूव: ब्रू : असा पाणिनीय संस्कृतात न चालता ब्रवीमि,
ब्रूव: ब्रू : असा चाललेला पाहून, पाणिनी एवढेच सांगतो की अपवाद म्हणून ब्रू चे ब्रवीमि असे रूप होते. ब्रवीमि हा पूर्ववैदिक बोब्रवीमिचा संक्षेप आहे व ब्रूव: हा बुब्रूव: चा संक्षेप आहे आणि दोन भाषांतील रूपे एकत्र मिसळून ब्रवीमि, ब्रूव: ही रूपे संमिश्र संकृत भाषेत आली आहेत, हा तपशील त्याला बिलकूल माहीत नाही. भ्वादि, दिवादि, तुदादि, चुरादि, स्वादि, तनादि, रुधादि व क्रयादि गणातील न आगमा संबंधाने पाणिनीचे अज्ञान पराकाष्ठेचे आहे. भू धातू, भूमि, भूव: भूति असा न चालता भवामि, भवाव: भवति असा चाललेला पाहून पाणिनी सांगतो की भू तील उ ला गुणादेश होतो, अ विकरण लागते व दीर्घ होतो. त्याला हे माहित नाही की पूर्ववैदिकभाषेत यङ्लुक् चे बोभो असे अंग होते, त्यापुढे आमि हे सर्वनाम येऊन संधी बोभवामि होतो व आद्य बो चा लोप होऊन भवामि हे रूप रहाते. शिवाय, आमि प्रत्यय न लागता, नुसता मि प्रत्यय लागला तर बोभोमि रूप होऊन त्याचा संक्षेप भोमि असा होत असे. एकंदरीत वैदिक व पूर्ववैदिक भाषांचा अभ्यास पाणिनीचा जितका सूक्ष्म व व्यवस्थित असावयास हवा होता तितका नाही.
संस्कृत भाषेचा उलगडा
६१ (८) चुरादि धातू : चुरादि धातूंची रूपे अय् किंवा आपय् हा जोडधातू लागून होत असल्यामुळे चोरय्, ताड्य् इत्यादी अंगे साधी आहेत किंवा नाहीत, या बाबीचा निर्णय करीत बसण्याचे कारण रहात नाही. तत्रापि चुरादिसंबंधक एक बाब नमूद करून ठेवण्यासारखी आहे. ती ही की चोरय्, ताड्य, अर्थय्, कथय्, भावय् ही अंगे अय् धातू लागून तयार होण्यापूर्वी चोर्, ताड्, अर्थ्, कथ्, भौ ही अंगे पूर्ववैदिकभाषांतील यङ् व यङ्लुक् यांचे संक्षेप होऊन आलेली आहेत. चोचोर्, ताताड्, आरर्थ्, चाकथ्, बोभौ यांचे संक्षेप चोर्, ताड्, अर्थ्, कथ् व भाव् ही अंगे आहेत. तात्पर्य, चुरादीचे गणगोत पूर्ववैदिक यङ् व यङ्लुक् यांच्याशी इतर धातूंप्रमाणेच लागलेले आढळते. इतर धातूंत व चुरादि धातूत भेद एवढाच की यङ्लुक् मधून संक्षेप होऊन आल्यावर चुरादि धातूंना अय् धातूचा जोड लागतो व इतर धातूंना कोणताच जोड लागत नाही. चुरादि धातूंना अय् हा जोड लागत असल्यामुळे त्या अय् सहित अंगांना पुन: यङ् किंवा यङ्लुक् होत नाही.
संस्कृत भाषेचा उलगडा
ना व नी, नु व नो यांच्या जोड्या आहेत. रुध्नामि-रुध्नीव: आणि साध्नोमि-साध्नुव: अशा जोड्या आहेत. पूर्ववैदिक काली रुध्नीमि रुध्नीव: रुध्नीम: प्रमाणेच रुध्नामि रुध्नाव: रुध्नाम: अशी निरनिराळ्या पोटभाषात रूपे असत. मिश्रण झाल्यावर एका भाषेतील रुध्नामि दुसऱ्या भाषेतील रुध्नीव: आणि तिसऱ्या भाषेतील रुध्नन्ति अशी तिन्ही भाषेतील रूपे मिश्र भाषेत आली. हाच न्याय साध्नोमि साध्नुव: या रूपांना किंवा तृणेह्मि तृंह्व: या रूपांना लावावा. निरनिराळ्या पूर्ववैदिक भाषांत निरनिराळीं यङ् व यङ्लुक यांची अंगें असत व त्या भाषांत अनुनासिक ग्रहणाचे प्रकार भिन्नभिन्न असत. त्यामुळे एकच धातू पूर्ववैदिक भाषांत निदान सोळा प्रकारांनी तरी चालत असे. म्हणजे निदान सोळा निरनिराळ्या पूर्ववैदिक पोटभाषा असत व एकच धातू त्या निरनिराळ्या तऱ्हांनी चालवीत. या विधानाला प्रत्यन्तर खुद्द पाणिनीचा धातुपाठ व अष्टघ्यायीच आहे. एकच धातू निरनिराळ्या गणांत खुद्द पाणिनीनेच गणिले आहेत. उदाहरणार्थ, स्तंभ्, स्तुंभ्, स्कंभ्, स्कुंभ्, स्कु इत्यादी धातू पाणिनीच्या मते श्नविकरण जसे आहेत तसेच श्नुविकरणही आहेत म्हणजे नवव्या गणातले जसे आहेत तसेच पाचव्या गणातले आहेत. दोन्ही गणात चालविले तरी अर्थात बदल नाही एकच धातू पाच पाच सहा सहा गणात असलेलाही धातू पाठात आहे उदाहरणार्थ, विद् धातू, विद्यते ४) वेत्ति, २) विन्ते, ७) विन्दते, १) विन्दति, ६) अशा पाच गणात हा धातू चालतो, अर्थात बिलकुल बदल नाही. धू धातू धवति १) धुनोति, ५) धुनाति ९)धुवति ६) धृनयति १०) अशा पाच गणात चालतो. अशी आणिक कितीतरी उदाहरणे देता येतील. एकच धातू अनेक गणात चालतो, याचा अर्थ इतकाच की एकच धातू पूर्ववैदिकभाषात अनेक तऱ्हांनी चालत असे. पुढे सर्व भाषा एक झाल्यावर मिश्र भाषेत सर्व भाषांतील थोडथोडा मासला आला.
तात्पर्य, रुधादिगण व क्रयादिगण यातील धातूही साधे नाहीत, इतर गणातल्याप्रमाणेच सनन्त, यङ्, यङ्लुक् इत्यादी मधून संक्षेप होऊन आलेले आहेत.