Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

मध्यमपुरुषाच्या एकवचनी सकृत् चमत्कारिक दिसणारी रूपे म्हणजे गृहाण, स्तभान, अशान, बधान, मुषाण ही होत गृहणहि गृहणीतात् अशीही रूपे होतात. म्हणजे गृह्णा गृह्णी, या अंगांनाही तात् ही सर्वनामे लागतात. परंतु भूपासून जसे भव रूप होते तसे ग्रह्पासून कोणते रूप होते? ना हे क्रयादि धातूंचे विकरण धरले आहे. ग्रहादि धातूंना हे ना विकरण असून शिवाय आन् असेही वैकल्पिक विकरण असे. गृह्णा असे जसे अंग होते तसे गृहाण्, मुषाण अशी अंगे होत. या गृहाण् अंगाला त्व सर्वनाम लागून गृहाण + त्व=गृहाण+स्=गृहाण्+ह=गृहाण्+अ=गृहाण. गृहाण म्हणजे हा तू घे. या गृहाण रूपाची उपपत्ती लावताना आन् विकरण होणारे काही धातू होते ही अभूतपूर्व बाब उघडकीस आली. चकर् +तह्=चकर्+थ= चकर्थ; म्हणजे तू करतोस. येणेप्रमाणे मध्यम पुरुषैकवचनी अ, इ, त्व्, तह् ही सर्वनामे रचनेत येतात.

मध्यमपुरुषद्विवचनात तू व तो किंवा हा या अर्थाचीं सर्वनामे जोडून द्विवचन साधते. पा+तह्+स्=पा +थ +स्= पाथस्. तह् म्हणजे तू व स् म्हणजे तो. पाथस् म्हणजे तू व तो  असे दोघे रक्षिता. भव् + अ + तह् + स् = भवथस्; भवथस् म्हणजे हा तू व तो असे दोघे होता. भव्+ अ + इ+ तह+अ+इ = भवे+थे= भवेथे म्हणजे हा तू खास व हा खास असे दोघे स्वत: होता. ब्रू+अ+अ+तह्+अ+इ= ब्रुवाथे; म्हणजे हा तू खास व हा खास असे दोघे स्वत: बोलता. अ+भव् + अ+ त्व्+ अम् =अभवतम्= अभवतम्; म्हणजे हा तू व तो असे दोघे झाला. अ+भव्+अ+इ+ तह्+अ+अम्= अभवे+थाम्=अभवेथाम्; म्हणजे हा तू खास व तो खास असे दोघे स्वत: झाला. जग्म्+अ+तह्+उ+स्=जग्मथुस्; म्हणजे हा तू व तो तो असे दोघे जाता.

जग्म्+अ+अ+तह्+अ+इ = जग्माथे; म्हणजे हा तू खास व हा खास असे दोघे स्वत: जाता इतर लकारांतील मध्यम पुरुष द्विवचनाची रूपे याच धर्तीने सहज उकलता येतील. द्विवचनरचनेत तह्, अ, इ, उ, अम्, स् या सर्वनामांचा उपयोग होतो.

गावडी १ [ गोवधूटी ( a bull's wife) = गावडी ]

-२ [गौर्गडिः = गावडी ] lazy cow. a young lazy ox.

गांवडें, गांवढें [ ग्रामटिका = गांवडें-ढें ] लहान गांव.

गावँढ (ढा-ढी-ढें) [ ग्रामड (ग्रामषंड) = गावँढ ] ग्रामड असा शब्द पाणिनीयांत आहे. ( भा. इ. १८३६)

गांवढें [ ग्रामटिका = गांवडी = गांवढें. ग्रामटिकिकः = गांवढ्या ]

गावण [गवीनं = गावण (गुरांची)] गवत खाण्याची जागा.

गावुंडा १ [ ग्रामकूट: ] ( गाउंडा पहा).

-२ [ ग्रामषंड: = गावुंडा]

गावोगाव [गामओ गामो = ग्रामात् ग्रामः = गावोगाव. गावो ही पंचमी आहे व गाव प्रथमा किंवा द्वितीया आहे. घरोघर, दारोदार इत्यादि. ग्राम व ग्राम असा समास नाहीं. ]

गाहाण [अवगाहनं] (गहाण पहा)

गाळण [ग्लै १ हर्षक्षये. ग्लानि = गाळण (स्त्री). ग्लै = ग्रै =गेरे = घेरी (अत्यंत ग्लान होणें) ] (धा. सा. श.)

