

चवथ्या व सातव्या लुङांत सर्व प्रत्यय सादि आहेत. पाचव्या लुङांत या सादि प्रत्ययांना आदौ इडागम लागतो, कारण पाचव्या लुङांतील सर्व धातू सेट् असतात. एकूण अर्थ असा की, चवथ्या, पाचव्या व सातव्या लुङांत सर्व धातू सेट् असतात. एकूण अर्थ असा की, चवथ्या, पांचव्या व सातव्या लुङांत सर्व प्रत्यय सादि आहेत. पैकी चवथा व पाचवा लुङ् यांचे प्रत्यय अम् व म स् तम् त आणि त् ताम् उस् असे आहेत आणि सातव्या लुङाचे प्रत्यय अम्, आव, आम, अस् अतम् अत आणि अत् अताम् अन् असे आहेत. म्हणजे सातव्या लुङाचे प्रत्यय अजादि आहेत म्हणजे परोक्ष आहेत आणि पाचव्या व चवथ्या लुङाचे प्रत्यय प्रत्यक्ष आहेत. या परोक्ष व प्रत्यक्ष प्रत्ययांना लुङांत सुडागम होतो असे पाणिनी सांगतो. परंतु हा सुडागम वस्तुत: काय आहे याचे अभिज्ञान पाणिनीला झाले नाही. हा सुडागम जो आहे तो वस्तुत: लेट् चा सिप् आहे. सिब्बहुलं लेटि, म्हणून पाणिनीय सूत्रच आहे. तात्पर्य, लेटांतील स् व लुङांतील स् एकच आहेत. इतकेच की ते एक आहेत ते पाणिनीला ओळखता आले नाही.