Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१.
(नकल)
श्री.
१५९७ कार्तिक शुध्द २.
श्रीसके १५९७ राक्षस नाम संवत्सरे कार्तिक शुध्द २ द्वितीया वार आदितवार ते दिवसी लिखिते हाजर मजालसी सभासद
राजश्री माहादाजी सामराज सुभेदार प्रा। मावळ |
राजश्री उधोराम सरमजमदार त॥ मावळ |
राजश्री माहादजी नरसिंह प्रभु मजमदार कर्यात मावळ + + + नाईक बिन मल्हारजी नाईक करजवणे देशमुख कर्यात मावळ |
राजश्री सोमाजी तमाजी प्रभु मज- |
+ ईकजी बिन चापाजी शाहाडा मोकदम मौजे वडघर कर्याती मावळ (फाटलें आहे) |
आपाजी नामदेव वाकडे |
रामजी करजवणे मोकदम मौजे किरकटवाडी |
बाजी पाटिल पायगुडे मोकदम मौजे आगलबे |
तान्हाजी पोकला मोकदम मौजे धाइरी |
मल्हारजी खपरीड मोकदम मौजे गोव्हे बु॥ |
+ + जी फर्जंद व मोराजी घुला मोकदम मौजे नांदेड |
गिरजोजी बिन सुर्याजी मते मोकदम मौजे खडकवासले |
+ + + + + + नल्हवडा मोकदम मौजे + + + कर्यात मावळ |
चिमणाजी बापूजी मोकदम मौजे नांदूसी |
+ + काजी बागटे मोकदम मौजे सी + + + |
मालजी राजवडा मोकदम मौजे नव्हे देहाय प्र॥ |
+ + वोजी नलगा मोकदम मौजे + + + गाव खुर्द |
रेखोजी चौंधा मोकदम मौजे आंबेगाव खुर्द |
+ + जी मुसलमान मोकदम मौजे + + + + |
सोनाजी बाहवा मोकदम मौजे वाभरने सीऊजी पाटिल मोकदम मौजे वडगौ |
+ + + + + मोकदम मौजे कोंढ बु॥ + + + कानडा व सिवाजी घुला मोकदम मौजे उडरी |
बु॥ बावाजी पाटिल कोढलकर व पिलाजी पोपला व बाजी बेलदरा मोकदम आंबेगाऊ बु॥ |
+ + + जी चोंधा व परसोजी इंगवळा मोकदम मौजे भूगांव |
निंबाजी पाटिल मोकदम मौजे कोढ खुर्द |
+ + + जी नरसिंगराव व यशवंत + + सितोळे मोकदम मौजे लवळे + + + मजकूर + + राजी बोराटा मोकदम मौजे को + + + + + + पाटिल व जावजी पाटिल मोकदम मोजे आंहिरे व भिवजी प॥ मा।र + + + बापूजी ससार मोकदम मौजे सारणे |
चांदजी मांजरा मोकदम मौजे भूकुम क॥ म॥ रामजी दगडा मोकदम मौजे बावधण बु॥ होनाजी वेडा मोकदम मौजे बावधन खुर्द सीऊजी पाटिल बाराव मोकदम मौजे हिंगणे बु॥ हिरोजी तनपुरा मोकदम मौजे मांडवी खुर्द रायाजी राजवडा मोकदम मौजे नांदे |
+ + + + + + + + + मौजे खांबगाव + + + + + + + सु॥ सीत सबैन अलफ महजद + + + + + + + पाटिलकी कदीम लोहकरा यानें पायगुडे देशमुख यासी विकली. पायगुडे याणी राजश्री साहेबांस विकल दिल्ही. राजश्री साहेबी बकाजी फर्जंद यास बक्षीस दिल्ही. कागद राजश्री साहेब छ ८ रजब सनद बयान बकाजी फर्जंद साहेबाचा कदीम इतबारी फर्जंद याचे बापानें राजश्री साहेबाचे कष्टमशागत केली व बकाजीहि साहेब कामावर कष्टमशागत बहुत करतो याकरिता साहेब यावर मेहरबान आहेत. मेहरबानीची बक्षिसें पावतो याउपरांत मेहेरबानीने साहेबाचे मर्जी आले की, यास काहीं वतन करून द्यावे ह्मणोन यावरून मौजे खांबगाव बु॥ तर्फ कर्यात मावळ ऐथील पाटिलकी साहेबाची कदीम ती बकाजी फर्जंद यास वतन करून दिल्ही असे. इ. * * इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०.
