Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
६० ता। |
||
गला खंडी | ४ ह्मैस | १ गहू पेरावयास पेशजी घेतले कैली |
१॥दर | ५ बइल २ | ![]() |
खंडी | ६ गहू पो- | .|||. अर्ज पा। बिन लाहूजी पा। लोणकर |
होन तीस ३० | टाबे॥ | .॥. महादजी पा। लोणकर यासी जमान |
प्रा। होन | ------- १५ |
आपण व अर्ज पा। आहो. |
४५ ----- ६० |
||
१।-१। |
रामाजीपंत हवालदार कोट प्रा। मा। मोकासा होता; त्यांहीं आपणास जामीन मागितला, ते वख्तीं जामीन कोणी न होए. मग आपण तुह्मास जमान देऊन गांवास गेलों तों आपण तक्षीमदार अर्ज पा। व गोत्रज गांव टाकूण गेला व आपण हि गेलों ते जमाणत तुह्मावर पडली. होन २५ पंचवीस त्यास दहा पांच वर्शे जालीं ह्मणून याची दूण गोते देविले होन ५० पन्नास पैकीं आले निसबतीस होन २५ |
यासी गोतें बहुत दिवस जाले ह्मणून दाम दुसार कण तिसार या हिशबी दुगुणी प्रा। देविले. २॥३ अडीच खंडी तीन मण दर खंडीस होन ३० एकूण होन ७९॥ साडे एकुण ऐसी पैकी आपली निसबती बि॥ ऐनखासा जमान माह होन ४॥ पा। होन १५ |
एकूण बेरीज होन १०४॥ एकसे साडेच्यार तुह्मापासून आपणास देविले, ते आपणास प॥ सदरहू होन एकसेसाडेच्यार पैकियावर आण आपली मोकदमी तवरीकबाद तुह्मास दिल्हे असे; आत्मसुखे तुमची खरेदी दिल्हे असे. तुह्मी सुखे मौजे मजकूरची मोकदमी आपले निसबतीची निमे करणें. नांगर व टिळा व विडा पानमान माणनूक हक्क उत्पन्न लेकराचे लेकरीं खाऊन सुखे निमे मोकदमी करणें आपणास निमे मोकदमीसी समंध नाहीं. पेस्तर आपला दाइज व गोत्रिज कोणी उभा राहील तर आपण त्यास वारू व तुह्मास घर सेतवाडा दिल्हा असे. हे आपले लिहिले सही.'
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
सु॥ सन इहिदे खमसैन अलफ कारणें कृष्णाजी बिन सताजी प॥ लोणकर मोकदम मौजे मुंढवे प्र॥ पुणें यासि गोविंद राम देशकुळकर्णी प्र॥ मजकूर लिहून दिले ऐसे जे :- तुमचा भाऊ वालपाटिल बिन दादपाटिल लोणकर हा मौजेमजकूरची मोकदमी पेशजीं करीत होता, यावरी पेशजीं दुकोळ कहर पडला होता, ते वख्तीं वाल पाटिल दुकाळाकरितां उपवासी मरो लागला ह्मणौन मौजे नेरे प्र॥ मा।र एथें आपला बाप रामाजी होनदेऊ होता, त्याजपासीं एऊन निमे मोकदमी पैके घेऊन विकत दिल्ही आणि वालपाटिलें कागद लिहून दिधला त्या कागदाचा इद्रज :-
'श्रीसके १५५३ प्रजापति संवछरे आशाड वद्य १ प्रतिपदा ते दिवसीं राजश्री रामाजी होनदेऊ होनप देशपांडे प्रा। पुणें यासि वालपाटिल बिन दाद पाटिल लोणकर मोकदम मौजे मुंरवे ता। हवेली प्रा। मा।र सन सलासन अलफ कारणें लिहून दिल्हें ऐसाजे :- मोजे मा।