Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
गलेलठ्ठ [गल अदने. लष् सुखी असणें. गललष्ठ=गललठ्ठ = गलेलठ्ठ ] (ग्रंथमाला)
गवई [ गोपति ] (गोवई पहा)
गवगवा १ [ गवगवः ] (धातुकोश-गवगव पहा)
-२ [गु to sound]
गवत १ [ गो + अत्तम् = गवत्तम् = गवतँ = गवत ] (स. मं.)
-२ [ गोअत्तं = गवत्तं = गवत ] ( रोशें गवत पहा )
गवसणी १ [ गवाक्षन् = गवासण = गवसण (णी ) ] छिद्रें किंवा जाळी असलेलें वस्त्र, पिशवी, दोरा. (भा.इ. १८३३)
-२ [ गवाक्षायनं ] (ज्ञा. अ. ९ पृ. १९)
गवसणें [गेषण ] (वेसण दहा)
गवा [ गमः ( march ) = गवा ]
त्याच्या गव्यांत तो आला पाहिजे.
गव्हला [गोधूमवल्ल: = गोहूअँवल = गोहूला = गव्हला ] गव्हले वळणें असा बोलण्याचा संप्रदाय आहे. वल् या क्रियापदापासून वल, वल्ल हे शब्द निघाले आहेत.
गहाण [ अवगाहनं = गाहाण = गहाण ]
अवगाहनं नाम आश्रयभूमिः क्षेत्रावगाहनं = शेतगहाण.
गहिरा [ गभीर: = गहिरा] हिरवा गहिरा म्हणजे अति हिरवा.
गळ [गल: = गळ ]
गळचेपी [गलेचोपिका = गळचेपी ] ( कर्तृकरणे कृता बहुलं २-१-३२)
गळणें [ ग्लै = गळ (णें) ] गळणें म्ह० म्लान होणें. ( भा. इ. १८३६)
गळपणें [ग्लपनं = गळपणें ] ( भा. इ. १८३४)
गळा [ गलक = गलअ = गला = गळा ] ( स. मं.)
गळूं १ [ ग्लौ (excrescence) = गळूं]
-२ [ (वैदिक) ग्लौ = गळौ = गळूं ] (भा. इ. १८३६)
गाउंडा [ ग्रामकूटः ( शूद्र, noblest man in the village) = गाउंडा, गावुंडा, गावंडा ]
गागज १ [ ( गद्) गागद्यते = गागजणें ] ( भा. इ. १८३६)
-२ [ गागर्ज् ( क्रियासमाभिहार ) = गागज्ज = गागज ] जोरानें ओरडणें. (भा. इ. १८३३)
गागणें [ घग्घ् हंसणें, रागावून बोलणें. घग्घ् = गग्ग = गाग्. घग्घन = गागणें ] (भा. इ. १८३३)
गागोडें [ गर्गपद्र = गागोडें ] (भा. इ. १८३६)
संस्कृत भाषेचा उलगडा
वद् हा मूळ धातू याला नुमागम किंवा नुकागम पूर्ववैदिक लोक नाना प्रकारे लावीत. नुमागम किंवा नुकागम म्हणजे अनुनासिक पूर्ववैदिक लोकांत कित्येक समाज अनुनासिक उच्चार प्राचुर्याने करीत व कित्येक समाज निरनुनासिक उच्चार प्राचुर्याने करीत. पैकी अनुनासिक उच्चार करणाऱ्यांच्या भाषांतून कित्येक भाषा वद् चा अनुनासिक उच्चार १) वन्द असा करीत, कित्येक २) वदन् असा करीत, ३) कित्येक वनद् असा करीत, ४) कित्येक वनेद् असा करीत, ५) कित्येक वद्ना, ६) कित्येक वद्नी, ७) कित्येक वेदनु, ८) कित्येक द्नो, असे अनुनासिक आठ प्रकारांनी धातूला यङ् किंवा यङ्लुक् चे रूप देताना जोडीत, पैकी वन्द्, वनद् व वनेद् ही अंगे रुधादि धातूंत आढळतात. वद्ना, वन्दौ व वन्द ही अंगें क्रयादि धातूंत आढळतात. वन्द् हे रूप भ्वादि व अदादि धातूंत येते आणि वन्दो व वदनु (वन्दव) ही अंगे स्वादि