Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पाणिनीहून शहाणे म्हणविणारे वर्तमानकालीन जे आपण, पाणिनीहून निराळ्यादृष्टीने म्हणजे इतिहासदृष्टीने पहाणारे जे आपण व पाणिनीला मिळाली नव्हती ती साधने मिळविलेले जे आपण, त्या आपणाला तरी रानटी आर्यांचा मूळ धातू कोणता होता, भू होता की भव् होता, ते शोधिता येईल काय ? पाहू. आदौ एवढे लक्षात ठेविले पाहिजे की रानटी आर्यांना, बोलताना आपण अमुक धातूंची रूपे बोलत आहोत, ही कल्पना बहुश: बिलकुल नसावी. परंपरागत जी रूपे पुस्त दर पुस्त चालत आली ती ते व्यवहारात बोलत. रूपातील धातुत्वाची कल्पना व पृथक्कृती यांची उठाठेव ते प्राय: करीत नसावे. वडिलांचे भाषण वारंवार ऐकून, लहान अर्भके ज्याप्रमाणे वर्तमान, भूत व भविष्य रूपे क्रियापदांची बोलतात तीच गत रानटी आर्यांची असे. अशी जरी अर्भकांची व रानटी लोकांची सर्वसाधारण तऱ्हा असते, तत्रापि रानटी आर्यांतील एखाद्या कल्पक व्यक्तीने एखाद्या नव्या क्रियेला एखादा नवा शब्द सहज स्फूर्तीनें सादृश्यावरून निर्माण केला असेल तेव्हा त्या क्रिया शब्दाची वर्तमान, भूत, भविष्य इत्यादी कालीन रूपे इतर धातुरूपांच्या धर्तीवर बनवावी लागताना, धातूची पृथक्कल्पना ज्ञानत: जरी नव्हे तरी अज्ञानत: त्याच्या मनात येऊन जात असे यांत संशय नाही. याचा अर्थ असा की रानटी माणूस झाला तत्रापि धातूची जागृत जरी नव्हे तरी सुप्त कल्पना त्याच्या मनात असते. रानटी माणसाच्या मनातील ही धांतुत्वाची सुप्त कल्पना त्याच्या पश्चात हजारो वर्षांनी झालेल्या भाषा संशोधकांनी जाणावयाची कशी? रानटी मनुष्य आपल्या भाषेचा जर काही मागमूस ठेवील तरच रानटी मनुष्याच्या भाषेतील सुप्त कल्पना संशोधकाला गवसण्याचा संभव आहे. असा मागमूस रानटी आर्यांनी किंचित् ठेविलेला आहे. रानटी आर्यांचे वंशज जे वैदिक ऋषी त्यांची गाणी ज्यास ऋग्वेद म्हणतात ती आपणाला उपलब्ध आहेत व रानटी आर्यांचे वंशज जे वर्तमानकालीन आपण ब्राह्मणादी चातुर्वर्णिक लोक त्यांच्या प्राकृत भाषा सध्या प्रचलित आहेत. वेदभाषेत व आपल्या सध्याच्या प्राकृत भाषेत रानटी आर्यांच्या भाषांचे मागमूस राहिलेले आहेत. वेद भाषेत व पाणिनीय भाषेत बभूव, बोभोमि, बोभूति, बोभवीमि, बुभूषति, अबीभवत् अशी रूपे येतात. प्रत्यय व उपसर्ग काढून टाकले म्हणजे बभू, बुभू, बोभू, बोभो व बोभवी अशी पाच अंगे शिल्लक रहातात आणि एक बोभौ असे अंग अभ्यस्ताची वृद्धी होऊन होत असे मिळून सहा अंगे झाली. या सहातून मूळ धातू कोणता? भू, भो, भौ, का भवी? अत्यंत जुनाट जो प्रयोग असेल त्यात जे रूप येईल ते जुनाट धरण्यास हरकत नाही. पाणिनी बोभूति या रूपाचे निपातन करून असे दाखवितो की बोभोति या रूपाहून बोभूति हे रूप जुनाट व पाणिनीच्या मते आडनीड आहे. बोभूति या रूपात भू धातू आहे. सबब मूळधातु भू धरावा असे मत करून घेणे न्याय्य दिसते.