गाळणमाळण [ग्लानि: म्लानिः = गाळणमाळण ]

गाळा [ अगार: = ( अ लोप ) गाळा ] a set of rooms more long than short.

गाळी [ गर्‍हिका = गल्हिका = गाळ्ही = गाळी (निंदा)] (भा. इ. १८३२ )

गिट्टा [ गृष्टिः = गिट्टा ] आर्य गृष्टे (उत्तररामचरित)

गिधाड [ गृध्राढ्यः ] (उंटाड पहा )

गिरणी १ [ गृहिणी = गिरणी ] वृद्धलोक स्वस्त्रीला उद्देशून विनोदानें म्हणतात, आमची गिरणी आतां थकली. येथें गिरणी म्हणजे स्त्री, गृहिणी. दळण्याची गिरणी उच्चारसाम्यामुळें ध्यानांत येऊन चमत्कृति वाटते इतकेंच.

-२ [ गीर्णिः ( swallowing ) = गिरणी ]
तोंडाची गिरणी चालली आहे contiuning eating.

गिरा [ ग्रहः ( ग्रहणं ) = गिरा ] गिरा आला म्हणजे ग्रहण आलें.

गिराशी [ गिर्याश्रयी = गिराशी ] डोंगराच्या आश्रयानें रहाणारा.

गिर्‍हाईक [ क्रायक purchaser =किराईक=गिन्हाईक ] a purchaser.

गुज [ गुह्य = गुझ्झ = गुज, हितगुज ] (स. मं.)

गुंठाळणें [ घोंटाळणें पहा]

६४ मध्यमपुरुषाच्या एकवचनाची रचना त्वं या अर्थाचें सर्वनाम व तो किंवा हा या अर्थाची सर्वनामे मिळून होत्ये. अह् या उत्तमपुरुषसर्वनामाला त् हे सर्वनाम उपसर्ग म्हणून लागून त्वह् व हम् या उत्तमपुरुषसर्वनामाला त् हे जोड सर्वनाम उपसर्ग म्हणून लागून त् +हम् =त् + म्= त्व् अशी मध्यमपुरुषाची दोन सर्वनामे होतात. त् व स् ही सर्वनामे परस्पर विनिमेय असल्यामुळे त्व् स् चे किंवा स्व् चे रूप धारण करतो. अद् +त्व्+इ=अद्+स्+इ = अत्सि. अत्सि म्हणजे हा तू खातोस. अ+अद्+अ+त्व=आद्+अ+म्= आदस्; आदस् म्हणजे हा तू खाता झालास. अबिभर्+त्व् = अबिभर्+स्=अबिभर्; अबिभर् म्हणजे तू भरता झालास. भव्+अ+व+इ=भव +स्+इ=भवसि; भवसि म्हणजे हा हा तू होतोस. भव+अ+त्व्+ अ+इ=भव +स्+ए=भवसे; भवसे म्हणजे हा हा तू खास स्वत: होतोस. अ+भव्+अ+तह्+अ+अस्=भव्+अथ्+आस्= अभवथास्; म्हणजे हा तो तू खास स्वत: होता झालास. अब्रू+त्व+अ+अस्=अब्रू +थ्+आस्=अब्रूथास् म्हणजे हा तो तू स्वत: बोलात झालास. भव्+त्व्+अ=भव्+स्+अ=भव्+ह=भव् +अ=भव; भव म्हणजे हा तू हो. भव्+अ+त्व्+अ+अत् = भव+त+अत्=भवतात्; म्हणजे हा हा तो तू हो. कुणु+त्व्+अ+अत्= कृणु+त्+आत्=कृणुतात; म्हणजे हा तो तू कर. कृणु+त्व्+इ=कृणु+स्+इ=कृणु+ह्+इ= कृणुहि; म्हणजे हा तू कर. श्रुणु+त्+त्व्+इ=श्रुणु+ध+इ=श्रुणुधि; म्हणजे तो हा तू ऐक. भव्+अ+त्व्+अ=भव+स्व=भवस्व म्हणजे हा हा तू हो. ब्रू+त्व्+अ=ब्रू+स्व=ब्रूष्व; म्हणजे हा तू बोल.