व तनादि धातूंत सापडतात. वनेद् हें अंग म्हणजे न हा आगम वस्तुत: एकट्या तृह् धातूंत आढळतो व त्याचा स्वतंत्र गण पाणिनीनें कल्पिला असता तर उत्तम व शास्त्रोक्त झाले असते. परंतु तसे न करता तूह्ं ची गणना पाणिनीने रुधादीं त करून तृणह इम् या सूत्राने तृणेहिभ हे रूप साधिले आहे. नु करता स्वादिगण व ना करिता क्रयादिगण जसा स्वतंत्र बनविला तसाच ने किंवा णे करता तृह चा स्वतंत्र गण बनविला पाहिजे होता. भ्वादि आणि अदादि धातूंत भेद एवढाच की भ्वादि धातूपुढे आमि, असि, अति अशी अजादि सर्वनामे लागतात व अदादि धातू पुढे मि, सि, ति इत्यादी अविरहित सर्वनामे लागतात. जसे,
वन्द् + मि = वन्दिम
वन्द् + आमि = वन्दामि
वन्द् + ति = वन्ति
वन्द् + अति = वन्दति
संस्कृत भाषेचा उलगडा
६० (७) रुधादि व क्रयादि धातू : ह्न पूर्ववैदिक भाषांत यङ् व यङ्लुक् यांचीं अशी रूपे असत :
रुध् ह्न रोरुणष्मि = रुणध्मि
रुध् ह्न रोरुंध्मि = रुंध्व:
भिद् ह्न बेभिनदिम = भिनदिम
भिद् ह्न बेभिंदिभ = भिंद्व:
प्री ह्न पेप्रीणामि = प्रौणामि
प्री ह्न पेप्रीणीमि = प्रौणीव:
ग्रह् ह्न जगृह्णामि = गृह्णामि,
ग्रह् ह्न जगृह्णीमि = गृह्णीव:
रोरुणध्मि, बेभिनदिम, पेप्रीणामि इत्यादी रूपात नुमागम येतो. हा नुमागम का येतो? नुमागमचा इतिहास असा आहे की पूर्ववैदिक भाषात यङ् व यङ्लुक् याची रूपे नुमागम घालून बनविण्याचा अनेक पद्धती असत. कोठे नुमागम अभ्यासाच्यानंतर लागे, कोठे नुमागम अभ्यस्ताच्यानंतर लागे, कोठे नुमागम अभ्यस्ताच्या अन्त्य स्वरानंतर लागे, कोठे नुमागम अभ्यस्ताच्या अन्त्य व्यंजनानंतर लागे, कोठे हा अनुनासिक न् चे रूप घेई, कोठे ण् चे घेई, कोठे न चे घेई, कोठे नी चे घेई, कोठे ना चे घेई, कोठे ने किंवा णे चे घेई व कोठे नो चे किंवा नु चे घेई. नमुन्याकरता उदाहरणार्थ वदि अभिवादने हा भ्वादिवर्गातील धातू घेऊ . याची निरनिराळ्या पूर्ववैदिकभाषात खालीलप्रमाणे यङ् व यङ्लुकची अंगे होत :
१ वंवद वदति (भ्वादि ) १
२ वनीवद्
३ ववन्दू वन्दति (भ्वादि) १
४ ववनद् वनत्ति (रुधादि) ७
५ ववन्दा वदानति (क्रयादि) ९
६ वावदि वावदिमि (अदादि) २
७ ववदौन वद्नौत: (क्रयादि) ९
८ ववदनु वदनुत: (स्वादि) ५
९ ववद्नो वद्नोति (स्वादि) ५
१० ववनेद् वनेदम (तृहादि) ७
११ ववन्द वन्म्दि (अदादि) २
१२ वावद वदिम (अदादि) २
१३ ववद् ववदम (जुहोत्यादि) ३
उवद उवदम
१३ वावदी वदीमि (अदादि) २
१४ वावद्य वद्यति (दिवादि) ४
१५ वावद् वदति (तुदादि) ६
१६ ववद्न वद्नन्ति (क्रयादि) ९
संस्कृत भाषेचा उलगडा
५९ (६) तुदादि धातू : ह्न तुदादिवर्गातील इच्छा, विछ, पृच्छ ही अंगे इष्, विद् व पृच्, या धातूंच्या पूर्ववैदिक सनन्त रूपांपासून निघालेली आहेत.