श्रीशंकर
१५९७ ज्येष्ठ शुध्द १.
राजश्री राघो बलाल सुभेदार माहालनिहाय ता॥ जुनर गोसावी यासि
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री सेवक मोरो त्रिमल नमस्कार विनंति सु॥ खमस सबैन अलफ देसकुलकर्णी पा। पुणें इही एउनु वर्तमान सांगितलें की देसमुखास व आपणास पेसजी र॥ दादाजी कोंडदेऊ सुबेदार तिही इनामती खंडणीचा तह दरसाल दिधला बेरीज होनु प॥ ४००
देसमुख होनु | देशकुलकर्णी होनु |
३०५ | ९५ |
एणेप्रमाणे खंडणीचा तह दिधला त्याप्रमाणे गलबलिया आधी उसूल होत आला आहे हाली सात पाच साले माहाल खराब पडिला जुजबी गाववसाहत थोडीबहुत आहे त्यास आपणास व देसमुखांस हकाचें दस्त थोडेसे हों व त्यास दस्तमाफीक देसमुखास व आपणास पोटात देउनु वरकड दिवाणांत घेत आहेत ऐसियासि स्वामिने एक कागद आपला माहालास दिधला पाहिजे की पेसजी यासि राजश्री दादाजीपंती इनामती खंडणी होन ४०० च्यारसे दर साल खंडणी केली आहे ते बेरीज जोवर पा। म॥ वसाहत होती तोवर सारी बेरीज उसूल होत होती हाली गलबलियाकरिता सारी बेरीज उसूल होत नाही तरी जे हकाचे दस्त होईल ते बेरीज मसमू धरून पेसजी माहाला मामूर असता च्यारसें होनु उसूल होत होता ते वख्ती यासि दस्त होते होतें ते मनास आणून त्यांत दिवाणांत च्यारसें होनु देत होते ते वजा करून यांस काय पावत होतें त्या हिसेबें हाली दस्त होईल त्यासि च्यारसें होनुपैकी घ्यावयाची बेरीज होईल ते दिवाणांत दस्तमाफीक घेत जाणे वरकड यासि देत जाणे दिवाणांत घ्यावयासि बेरीज जे साधेल ते चौं श्या होनावर वाटून देसमुखाचे निसबतीने जे तकसीम एईल ते त्यापासून घेत जाणे व देसकुलकर्णी याचे निसबतीने दस्तमाफीक जे जे तकसीम एईल ते देसकुलकर्णि याजपासून घेत जाणे पेस्तर प॥ म॥ मामूर जालियावर सारी बेरीज च्यारसे होनु नि॥वार घेत जाणे ऐसा एक कागद दिधला पाहिजे ह्मणौउनु त॥ समाचार सांगितला तरी तुह्मी आपला कागद परगणे मजकूरच्या कारकुनास सदरहूप्रमाणे इही समाचार सांगितला आहे तेणेप्रमाणे वर्तणूक करणे ह्मणौउनु आपली सनद करून देणे आणि जे हकाचे दस्त होत जाईल ते चौ श्या होनावर वाटून देसमुखाकडे घेत जाणे देसकुलकर्णियाकडे एईल ते देसकुलकर्णि यापासून घेत जाणे तालीक लेहोनु घेउनु असल देसकुलकर्णियापासि फिराउनु देणे छ २९ सफर प॥ हुजूर
सुरू सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
एकूण होनु साडेचवतीस विस्णूबाचे वहीस आहेत हे कर्जदाराचे कर्ज फेडावे नि॥ माळी मोकदम जागा हि लिहिला आहे कलम १
सदरहूप्रमाणे जागा विस्णूबाचे वहीस तोडिला आहे
कि॥ कलम सन तिसा शंकरभट ढेकणा सेकीन पुणे याजपासून कर्ज देउनु मोकदमी व नि॥ माही जैतू फर्जंद माऊ माळी याचा याणे घेतले होनु १० दाहा याचा जागा कुलारग तुटला आहे तो जागा या कुलापासुनु मोकदमी घेउनु कर्ज भटमजकुराचे वाटावेणी कलम १