रची मोकदमी आपली मिरासी आपला आपला बाप दाद पाटिल यानें संचणी उगवणी बदल लाहूजी पाटिल लोणकर त्यासी निमे मोकदमी दिधली होती. खासा आपणाखाले नांगर टिळा विडा लुगडी दिवाणांतील शवधार व खोबरे याची वाटी व बाजे उत्पन्न व लाजिमेस समाकुल असे आपणाखालें ठेऊन, लाहुजीस निमे इनामती मात्र देऊन निमे मोकदमी दिल्हे. त्याखेरीज त्यास कांहीं नाहीं. असें कित्येक दिवस चालिलें. याहि काल दुकोल प्रजा कुल बेमवसर जाली. गांवचीं कुळें मिरासी गांवीं नाहींत. गांव लागत नाहीं. त्यावर इदिलशाई नामजादी पुणा एऊन बसली. पुणें लुटून जाळून तलक केलें, कोट पाडिला. यावर काळ दुकोळ कहर पडला. दर मणी होन दीड जाला. आपले दाईज व गोत्रीज होते ते सुजोन मेले, व आपलीं माणसें व आपण पोटाविण सुजों लागलों. मग तुह्मापासीं मौजे नेरे प्रा। मा। तेथें आलों आणि तुह्मासीं बोललों जे :- मौजे मुंढवे ता। मा। येथील मिरास मोकदमी आहे दुकलाकरिता आपला हाल कांहीं उरला नाहीं. माणसें व आपण सुजलों आहे. पोटाकारणें बहुत मशागत केली परंतु कोणी हातीं धरीत नाहीं. तर तुह्मी मिरासदार आहां. पेशजीचें तुमचें कर्ज व गहू आहेत व हालीं आपण तुह्मास मोकदमी विकीत होतों तर तुह्माकडून गोत देविले तें आपणास देणें. मोकदमी मौजे मजकूरची तुह्मी करणें. ऐसें तुह्मासि बोललयेयावर तुह्मीं बोलिलेत जे :- ए वख्तीं आपणाजवळ कांहीं नाहीं. तुझी मोकदमी मजला काय करावी ? कांहीं गरज नाहीं. ऐसें तुह्मी बोलिलेत. मग आपण बोललों जे :- तुह्मी जर न घ्याल तर तुमचें कर्ज व जमानतीचे पैके आपणावर असतां आणखास मोकदमी देतां न ये. जर तुह्मी कबूल न करा तर आणखास देईन ह्मणून बोललों. यावर तुह्मी कबूल केलें. मग दहाजण गोत बसोन आपणास खुसी करून मोकदमीचा निरख केला. बितपसील हाली रोख देविले होन
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०.
नकल
१५७३ वैशाख वद्य १
श्रीसके १५७३ खर नाम सवछरे वैशाख वदि १ प्रतिपदा ते दिवसीं हाजीर मजालसी बितपसील
काजी अबदुला बिन काजी महमुद हाकीमशरा प्र॥ पुणें आमाजी नरहरि मजुमदार प्रा। पुणें |
सिद्दी अंबर हवालदार प्र॥ पुणें मालोजी नरसिंगराव व विठोजी नाईक सितोले देशमुख प्रा। पुणें |
विठल मोरदेव देशकुलकर्णी प्र॥ पुणें नाईकवडी चाकर ठाणें प्र॥ मजकूर |
ह्माकोजी पाटिल मोकदम क॥ पुणें कृष्णाजी काळभोर मोकदम मौजे लोणी काळभोर |
राऊतराव | सिवाजी रामजी | पाटिल मोकदम |
जाचक | नाईकवडी | मौजे खराडी |
नाईकवडी | चाकर | मल पाटिल मोकदम |
चाकर | ठाणां | मौजे मांजरी बु॥ |
ठाणा | १ | कोंड पाटिल मोकदम |
१ | ||
राहूजी | माऊजी | |
बाबर | सोरटे | मौजे वडगाव सेरी |
नाईकवडी | नाईकवडी | जैत पाटिल मोकदम |
चाकर | चाकर | मौजे घोरपडी |
ठाणा | ठाणा | |
१ | १ | |
बेणोजी खंडागळा मोकदम मौजे वानवडी |
माल पाटिल मोकदम मौजे कोंढवे बु॥ कृष्णाजी पाटिल मोकदम मौजे कोंढवे खुर्द |
|