पूर्ववैदिकभाषेंत यङ् चीं रूपे तोतुद् नोनुद, चरीकृष्, अशी होत असत यांचे अवशेष तुद्, नुद्, कृष् (तुदामि, नुदामि, कृषामि) इ. इ.इ. आहेत. किंवा तुद्, नुद्, कृष् हे साधे धातूही समजले गेले तरी चालेल. इतकेच की यांना अदादि सर्वनामे लागतात.
पूर्ववैदिक भाषात यङ् व यङ्लुक् दोन्ही परस्मैपदीं व आत्मनेपदी असे दोन्ही पदी
चालत, हे लक्षात ठेविले पाहिजे.
नुमागम घेणाऱ्या धातूंसंबंधाने भ्वादिगणात जी टीका केली तीच तुदादिगणांतही लागू आहे असे समजावे.
कित्येक धातु दोन दोन गणात चालतात. म्हणजे भ्वादिप्रमाणे चालतात किंवा तुदादिप्रमाणे चालतात. याचे कारण इतकेच की यङ् व यङलुक् यात हे धातू पूर्ववैदिककाली दोन तऱ्हांनी चालत. उदाहरणार्थ :
कृष् ह्न चरीकर्षति पासून कर्षति (भ्वादि)
कृष् ह्न चरीकृष् पासून कृषति (तुदादि)
चेक्षिप्यते ह्न क्षिप्यते (दिवादि)
चेक्षिप्ति ह्न क्षिपति (तुदादि)
चेक्षेप्ति ह्न क्षेपति ( भ्वादि)
क्षेपति हे रूप पाणिनीय संस्कृतात नाही. परंतु असते तरीही फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. क्षेपति हेच रूप काय, पण पूर्ववैदिक भाषेत क्षिप्ति असेही एक रूप असे. या शेवटच्या रूपांसंबंधाने पुढे टीका येईल तुदादिवर्गाला पाणिनी शविकरण म्हणतो.
संस्कृत भाषेचा उलगडा
तन्न्व् : तन् हे दोन धातू आर्धधातुकांत व सार्वधातुकात जसे चालतात, तसे सुन्व् ह्न सु असे दोन धातू आर्धधातुकात व सार्वधातुकात कसे चालतात ते पहावयाचे असल्यास, तनोति, ततान यांच्याप्रमाणेच सुनोति सुषाव ही रूपे आहेत हे लक्षात ठेवावे. शिवाय तन्विरे व सुन्विरे हे ततन्विरे व सुषुन्विरे या पूर्ववैदिक लिटांचे संक्षेप आहेत हेही स्मृतीतून जाऊ देता कामा नये. यापासून निगमन असे प्राप्त होते की, सु व सुन्व् आणि तन् व तन्न्व् असे दोन भिन्न धातू आहेत. सु ह्न सवति, सुन्व् ह्न सुनोति; तन् ह्न तनति, तन्न्व् ह्न तनोति; अशी सु व सुन्व् आणि तन् व तन्न्व् या धातूंची रूपे पृथक्पृथक् आहेत. पैकी सुन्व् व तन्न्व् हीं अंगे फार जुनाट असून, पाणिनीयकाली ती स्वतंत्र अंगे म्हणून स्मृतीतून नष्ट झाली. स्वादि व तनादि धातूंची सुन्व् व तन्न्व् ही अंगे पूर्ववैदिक यङ्लुक्च्या अनुनासिक रूपांचे संक्षेप आहेत, हे रूधादि व ऋयादि गणांवरील विवेचनावरून दिसून येईल.