उत्तमपुरुष बहुवचनह्न त्रिवचनाच्या साधनिकेंत ह्म, अ, व, स् किंवा ह्म, अस, व इ अशी सर्वनामे येतात. ह्म म्हणजे मी, अ म्हणजे हा व स् ऊर्फ ह् म्हणजे तो, मिळून मी, हा व तो असे आम्ही तिघे. अद्म = अद् + हम् + अ+स् =अद् +म्+अ+स्=अद्मस् अद्मस् म्हणजे मी, हा व तो असे तिघे खातो. भवामस् = भव् +अ+अ+ह्म+ अस् = भवामस्. भवामस् म्हणजे हा, हा, मी व हा असे चौघे होतो. भवामसि= भव+अ+अ+ह्म + अस्+ इ = भवामसि. भवामसि म्हणजे, हा, हा, मी व तो व हा असे आम्ही पाच होतो. अद्मस् या रूपात तीन सर्वनामे आहेत, भवामस् या रूपात चार सर्वनामे आहेत व भवामसि या रूपात तीन सर्वनामे आहेत, अर्थात वेदपूर्वभाषेत जसे त्रिवचन होते, तसेच चतुर्वचन व पंचवचनही होते. ऋग्वेदात मसि हा प्रत्यय मस् या प्रत्ययाहून पाचपट जास्त येतो आणि अर्थर्ववेदांत मस् हा प्रत्यय मसि या प्रत्ययाहून जास्त येतो. ऋग्वेदकाली ही जोड सर्वनामे प्रत्यय होऊन बसल्यामुळे भवामसि व भवामस् ही दोन्ही रूपे एकार्थक म्हणजे केवळ बहुवचनार्थ समजली जात. परंतु मूळ प्राथमिक भाषेत तिघांसंबंधाने बोलावयाचे म्हणजे भूमस, चौघासंबंधाने बोलावयाचे म्हणजे भवामस् व पांचासंबंधाने बोलावयाचे म्हणजे भवामसि अशी रूपे, वस्तुत: वाक्ये योजीत, हे पृथक्करणान्ती लक्षात येते. परस्मैपदी रूपांना ए (अ+इ) हे स्वत्वदर्शक जोड सर्वनाम जोडले म्हणजे दुह्मह्+ए =दुह्महे, भवामह्+ए =भवामहे ही आत्मनेपदी रूपे बनतात. परस्मायक रूपाना इ हे स्वत्वदर्शक सर्वनाम जोडले म्हणजे अदुह्म (ह्) + इ = अदुह्महि, अभवाम (इ) + इ = अभवामहि ही आत्मनायक रूपे येतात. आत्मनायक रूपांपैकी एक रूप विचारात घेण्यासारखे आहे. ते रूप चयस्महे हे होय. चि ह्न चय् धातूचे लट्च्या उत्तमपुरुषाच्या अनेकवचनाचे हे रूप आहे. सामान्य धर्तीने पहाता चयामहे असे रूप व्हावे. चय्+अ+अ+हम् +अह+ ए = चयामहे. ह् व स् हे उच्चार एकमेकांच्या बदला येणारे आहेत. सबब, ह्म च्या स्थानी स्म् घालून व एक अ कमी करून चय्+अ+स्म्+अह्+ए = चयस्महे असे रूप लाभते. अ म्हणजे हा, स्म् म्हणजे मी, अस् किंवा अह् म्हणजे तो. ए हे आत्मत्वदर्शक सर्वनाम, चयस्महे म्हणजे हा, मी व तो असे आम्ही तिघे खास गोळा करतो. हम् प्रमाणेच स्म्चाही उपयोग प्राथमिक भाषा करी, हे दाखविण्याला चयस्महे हे रूप अथर्ववेदांत सुदैवाने राहिले आहे. इतर लकारांतील उत्तमपुरुष बहुवचनाची रूपे सहज उकलता येण्यासारखी आहेत, करता तपशिलात शिरत नाही.