सेटे महाजण क॥ पुणें | ||
तानसेट व | बाबजी | जाव पाटिल मोकदम |
मणिकसेट | महाजन | मौजे महमदवाडी |
सेटिये क॥ | क॥ | बापोजी व बालोजी |
म॥ | म॥ | मोकदम मौजे उरोळी बु॥ |
गणसेट सटिया पेठ शहापूर | मोकदम मौजे व-होडें | |
सतपाटिल मोकदम सकराजी | मुंढवेकर | |
बावसाजी जोसी कुलकर्णी | नागोजी | माहादो नारायण |
मौजे हडपसर | हजारा | जोसी |
चौगुला | कुलकर्णी | |
१ | १ | |
भिकाजी मोकदम | रायाजी | चिंतो |
मौजे फुरसंगी | व मोत्याजी लोणकर |
बल्लाल जोसी कुलकर्णी |
१ | १ | |
बापूजी मोकदम | बाके सुतार | कानकोळी |
१ | १ | |
मौजे सांगवड | गोंद माहाला | दसनाक महार |
१ | ||
गणोजी व कनकोजी | बिन मेंग माहाला | |
मोकदम मौजे नेरे | न्हावी | |
१ | ||
बाला गावडा | ||
राविंजकर | ||
धनगर | ||
१ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९.
श्री.
१५६४ ज्येष्ठ वद्य ६
''महजर बतेरीख छ २० माहे रबिलोवल बहजूर हाजीर मजालसी मुकास क॥ खेडबारें
काजी अबदुला बिन काजी महमूद हाकीमशरा व काजी सदर बिन काजी इस्माईल काजी नेब प॥ पुणे बापूजी मुद्गल हवालदार प॥ पुणें मालोजी नरसिंगरा व विठोजी सितोले देशमुख प॥ पुणें कमाजी मोकदम मौजे अतीत प॥ पुणें |
मसुरल हजरती राजश्री दादाजी कोंडदेऊ सुभेदार नामजाद किले कोंडाणा व माहालानिहाय सुंदर हरी मजमूदार प॥ पुणें चाहू पाटिल मोकदम मौजे चिकिली लाखोजी व कभाजी मोकदम मौजे मिर्जे |
सु॥ सलास अरबैन अलफ कारणें महजर केला ऐसा जे. मिरासी बिन मियाजी व अमन बिन चांद मोकदम मौजे कातरज प॥ पुणें हे हरदोजण मौजेमजकुरीचे मोकदमीबदल आपणामध्यें आपण भांडत हुजूर आलेयावरी, साहेब व देसमुख व गोत बैसोनु हरदोजणाचे बोल मनास आणितां, मिराजी बिन मियाजी एणें तकरीर केली ऐसी जे, आपलें घर वडील नांव व नांगर व मानमाननूक आपले वडिलपणाच आपले वडील खात होते वरकड हक्क उत्पन्न निम्में आपले वडील खात असेती व निमें अमनाचे वडील, एणेप्रमाणें चालत होतें. यावरी आपले वडिलामधें व अमनाचे वडिलामधें मारे जाले. तधीपासुनु आपलें व अमनाचे सुरळीत चालत नाहीं. हे आपली तकरीर; सही. एणेप्रमाणें एणें तकरीर केली. यावरी अमनास पुसतां एणें तकरीर केले जे, मिराजीचे घर वडील होए. यावरी मिराजीचे वडील हिसेबी आपल्या वडिलासी वर्तती च ना ह्मणौउनु मिराजीच्या वडिलांत व आपले वडिलांत मारे जाले. तधीपासुनु आपलें व मिराजीचें सुरळीत चालत नाहीं. हे आपली तकरीर; सही. एणेप्रमाणें हरदोजणीं तकरीरा केल्या. यावरी अमनपाटिल बोलिला जे, मिराजीचें घर वडील आहे. मिराजीस नांगर देणें व कागदीपत्रीं आधीं नांव मिराचें व हरएक मानमाननूक व पानें व लुगडीं व वाजंतर व उवालणी टिला व बाजे मान जे मोकदमीचे निसबतीचे असतील ते तमाम आधीं मिराजीस देणें. त्यामागून आपलें नांव व टिलाविडा व पानें व लुगडीं व बाजे जे पान असतील ते तमामी आपणास घेईन व मोकदमीचे निमाचे मौजे मजकुरीं जे काळी व पांढरीस हक उत्पन्न होईल तें दो ठाई बराबरी वाटुनु मिराजी व आपण खाउनु. ऐसे बोलौनु आपले पूर्वजाची भाग ठेविली. यावरी सभानाइकी हरदोजणाचा एणेप्रमाणें निवाडा केला. बित॥