संस्कृत भाषेचा उलगडा
५८ (५) स्वादिधातू व तनादिधातू : स्वादिधातूंना श्नुविकरण अशी संज्ञा पाणिनीने दिली आहे. कारण नु हे विकरण लागते अशी पाणिनीची समजूत होती. खरा प्रकार अगदी निराळा होता ह्न स्वादिवर्गातील व तनादिवर्गातील एकूणएक धातू मूळचे न्यान्त व वान्त होते. म्हणजे,
सुन्व् आप्न्व्
धिन्व् चम्न्व्
कृण्व् शक्न्व्
पृन्व् तिक्न्व्
(तन्+न्व्) तन्न्व् सध्न्व्
कर्व् कुर्व्
असे होते. भ्वादिगणात धिन्व् व कृण्व् हे धातू घालून ते धिनोति व कृणोति असे तनादिप्रमाणे व स्वादिप्रमाणे चालतात म्हणून पाणिनी सांगतो. धिन्विकृण्व्योर च. श्रु चीही गणना भ्वादींत करून त्याला श्रृ आदेश होतो व श्नु प्रत्यय लागतो असे पाणिनी सांगतो. श्रुव: शृ च. पाणिनीच्या काळी घिनोति असे रूप समाजात प्रचलित होते. तेव्हा स्वादिगणात हा धातू पाणिनीने घालावयाचा, तो तसा न घालता भ्वादिगणात काय म्हणून घातला? तर, दिधिन्व, धिन्विता, अधिन्वीत् या रूपात धिन्व् हे अंगे दिसते म्हणून, धिवि ह्न धिन्व् असा धातू पाणिनीनें धरला. परंतु धिन्वा म असे रूप भाषेत पाणिनीकाली उपलब्ध नव्हते, सबब धिन्व् पासून धिनोमि रूप कसेतरी बनविण्याकरता, व्लोप, अगागम, अग्लोप, उगागम इतकी चार कार्ये सांगावी लागली. वस्तुत: उच्चारशास्त्रदृष्ट्या स्थिती अशी होती, धिन्व् असा धातू होता. त्याला मि प्रत्यय लागला. धिन्व्मि अशी स्थिती झाली. उच्चारावयाला अवघड पडू लागले, सबब व् चा ओ होऊन धिनोमि असा उच्चार झाला. धिन्व् अधिक वस् = अधिन्व्वस् = धिन्व: असे रूप होई किंवा व् चा उ होऊन धिन्व् + वस् = धिनुव: असे रूप होई. धि हा धातू स्वादिगणात घालून, तो सार्वधातुकात धिन्व् चे काम करतो, असे पाणिनीने म्हटले असते तरी काही बिघडले नसते किंवा आर्धधातुकात धि चे काम धिन्व् करतो, असे म्हटले असते तरीही चालले असते. परंतु हा सर्व चालाचालीचा मामला झाला. खरा प्रकार काय होता? धिन्व् असा पूर्ववैदिक धातू होता व चा उच्चार व, ओ किंवा उ करून त्याची धिन्वामि, धिनोमि व धिनुमि अशी तीन रूपे तीन पोटसमाजात बोलत. त्यांचें मिश्रण होऊन धिनोमि, धिनुव:, दिधिन्व ही रूपे पाणिनीयकाली प्रचलित झाली. तात्पर्य, स्वादिगणातील व तनादिगणातील सर्व धातू मूळचे वान्त आहेत व मधील अ आम्ही उच्चारसुखार्थ योजिला आहे. येथे कोणी असे विचारील की कृ ची व्यवस्था काय व कशी लावता? तर पूर्ववैदिककाली कर्व्, कुर्व् असे दोन धातू असत. कर्व् + मि = करोमि, कुर्व् + वस् = कुर्व्व: = कुर्व: कुर्व् + अन्ति = कुर्वन्ति, अकर्व् + अम् = अकर्वम् = अकरवम्. इ.