उत्तमपुरुषाच्या द्विवचनाच्या रचनेत तो व मी असे आम्ही दोघे किंवा तू व मी असे आपण दोघे, हा द्वैवचनिक मतलब प्रदर्शित करण्याकरता तो याअर्थी उ हे सर्वनाम व मी या अर्थी अह् किंवा अस् हे सर्वनाम योजीत. अह् या सर्वनामाचा उच्चार अह् किंवा अस् असा दुहेरी होत असे. हा मी व तो मी असाही जोड होऊन हा या अर्थी अ सर्वनामाचा, तो या अर्थी उ सर्वनामाचा व मी या अर्थी अह् किंवा अस् सर्वनामाचा उपयोग करीत. अद्वस् = अद् + उ + अस् किंवा अह् = अद्वस् किंवा अद्वह किंवा अद्व: अद्व: म्हणजे तो व मी असे आम्ही दोघे खातो. भवावह् = भव्+अ+अ+उ+ अस् = भव +अ+वस् = भवावह्, भवावस्, भवाव:, भवाव: म्हणजे हा मी व तो मी असे आम्ही दोघे होतो. आद्व = अ+अद्+उ+अह् = आद्+व अ = आद् + व= आद्व. आद्व म्हणजे तो व मी खाते झालो. अभवा =अ+भव्+अ+अ+उ +अह् = अभवा + वह्= अभवा + अ व = अभवाव. अभवाव म्हणजे तो मी व हा मी असे आम्ही दोघे झालो. ए (अ+इ) हे स्वत्वदर्शक म्हणजे खासपणा दाखविणारे जोड सर्वनाम परस्मायक रूपांना लागून भवावह् + ए= भवावहे, स्वह् + ए = स्वहे, ही आत्मनायक रूपे होतात. इ हे स्वत्वदर्शक सर्वनाम लागून अभवाव (ह्) + इ= अभवावहि, आस्व (ह्) + इ = आस्वहि ही आध्मनायक रूपे होतात. वह् आणि व (वह्=वअ+व) ही दोन जोड सर्वनामे मूलत: एकच आहेत हे अभाववहि व आस्वहि या आत्मनायक रूपांवरून उघड होते. मूळ परस्मायक रूप अभवावह् व आस्वह् असल्यावाचून अभवावहि व आस्वहि ही रूपे इ सर्वनाम लागून साधली जाणार नाहीत. भवाव: व भवाव ही रूपे मूलत: एकच आहेत हे सिद्ध करण्यास एक ज्ञापक आहे, स उत्तमस्य (३ह्न४ह्न९८) या सूत्रात पाणिनी सांगतो की लेट् ची करवाव व करवाव अशी दोन वैकल्पिक रूपे होतात. ती दोन्ही रूपे ज्याअर्थी एकार्थक असतात त्याअर्थी वह् व व ही जोड सर्वनामे एकार्थक व एकच आहेत हे मुद्दाम सांगावयाला नको. आत्मनायक इतर लकारांच्या रूपात विशेष भानगड नसल्यामुळे त्यांचे पृथक्करण करून जागा अडवीत नाही. उत्तम पुरुषाच्या द्विवचनाच्या रूपांच्या साधनिकेत अ, इ, उ, अह् ऊर्फ अस् ही सर्वनामे येतात. 