५४ (१) भ्वादि धातू. अन्त्य स्वर व उपान्त्य ऱ्हस्व स्वर यांचा गुण होतो म्हणून पाणिनी सांगतो. एकाएकी गुण काय म्हणून होतो? अविकरण भाषेत गुण वगैरे काही विकार न होता प्रत्यय लागतात; परंतु सविकरण भाषेत गुण होतो. हा असा भेद का? याचे कारण असे आहे की भवति, नयति, सेधति हे वस्तुत: यङलुक् चे अवशेष आहेत. पूर्ववैदिकभाषेत अशी रूपे असत : बोभो, नेने, सेसेध् इत्यादी. पैकी अभ्यासाचा लोप होऊन पाणिनीय भाषेत भो, ने, सेघ् अशी अवशिष्ट रूपे राहिली, त्या अवशेष धातूंना प्रत्यय लागून पाणिनीकालीन रूपे बनत. मूळ धातू भू, नौ व सिध् होते हे पाणिनी जाणत होता. परंतु यांची भो, ने सेध् अशी सगुण रूपे का होतात, सन्निपात ज्वर झाल्याप्रमाणे एकदम एकाएकी ऊ चा ओ व इ चा ए का होतो, याचे कारण त्याला सांगता येईना. सबब, भ्वादिवर्गातील धातूंचे अन्त्य स्वर व उपान्त्य ऱ्हस्व स्वर यांना प्रत्ययांपूर्वी गुण होतो म्हणजे ऊ चा ओ होतो व इ चा ए होतो असे तो सांगतो. म्हणजे जे होते ते होते म्हणून सांगतो आणि गप्प बसतो. कारण सांगत नाही. कारण वर दिले ते आहे. पूर्ववैदिक भाषेत धातूंची द्विरुक्ती करून फार बोलत. कर् कर् मि, सर् सर् मि, भव् भव् मि असा द्विरुक्तीचा प्रकार इतर रानटी लोकातल्याप्रमाणे रानटी आर्यांच्याही भाषेत फार असे. या द्विरुक्तीचा पुढे कालांतराने संक्षेप होऊन भव् भव् मि चे भो भो मि झाले नंतर प्रथम भो चा लोप होऊन नुसते भो असे रूप राहिले. या भो ला आमि, अति, असि प्रत्यय लागून भवामि, भवति, भवति, ही रूपे झाली. पाणिनी गुण म्हणून ज्याला म्हणतो त्याची ही अशी परंपरा आहे; १) भव् भव्, २) भो भो, ३) भो , येथे प्रश्न अस उद्भवतो की रानटी आर्यांच्या भाषेत मूळ धातू भव् होता, की भव् होता, की भो होता, की भू होता? पाणिनी मूळ धातू भू धरतो तो काय म्हणून धरतो? अभूत्, अभवत्, भूत भूति, भव, भाव अशी रूपे पाणिनीच्या पुढे होती. पैकी भू हे रूप त्याने मूळ धरिले आणि त्या भू ला काय विकार झाले म्हणजे अभवत्, भव, भाव, अभूत् भूत ही रूपे बनतात ते त्याने सांगितले. त्याचे मूळ धातू भव् धरिला असता तरी चालले असते व त्यापासून अभूत्, भूत, भव, भाव, वगैरे रूपे कशी निघाली तेही त्याला सांगता आले असते. भू मूळ धातू धरून अन्त्य ऊ चा गुण होऊन भव रूप बनते हे जसे सांगता आले, तसेच भव् मूळ धातू धरून अन्त्य अव् चे गुणमूळ होऊन अभृत्, भूत्, भूति, ही रूपे होतात हेही सांगता आले असते. ऊ च्या ओ होण्याला जसा गुण हा पारिभाषिक शब्द टांकशाळेतून निघाला, तसा च ओ च्या ऊ होण्याला गुणमूळ वगैरे पारिभाषिक शब्द निघण्यास अडचण नव्हती. तात्पर्य पाणिनीने मूळ धातू भू धरला याला कारण केवळ पाणिनीची इच्छा. मूळ रानटी आर्य मूळ धातू कोणता समजत होते, हे त्याने शोधले नाही.