इ.इ. वैदिककाळी १) कर्मि, २) करामि, ३) कृणोभि, ४) करोमि, अशा चार प्रकारांनी हा धातू चाले म्हणजे भ्वादि, अदादि, स्वादि व तनादि या चार गणातल्याप्रमाणे हा धातू चाले. एक च धातू चार गणात चालतो याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की, हे पाणिनीय गण जे आहेत ते पाणिनीने अडाणीपणाने वरवर पाहून पाडलेले आहेत. वस्तुत: चर्कर्मि पासून कर्मि; चर्करामि पासून करामि, कृण्व् पासून कृणोमि व कर्व्पासून करोमि अशी रूपे पूर्ववैदिककाळी बनत असत. शिवाय कृमि असेही एक पाचवे रूप बनत असे. हे पाचवे रूप तर फारच जुनाट आहे. इतके जुनाट आहे. इतके जुनाट की, त्याच्या अगोदरचे दुसरे जुनाट रूप नाही. म्हणजे कृमि या रूपाच्या अगोदर भाषा केवळ अप्रत्यय होती. एकूण निर्णय असा की, स्वादिगणातील व तनादिगणातील सर्व धातू व कृ धातू हे वस्तुत: भ्वादिगणातील असून वान्त आहेत.
संस्कृत भाषेचा उलगडा
५७ (४) दिवादि धातू : भृशार्थक यङ्पासून दिवादिग्णाची उप्तत्ति आहे. यङ् मधील ङिता वरून उघड होते की पाणिनीच्या मते यङांत सर्व धातू आत्मनेपदी असतात. परंतु पूर्ववैदिकभाषांत पाणिनीचा हा यङ् परस्मैपदीही चाले. दिव् ह्न देदीव्यति, सिव् ह्न सेवीव्यति, लिश् ह्न लेलिश्यति इ. इ. इ. यङ् फक्त आत्मनेपदी व यङ्लुक् फक्त परस्मैपदी चालतो असे वैय्याकरण म्हणतात. परंतु पूर्ववैदिकभाषांत यङ् व यङ्लुक् दोन्हीं आत्मने ह्न व परस्मै अशा दोन्ही पदी चालत. या दिवादींना श्यन्विकरण म्हणून पाणिनी म्हणतो. हा दिवादि वर्गही यङ् चा संक्षेप होऊन म्हणजे आद्य अक्षराचा लोप होऊन झालेला असल्यामुळे, यालाही साध्या धातूत गणण्याची सोय नाही, बाब अतीच स्पष्ट असल्यामुळे, उदाहरणे वगैरे देऊन जागा अडवीत नाही. फक्त एवढीच टीका करतो की परस्मैपदी यङापासून पाणिनीचा दिवादिगण निघाला आहे आणि आत्मनेपदी यङापासून कर्मणि क्रियापदे निघतात. जसे :
देदीव्यति = ( दे ह्न लोप) दीव्यति
देदीव्यते = ( दे ह्न लोप) दीव्यते (कर्मणि)
लेलिश्यति = ( ले ह्न लोप) लिश्यति
लेलिश्यते = ( ले ह्न लोप) लिश्यते (कर्मणि)
इ. इ. इ. इ.
शमादि आठ धातूंतील अ, य पुढे असता, दीर्घ होतो म्हणून पाणिनी सांगतो. याचा अर्थ असा की, पूर्ववैदिकभाषांत यङ् ची शाशाम्य्, ताताम्य्, दादाम्य, अशी रूपे होत होती. शो, छो, सो यांची शोश्यति, छोछ्यति, सोस्यति, इत्यादी रूपे होत, त्यापासून श्यति, स्य, छयति, ही रूपे संक्षेपाने निघाली. हाच न्याय इतर अनियमित म्हणून म्हटलेल्या धातूंना लावावा. दिवादिवर्गात एकंदर १४० धातू पाणिनी देतो.