मिराजी बिन मियाजी याचें नांव कागदीपत्रीं मोकदमीचे आधीं लिहीत जाणें व नांगर एकच याणें करावा व दिवाणांतील लुगडीं व पानें व टिला विडा व वाजंत्र व उवालणी व दिवालीचे व हरएक उवालणें व हरएक मानमाननूक आधीं यासी व होलीची पोली आधी एणें बांधावी व कालीस व पांढरीस जो हक एईल तो निमे एणें खावा व माहारहि यासि निमे असे. |
अमन बिन चांद याचें नांव कागदीपत्रीं मोकदमीचे मिराजी मागें लिहीत जाणें व लुगडीं व पानें दिवाणांतील व हरएक ठाईची व वाजंत्र व उवालणी व दिवाळीचें उवालणें व हरएक मानमाननूक हे मिराजीनें आधीं घेणें त्यामागून याणें घेणें व होळीस पोळी मिराजी आधी बांधेल त्यामागून एणे बांधावी. काळीस व पांढरीस जो हक एईल तो व माहार ऐसे निमे एणें खावे. |
एणेप्रमाणें निवाडा केला आहे. एणेप्रमाणें आपलाले लेकुराचे लेकुरीं खाउनु सुखें असणें. यास जो हिलाहरकत करुनु सदरहू निवडिलेप्रमाणें जो वर्ते ना त्याणें दिवाणांत सिसे पांच व होनु पांचसे देणें. हा महजर सही ''
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
पत्नी दुहितरश्चैव पितरौ भ्रातरस्तथा ॥
तत्सुतो गोत्रजो बंधु शिष्य स्र्रह्मचारिण: ॥१॥
पिंडदोंशहरश्चैपां पूर्वाभावे परःपर इति ॥
वृध्दमनुरपि ॥
पत्न्याः समग्रधनसंबंध वक्ति ॥
अपुत्रा शयनं भर्तुः पालयंती व्रते स्थिता ॥
पत्न्येव दद्यात्तपिंडं कृत्स्रमंशं लभेत च ॥
बृहत्मनुरपि ॥
कुल्येषु विद्यमानेषु पितृभातृसनाभिषु ॥
असुतस्य प्रमीतस्य पत्नी तद्भागभागिनी ॥
अस्मिन्नेवार्थे विज्ञानेश्वरस्य उपसंहारफक्किकापि ॥
तस्यादपुत्रस्य स्वर्यातस्य विभक्तस्यासंसृष्टिनोधनं परिणीता स्त्री सकळमेव गृण्डातीति स्थितमिति ॥
ऐसीं वचनें शास्त्रीचीं असेती. तरी शास्त्र व साक्षीप्रमाणें उभे वर्गी वर्तावें. बित ॥
बाजी बिन बानजी रणनोवरे मोकदम यांसि कागदीपत्रीं मोकदमीचे नांव एकच याचेच लिहित जावें व नागर एकच इहींच करावा व दिवाणांतील व हरएक ठाईचीं लुगडीं व पानें व दिवाळीचे व हरएक वाजंत्र व वोवालणें व वोवालणी व पोळियाचे बैल व बाजे मान जे असतील ते तमाम आधीं यास. यामागून कृष्णाजी बिन सिदोजी रणनोवरे यासी. एणेप्रमाणें मानमाननूक घेणें. व हक जो मोकदमीस काळीस व पांढरीस उत्पन जें होईल तें दो ठाई बराबरी करून निमे इहीं खावा व मोकदमास राबता माहार आहे तोहि दो ठाई असे. होळीस पोळी एकींच इहीच बांधावी.