५३ (१) साधे धातू स्पष्टीकरण : वर सांगितले की पूर्ववैदिक भाषात अशी एक भाषा होती की, तीत आदी अंती किंवा मधी काही एक विकार न होता धातूंना पुरुषवाचक सर्वनामे लागत. पाणिनीय धातुपाठात जो धातूसमूह संकलित केला आहे त्यापैकी काही धातू अविकारी किंवा अविकरण धातुवर्गात मूलत: पडतात. उदाहरणार्थ, अद् धातू घ्या. अद्मि, अद्व:, अद्म: अशी या धातूची अविकरण रूपे त्या भाषेत होत. शक् धातू त्या अविकरण भाषेत शक्मि, शक्षि, शक्ति असा चाले. पुढे पाणिनीय काळ आला. त्याकाळी शक् धातूची शक्नोमि, शक्नूव:, शक्नु : व शक्यांमि, शक्याव:, शक्याम: अशी रूपे बोलण्यात असलेली आढळली व शक्मि, शक्ति ही रूपे अस्तंगत होऊन गेली किंवा वेदभाषेत अवशिष्ट असलेली दिसली. वेदभाषेत अशकम्, हनति, दाति, अकरम्, मरति, अदरत्, अरुहत् ही रूपे असलेली पाहून व स्वकालीन भाषेत ती नाहीत ते पाहून बहुलं छंदसि असा पाडा पाणिनी जेथे तेथे वाचू लागला. एका पूर्ववैदिक भाषेत विकरणाशिवाय धातू चालत ही बाब पाणिनीच्या लक्षात आली नाही. साध्या धातूंच्या संबंधाने पाणिनीच्या लक्षात न आलेली ही पहिली बाब. पाणिनीच्या लक्षात न आलेली एतत्संबंधाने दुसरी बाब म्हणजे कित्येक तद्भव धातूंची गणना तो साध्या धातूंत करतो. उदाहरणार्थ, जुहोत्यादी वर्गातील सर्व धातू, दिवादिवर्गातील सर्व धातू, भ्वादिवर्गातील बहुतेक सर्व धातू , अदादिवर्गातील काही धातू, तुदादि वर्गातील काही धातू, स्वादिवर्गातील धातू, क्रयादिवर्गातील धातू, तनादिवर्गातील धातू व चुरादिवर्गातील धातू मूलत: तद्भव असून त्यांची गणना पाणिनीने साध्या धातूंत केली आहे. हे धातू मूलत: काय आहेत हेच मुळी त्याला समजले नाही. पाणिनी तिसऱ्या एका बाबीसंबंधाने जो भ्रममाण झाला ती अशी की स्वादि तनादि, रुधादि व क्रयादि धातू मूलत: काय आहेत याचा उमज त्याला पडला नाही. अशा तीन स्थली पृथक्करणाच्या कामीं पाणिनीच्या कृतीत व्यंग पडले आहे. त्यामुळे धातूंचे त्याने केलेले वर्गीकरण इतिहासदृष्ट्या अत्यंत सदोष निपजले आहे. संस्कृत भाषेची जी स्थिती त्याच्याकाळी विद्यमान होती त्या स्थितीच्या दृष्टीने, इतिहासाकडे लक्ष न देता, त्याने केले ते वर्गीकरण योग्यच आहे. पाणिनीने प्रथम धातूंचे दोन मोठे वर्ग केले १) सर्वधातू व २) अर्धधातू. विकरण