कि॥ कलम विसाजी बाबाजी सन समान सन तिसा दोनी साले कुलकर्ण केले त्यास नख्त पावले गला आता मु॥ राहिला आहे तो गला लागले ढेपप्रमाणे विसाजीचा मुशाहिराचा घ्यावा ए॥ कलम
नि॥ बिता।
तेरीज
अ | कलम | ए॥ | होनुरु॥ | गला | गूळ |
कि॥ कलम | १ | ० | ९१ | १॥ | ० |
सन तिसा | |||||
कि॥ सन | ३ | १२ | ० | ७ | ४ |
सबैन | |||||
कि॥ कलम | १ | ० | ३४॥ | ० | ० |
सन सबैन | |||||
कि॥ कलम | १ | ३४॥ | ० | ० | ० |
सन समान | |||||
कि॥ सन | १ | १० | ० | ० | ० |
तिसा | |||||
कि॥ मु॥ | १ | ० | ० | ० | ० |
कुलकर्णी | |||||
८ ------- ८ ------- ५६॥ -------- १२५॥ -------- ८॥ -------- ४ |
एकूण कलमे आठ बराबेरीज होनु ५६॥ साडे छपन रुपये १२५॥ एकसे साडेपंचवीस व गला साडे आठ खंडी ८॥ व गूळ खंडी ४ च्यार याची मखलासी विसाजी कुलकर्णी याचे कागद मनास आणून मखलासी माळियाचे विदमाने केली आहे बि॥ सन समान त॥ सन तिसा दोनी साले हिसोब निर्गमिला असे. सदरहू कलमामधे विसाजीची कांहीं समंधु नाही. कलम मनास आणून केला असे त्याप्रमाणे माळी यानी वर्तोन देणे वारावे ऐसा तह करुनु माळियासी व विसाजीस निरोप दिल्हा पुढें विसाजीची घसघस जो करील तो दिवाणीचा गुन्हेगार छ २ रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
एकूण रुपये एक्याणव व गला खंडी १॥ दीड याची पटी घेऊनु दादोवाचे देणें राहिले आहे त्याचा जागा कुलारग आहे कुलारगाचा बाकीचा कागद मुकाम कोट गऊ तेथे कुलाकर्णीयाने नि॥ माऊ माळी व नि॥ मोकदम दिधला आहे तेणेप्रमाणे त्याकुळानी मुदल व कलोत्तर जो हिसोब दादावा नाइकाचा खतप्रमाणे होईल तो दादावास नि॥ माळी व मोकदम देऊन खत फाडावे नि॥ माळी व मोकदम कलम १
कि॥ कलम सन सबैनामधे गलबला जाला ते वख्ती मोगलाचे ठाणे उठिले र॥ साहेबाचे लोक आले त्यास र॥ संताजी जगथाप व राजश्री खंडोजी जगथाप तिहीं गावामध्ये पैकियाबदल स्वार पाठविले त्या स्वारानी गावामधे बहुत मारामारी केली त्यास पैकेकर्ज घेउनु दिल्हे त्या कर्जाची पटी जाली नाही. कर्जदाराची नावे ए॥ बेरीज
नख्त होनु १२ एैन जिन्नस. |
|
गलाखंडी गहू ७ |
गूळखंडी ४ |
जानसेटी बतीर क॥ पुणा याजपासून घेतले होनु १६। त्याचा काढा त्यास देउ केला बि॥ |
गणसेटी वाहकरी क॥ पुणा याजपासून घेतले होनु १५ घेउनु दिवाणात दिल्हे त्याचा काण त्यास देऊ केला बि॥ |
गलाखंडी | गूळखंडी | गलाखंडी | गूळखंडी |
गहू ५ | २ | २ | २ |
कि॥ कमल सिवाजी बाबाजी यास हुजरातीस सबनिसीची पारिखी होती त्यास सिवाजी बाबाजी पुण्यास आला होता याणे आपल्या मुशाहिर्यात होनु १२ संताजीपाशी वरात मागितली त्याणी मौजेमजकुरीचे होनु १२ सुभा जमा धरून सिवाजी बाबाजीस गावावरीच देविले गावास खंडणीमधे मजुरा पडिले सिवाजी बाबाजीस पावले नाहींत होनु १२
