Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

जजु [ यज्यु ( यजुर्वेदज्ञ ) = जज्यु, जजु ] ( भा. इ. १८३६)

जनी १ [ जन्या ( करवली ) = जनी. जनिः ( सून ) = जनी ]

-२ [जानकी = जाणइ = जाणी = जणी = जनी ] ( भा. इ. १८३२ )

जनू [ जनार्दन ( एकशेष ) = जनू ]

जळंभट [जहलण = जळण = जळं. जळं + भट = जळंभट ] ( भा. इ. १८३४)

जानू १ [ जन्युः ( ब्रह्मदेव ) = जानू. जन्यः ( करवला ) = जानू ]

-२ [ जानुक = जाणुअ = जानू ] हा शब्द शाकुंतल नाटकांत श्यालाच्या भाषणांत येतो.

-३ [ जन्हुः = जानू]

जानोजी [ जन्हु = जानोजी ]

जिउ, जिउवा [ जीमूत = जीवूअ = जिऊ, जिउ, जिउवा ] जिउ, जिउबा, जिवाजी, जिवा ही विशेषनामें जीमूत पासून निघालेलीं आहेत.

जिऊ [जीमूत = जिऊअ = जिऊ (पुरुषनाम) ] (भा. इ. १८३३)

जिजा [ जया = जजा = जिजा ( स्त्रीनाम ). जिजाबाई = जया ] 

जिजाबा [ ययाति ] ( जजाबा पहा ) 

जिवा १ [ जीमूत ] ( जिउ पहा )

-२ [ जीवक = जिवा, जिऊ ] जीवक म्हणजे दास, चाकर. जिवा, जिऊ ही शुद्रादिकांत व क्वचित् ब्राह्मणादिकांत नांवें असतात. 

जिवाजी [ जीमूत ] ( जिउ पहा ) 

जुजुत्सु [ युयुत्सु = जुजुत्सु ( हा जपानी शब्द बहुशः आर्य आहे ) ]

जोजार [ यज्वर ( sacrificer ) = जोजार ] जोजार नागेश = यज्वर: नागेश: हें मराठी ग्रंथकाराचें नांव आहे.

जोधाजी [ युधिष्ठिरादित्य = जोध (एकशेष) + जी = जोधाजी ] ( आदित्य पहा)

ठकी [ स्थगिका ( रंडी, तांबूलकरंकवाहिनी ) = ठकिआ = ठकी ] (भा. इ. १८३३)

ठिंठाकराल - हा शब्द कधासरित्सागराच्या १२१ व्या तरंगाच्या ७२ व्या श्लोकांत आला आहे. तसाच कर्पूरमंजरींतहि टिंटाकराल आला आहे. सोमदेवानें बृहत्कथेचा तर्जुमा संस्कृतांत
यथामूल केला. तेव्हां गुणाढ्यानें ठिंठाकराल हा शब्द योजिला, असें म्हणावें लागतें. ठिंठाकराल हें कथासरित्सागरांत कितवाचें नांव आहे. हा कितव जुगारी असे.

गोंगावणें [(पौनःपुन्य) ञोङूयते = गोंगावतो. ङू नादे] दुसरा शब्द-गंगावण. (भा. इ. १८३६)

गोचीड [गोक्ष्वेड = गोचेड = गोचीड ] (भा. इ. १८३४)

गोजर ( रा-री-रें ) [ गोजरः ( old bull ) = गोजर (रा-री-रें) ] गोजरा म्हणजे मृदू, मऊ, गरीब.

गोजरा [गोचरः (frequented by cows) = गोजरा. गोजर: ( old bull ) = गोजरा ] साजरागोजरा हें पर्वत-नांव आहे.

गोजरी [ गोजरः (old bull) = गोजरी F. ] an old cow.

गोजीरवाण ( णा-णी-णें ) [ गोजरवर्ण: = गोजीरवाणा ] of the kind of a soft old bull.

गोट १ [ गोघा = गोढ = गोट ]गोधा म्हणजे मनगटावर बांधण्याचा कातड्याचा पट्टा. हा शब्द हरिवंशांत आला आहे.

-२ [ कोट: = गोट (camp) ]

गोठण [ गोष्टीनं = गोठण ] जुना गोठा. गोठणें हें ग्रामनाम आहे.