ज्यांना होते ते सर्वधातू व होत नाही ते अर्धधातू. एकच धातू कित्येक प्रत्यय पुढे असता सर्वधातू होतो व कित्येक प्रत्यय पुढे असता अर्धधातू होतो. उदाहरणार्थ, साध् धातू घेऊ. नुवीकरणारासह साघ्नु या जोडाला पाणिनी सगळा ऊर्फ सर्वधातू म्हणतो व नुसत्या साध् ला अर्धधातू म्हणतो. सर्वेण अनुषंगिक ह्न विकरणेन वर्तमान: धातु: सर्वधातु: असा पाणिनीचा समज असलेला स्पष्ट दिसतो. जे प्रत्यय पुढे असता धातू सर्वधातूचे रूप धारण करतो त्या प्रत्ययांना सार्वधातुक प्रत्यय ही संज्ञा पाणिनीने दिली आणि ज्या प्रत्ययांच्या पाठीमागे धातू जसाचा तसा रहातो त्यांना अर्धधातुक प्रत्यय ही संज्ञा दिली. सार्वधातुक आणि आर्धघातुक प्रत्यय बनविण्याचा खटाटोप पाणिनीला जो करावा लागला त्याचे कारण साधे धातू व तद्भव धातू यांच्यातील भेद काय तो त्याला कळला नाही. जुहोत्यादि धातू अभ्यस्त धातू आहेत, अदादि गणातील चकास्, जक्ष्, दरिद्रा इत्यादी अनेक धातूही अभ्यस्त आहेत, दिवादि धातू अभ्यस्त आहेत व भ्वादिवर्गातील सर्व इगन्त धातू अभ्यस्त आहेत, हे पाणिनीच्या लक्षात न आल्याकारणाने नी तील ई चा गुण होतो भू तील ऊ चा गुण होतो वगैरे कार्य त्याला सांगावी लागली दिवादि धातूंना य् विकरण होते, इष् चे इच्छ् होते, असे जेथे जेथे अडचण उभी राहिली तेथे तेथे, नवे नवे कार्य पाणिनीला सांगावे लागले. हन् चे जहि होतें, चकास् चे चकाद्धि होते, अस् चे एधि होते, अशी शेंकडो अडचणीची स्थले पाणिनीला भेटली व त्यांची व्यवस्था असे असे होते, या सांगण्यापलीकडे, त्याच्या हातून झाली नाही आणि तो ज्या सरणीने चालला होता त्या सरणीने ती होण्यासारखीही नव्हती. जहि, चक्राद्धि, एधि, ही रूपे अभ्यस्त धातूंची आहेत, या बाबीचे स्वप्नही पाणिनीला नव्हते. नयामि, भवामि, जक्षिमि, दौव्यामि, ही देखील रूपे अभ्यस्त धातूंची आहेत, हे तर पाणिनीच्या स्वप्नाच्याही आटोक्याच्या बाहेरचे होते. तसेच वन्दामि, वणद्मि, तृणेह्मि, अश्नामि व क्षुभ्नीम: ही रूपे एकाच वर्गातील आहेत, हे त्यास कोणी सांगितले असते तर तो आश्चर्याने चकित झाला असता. असे हे जे पाणिनीलाही भुलविणारे भ्वादि, अहादि, जुहोत्यादि दशवर्गातील धातू ते मूलत: काय आहेत व कोणत्या पूर्ववैदिक धातूंचे अवशेष आहेत याचे दर्शन खाली करून दाखवितो.