६३ प्रथम पुरुषरूपांच्या रचनेप्रमाणेच उत्तमपुरुषरूपांची व मध्यमपुरुषरूपांची घडण होते. उत्तम पुरुषाच्या एकवचनी मी या अर्थाचे सर्वनाम धातूपुढे येते. मी व तू मिळून आपण दोघे किंवा मी व तो मिळून आम्ही दोघे असा द्विवचन प्रत्ययांचा अर्थ असतो; सबब उत्तमपुरुषाच्या द्विवचनी रूपांच्या रचनेत मी व तू किंवा मी व तो या अर्थाची सर्वनामे येणार हे स्पष्टच आहे. मी व तू व तो किंवा मी व हा व हा किंवा मी व तो व हा मिळून आम्ही तिघे किंवा आपण तिघे असा त्रिवचन प्रत्ययांचा अर्थ असतो. सबब त्रिवचन रूपरचनेंत मी व तू व तो किंवा हा या अर्थाची तीन सर्वनामे येणार हे उघड आहे. अदिम = अद्हम्+ इ = अद् + म् + इ= अदिम हम म्हणजे मी व इ म्हणजे हा. मि म्हणजे हा मी. अद्मि म्हणजे हा मी खातो. आदम = आद + अ + हम् = आद + अ + हम् = आद + अ + हम् = आदम. अ म्हणजे हा व हम् म्हणजे मी. आदम् म्हणजे हा मी खाता झालो. भवा (लेट्) = भव् + आ+ अह् = भवा. आ हा लोट्चा विशिष्ट आगम् आहे. अह् म्हणजे मी. अह हे अहम्, हम् प्रमाणेच उत्तम पुरुषैकवचनाचे सर्वनाम असे. हे अह् सर्वनाम आत्मनेपद प्रक्रियेत हमेष येते. भवा म्हणजे मी हो वो ह्न भव्+आ+हन+इ=भव्+आ+न्+इ = भवानि. हन् म्हणजे भी व इ म्हणजे हा. भगनि म्हणजे हा भी होवो. भवामि यात म् उच्चारांकित उत्तमपुरुषसर्वनाम आलेले आहे, भवानि यात न् उच्चारांकित उत्तमपुरुषसर्वनाम आलेले आहे व भवा यात म् उच्चारांकितही नव्हे व न् उच्चारांकित हि नव्हे, असे अह् हे सर्वनाम योजिलेले आहे. हे भवा रूप वैदिकभाषेत आढळते, परंतु पाणिनीयभाषेत हे लोप पावले. लिङ् मधील याम्, इयम् या प्रत्ययात अ हे सर्वनाम असून लङ् प्रमाणेच त्याची जुडणी भवेय्, अद्या या धातूंशी होऊन भवेयम्, अद्याम् ही रूपे होतात. उत्तमपुरुषाच्या पारस्मायक एकवचनाची घडणही अशी होते. आत्मनायक घडण येणेप्रमाणे : भव् + अह् + इ = भवे. अह म्हणजे मी व इ म्हणजे हा खास. मिळून भवे म्हणजे हा प्रत्यक्ष खास मी होतो. अ + भव् + अह् + इ = अभव म्हणजे मी प्रत्यक्ष खास झालो. अ + ब्रुव् + इ= अब्रुवि म्हणजे मी खास बोललो. अब्रुवि या रूपात अह् सर्वनाम नाही. फक्त खास स्वत्वदर्शक इ या दर्शक सर्वनामावर काम भागविले आहे. भव्+आ+इ= भवै (लेट्). आ ही लेट् ची खूण आहे व इ म्हणजे खास स्वत: भवै म्हणजे खास मी होवो. भवेय् + अह् = भवेय. अह् म्हणजे मी. भवेय म्हणजे प्रत्यक्ष हा मी होइजे. जगाम् + अह् = जगामह्न जगाम म्हणजे मी जातो. जग्म्+अह्+इ= जग्मे. जग्मे म्हणजे हा मी प्रत्यक्ष स्वत: जातो. येणेप्रमाणे अ, अह् किंवा अस्, इ, उ, हम्, हन ही सर्वनामे उत्तमपुरुषाच्या एकवचनाच्या रचनेत येतात.

११) आ किंवा अ ह्न हा आज्ञादर्शक उद्गार लेट् च्या प्रथमपुरुष रचनेत येतो. येणेप्रमाणे प्रथमपुरुषरूपरचनेत वरील नऊ सर्वनामे, एक संख्यावाचक शब्द व एक उद्गार कार्य कसे करतात, ते येथपर्यंत पृथक्कारले. आता कित्येक चमत्कारिक दिसणारी प्रथमपुरुषाची वैदिक धातुरूपे घेऊन त्यात हे शब्द कसे योजले आहेत ते मासल्याकरता दाखवितो.

१) दुहाम् ( व शयाम्) = दुह् + आ + अम्. आ हा आज्ञादर्शक उद्गार व अम् म्हणजे तो. दुहाम् म्हणजे तो दूध काढो. शयाम् म्हणजे तो निजो.
२) दुहाम् = दुह् + र् + आ + अम्. ते तिघे दूध काढोत.
३) दुहे् = दुह् + र् + ए = हे तिघे दूध काढतात.
दुह्ते = दुह् + र् + त् + ए ह्न ते हे तिघे दूध काढतात.
दुह्ते = दुह् + अ+ त्+ ए = हा तो व हा असे तिघे दूध काढतात
(किंवा र् चा अ होऊन) ते हे तिघे दूध काढतात.
४) दुहे् = दुह् + ए ह्न हा दूध काढतो.
दुग्धे = दुह् + त् + ए ह्न तो हा दूध काढतो.
शये = शय् + ए ह्न हा निजतो.
५) गच्छतात् = गच्छ् + अत्+आ+अत् ह्न तो तो जावो.
गच्छतु = गच्छ् +अत्+उ ह्न तो तो जावो.
विशतात् = विश्+अत् + आ +अत् ह्न तो तो शिरो.
पप्रा = पप्रा +अ ह्न तो भरतो be fills.
अदुह = अ + दुह् + अ ह्न हा दूध काढी.
६) अदुह्न् = अदुह् + अन ह्न ते दूध काढीत.
अदुह्न् = अदुह् + र् + अन् ह्न ते तिघे दूध काढीत.
अदुह् : अदुह् + स्+स्+स् = तो, तो आणि तो (असे तिघे दूध काढीत.)
अदुह् = अदुह् + र् + अ ह्न हे तिघे दूध काढीत.
७) आस् (आस्त्) = अ + अस्+त् = तो होता.
आसौत् = अ +अस्+ई+त् ह्न हा तो होता.
८) अकारि =अ + कार +इ ह्न हे ह्न हाह्न ही करविले (प्रयोजक) जाते.
यासरणीने वैदिक व पाणिनीय संस्कृतातील प्रथम पुरुषरूपरचनेतील ककोणतेही रूप सहज पृथक्कारता येईल, सबब विस्तार करीत नाही.