संस्कृत भाषेचा उलगडा
इ : एमि इत्यादी रूपे यङ्लुकचे संक्षेप आहेत. लुङ् व लिट् यात इ चे काम गा करतो. म्हणजे हा लंगडा धातू आहे. लंगड्या धातूंसंबंधाने विवेचन दाही गणांचे विवेचन झाल्यावर शेवटी एकदम करणे सोयीचे आहे.
तात्पर्य, अदादि गणातही बहुतेक सर्व धातू यङ्लुक्चे व काही लिट् चे संक्षेप आहेत. भ्वादीत व अदादीत भेद इतकाच की भ्वादीत आमि, आव:, आम: इत्यादी अजादि सर्वनामे धातूंपुढे लागतात व अदादि गणात मि, व:, म: इत्यादी हलादि सर्वनामे धातूंपुढे लागतात. या धातूंना पाणिनी लुग्विकरण म्हणजे ज्यांना विकरण नाही ते धातू हे नाव देतो. अदादीतील अद्, अन्, अक्ष् यांच्या लङ् च्या आद: आदत् आन:, आनत् इत्यादी रूपात अजादि सर्वनामे धातूंना लागलेली आढळतात.
५६ (३) जुहोत्यादि धातू : हा वर्ग बोलूनचालूनच अभ्यस्त आहे. तेव्हा यातील धातूंच्या साधेपणाचा प्रश्नच निघत नाही. यांना श्लुविकरण अशी पाणिनीय संज्ञा आहे. याची अंगे लिटांतली आहेत.
संस्कृत भाषेचा उलगडा
संमिश्र भाषेत आली आहेत. अन् अक्ष, स्वप्, श्वस्, या धातूंचीही पूर्वपीठिका रुद् प्रमाणे च लिट् पासून आहे. लङांतील अरोदीत् व अरोदत् ही रूपे यङ्लुकाचे संक्षेप आहेत.
द्विष् : देद्वेष्मि, देद्विष्मि यापासून द्वेष व द्विष ही दोन अंगे निघाली आहेत. यङ्लुक्
इ : लुङ् व लिट् यात इ चे काम गा करतो; म्हणजे लुङ् व लिट् यात इ चालत नाही; म्हणून वैय्याकरण सांगतात. ब्रु, अस् , हन् इत्यादी धातूंसंबंधानेही असाच प्रवाद आहे, की हे धातू व्यंग आहेत, लंगडे आहेत, काही लकारांत चालतात व काही लकारांत चालत नाहीत. या लंगड्या धातूंची थोडीशी परोक्षा करू. अस् धात् परोक्षणार्थ प्रथम घेऊ. अस्ते र्भू: म्हणून सूत्र आहे. अस् चे काम काही लकारांत भू करतो म्हणून पाणिनी सांगतो. कोणाचे काम कोण करतो व लंगडा कोणता धातू आहे ते ठरविण्याकरता, या दोन्ही धातूंची पूर्ववैदिक रूपे, वैदिकरूपे व पाणिनीय रूपे यांची तुलना करू. एका पूर्ववैदिकभाषेत आहे या अर्थी अस् व स् असे दोन धातू होते आणि दुसऱ्या पूर्ववैदिकभाषेत आहे या अर्थी भू म्हणून धातू होता. अस्, स् व भू यांची काही रूपे येणेप्रमाणे :
अस् स् भू
अस्मि स्मि भूमि
वर्तमान अस्व: स्व: भूव:
अस्ति स्ति भूति
आसम् सम् अभूवम
आसी: सौ: अभू:
भूत आसीत् सीत् अभूत्
आसु: सु: अभूवु:
संस्कृत भाषेचा उलगडा