गंधो गंधक आमोदे लेशे संबंधगर्वयोरिति विश्वः ।
पैकीं आमोद, लेश, संबंध हे तीन अर्थ मराठींत प्रचलित आहेत. (भा. इ. १८३६)

गंध (अल्पार्थक) [अल्पाख्यायां (५-४-१३६ पाणिनि) गंधः = गंध ] त्याला अक्षराचा गंध नाहीं म्हणजे अक्षराचें अल्प ज्ञान नाहीं. हा शब्द पाणिनीय कालापासूनचा आहे.

गधडा [गेहेधृष्टः bold at home, coward = गधडा ] a boastful, useless child.

गंधवाटी [गंधवर्ति = गंधवट्टी = गंधवाटी] (भा. इ. १८३२)

गपकन् १ [गृभ clasp = गपकन् ] graspingly.

-२ [ गृभ् = गप्] गपकन, धरणें.

गफलत [ग्लपतिः = गळपत = गपळत, गफलत ] फसवणूक, चूक.

गबर [ गव्हर = गब्भर ( पाली ) = गब्बर = गबर] (भा. इ. १८३२ )

गबरू [ गर्भरूपक (पोर, मुलगा ) = गबरू ] ए गबरू ! कोठें गेला होतास, येथें लेका ! पोरा ! या अर्थी गबरू शब्द योजलेला आहे.

गबाळ [ गोबाल (गाईचे केस) = गबाळ ]

गम् [ अगमत् = गमणें. अगछत् = गचणें.] ( भा. इ. १८३४)

गम १ [गम ( अविचार ) = गम ] (भा. इ. १८३४)

-२ [ आ + गम् ( आागमेः क्षमायां )] आगमयस्व तावत् = गम तर खा थोडी. गम म्हणजे क्षमा. मी थोडीशी गम खाल्ली म्हणजे क्षमा केली.

गमणें [ गम्ब् = गम्बति. गम्बन = गम्मण = गमणें ] वेळ घालवणें. (भा. इ. १८३४)

गमे [ गम्यते = गमे (कर्मणि ) ] गमे म्ह० समजे. मज गमे = में गम्यते. (भा. इ. १८३४)

गयावया - गयावया हा शब्द प्राकृत गअवइ शब्दापासून निघाला आहे. गयावया ह्या शब्दाचा मराठींत अर्थ निराश्रित असा आहे. प्राकृत गअवइ शब्दाचें संस्कृत रूप गतपतिका आहे. ज्या स्त्रीचा नवरा गेला आहे तिला प्राकृतांत गअवइ म्हणत. गतपतिकेप्रमाणें दिसणार्‍या व वावरणार्‍या निराश्रित माणसाच्या कृतीला अनुलक्षून गयावया हा शब्द योजतात. (स. मं. श्रावण १८२६)

गयावळ [ गयापालकः = गयावळ.
प्रयागपालकं: = प्रयागवळ. ]

१) साधे धातू, २) दुहेरी जोड धातू, ३) अभ्यस्त धातू, ४) तिहेरी जोड धातू व ५) या सर्वांपासून होणारे परोक्ष धातू, असे धातूंचे पांच वर्ग झाले. आता आणिक तीन प्रकारच्या जोडधातूंचा निर्देश करतो. परोक्ष धातूप्रमाणेच हे तीन जोड धातू पहिल्या चार वर्गांपासून निघतात. यांच्या निघण्याच्या पद्धती अशा : १) एय् धातू लागून होणारा जोडधातू किंवा या धातू लागून होणारा जोडधातू आणि २) यास् धातू लागून होणारा जोडधातू. या तिन्ही पद्धतीच्या जोडधातूस आशंसक धातू हे नाव देणे योग्य दिसते.

६ आशंसक धातू
(१)
एय्


४ तिहेरी धातू

१०           रमयां           रमयांकर्मि        रमयामकरम्
               रमयां           रमयांचकाररमयांचकार
               पावयां          पावयांकर्मि पावयामकरम्
               पावयां          पावयांचकार पावयांचकार
(वि) विदां (वि) विदांकर्मि (वि) विदामकरम्
(वि) विदां (वि) विदांचकार (वि) विदांचकार