उस् (उ+स्) म्हणजे तो तो.
४) त् : या सर्वनामाचा अर्थ तो.
५) अत् : अ म्हणजे हे व त् म्हणजे ते मिळून अत् म्हणजे हे ते.
६) अस् : अ+स्=अस् स् या सर्वनामाचा अर्थ तो. अस् म्हणजे हा तो. हे जोड सर्वनाम भवतस् (भव्+अत्+अस्) या रूपात येते. अस्+अ = अस असा जोड होतो. अस हे जोड सर्वनाम असौ = (अस + उ = असौ ) या रूपात येते.
७) अन् : या सर्वनामाचा एक अर्थ बहुत असा अनेकवचनी आहे. भवन्ति (भव्+ अन् + त् + इ), अभवन्, भवन्ते, अभवन्त, भवन्तु, भवन्तामु, इत्यादी रूपात हे सर्वनाम येते. या सर्वनामाचा दुसरा अर्थ हा असा आहे. या सर्वनामाचे १) अन् + अ = अन, २) अ + इ+ =ए + अन् + अ= एन, ३) अन् + य= अन्य, व ४) अन् + एक = अनेक, असे चार जोड होतात. अनेन, अनया, अनयो: या तीन रूपात अन हे जोड सर्वनाम येते. एनेन, एनया, एनयो: एनौ एनान् एना: या रूपात एन सर्वनाम येते. अन म्हणजे हा हा व एन म्हणजे हि हा हा. अन्य म्हणजे
हा जो, अनेक म्हणजे बहुत, पुष्कळ, दुसरे हे. ऐ सर्वनामाला अकच् होऊन एक सर्वनाम होते. एक सर्वनामाचा मूळ अर्थ हा. अनेक सर्वनामाचा अर्थ पुष्कळ हे.
८) ए : अ + इ मिळून ए सर्वनाम होते व याचा अर्थ हा. ए + त् + अ= एत, ए + अन् + अ = एन, ए+अस + अ= एष, असे तीन जोड होतात. एष म्हणजे तो हा. एभि: एभ्य:, एषां, एषु या रूपातील ए हे अ या सर्वनामाचे पुल्लिंगी प्रथमेचे अनेकवचन आहे, स्वतंत्र एकवचनी सर्वनाम नाही. भक्ते, भवन्ते, भवातै, भवान्ते, इत्यादी रूपात ए सर्वनाम येते.
९) अम् : या सर्वनामाचा अर्थ तो. भवताम्, अभवताम्, भवेताम् इत्यादी रूपात हे सर्वनाम येते. अम् + अ = अम हे जोड सर्वनाम होते, अथर्ववेदातीस अमोऽहमस्मि या मंत्रांत अम हे सर्वनाम आलेले सुप्रसिद्ध आहे, कारण हा मंत्र विवाह प्रयोगात म्हणतात. अम्+उ=अमु हे जोड सर्वनाम अम्, अमी, अमुना, अमुम्, अमूभ्याम् अभीभि: इत्यादी रूपात येते.
१०) रिर्, इर्, र : हे तीन त्रिर् या संख्या शब्दाचे अवशेष आहेत. यांचा उपयोग अन् प्रमाणे प्रथमपुरुषाचे त्रिवचन साधताना होतो.

६२ सर्व लकारातील प्रथमपुरुषाच्या रूपांची आत्मनायक व परस्मायक रचना तिन्ही वचनात कोणकोणती सर्वनामे लागून कसकशी होते ते सांगितले. आता या सर्वनामांचे परिसंख्यान करू व या सर्वनामांचे अवशेष वैदिकभाषेत कितपत राहिले आहेत ते पाहू.