शी : सार्वधातुक व आर्धधातुक प्रत्यय पुढे असता ज्या अर्थी ई चा गुण होतो त्या अर्थी शये, शयीय ही रूपे ज्या शे या अंगाची होतात ते अंग साधे नव्हे, मूळचे अभ्यस्त आहे, हे सांगावयाला नकोच. प्रश्न एवढाच की अभ्यास कोणत्या प्रकारचा आहे, यङ् चा आहे की यङ्लुक चा आहे की लिट् चा आहे, की चवथ्या एखाद्या निराळ्याच प्रकारचा आहे? प्रश्न सोडविण्यास एक गमक आहे. शी ची शेरते, अशेरत, शेरताम्, शयीरन् व शिश्यिरे अशी रूपे लट्, लङ्, लोट, लिङ् व लिट् या पाच लकारांत येतात. या पाची रूपांतर येतो हा कोठला? याचा उगम काय? र् नसता तर शयते, अशयत, शयताम् अशी रूपे झाली असती. लिङ् चे शयीरन् व लिट् चे शिश्यिरे ही दोन रूपे सर्वच आत्मनेपदी धातूंच्या रूपांसारखी असल्यामुळे, त्यापासून र् चा उगम कळण्यास मार्ग नाही; परंतु संस्कृतात शी हा धातू असा एक आहे की ज्याच्या लट्, लङ् व लोट, या तीन लकारांत र् आढळतो. संस्कृत भाषेतील इतर कोणत्याही धातूच्या लटांत, लङांत किंवा लोटांत र् भेटत नाही आणि या एकट्याच धातूच्या रूपात आढळतो याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की या धातूला प्रथमपुरुषानेकवचनी लागणाऱ्या प्रत्ययांतील रुडागम अत्यंत जुनाटांतला जुनाट आगम आहे व अशा अत्यंत जुनाट काळी शी धातू होता व त्याची शेरते शिश्यिरे वगैरे रूपे वैदिक भाषेंत अवशेष म्हणून राहिली. अते, अत, अताम्, अन् यांच्या ऐवजी येणारे रते, रत, रताम्, रन्क हे प्रत्यय आहेत. अर्थात र चा अर्थ बहुवचन आहे यात संशय नाही. ते एकवचन आणि अते व रते बहुवचन दाखवितात. पैकी लटांतून लङांतून लुङांतुन व लोटांतुन हा रुडगम लोप पावला. परंतु लिटांत व लिङांत आत्मनेपदीं हा रडागम ज्याअर्थी आहे त्याअर्थी लिट् व लिङ् हे लकार जुनाटांत जुनाट आहेत हे उघड आहे. पाणिनी सांगतो की वैदिक भाषेत लिट् वर्तमानकाळही दाखवितो यात काही नवल नाही. पूर्ववैदिकभाषात लिट् वर्तमानकाळच दाखवीत असे. इरे हा प्रत्यय वैदिक भाषेंत वर्तमानकाळी लागल्याचे उदाहरण म्हणजे विश्रृण्विरे या रूपाचे. श्नु हे विकरण सार्वधातुकाचे दर्शक आहे. ते श्रु धातुला लागून इरे हा प्रत्यय लागलेला आहे. विश्रुण्विरे म्हणजे विश्रुण्वन्ति असे दिसते की एकेकाळी एका पूर्ववैदिकभाषेत प्रथमपुरुषानेकवचनी सर्व लकारांतील प्रत्यय रुडिवशिष्ट असत. पुढे भाषांचे जेव्हा मिश्रण झाले व वैदिकभाषा जन्मास आली तेव्हा तीत लिट् लिङ् व शी वगैरे काही थोडे धातु यातच तेवढा रुट् अवशिष्ट राहिला. छंदसि उभयथा, छंदसि बहुलं, छंदसि अनेकचा इत्यादी रडगाणे पाणिनी अशा जुनाट ठिकाणी गातो ते रास्तच आहे. मध्ये च रुट् कोठून येतो, विश्रृण्विरे हे बंड काय आहे इत्यादी आश्चर्यजनक प्रश्न त्या विख्यात वैय्याकरणाच्या डोक्यात आले व ते न सोडविता वस्तुस्थिती जशीची तशी त्याने नमूद करून ठेवली.