११ विविदिष्            विविदिषामि        अविविदिषम्
     जुहूष्                जुहूषामि            अजुहूषम्
     विवक्ष्               विवक्षामि            अविवक्षम्
प्रत्यक्ष धातूंना उपसर्ग नाही व परोक्ष धातूंना अ हा उपसर्ग आहे. या अ उपसर्गाचा अर्थ दूरचा, परोक्ष असा आहे. हन्मि हे रूप मारण्याची क्रिया. प्रत्यक्ष करणारा मी असा अर्थ दाखविते आणि अहनम् हे रूप मारण्याची क्रिया परोक्ष करणारा मी असा अर्थ दाखविते. रानटी आर्य डोळ्यासमोर होणाऱ्या क्रियेला प्रत्यक्ष म्हणे व दूरच्या म्हणजे डोळ्याआड होणाऱ्या क्रियेला परोक्ष म्हणे. म्हणजे अगदी प्रथमावस्थेत हन्मि व अहनम् हीं रूपे दिशादर्शक असत, म्हणजे स्थलदर्शक असत. येथे डोळ्यासमोर होणारी माझ्या हातूनची क्रिया हन्मि रूप दाखवी आणि तेथे दूर तुमच्या डोळ्याआड होणारी माझ्या हातूनची क्रिया अहनम् हे रूप दाखवी. प्रथमावस्थेंत हन्मि व अहनम् या रूपात कालकल्पना नव्हती. पुढे ज्याप्रमाणे दिगपेक्षेने अहनम् हे रूप परोक्ष क्रिया दाखवी, त्याप्रमाणेच अतिदेशाने अहनम् हे रूप काल, पर्वा शंभर वर्षांपूर्वीच्या क्रियेचेही दर्शक ऊर्फ कालदर्शक झाले. म्हणजे भूतार्थकत्व हा मूळचा अर्थ अहनम् या रूपाचा नव्हता, भूतार्थकत्व मागाहून अतिदेशाने त्या रूपाला आलेले आहे. तात्पर्य, अम् या सर्वनामाचा व भूतार्थकत्वाचा काही एक संबंध नाही. हे लक्षात बाळगून स: अद्य ममार किंवा अमरत् या वैदिक वाक्यांचा अर्थ लावावयाचा आहे. पाणिनी सांगतो की वैदिकभाषेत लुङ्, लङ् व लिट् यांचा वर्तमानकाळीही उपयोग होतो व भुतकाळीही होतो. पैकी स: अद्य अम रत् या वैदिक वाक्याचा अर्थ, तो आज दूरच्या ठिकाणी मरतो, असा आहे व स: अद्य मरति या वैदिक वाक्याचा अर्थ, तो आज येथे आपल्या समक्ष मरतो, असा आहे. अद्य ममार, म्हणजे आज दूर ठिकाणी मरतो, असा अर्थ आहे आणि त्द्य: ममार, म्हणजे दूर कालीं म्हणजे काळ मरतो, असा अर्थ आहे. अमरत् व ममार ही रूपे मूळची भूतार्थक नसल्याकारणाने, अहं वेद = अहं वेद्मि ही रूपे वर्तमानार्थक का ते स्पष्ट होते. (वि) वेद हे मूळचे वर्तमानक्रिया म्हणजे प्रत्यक्ष क्रिया दाखविणारेच रूप होते. तसेच वि चा लोप होऊन वेदपूर्वकालीन भाषांतून वैदिक भाषेत व पाणिनीय भाषेत अवशेष म्हणून राहिलेले आहे. इतकेच की अहं वेद व अहं वेद्मि या दोन वाक्यांत प्रथमारंभी किंचित् अर्थभेद होता. अहं वेद्मि म्हणजे मी प्रत्यक्ष जाणतो असा अर्थ होता व अहं वेद म्हणजे मी परोक्ष जाणतो असा अर्थ होता. प्रत्यक्ष व परोक्ष या अर्थांचा स्थलावरून कालावर अतिदेश कालांतराने झाला.