प्रथमपुरुषरचनेत खालील सर्वनामे येतात ह्न १) अ, २) इ, ३) उ, ४) त्, ५) ए (अ +ए), ६) अत् (अ+त्), ७) अस् (अ+स्), ८) उस् (उ+स्), ९) अन्, १०) अम्; तसेच खालील संख्याशब्द येतात: ह्न इर; र् व रिर्; व खालील उद्गार लेट् मध्ये येतो : आ किंवा अ ह्न या सर्वनामासंबंधाने, संख्याशब्दांसंबंधाने व उद्गारांसंबंधाने विशेष माहिती प्रत्येकी येणेप्रमाणे :

१) अ : या सर्वनामाचा अर्थ जवळचा किंवा दूरचा 'हा' असा दुहेरी आहे. हे सर्वनाम त् सर्वनामाला पुढे किंवा मागे जोडून येते व इ सर्वनामाला फक्त मागे जोडून येते. अ+त=अत्. त् + अ=त. अ+इ = ए. त् सर्वनामाच्यापुढे जेव्हा अ सर्वनाम येते तेव्हा त्याचा अर्थ खास असा असतो व इ सर्वनामाच्या मागे जेव्हा अ सर्वनाम येते तेव्हा त्याचाही अर्थ खास असा असतो. अभवत् म्हणजे तो झाला व अभवत म्हणजे तो खास झाला. भवति म्हणजे तो आहे व भवते म्हणजे तो खास आहे. हे अ सर्वनाम अस्मै, अस्मात्, अस्य, अस्मिन्, अस्यै, अस्या:, अस्याम्, आभ्याम् या वैदिकरूपात राहिले आहे. इदम् सर्व नामाच्या बदला ज्याअर्थी अ सर्वनाम येते त्याअर्थी इदम् चा जो सन्निकृष्ट पदार्थ हा अर्थ तोच अ या सर्वनामाचा आहे, हे स्पष्ट होते. त् सर्वनामाच्या पुढे जसे अ सर्वनाम येते तसेच ते एत्, एष्, एन्, अन्, अम् याही सर्वनामांच्या पुढे येऊन एत, एष, एन, अन व अम अशी जोड अंगे बनविते. द्विरूक्ती होऊन अ + अ = आ असाही जोड ब्रुवाताम्, अब्रुवाताम्, ब्रुवाते इत्यादी रूपात दिसतो.

२) इ : या सर्वनामाचा अर्थ हा असा आहे. हे सर्वनाम त् सर्वनामाच्या पुढेही येते व मागेही येते. इ+त् = इत्. त् + इ= ति. अ सर्वनामाच्यापुढे इ सर्वनाम येऊन ए हे जोड सर्वनाम होते. द्विरूक्ती होऊन इ+इ=ई असाही जोड होतो, ई हे जोड सर्वनाम बोभवीति (बोभव्+ई+त्+इ) ब्रवीति, आसौत्, अकार्षीत् इत्यादी रूपात आढळते.

३) उ, उस् : या सर्वनामाचा अर्थ तो असा आहे. भवतु (भव्+अत्+उ) भवन्तु (भव्+अन्+त+उ) या अज्ञार्थक रूपात हे सर्वनाम आढळते. अम् सर्वनामाच्या पुढे येऊन अमु असा जोड होतो. अमु चा अर्थ हा तो. बभूवथूस व वभृवतुस् या लिट्च्या रूपात उस् हे सर्वनाम आढळते.