एकूण होनु १२ बारा व गला व गहू खंडी ७ व गूळ खंडी च्यार ए॥ कलमे २ याची पटी करूनु सदरहू देणेदार वारावे तो तिघे भाऊ माळी आपणामधे आपण भांडो लागले त्याकरिता पटी ठेऊनु देणेदार वारावे ते वारिले नाहींत ए सालीचे कुलकर्ण पिलाजीने चालविले आहे त्याची पटी नी॥ माळी मोकदम करावी आणि कर्जदार वारावे वरातीचे होनु बारा घ्यावे नि॥ मोकदम ९ माळी वारावे कलम १ कि॥ कलम मोकदम व कुलकर्णी औरंगाबादेस देसका ब॥ गेले होते तेथे मोकदम व कुलकर्णी यास खर्च जाला आहे त्याचा हिसोब गु॥ पदाजी मोकदम मौजे पोचे गु॥ माळी निमे मोकदम यास समजाविला आहे बि॥ खर्च रुपये
४॥ नि॥ मोर मोकदम
२१॥ नि॥ माळी निमे मा।
८॥ नि॥ कुलकर्णी
-------
३४॥
एकूण रुपये साडेचवतीस याचा जागा णावनि॥ ने करुनु देसपांडिये त्याचे कर्ज फेडावे नि॥ मोकदम व निमे मोकदम माळी -----------------------
कलम सन सबैन
कि॥ कलम सन समानामधे विस्णु बनायक डांगरा सेफीन पुणे याचे कर्ज पेसजीचा हवाला घेतला आहे त्याचे कर्ज पटीस घालून जागा तोडिला आहे नि॥ माळी कर्ज बेरीज होनु
२७ मुदल
७॥ कलोत्तर
-------
३४॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९.
श्रीशंकर
१५९४ श्रावण शुध्द ४.
जाबिता मखलासी सुभा राजश्री राघो बलाल सुभेदार व कारकून नामजाद स॥ जुनर व मा।हाय सु॥ सलास सबैन अलफ मौजे चिंखली ता। हवेली प॥ पुणें एथील माली माऊमाली वगैरे नि॥ मोकदम इही सुभा एउनु फिर्याद तलेगांवीचे मुकामी केली कीं विसाजी बाबजी कुलकर्णी मौजे मजकूर हा कुलकर्ण चालवीत असतां आपणास हिसोब गावगतीचा समजाविला नाहीं लोकांचे देणेघेणे आहे ते मागत आहेत. विसाजी मुठेखोरियात जाउनु राहिला आहे तरी साहेबी यास तलब करुनु आणून त्याचा आपला हिसोब गावगतीचा साहेबी आपणा देखता मनास आणून विल्हे केली पाहिजे ह्मणऊनु फिर्याद केली त्यावरुनु सुभाहून विसाजी बाबजी मुठेखोरियामधे राहात होता तेथें सुभाऊन चौघजण रजपूत पाठउनु यास मसाला खुद्द नि॥ विसाजी टकें २० वीस
सोनजी न॥ खासा टके ५ | एससू काकडा टके ५ त॥ |
क॥ सरद २॥ | क॥ सरद २॥ |
क॥ सरद २॥ | क॥ सरद २॥ |
केरोजी टके ५ | सोनजी लोहारी टके ५ |
क॥ सरद २॥ | क॥ २॥ |
क॥ सरद २॥ | क॥ २॥ |
एणेप्रमाणे चौगजण रजपूत सुभाहून माळियाचे मालुमातीवरूनु पाठविले त्यास विसाजी गावी नव्हता याकरिता विसाजीची बाईल दस्त करुनु सुभ्यास आणिली. यावरी मागून विसाजीस हि आणिलेयावरी म॥ दादाजी कोंडदेउ मजमूदार सुभेमजकूर व कासीराम हावालदार प॥ चाकण व निळो वामन अजहती र॥ त्रिंबक हरी देसपांडे स॥ जुनर यास बैसउनु मोजेमजकुरीचा हिसोब अवघा कथला मालियाचा व विसाजी बाबजीचा मनास आणून कमलाची मखलासी केली बित॥
कि॥ कलम सन तिसामधे अनूपराउ करोडी पुण्यामधे होता त्याचे मागणे लागले त्यास माळी व मोकदमी दादावा गोडसे याचे कर्ज घेउनु अनूपराऊ त्यासी दिधले कि॥ त्यापैकी त्याची बाकी आहे नि॥ माळी व नि॥ मोकदम
नख्त रुपये | गला खंडी गहू |
९१![]() |
१॥ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८.