गोठणें [ गोष्ट् (संघाते ) = गोठते ] पानीयं गोष्टते = पाणी गोठतें (भा. इ. १८३६)

गोठा - (सं.) गोष्टी म्हणजे शाला, पडवी, गोठा. प्रथम, गाई, बैल वगैरे जनावरें बांधण्याचा विस्तीर्ण सोपा म्हणजे गोष्टी, गोठा. गोष्ठः = गोठा. नंतर, कोणताही सभा वगैरे भरविण्याचा विस्तीर्ण सोपा, दिवाणखाना वगैरे. (भा. इ. १८३३)

गोंड [ गोवंट: = गोंड ] चरावयाला जाण्याकरितां गुरें एके ठिकाणीं जमविण्याची जागा.

गोडंवें-बी [ गवीधुमत्-मती = गोडंबें-बी ]

गोंडा (घेळणें) [गुंडिकः = गुंडिआ = गोंडा ] गुंडिक म्हणजे कणीक, पीठ. कुत्रें गोंडा घोळतें म्हणजे कुत्रें कणीक खाऊन मिटक्या मारतें. (भा. इ. १८३३)

गोडाजी [ गोध्वजिन् ( शिव ) = गोडाजी ] हे कोण गोडाजी आले म्हणजे ( थट्टेनें ) परमेश्वर शिव आले.

गोंडाळ [ गंडोलः ]

गोड्या [गौतम = गेोडअँ = गोड्या = घोड्या] संस्कृत नाटकांत राजा विदूषकाला या नांवानें संबोधतो. खालच्या दर्जाच्या मित्राला हा शब्द लावीत. सध्यां मराठींत उपहास व तिरस्कार या अर्थी गोड्या व घोड्या हीं संबोधनें योजतात.

गुळगुळित [ गेलगोलित = गुळगुळित ] (भा. इ. १८३४)

गुळचट १ [ग्लुच् १ स्तेयकुरणे. ग्लुच + ट = गुळचट] तो गुळचट माणूस आहे म्हणजे चोर आहे. (धा. सा. श.)

-२ [ग्लोचट = गुळचट ग्लुच् to steal ] गुळचट थापा म्ह० चोराच्या थापा.

-३ [ ग्लुच् किंवा ग्रुच् to rob, ग्लोचट = गुळचट ] गुळचट म्ह. falsely enticing, falsely captivating. गुळचट थापा falsely captivating talk. येथे च चा उच्चार संस्कृत च व मराठी च असा दोन्ही आहे.

-४ [ग्लुच्= गुळच + (ट) = गुळचट. ग्रुचु, ग्लुचु स्तेयकरणे । ] तो गुळचट माणूस आहे म्हणजे चोर आहे. गुळाशीं कांहीं एक संबंध नाही.

गुळणी १ [ गूर्णि: ] (धातुकोश-गुळगुळ पहा) (या ठिकाणीं गुळगुळ धातु पहा असें राजवाड्यांनीं लिहिलें आहे परंतु धातुकोशांत गुळगुळ धातूची चिठ्ठी आढळत नाहीं.)

-२ [ गृ to sprinkle, to wet = गुळणी ] पाण्याची गुळणी भरणें म्हणजे पाण्यानें तोंड भिजविणें.

गुळपापडी [गुडपर्प्पटिका = गुळपापडी]

गुळपीठ [गुडपीष्ट = गुळपीठ ] (भा. इ. १८३६)

गुळमुळित [ गूढमूढित = गुळमुळित. गूढमूढायते ]

गुळुंब, गुळूम [ गुल्म = गुळूम, गुळुंब ]

गू १ [ गु पुरीषोत्सर्गे ] (ग्रंथमाला)

-२ (गू: (ordure) = गू]

गूल [ गुल (बारीक गेळी) = गूल ] आगकाडीच्या शेवटाची गोळी. (भा. इ. १८३४)

गूळपोहे [ गुडपृथुकाः = गूळपोहे ] (भक्ष्येण मिश्रीकरणं २-१-३५ अंजनेन व्यक्तं २-१-३४ पाणिनि ) दूधभात, दहीभात, ताकभात, गुडदाणी इ. इ.