५ परोक्ष धातू

१ साधे धातू

१     मूळधातू             प्रत्यक्ष             परोक्ष
       अद्                  अद्मि               आदम्
       तुद्                   तुदामि             अतुदम्
       हन्                   हन्मि               अहनम्
       स्था                   स्थामि             अस्थाम्

२ दुहेरी धातू

२    तोदय्              तोदयामि             अतोदयम्
३    तारिष्              तारिषम्              अतारिषम्
      तोदिष्              तोदिषम्             अतोदिषम्
      नैष् ह्न नेष्         नैषामि ह्न नेषामि   अनैषम्
४    हन्तार्              हन्तास्मि             अहन्तासम्
५    हनिष्य्              हनिष्यामि          अहनिष्यम्

३ अभ्यस्त धातू
६       जुहो           जुहोमि          अजुहवम्
७       जूहव्          जूहवामि       अजूहवम्
          चीकथ्       चौकथामि      अचीकथम्
          वीवद्         वीवदामि      अवीवदम्
८        जोहो         जोहोमि        अजोहवम्
           वावद्        वावद्मि        अवावदम्
           चर्कर्        चर्कर्मि        अचर्करम्
९        आह्         आह             आह
           जुहव्       जुहव            जुहव
           जुहाव       जुहाव          जुहाव
          विवेद्        (वि)             वेद विवेद

४) तिहेरी जोडधातू

१ रमय् + आम् + कर् + मि = रमयांकर्मि
रमय् + आम् + चकर् + अ = रमयांचकर
पावय् + आम् + कर् + मि = पावयांकर्मि
पावय् + आम् + चकार् + अ = पावयांचकार
कचोरय् + आम् + कर् + मि = चोरयांकर्मि
चोरय् + आम् + चकार् + अ = चोरयांचकार
(वि) विद् + आम् + चकार् + अ = (वि) विदांचकार

२ विविद् + इष् + आमि = विविदिषामि
जुहू + ष् + आमि = जुहुषामि
विवह् + ष् + आमि = विवक्षामि

१) साधे धातू. २) दुहेरी धातू, ३) अभ्यस्त धातू व ४) तिहेरी धातू, यांना एक उपसर्ग लावून एका प्रकारचे जोडधातू पूर्ववैदिक भाषांत बनवीत असत. या उपसर्गी जोडधातूंना परोक्ष ही संज्ञा नामी शोभते. परोक्ष या संज्ञेच्या अपेक्षेनें बाकीच्या धातूंना अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष किंवा समीप किंवा वर्तमान या संज्ञा अस्तित्वात येतात. परोक्ष धातू येणेप्रमाणे बनत : १) साध्या, दुहेरी, अभ्यस्त किंवा तिहेरी धातूच्या मागे अ उपसर्ग लावण्याची एक पद्धत. २) पाचव्या प्रकारच्या अभ्यस्त धातूंची प्रत्यक्ष रूपेच परोक्ष समजत. प्रत्यक्ष अर्थ कोठे घ्यावयाचा व परोक्ष अर्थ कोठे घ्यावयाचा ते केवळ संदर्भावरून ठरे. उदाहरणार्थ, राम आह: या वाक्याचा राम: ब्रवीति असा प्रत्यक्ष अर्थ होतो किंवा राम: अब्रवीत्, अस परोक्ष अर्थही होतो. कोणता अर्थ विवक्षित आहे ते केवळ संदर्भावरून कळे, परोक्ष धातू व त्यांची रूपे येणेप्रमाणे साधत. तुलनेकरता प्रत्यक्ष रूपेही देतो :

३ अभ्यस्त धातू

१ जुहो + मि = जुहोमि

२ जुहव् + आमि = जुहवामि
ची कथ् + आमि = चीकथामि
वौवद् + आमि = वीवदामि

३ जुहू + मि = जुहूमि
विवद् + आमि = विवदामि
विवह् + मि = विवह्मी

४ जोहो + मि = जोहामि
वावद् + मि = वावद्मि
चर्कंर् + मि = चर्कर्मि



साध्या धातूंचा पहिला वर्ग, दुहेरी जोडधातूंचा दुसरा वर्ग व अभ्यस्त धातूंचा तिसरा वर्ग, या तीन वर्गांहून निराळा असा चवथा एक वर्ग असे. त्याला तिहेरी जोडधातूंचा वर्ग हे अभिधान उत्तम शोभेल. तिहेरी जोड धातू दोन पद्धतीनी होत. १) पहिल्या पद्धतीत णिच् नामक दुहेरी जोडधातूला कृ, अस् किंवा भू धातू चिकटवीत व आम् आगम करीत. २) दुसऱ्या पद्धतीत तृतीयाक चिन्हित अभ्यस्त धातूला इष् धातू जोडून तिहेरी धातू साधीत.