कृष्णाजी बिन सिदोजी रणनोवरे यासी बाजी बिन बानजी मोकदम मागे मानमाननूक कृष्णाजीनें घेणें. मोकदमीचे निसबतीनें हक उत्पन्न काळीस व पांढरीस होईल त्याची निमे एणें घेणें, व राबणूक माहाराची तेहि निमे यास असे.
एणेप्रमाणें निवाडा केला आहे व याखेरीज यांच्या वडिलाचें सेत मोकदमीचें मिरासीचें असेल तेंहि निमे बाजी बिन बानजीनें घेणें, निमें कृष्णाजी बिन सिदोजनें घेऊन लेकुराचे लेकुरीं खाऊन सुखें असणें. यासि जो हिलाहरकती करून निवडिलेप्रमाणे वर्ते ना तेणें दिवाणातु होन ५०० व सिसे पांच देणे, व गोताचे अन्याई. हा महजर सही.''
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
सदरहूजणांसी चांभारकुंड काडुनु, मांगीमाहारीचे वस्त्राची आण घालून, सभानाईकीं ह्मणटिले जे :- बाजी व पुताई मौजे मजकुरीचे मोकदमीबद्दल भांडत आली आहेती, तरी पहिलेपासून यांचे मोकदमीचे बाबें कैसें चालत आलें आहे हें आपलें सत्य स्मरोनु सांगणें. यावरी सदरहूजणी आपलें सत्य स्मरोनु गोही दिल्ही जे :- सिदोजी बिन बाकोजी व बानजी बिन बाकोजी हे दोघेजण सखे भाऊ. वडील सिदोजी, धाकुटा बानजी. यावरी सिदोजीनें धाकटेया भावास बानजीस मोकदमीचे असकेच मान आपले खुसीनें एणेप्रमाणें दिल्हे. कागदीपत्रीं नावनांगर व दिवाणांतील व हरएक ठाईचीं लुगडीं व पानें व दिवाळीचे व हरएक वाजंत्र व दिवाळीचे व हरएक ओवाळणें व होळीची पोळी व वोवाळणी व पोळियाचे बैल व महार व बाजे मान जितुके मोकदमीचे निसबतीचे असतील तितुके तमाम सिदोजीनें बानजीस दिल्हे. याखेरीज काळीसव पांढरीस मोकदमीच्या हाकाचे जें उत्पन्न होईल तें दो ठाईं बराबरी वाटून खावें. त॥
निमें बानजी निमें सिदोजी
एणेप्रमाणें चालत असें. ते दोघेजण मेलियावरीहि बाजी व एसाजी हेहि सरहूप्रमाणें खात असेती. हा आपला इनाम सत्य. एणेप्रमाणें गोही गुदरली व कृष्णाजी पालकपुत्र याचेविशीं बानजी व सिदोजी वरी लिहिलें आहे तेणेप्रमाणें वर्तत होते यावरी उभे वर्ग निवर्तले. त्या उपेरी पुताईचे पोटीचा पुत्र एसाजी असतां पुताईनें पाळकपुत्र कृष्णाजी घेतला, तधीहि बाजी व एसाजी हे दोघे वरी लिहिलेप्रमाणें वर्तत होते. यावरी एसाजी निवर्तलिया उपरीं बाजी ह्मणतो जे :- कृष्णाजी पाळकपुत्र आहे. यास विभाग नेदीं. तरी जर्ही सिदोजी निवर्तलिया- उपेरी त्याचे पोटीचा पुत्र असतां पुताईनें पाळकपुत्र कृष्णाजी घेतला. या उपेरी आपला विभाग भक्षीत असतां पोटीचा पुत्र निवर्तला, तर्ही बानजीचे संततीस सिदोजीचे विभागस संमंधु नाहीं. बानजीचे व सिदोजीचे विभाग पूर्वीच जाहाले आहेती. विभाग जालियाउपेरी विभागाची धनीण सिदोजीची पत्नी पुताई, ते तो विभाग आपण भक्षूं अथवा पालकपुत्रास देऊं, अथवा आणिकास देऊं. ए अर्थी बानजीचे संततीस समंध नाहीं. एदर्थी वचने याज्ञवल्क्य: ॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