१५९३ श्रावण शुध्द ७.
अज दिवाण ठाणे ता। कर्हेपठार पु॥ पुणें ता। मोकदमानी देहाय त॥ कर्हेपठार
१ सासवड | १ पारगौऊ |
१ गुल्हेरी | १ सोनारी |
१ आंबवडी | १ वाघापूर |
३ | ३ |
सु॥ इसन्ने सबैन अलफ जानोजी कुभारकर व एमाजी कुभारकर मोकदम मौजे वणपुरी ता। मजकूर यामध्ये बापभाउवीचे भांडण आहे ऐसियास जानोजी राजश्री साहेबापासी गेला होता ऐसियास राजश्री साहेबी हुकूम केला की मागे माइले दादाजी कोंडदेऊ सुबेदार याचे कारकीर्दीस ऐस चालिले असेली राजश्री साहेबाचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे. जो न वरते त्यास ताकीद करणे ह्मणौनु रजा फर्माविली तरी तुह्मी हमशाही गोत आहे जैस पेसजी चालविले असेली तेणेप्रमाणे मनास आणोन विल्हे लावणे हरएक मनास आणोन निवाडा करणे सदरहू गोत वणपुरीस राहोन हरएक निवाडा करणे छ २६ रबिलावल
एणेप्रमाणे गोतास हुकूम जालियावरी गोत मौजेमजकूर एऊन दोघांचे राजीनामे लेहोनु घेतले बित॥ + + + + + + + + + + श्रीसके १५९३ विरोधकृत नाम संवत्सरे स्त्रावण सुध सपतमी हजर मजालसी मौजे मा। मोकदम देहाय सु॥ इहिदे सबाईन
१ पारगौ | १ सासवड |
१ उन्हेरी | १ सोनारी |
१ वाघापूर | १ आंबवडी |
एणेप्रमाणे गोतहुजूर तकरीरकर्दे
अगरवादी रतन प॥ बिन जान पा। मौजे वणपुरी ता। कर्हेपठार राजी होऊन राजीनामा लेहौनु दिधला ऐसा जे एसाजी कुंभारकरामधे व आपणामधे मोकदमीबदल भांडत होते त्यास माहाराज साहेबी फर्माविले की मौजे म॥ बारा हि बलुते सांगतील त्याप्रमाणे वर्तवणे बलुते गोही देतील त्यास आपण राजी आहे गोहीदाराचे जरी मोडून तरी साहेबास गुन्हेगारी होनु १०० एकसे देऊन व गोताचा खोटा राजीनामा सही |
पछमवादी एमाजी कुभारकर मौजे वणपुरी ता। कर्हेपठार त॥ म॥ राजीनामा लेहौनु दिधला ऐसा जे जाणोजी बिन रतनोजी कुभारकर व आपणामधे मौजे म॥ मोकदमीचे भांडण आहे त्यास माहाराज राजश्री साहेबाचा हुकूम की गावीचे बलुते + + गाही देतील तेणेप्रमाणे वर्तन जरी बलुते सांगतील ते नाइको तरी दिवानाची गुन्हेगारी होनु १०० एकसे देऊन हे तकरीर सही |
एणेप्रमाणे राजीनामा लेहोनु देऊन मग गोताने गावीचे बलुते बोलाऊन त्यास पुसिले बित॥
१ साजाजी सुतार | १ कुवरवा |
१ बहीर माहाला | १ रंभाजी मावली |
१ नूल माहार चांभार | १ बहरिजी जाचक |
१ खंडनाईक माहार | बिल्हराऊतराऊ |
------- ४ |
------ ३ |
हे सातजण यास बलाऊन हकीकती लिहिली जे पेसजी माहाराज राजश्रीचे व दादाजी खंडदेऊ व मुधोली भोसले मुकासी ते वेळेसी मोकदमी कोने केली तरी ते वेळेसी रतनजी बिन तान्हाजी यानी मोकदमी केली असे हे सदरहू प्रमाणे मोकदमीचे खावंद जानोजी बिन रतनोजीची मोकदमी खरी यास जो हिलाहरकती करी तो दिवानीचे गुन्हेगार होनु ५०० पाचसे देईल व गोताचा दंड देईल हे लिहिले सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७.
