लेखांक १५.
१५९० पौष शुध्द ५
''मशरुल अनाम बाबाजी राम देसपांडे प्रा। पुणें यासि राजश्री शिवाजी राजे सुहुरसन तिसा सितैन अलपु हुजूर खबर मालूम जाली की, मुकुंद कान्हो देशपांडियो प्रा। मजकूर याचे तकसिमेचा कारबार यांसि न देवा आणि अवघा कारबार आपण च + + + + आहे तरी हे कोण गोस्टी + + पहिलेपासून सालाबाद हैबतखान व मलिक अंबर व माहाराज साहेबाचे कारकीर्दीस व हालीचे कारकीर्दीस जैसे चालिले तेणेप्रमाणें वर्तनूक करणे नवे कचाट करून कारबारास खलेल करणे हे गैरमाकूल गोस्टी आहे. नवे कारबार कांही चालनार नाही तरी तुह्मी आपले तकसिमेचा कारबार करीत जाणे. मुकुंद कान्होचे तकसिमेचा कारबार मुकुंद कान्हो करीत जाईल ++ मुकुंद कान्होच्या ता। कारबारासि बजबज घालावयासि गरज नाहीं. हे समजोन वर्तनूक करणे. नवे खलेल सर्वथा न करणें तें काहीं चालणार नाही. सालाबादपमाणें दुरूस वर्तनूक करणे नवे खलेल केले ह्मणजे साहेबास बोल नाही ऐसे समजोन वर्तणूक करणे छ ३ साबान.''
लेखांक १६.
१५९०.
सेटिये क॥ पुणे व माहाजन ह्मालोजी कदम
त्रिंबक सेटी माधसेटी सेट्या मुजेरी क॥ वाळदूर
सेटिये कसबा पेठ मूर्तजाबाद
''सन हजार १०७८ कारणे महजरनामा केला ऐसा जे गोंदसेटी हुलवला प्रज पेठ शापूर क॥ पुणे यामधे व गणसेटि शेटे शाहार यामधे घराचे भांडण होते ऐसियासी घराची + + णास आजीत॥ अमल शाहाजी राजे वीस तीस वरसे गेली नांदत होता त्यावरी दादाजी कोंडदेऊ सुभेदार त्याचे वख्तीं गोदजीने गणोजी मजकुरासि दाही दिधली हरदोजण भांडण दादाजी कोंडदेऊ सुभेदार त्याजपासी गेले त्यानी मुनसिफी केली + + + दिधले व महजर करुनु दिधला त्यावरी गोंदसेटी घरी + + लागला त्यावरी अमीरलउमराऊ श्यास्ताखान सुभा सिवाजी भोसले + + जाती आले त्याचे दहशतीने कुल मुलूक आप + + + टाकुनु परागंदा जाला त्यावेळेस गोंदजी हुलवलियाचे + + करितां घर जळाले त्यामधे किती वस्ता जळाल्या महजर दादाजी कोंडदेऊ त्यानी करुनु दिधला तो हि जळाला ऐसे + + आह्मास ठाउके आहे. त्यावरी गोंदजी मजकूर राजीकाने तीन च्यार वरसे पळोन गेला त्यावरी कुल मुलुकास आबादानी कौल दिधला त्या बराबरी गोंदजीमजकूर एउनु + + राहिला आनी गणसेटी सेटियाने दाही दिधली आनी + + + सवेचि मेला त्यामागे दुसरे वरसी गणसेटीचा लेकाने दोही दिधली हरदोजनाचे मागत्याने गोहीमुदाई पाहोनु घर गोंदसेटी हलवलियाचे हिसेबी जाले मग हाजीरमज्यालसीने घरठाणे गोंदसेटीचा लेक दुलबा हुलवला त्यास दिधले गणसेटीच्या लेकास काही निसबत नाही नाहक गळा पडिला होता हाली दुलबाजी हुलवला याचे घर याचे हवाला केले असे.''