गेंठी [ गृष्टिः = गेठी ( वनस्पती ) ]

गेलेलें [ गतगतं ] ( ओलेलें पहा)

गोखरूं [ गोक्षुरः = गोखुर = गोखरूं] (भा. इ. १८३४)

गोगलगाय [ गौर्गलिः गौः = गोगलगाय ] दिसण्याला मंद माणूस, मंद बैलाप्रमाणें.

गोंगाट [ ञोङूय ] ( गोंगाव पहा)

गोंगाव [ ङु १ शब्दे. ञोङूय = गोंगाव, गोंगाट ] ( धा. सा. श.)

गुंतोळ [ कुंतल ] (गुंतळ पहा)

गुदखीळ [ प्रायुजो गुदकीलः स्यात् ॥ (केयदेव-पथ्यापथ्यविबोध). गुदकील = गुदखीळ ] ( भा. इ. १८३४)

गुदगुली १ [ गुद गुर्द क्रीडायाम्. गुदगुर्दिका = गुदगुली ] तो मला गुदगुल्या करतो म्हणजे खेळानें खाकेंत हास्योत्पादक स्पर्श करतो.

-२ [गुदगूर्दिका = गुदगुली. गुद and गूर्द to play, to sport ] पोटाला गुदगुल्या करणें.

गुपचुप [ गुप रक्षणे व चुप मंदायां गतौ ] (ग्रंथमाला)

गुपचुप् [ गुप्] ( धातुकोश-गुप पहा )

गुबा [गुर्बः = गुब्बा = गुबा. गुर्व उद्यमने ] पोटांत गुबा धरला आहे म्हणजे पोट उंच झालें आहे, फुगलें आहे.

गुब्बा [ गुर्वः ] (गुवा पहा)

गुरगुज [ (गृज् शब्दे) गुरगृज् = गुर्गुज, गुरगुज (वाद्यविशेष ) ] गृचा अभ्यास ज व्हावयाचा परंतु एथें ज न होतां ग चा अभ्यास झाला आहे. मराठींत अभ्यासाचीं अशीं उदाहरणें आहेत.

गुरगुरित् [ गुर्व to be elevated = गुरगुरित (पोळी वगैरे) ]

गुरम्यांव [गुर शब्द + मीम शब्दे=घुरम्यांव, गुरम्यांव] the purring new of a cat.

गुरूं १ [ नव्या व जुन्या मराठींत रूं प्रत्यय र्‍हस्वत्वदर्शक आहे. जसें:- वत्स = वास = वासरूँ ( लहानगें वत्स). महिषी = म्हैस = म्हसरूँ ( लहानगी म्हैंस ). तसें:- गौ = गु = गुरूं (लहानगें जनावर). संस्कृत समासांत गु हें रूप येतें.] (स. मं. )

-२ [ गुतर = गुअर = गुरुं = गोरूं (ज्ञानेश्वरी ) = गुरूं ] ( रूं पहा)

गुर्गुज [ गृज् १ शब्दे. गुरगृज = गुर्गुज (वाद्यविशेष)] ( धा. सा. श.)

गुर्मी [ कु + उर्मिः = गुर्मी ] वाईट ऊर्मी. ऊर्मीगुर्मी म्हणजे चांगले वाईट विकार.

गुलकंद [ गुल + कंद = गुलकंद. ] गुल म्हणजे गूळ व कंद म्हणजे गोळा, फुगलेला पदार्थ. (भा. इ. १८३४)

गुलफणें [ लुप् ४ विमोहने ] गो (भाषा) व लुंपन म्ह० लेप होणें. गुलफणें म्हणजे तोतरें बोलणें. ( धा. सा. श.)

गुवेलें [ गूधचेलं = गुएलें = गुवेलें ]

गुवेलें-रें [ गूधवस्त्रं = गुवरें-लें ]