१५९१ भाद्रपद वद्य १२.
ता।
''कौलनामा अज दिवाणा खासा बजानेबु कडतोजी बिन हिरोजी माहाजन व सेटिया मुकाम पेठ मूर्तजाबाद पा। किले पुरंधर बिदानद सुहुरसन सबैन अलफ बाद कौलनामा ऐसा जे तुवा हुजूर एऊन बंदगीस हजरती मालूम केले जे पेठमजकुरी पूर्वी प्रजा दिवेलाविणी वस्ती यावेरी शाहाजी भोसले परमुलकी एऊन पेठ जाळिली फितरिताकरिता रोडीदुबळिया प्रजा होत्या त्या परागंदा होऊन एकएक जागा गेलिया शक धरून पेठेवरी एत नाही याचा मुदा आहे की आपणास पेशजी रायारराव याचे तसविसेकरिता खराबा होऊन आपली जितरबे बुडाली दो वरीस बाहेर होतो यावरी तुह्मी एऊन आपली खातीरनिशा करून पेठेवरी आणिले आपण कर्जवाम घेऊन मागती घरे दुकाने केली ते वेळे शाहाजीचे फितरीत जाली घरे जाळिली मागती परागंदा होऊन एकएक जागा राहिलो कोनाचा आसिरा देखो न याजवरी आपणास हुजरून सा सालांचा कौल मर्हामत जालिया पेठेवरी एऊन कीर्दी मामुरी करून ह्मणौन प्रजांचा मुदा घेतला आहे तरी साहेबी नजर अनायत फर्माऊन सा सालांचा कौल मर्हामती जालिया आपण कौल सिरी धरून प्रजासमजावीस करून पेठ कीर्दीमामुरी करून सदरहूप्रमाणे आपण हक लाजिमा आहे सवे पसकई आहे ते कौल पुरलियावरी घेईन कौल मर्हामत होए ह्मणऊन मालूम केले तरी बराय मालुमाती खातिरेस आणून सदरहूप्रमाणें बदल मामुरी कौल दिल्हा असे तरी पेठमजकुरी प्रजा आणून मामुरी कीजे. कोन्हे बाबे तालीक अंदेशा न कीजे इस्तावा साले सा पुरलियावरी बरहुकूम कानू कदीम कमावीस होईल मोर्तब सूद छ २५ रबिलाखर.''
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५.
१५९० पौष शुध्द ५
''मशरुल अनाम बाबाजी राम देसपांडे प्रा। पुणें यासि राजश्री शिवाजी राजे सुहुरसन तिसा सितैन अलपु हुजूर खबर मालूम जाली की, मुकुंद कान्हो देशपांडियो प्रा। मजकूर याचे तकसिमेचा कारबार यांसि न देवा आणि अवघा कारबार आपण च + + + + आहे तरी हे कोण गोस्टी + + पहिलेपासून सालाबाद हैबतखान व मलिक अंबर व माहाराज साहेबाचे कारकीर्दीस व हालीचे कारकीर्दीस जैसे चालिले तेणेप्रमाणें वर्तनूक करणे नवे कचाट करून कारबारास खलेल करणे हे गैरमाकूल गोस्टी आहे. नवे कारबार कांही चालनार नाही तरी तुह्मी आपले तकसिमेचा कारबार करीत जाणे. मुकुंद कान्होचे तकसिमेचा कारबार मुकुंद कान्हो करीत जाईल ++ मुकुंद कान्होच्या ता। कारबारासि बजबज घालावयासि गरज नाहीं. हे समजोन वर्तनूक करणे. नवे खलेल सर्वथा न करणें तें काहीं चालणार नाही. सालाबादपमाणें दुरूस वर्तनूक करणे नवे खलेल केले ह्मणजे साहेबास बोल नाही ऐसे समजोन वर्तणूक करणे छ ३ साबान.''
