एकाच जुनाट भाषेत दोन्ही प्रकारची रूपे होत नसत. तर दोन निरनिराळ्या पूववैदिक जुनाट भाषांपैकी एकीत दृशि रूप होई व दुसरीत दृष्टी रूप होई. ति हे परस्मायक सर्वनाम आहे व इ हे आत्मनायक सर्वनाम आहे, हेही लक्षात धरले पाहिजे. आत्मनायक इ सर्वनाम कर्मणि लुङ् च्या प्रथमपुरुषाच्या एकवचनी येत असते. ते तेथे का येते याचाही उलगडा इ च्या या आत्मनायकत्वावरून होतो. अलंभि, आदायि, आर्ति, अगोपि, अगामि, अकारि या कर्मणि लुङ्च्या रूपात ही आत्मनायक इ सार्वत्रिक आहे. तात्पर्य गमि आणि गंति अशी प्रथमपुरुषाच्या एकवचनाचीं लटांत रूपे अतिजुनाट पूर्ववैदिकभाषेंत होत. धातू संबंधाने बोलावयाचे म्हणजे ही गमि व गंति रूपे पाणिनीच्या फार पूर्वींपासून योजण्याचा प्रघात होता. तोच प्रघात पाणिनीने साहजिकपणे उचलला. गमि आणि गन्ति या रूपांच्या धर्तीवर गछति, नयति, भवति इत्यादी अर्वाचीन रूपेही पाणिनि योजितो ते ठीकच आहे. गमि हे आत्मनायक एकच रूप आपणास माहीत आहे, बाकीची आठ रूपे कशी चालत त्याची कल्पना होत नाही. परंतु प्रथमपुरुषाचे अनेकवचन गमिरे असे होत असावे. गंति हे परस्मायक रूप ज्या गम् धातूचे जाहे त्याची बाकीची रूपे लटात येणेप्रमाणे चालत :
गम्मि गम्ब: गम्म:
गंसि गंध: गंध
गंति गंत: गमंति,
कृ धातू परस्मैपदीं असा चाले
कृमि कृव: कृम:
कृषि कृथ: कृथ
कृति कृत: क्रंति
भू परस्मैपदीं असा चाले
भूमि भूव: भूम:
भूसि भूथ: भूथ
भूति भूत: भ्वति
जन् परस्मैपदीं येणेप्रमाणे चाले
जन्मि जन्व: जन्म:
जंसि जंथ: जंथ
जंति जंत: जनंति
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
संस्कृत भाषेचा उलगडा