२३१) अ+त्=अत्(५) देवात्
२३२) अ+स्=अस् (५) हरे:, अभिजित
२३३)आ+स्=आस्(५) नद्या:
२३४) त्=त् (५)मत्
२३५) या+स्=यास् (५)रमाया:
२३६)स्=स् (५)कर्तु:ऋ=उ
२३७) स्+य्+अ =स्य (६)
संस्कृत भाषेचा उलगडा (२०७)
२३८) स्+य्+आ+स्=स्या:(६)
२३९) अ+स्=अस्(६)
२४०) स्+म=स्म (६) म्ह हम=मम
२४१) अ+क=अक (६) अस्माक
२४२) अ+कम्=अकम्(६)अस्माकम्
२४३) य्+इ=यि (७) मयि
२४४) इ= इ (७) देवे, अभिजित
२४५) अ+अम्=आम् (७) नद्याम्
२४६) य्+आम्=याम् (७) रमायाम्
२४७) भि+स्=भिस् (३)
२४८) भि+अ+अम्=भ्याम् (३।४।५)
२४९) भि+अस्= भ्यस् (४।५)
२५०) त्=त् (५)
२५१) अ+अम्=आम् (६)
२५२) स्+उ=सु (७)

२०१)अत्+त्व्+अ= अथ
२०२)अत्+त्व्+आ=अथा
२०३) कत्+त्व्+आ=कथा
२०४) कत्+त्व्+अम्=कथम्
२०५) तत्+त्व्+आ =तथा
२०६) यत्+त्व्+आ =यथा
२०७) अन्यत्+त्व्+आ=अन्यथा
२०८) इत्+त्व्+अम्=इत्थम्
२०९) इत्+त्व्+आ= इत्था
२१०) इमत्+त्व्+आ= इमथा
२११) अन्+त्+इ=अन्ति
२१२) य्+अत्+इ=यदि
२१३) प्+उन्+अ+ऋ=पुनर्
२१४) स्+अन्+इत+उ+ऋ=सनितुर्
२१५) स्+अन्+उत्+अ+ऋ= सनुतर्
२१६) प्+ऋ+आ+त्+अ+ऋ=प्रातर
२१७) उत्+च्+आ =उच्चा
२१८) उत्+च्+आ+इस्=उच्चैस्
२१९) न्+आ= ना (३)
२२०) इन्+अ=इन (३)
२२१) इन्+आ=इना (३)
२२२) ए+आ=अया (३)
२२३) स्म+ए=स्मै (४) तस्मै
२२४) स्य+ए=स्यै (४) तस्यै
२२५) अ+इ=ए(४) अभिजिते
२२६) आ+ए= ऐ (४) नद्यै
२२७) या+ए=यै (४) रमायै
२२८) ह्+य्+अम्=ह्यम् (४)
२२९) ह्+य्+अ=ह्य (४)मह्य
२३०) अ+य् +अ =अय (४)देव

१८१) अप्+ह्+इ=अभि
१८२) उ+प्+अ=उप
१८३) उ+प् अ+ऋ+इ=उपरि
१८४)अ+अ= आ
१८५)त्+इ+ऋ+अस्=तिरस्
१८६) प्+अ+ऋ+इ=परि
१८७) प्+उ+ऋ+आ=पुरा
१८८) प्+उ+ऋ+अस्= पुरस्
१८९) प्+ऋ+अत्+इ=प्रति
१९०) अत्+ह्+अस् = अधस्
१९१) अप्+ह्+इ+त्+अस्=अभितस्
१९२) अभि+अन्+त्+अ+ऋ=अभ्यन्तर्
१९३) स्+उ+अन्+त्+अ+ऋ=स्वन्तर
१९४) ऋ+त्+ए=ऋते
१९५) प्+अ+ऋ+अस्=परस्
१९६) प्+अ+ऋ+आ = परा
१९७) स्+अम्=सम्
१९८) स्+अ=स
१९९) स+च+अ=सचा
२००) अ+प्+अ=अप

गुडगुड [ गुडगुडायनं = गुडगुड ( घरघर) ] पोटांत गुडगुडतें म्हणजे गुडगुड आवाज होतो.

गुडगुडी [गुडगुडिका = गुडगुडी ] गुडगुड आवाज ज्या नळींतून येतो तो.

गुडदाणी [गुडधाना (गुडमिश्राः धानाः ) = गुडधाणी = गुडदाणी ] एका प्रकारचा गूळ व दाणे यांचा मेवा. (भा. इ. १८३३)

गुडदी [ गुडधिः = गुडदी. गुड रक्षायां + धि ] भांड्याचें तोंड रक्षण करणारें धि म्हणजे झांकण.

गुंडा १ [गुंडः ] ( धातुकोश-गुंड २ पहा )

-२ [गुंडकः = गुंडा (पात्रविशेष), गुंडी ]

गुडाकू-खू [ गुडाका (निद्रा, तंद्रा) = गुडाकू - खू. ] गुडाकू म्हणजे निद्रा, तंद्रा आणणारा एक धूम्रपानाचा पदार्थ.