लेखांक १६.
१५९०.
सेटिये क॥ पुणे व माहाजन ह्मालोजी कदम
त्रिंबक सेटी माधसेटी सेट्या मुजेरी क॥ वाळदूर
सेटिये कसबा पेठ मूर्तजाबाद
''सन हजार १०७८ कारणे महजरनामा केला ऐसा जे गोंदसेटी हुलवला प्रज पेठ शापूर क॥ पुणे यामधे व गणसेटि शेटे शाहार यामधे घराचे भांडण होते ऐसियासी घराची + + णास आजीत॥ अमल शाहाजी राजे वीस तीस वरसे गेली नांदत होता त्यावरी दादाजी कोंडदेऊ सुभेदार त्याचे वख्तीं गोदजीने गणोजी मजकुरासि दाही दिधली हरदोजण भांडण दादाजी कोंडदेऊ सुभेदार त्याजपासी गेले त्यानी मुनसिफी केली + + + दिधले व महजर करुनु दिधला त्यावरी गोंदसेटी घरी + + लागला त्यावरी अमीरलउमराऊ श्यास्ताखान सुभा सिवाजी भोसले + + जाती आले त्याचे दहशतीने कुल मुलूक आप + + + टाकुनु परागंदा जाला त्यावेळेस गोंदजी हुलवलियाचे + + करितां घर जळाले त्यामधे किती वस्ता जळाल्या महजर दादाजी कोंडदेऊ त्यानी करुनु दिधला तो हि जळाला ऐसे + + आह्मास ठाउके आहे. त्यावरी गोंदजी मजकूर राजीकाने तीन च्यार वरसे पळोन गेला त्यावरी कुल मुलुकास आबादानी कौल दिधला त्या बराबरी गोंदजीमजकूर एउनु + + राहिला आनी गणसेटी सेटियाने दाही दिधली आनी + + + सवेचि मेला त्यामागे दुसरे वरसी गणसेटीचा लेकाने दोही दिधली हरदोजनाचे मागत्याने गोहीमुदाई पाहोनु घर गोंदसेटी हलवलियाचे हिसेबी जाले मग हाजीरमज्यालसीने घरठाणे गोंदसेटीचा लेक दुलबा हुलवला त्यास दिधले गणसेटीच्या लेकास काही निसबत नाही नाहक गळा पडिला होता हाली दुलबाजी हुलवला याचे घर याचे हवाला केले असे.''
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३.
फारसी सिक्का
१५८८ आषाढ
'' द॥ बे॥ गुमास्ते सरदेसमुख व देसमुख व देसपांडिये पा। पुणें सा। जुन्नर सुबे अवरंगाबाद उरुफ दक्ष्ण सन १०७७ कबूलेती लेहोनु दिल्ही ऐसी जे, पा। मा।ची जमाबंदी ब॥ फसल खरीफ होईल व रबी पेंचील सन इले हैबतखान गुमास्ते जागीरदार बरजाबंदी रायां आपल्या सल्यानें जमाबंदी मुशकस केली, तें आपण माफीक तपसील कबूल असों. जमा अज बा। आं देह बदेह अज देहे २९० वजा तश्रीफा रा। सीवाजी राजे भोंसले ता। मावळ वगैरे देहे ५६ ता। हवेली पुणें २० ता। मावळ ३६ बाकि देहे २३४
आबाद वैरान
मोकरा हाल हासील साल तमाम दे॥ माल व सायरे
रुपये १२८२९०
रुजूगुदस्ता रुपये १०६४०६
बाद कमी रुपये ७०६।.