निमें आपला बाप बानजी, निमें सिदोजी. एणेप्रमाणें खावें. एणेप्रमाणें दिल्हें. ए बाबेचे गोही वरधोजी अजहातीदार मोकदमीवरी ठेविला आहे तो व गांवांतील मोख्तसर लोक व बलुते साक्षी आहेती. त्यांचे माथा सुकृत घालून गोही पुसणें. ते आपले सत्य स्मरोनु जैसी गोही देतील तेणेप्रमाणें आपण वर्तोन. जरी वर्तो ना, तरी दिवाणचे गुन्हेगार व गोताचे अन्याई; मोकदमीस समंधु नाहीं. एसाजी मेला, आतां बाजी आपणास ह्मणतो जे :- कृष्णाजी पालकपुत्र आहे त्यास वाटा होत नाहीं. आपणच खाईन. ऐसें ह्मणतो. तरी ए बाबें दिन्यानेस्वरीं जैसे असेल तेणेंप्रमाणें व समस्त सभानाईक थोरथोर जैसे सांगतील तेणेप्रमाणें आपण वर्तउनु. ए दोही बाबें तकरीर लेहून दिल्हिया आहेती. एणेप्रमाणें आपण वर्तोन जरी वर्ते ना तरी दिवाणीचे गुन्हेगारीण व गोताचे अन्याईण. हे आपली तकरीर सही. तकरीकर्दे बे।। पुताई सिदोजी बिन बाकोजी रणनोवरे. तकरीर केली ऐसीजे:- आपला दादला व आपला दीर बानजी हे दोघेजण असतां मोकदमीचे काम चालवावयास वरधोजीस ठेऊन मोकदमी दो ठाईं खात असेती. यावरी आपला दादला मेलियावरी आपले पोटीचा मूल एसाजी होता व आणीकहि कृष्णाजी पडतरा यांचे पांचा दिवसाचा मूल आपण घेऊन त्यास पुत्रपणें वाढविलें. तघीं आपले पोटीचा पुत्र यव पालक पुत्र असतां वरघोजीस अजहातीदास ठेऊन मोकदमी दों ठाईं करून खात असो. ए बाबेचे गोही वरधोजी अजहातीदार व गांवीचे लोक मोख्तसर व बलुते साक्ष आहेती. त्यांचे माथा सृकृत घालून गोही पुसणें. ते आपलें सत्य स्मरोनु जैसी गोही देतील तेणेप्रमाणे आपण वर्तोन. जरी वर्तो ना, तरी दिवाणचे गुन्हेगार व गोताचे अन्याई; मोकदमीस समंघु नाहीं. एसाजी मेला, आतां बाजी आपणास ह्मणतो जे: -कृष्णाजी पालकपुत्र आहे त्यास वाटा होत नाहीं. आपणच खाईन.एेसें ह्मणतो. तरी ए बाबें दिन्यानेस्वरी जैसे असेल तेणेंप्रमाणे व समस्त सभानाईक थोरथोर जैसे सांगतील तेणप्रमाणें आपण वर्तउनु. ए दोही बाबें तकरीर लेहून दिल्हिया आहेती. एणेप्रमाणे आपण वर्तेान जरी वर्ते ना तरी दिवाणीचे गुन्हेगारीण व गोताचे अन्याईण. हे आपली तकरीर सही.