६१ भवति, भवते भवतस्, भवेते, भवंति, भवन्ते; अभवत्; अभवत; अभवताम्, अभवेताम्; अभवन्, अभवन्त; भवतु, भवताम्; भवेयु:, भवेरन्; भवाति ह्न भवात्, भवातै; भवातस्, भवैते; भवान्, भवान्ते; बभूव, बभूवे; बभूवतुस्, बभूवाते; बभूवुस, बभूविरे; अभूत, अभूयत या रूपाचे येथपर्यंत जे पृथक्करण केले त्यावरून प्रथमपुरुषी कर्त्याचे एकत्व, दित्व व त्रित्व किंवा बहुत्व कसे साधले जात असे ते कळून आले. आता या रूपात आत्मनेपदत्व व परस्मैपदत्व कसे दाखविले जाई त्याचा उलगडा करतो. भवति हे रूप मुळात भव्+अ+त्+ इ असे होते व भवते हे रूप भव्+अ+त्+ ए असे होते. भव्, अ, व त्, हे तीन शब्द दोन्ही रूपात सामान्य आहेत. फरक काय तो इ व ए या शब्दात आहे. पैकी ए हा शब्द अ + इ या दोन सर्वनामांचा जोड आहे. इ म्हणजे हा आणि अ + इ म्हणजे जवळचा खास हा. अ या सर्वनामाचे सापेक्षत्वाने जवळचा व दूरचा असे दोन अर्थ होतात म्हणून सुवंत प्रक्रियेत सांगितलेच आहे. अ + इ = ए या जोड सर्वनामांत अ सर्वनामाचा अर्थ जवळचा खास असा आहे. भवति या रूपातील ति = त् + इ चा अर्थ हा तो असा आहे आणि भवते या रूपातील ते= त् + अ+इ चा अर्थ जवळचा खास तो असा आहे. भवति यातल्यापेक्षा भवते त सामीप्यदर्शक किंवा आत्मत्वदर्शक अ सर्वनाम जास्त आहे. त्यामुळे भवते चा अर्थ तो फक्त स्वत: होतो असा आहे आणि भवति चा अर्थ तो दुसऱ्या करिताही होतो असा आहे. भवतस् व भवेते यातील भेदही असाच आहे. भव्+अ+त्+अस् = भवतस्. त् म्हणजे दुरचा तो व अस् म्हणजेही दूरचा तो ह्न भवतस् म्हणजे दूरचे ते दोघे होतात. भव्+अ+इ+त्+अ+इ= भवेते, अ+ इ म्हणजे जवळचा हा व त्+अ+इ म्हणजे जवळचा तो हा, मिळून एते म्हणजे जवळचे ते दोघे स्वत: खास. भवंति व भवन्ते यातील भेद भवति ह्न भवतेतल्या भेदासारखा आहे. अभवत् व अभवत या दोन रूपातील दुसऱ्या रूपात अ सर्वनाम जास्त आहे व तेच आत्मनायकत्वाचे दर्शक आहे. अभवताम् व अभवेताम् यातील दुसऱ्या रूपात आत्मनायकत्वदर्शक इ हे सर्वनाम जास्त आहे. अभवन् व अभवन्त यातील दुसऱ्या रूपात आत्मनायकत्वदर्शक अ हे सर्वनाम शेवटी जास्त आहे. बाकीच्या जोड्यातीलही भेद याच धर्तींवर उकलता येतो. भव् + अ + त्+ उ = भवतु, अत् म्हणजे तो व उ म्हणजे तो. अतु म्हणजे तो तो. भव्+ अत्+ अ+ अम् = भवताम्. अत् म्हणजे तो व अ + अम् म्हणजे खास तो. अताम् म्हणजे खास तो तो. भव् + आ + अत् = भवात्. आ ही लेट् ची खूण आहे व त्याचा अर्थ आज्ञा हुकूम असा आहे. अत् म्हणजे तो. भवात् म्हणजे तो होवो. भव् + आ + अत्+ इ= भवाति. भवाति म्हणजे तो हा होवो. भव् + आ+ अत् + अ+इ = भवातै. भवातै म्हणजे तो हा खास होवो. भवात् म्हणजे कोणीतरी अतिदूरचा अनिश्चित माणूस होवो. भवाति म्हणजे किंचित अलीकडील कोणी माणूस होवो आणि भवातै म्हणजे साक्षात् सन्निकटवर्ती हा खास माणूस होवो. बभूव म्हणजे तो आहे आणि बभूवे (बभृव +अ+इ) म्हणजे तो हा खास आहे. बभृवतु: (बभूव + अत्+ उस्) म्हणजे ते दोघे आहेत आणि बभूवाते (बभूव्+अ+अत्+अ+इ) म्हणजे ते दोघे खास आहेत. बभूवु: (बभूव्+उस्+स्+स्) 

म्हणजे ते तिघे आहेत आणि बभूविरे (बभूव +इर्+अ+इ) म्हणजे ते तिघे खास आहेत. ददौ (ददा + उ) म्हणजे तो देतो. ददतु (दद्+अत्+ उस्) तो व तो असे ते दोघे देतात. ददुस् (दद्+उ+स्+स्) तो व तो व तो असे ते तिघे देतात.