गंकार (गकाराची बाधा ) [गमकार (अविचार)=गंकार] गकाराची बाधा म्हणजे अविचाराची बाधा. गकाराची बाधा म्ह० गर्वाची बाधा म्हणून समजतात, परंतु तें निराधार आहे. ( भा. इ. १८३४)

गंगावण [ ङू नादे ] ( गोंगवणें पहा)

गचकन् [ ( गम्) गच्छ् १ गतौ ] ( धातुकोश-गच १ पहा)

गच्च [ गृध्य = गज्झ = गज्ज = गच्च. गर्धः अभिलाषातिशयः ] गच्च म्हणजे सडकून. ( भा. इ. १८३४)

गज (माप) [ गजः ( दोन हात लांबीचें माप) = गज ] माप.

गजबजाट [ गज् + बद्] (धातुकोश-गजबज पहा)

गजर [ गज् = नाद करणें, ह्या धातूपासून गजर = महाध्वनि, हा शब्द निघाला आहे. अर्थात् हा शब्द फारशी नाहीं. ] (स. मं.)

गंजी [ गंजा (केशगृहं) = गंजी ] गवताची गंजी म्ह० गवत सांठवून ठेवण्याची इमारत.

गट १ [ ग्रथ् १० बंधने ] ( धातुकोश गट १ पहा)

-२ [ग्रंथ: = गट. ग्रंथ: class, arrangment.

गटकन् गटदिनि [ चटकर पहा]

गटगट, गटागटा [ गृ to swallow = गरगर = गटगट, गट्गट्, गटागटा ] पाणी गटगटा पितो.

गटार (गत्वर transient = गटार transient ]
गटार बातमी = उडत बातमी flying news.

गट्गट् [ गटागटा पहा ]

गट्टी [ ग्रंथि ] ( धातुकोश-गट १ पहा)

गंठिसोड [ ग्रंथिचुट्, ग्रंथिछुट् = गंठिसोड] cut-purse, pick pocket.

गडदी [गुड ६ रक्षायाम्, गुड +धि = गुडदी ] ( धा. सा. श. )

गंडस्थळ [ गंडस्थल = गंडस्थळ ] (स. मं. )

गंडा [गंडक ( अडथळा ) = गंडा]

गडू [ गडुः = गडू = घटकः = घटुकः ]

गंडेरी [ इक्षु रसालो गंडीरी (हेमचंद्र-निघंटुशेष ) ] ( ग्रंथमाला)

गड्डा [ (स्त्री.) गर्ता = गड्डा (पु.) ] (भा. इ. १८३२)

गढूळ १ [गडुल = गढूळ ]

-२ [गोधूल = गढूळ ] dusty.

गणेरी [ गणकारिका = गणेरी ] गणेरीला थोरली ऐरण म्हणतात.

गताड [ गर्तातटः = गताड ] खोल खड्डा.

गदगदा [ गदगदं = गदगदा ( हसतो ) ]

गंध - गंध या शब्दाचा मराठींत लेशमात्र असा एक अर्थ प्रसिद्ध आहे. तो च अर्थ पाणिनीच्या कालीं हि होता. तत्संबंधानें पाणिनीनें अल्पाख्यायाम् ( ५-४-१३६) असें सूत्र रचिलें. सूपगंधि भोजनं, घृतगंधि भोजनं, घृताचा लेशमात्र ज्यांत आहे तें भोजन.