बाकी गु॥ रुपये १०५७००
इ॥ सालमजकूर रुपये २२५८९॥.।
राघो बलाल गुमास्ते
सरदेसमुख
लेखांक १४.
फारसी सिक्का १५८९ श्रावण वद्य २
तुमार वासलाती अज ता। गुमास्ते मुगुटमनी करोडी पायबाकी पा। पुणे सु॥ समान सन हजार १०७७ अज बा। मुतालबा एकबालपन्हा खेळोजी भोसले देहाय ता। पाठस इ॥ छ १६ माहे सफर तागाईत छ माहे अखेर माहे मोकरा रु॥ बटा कमी वजन रुपये ५२४
ता।
मौजे खोरवडी ३६४॥।- मौजे कडेगाऊ रु॥ ९६J -॥
मौजे नानगाऊ ६३ लग ०
बाबूजी नरसिंगराऊ व विठोजी नाईक सितोळे देशमुख प्रा। पुणें
दा। बो। मोरो विश्वनाथ व बाबाजीराम देशपांडे प्रा। पुणें
तेरीख माहे
पांचसें चोवीस रुपये साडे पंधरा आनें रस''
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११.
१५८७ माघ शुध्द ६
(पुणें देशपांडे दप्तर)
''म॥ अनाम राजश्री बावाजीराम देशकुलकर्णी प्र॥ पुणें राजश्री जिजाबाई सु॥ तिसा सितैन अलफ म॥ मकुंद कान्हो देशकुलकरणी प्रा। मा।र त्याचे तकसिमेस तुह्मी खलेल करून मा।लेसी घसघस करितां ह्मणउनु हुजूर मालूम जालें. तरी तुमची तकसीम तुह्मी चालऊन हालखुद वर्तनूक करणें. सालाबाद चालिलें आहे त्यास घसघस केल्या काहीं उज राहे ने. जेणेकरितां आपले भाउबंद एक नेट करून गहदम सालाबाद चालिले आहे तैसी वर्तनूक करणें. नशेत कथळे केल्या, चिरंजीव कांहीं कोन्हाचा मुल्हाजा करणार नाहींत. ऐसें समजोन म॥ मुकुंद कान्होजी घसघस न करणें. पेस्तर बोभाटा आला ह्मणजे बोल नाहीं छ ४ साबान.''
लेखांक १२.
१५८७ फाल्गुन शुध्द ३
''द॥ बे॥ मोकदम व समस्त रया मौजे मांजिरी बु॥ त॥ हवेली प॥ पुणा सु॥ सीत सन १०७५ साहेबाचे बंदगीस कतबा लेहून दिधला ऐसा जे, साहेबीं हुजूर बोलाऊन साल मजकुरीची जमाबंधी फर्माविली तरी साल गु॥ प॥ म॥ नामजादी ब॥ चा साहेब सुभा आले. ते वख्तीं रयतीवरी कही होउनु लुटिली, गांव जाळिला. यावरी गाऊ कुल खराब होउनु प्रजा पोट भरावयासि देसावरी गेलिया. यावरी गणीमाचा तह होउनु भेटला. तव मौजे मजकुर खराब पडिलेयावरी जागीरदारी आपला तपवास घेउनु खंडिला. कौल रुपये ५०० देउनु गांवावरी आणिले. आपण एका दोनीस गितीस मेलउनु जुजवी कीर्दी केली. यासि जुजबी पीक जालें. एणेप्रमाणे आपला हालअहवाल खातिरेसी आणितां साल गु॥ जमाबंदी रुपये ९०० यासीं गऊ लुटिला, जाळिला, खराब पडिला होता. यावरी खंडिला कौल् देउनु गांवावरी आणिले आहेती. अमल खातिरेसी आणुउनु बेमारुफाती मागुस्ते जागीरदार रजाबंदी करारती बमय माळव सायेर तमाम सालउगवणी करणे रुपये ८००
तेरीख ह॥ राघोजी
रमजान कुलकर्णी पे + +