एणेप्रमाणें हरदोजणी तकरीरा केलिया. यावरी गोही करणें. मोकदमीचा अजहातीदार मोकदमीवरी ठेविला आहे तो व गांवांतील मोख्तसर लोक व बलुते यांची नांवें बित॥
वरधोजी अजहाती मोकदमी मौजे मजकूर |
मोख्तसर लोक चांगोजी चोरघडा नागोजी दोरगा सोमाजी दोरगा |
बलुते | सोनजी जेधा |
नानावा जोसी व कुलकर्णी | |
लखमा चांभार | |
महार मांया |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८.
(नकल)
श्री.
१५६४ ज्येष्ट शुध्द ११.
''महजरनामा बतारीख ९ माहे रबिलावू बहजूर हाजीर मज्यालस
काजी अबदुला बिन काजी महमद हाकीमशरा व काजी सदर बिन काजी ईस्माईल नेम काजी प्रगणें पुणें |
मसुरुल हजरती राजश्री दादाजी कोंडदेऊ सुभेदार व नामजाद किले कोंढाणा व माहालनिहाय |
बापूजी मुद्गल हवालदार प्रा। पुणें मालोजी नरसिंगराऊ व विठोजी सितोळे देशमुख प्रा। पुणें |
सुंदर हरी मजमूदार प्रा। पुणा रामाजी सितोळे मोकदम मौजे कुरकुंब |
मोकदम मौजे वढाणें | बाबाजी मोकदम मौजे वडवड |
मोकदम मौजे राजेगाऊ |
सु॥ सलास अर्बैन अलफ कारणें महजर केला ऐसा जे :- बाजी बिन बानजी व कृष्णाजी बिन सिदोजी रणनोवरे हे दोघे जण मौजे मलेद प्रा। पुणा येथील मोकदमी बदल आपणामधें आपण भांडत होते. या निवाडियाबदल बाजी बिन बानजी व कृष्णाजी बिन सिदोजीची माय पुताई हे हुजूर आलियावरी साहेब व देशमुख व सदरहू हाजीर मजालसी बैसोन दोघाजणांचे बोल मनास आणितां एणेप्रमाणे तकरिरा केलिया. बित॥
तकरीरकर्दे बे॥ बाजी बिन बानजी रणनोवरे तकरीर ऐसी जे, सिदोजी बिन बाकोजी हा आपल्या बापाचा वडील भाऊ तो आपला चुलता, सिदोजीचा धाकटा भाऊ बानजी तो आपला बा, हे दोघेजण भाऊ एकवट असतां सिदोजी आपला चुलता एणे आपला बाप बानजीस एणेप्रमाणें मोकदमीचें मान दिल्हे. कागदीपत्रीं नांव व नांगर दिवाणांतील हरएक ठाईचीं लुगडीं व पान व दिवाळीचें हरएक वाजंत्र व दिवाळीचें हरएक वोवालणें व होलीची पोली व वोवालणी व पोलीयाचे बैल व माहार व बाजे मान जितुके मोकदमीचे निसबतीनें असतील ते तमाम असकेच आपला बाप बानजीस सिदोजीने दिल्हे. याखेरीज काळीस पाढरीस मोकदमीचे निबबतीनें जे हक व उत्पन्न होईल तें दोघांनीं दो ठाई बराबरी वाटून खावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७
१५६१.