गुंडाळलें [गुंड (गुंडयति) आच्छादने, वेष्टने ] माथें वस्त्रानें गुंडाळतो = वस्त्रेण मस्तकं गुंडयति. ( भा. इ. १८३३)

गुंडाळा [ गुंड: ] ( धातुकोश-गुंड २ पहा)

गुडी [गुरिका = गुडी, गुढी. गुर ६ उद्यमने ]

गुंडी १ [गुंडिका ] ( धातुकोश-गुंड २ पहा)

-२ [ कुंडिका (कमंडलू, घागर) = गुंडी ]

गुढघा [ टघु + घा = ढोंपराचा संधि ] (स. मं.)

गुढी १ [गुरिका ] (गुडी पहा)

-२ [ घृष्टिः = गुढी ] गुढी पाडवा म्हणजे ती प्रतिपदा ज्या प्रतिपदेस वराहध्वज उभारतात. घृष्टि = वराह. घृष्टिध्वज म्हणजे वराहाचें लांछन ज्या ध्वजावर आहे तो. तदनंतर घृष्टिध्वजाबद्दल नुसता घृष्टि शब्द ध्वजार्थी लावूं लागले. ( ज्ञा. अ. ९ पृ. १७७ )

गुणाचा (गुण्यः = गुणिज्जा = गुणाचा ]
प्रशस्ताः गुणाः यस्य गुण्यः ।
गुणाचा मुलगा म्हणजे प्रशस्त गुण आहेत असा मुलगा.

गुंतलेलें [ गुंथ ११ गुंथने. गुंथित = गुप्तलेलें ] ( धा. सा. श.)

गुंतवळ १ [ कुंतलावलि = गुंतवळ ]

-२ [ कुंतलवलयं = गुंतअवळअ = गुंतवळ ] भातांत गुंतवळ सांपडला म्हणजे केस सांपडला.

-३ [ कुंतल ] (गुंतळ पहा)

गुंतळ [कुंतल = गुंतळ, गुंतोळ, गुंतवळ ] भातांत गुंतवळ सांपडला.

१६१) ए+क= एक
(हा हा कोणीतरी, एक)
१६२) अन्+एक = अनेक
(बहुत एक, एकाहून निराळा)
१६३) स्+म्+अत्=स्मत्
१६४) स्+उ+म्+अत्=सुमत्
१६५) स्+अत्+अम्=सदम्
१६६) स्+अत्+आ=सदा
१६७) क्+अत्+आ= कदा
१६८) त्+अत्+आ=तदा
१६९) य्+अत्+आ=यदा
१७०) स्+अ+ऋ+उ+अ =सर्व
१७१) सर्व+अत्+आ=सर्वदा
१७२) इत्+आन्+इम्=इदानीम्
१७३) तत्+आन्+इम्=तदानीम्
१७४) अन्+त्+अ+ऋ=अन्तर
१७५) उ+अ+ह्+इ+ऋ=वहिर,बहिर
१७६) अत्+त्व्+च्=अच्छ
१७७) अत्+इ=अति
१७८) अत्+ह्+इ=अधि
१७९) प्+अ=प
१८०) अ+प्+इ=अपि

१४१) य+ऋ+हि =यर्हि
१४२) अमु+ऋ+हि=अमुर्हि
१४३) त+ऋ+हि =तर्हि
१४४) एत+ऋ + हि=एतर्हि
१४५) अन्+उ= अनु
१४६) अ+नु=अनु
१४७) इ+उ+अ=इव
१४८) अ+इ+उ+अम=एवम्
१४९) अ+इ+उ+अ=एव
१५०) अ+इ+उ+आ = एवा
१५१) अव+स्=अवस्(खालीं)
१५२) अ+त्+र= अत्र
१५३) अमु+त्+र=अमुत्र
१५४) कु+त्+र=कुत्र
१५५) त+त्र=तत्र
१५६) य+त्र=यत्र
१५७) अन्य+त्र=अन्यत्र
१५८) अन्+य=अन्य
१५९) स+त्+ऋ+आ=सत्रा
१६०) अ+इ=ए (हा हा)