'' तेरीख ६ माहे जमादिलावल बिहुजूर हाजीर मजालस
राजश्री दादाजी कोंडदेऊ | सेख फेरीद मुजावर + + |
सुबेदार नामजाद किले कोंडाणा व महालानिहाय |
राजा क॥ पुणे |
बापूजी व कानजी देसमुख त॥ खेडेबारे वाद पाटिल मोकदम मौजे खडकवासले बापूजी कुलकरणी मौजे माण |
बालाजी पासलकर देसमुख त॥ मोसे खोरे मालजी बिन हिरोजी चौगुला लोणीकालभोर माहाद पाटिल मोकदम मौजे अंजनगाव |
सु॥ अर्बैन अलफ सके १५६१ प्रमाथी नाम संवछरे महजर केला ऐसा जे साहेबांची रजा सादर जाली जे मालजी भोईटा मौजे रावेत प॥ पुणा हुजूर एउनु मालूम केले जे :- मौजे म॥ पाटिलकी आपली मिरासी वडिल घर आपले आहे, आणि आपला दाइज भिलोजी पाटिलकी करितो; तरी त्याची व आपली बरहक मनुसफी करून निवाडा केला पाहिजे. दरीं बाब सरंजाम होए मालूम जाले तरी प॥ मजकुरीचे दाहा गांवीचे मोख्तेसर पाटील व गावीचे कुणबी व बलुते आणून, बरहक मुनसफी करून निवडा करणे, गोताच्या माथां सत्या घालून ज्याची पाटिलकी होईल त्यास देवणे, ह्मणउनु रजा सादर जालियावरी यास व याचा वाद्या भिलोजीस आणुनु हरदोजणास मनुसफीबदल आदबखान राखिले
यावरी हरदोजणी कतबे दिधले जे हेबी हमशाही गांवीचे मोकदम व आपले दाइज बापभाऊ व बलुते ऐसे बोलाउनु साहेबी त्यांस पुसोन निवाडा केला पाहिजे. स्वगोताच्या निवाड्यास आपण राजी आहे. यास हिलाहरकती करील तो गोताचा अन्याई व दिवाणीचा गुन्हेगार ह्मणउनु हरदोजणी कतबे देउनु निवाडियाबदल हरदोजणी गोही नेमिले. बित॥ हमशाही गांवीचे मोकदम.
सिस पाटील मोकदम मौजे धामण १ बाबजी बिन राधा पाटिल भोडवे मौजे मजकूर १ मोकदम मौजे किवळे १ वासभट बिन रामभट जोसी कुलकर्णी मौजे मजकूर १ तान पाटिल मोकदम मौजे चिंचवड १ कोंड पाटिल मोकदम मौजे गहू १ |
तान पाटिल मोकदम मौजे किन्हई १ गोंदजी भोडवा मौजे मजकूर १ तान पाटिल मोकदम मौजे पुनवले १ एम सुतार बि॥ चांगा सुतार मौजे मजकूर १ ताऊ पाटिल मोकदम मौजे ताथवडे १ हिरा माहार मौजे मजकूर १ |
एणेप्रमाणें गोही नेमिले ते बोलाउनु त्यांस चांभाकुंड काढून, जितके पृथ्वीवरी पाप होते तितके तुमचे माथा ह्मणउनु ऐसी आण घालून पुसिलयावरी सदरहू जिणी गोही दिल्ही जे :- याचा मूलपुरुष ह्याऊ पाटिल तो पाटिलकी करीत होता. त्यास दोन फर्जंद २
वडील राम पाटिल धाकटा साक पाटिल
यासि ह्माऊ पाटिल मेलियावरी पडील लेक रामपाटिल तो मोकदमी करू निघाला. धाकटा साक पाटिल त्याण मोकदमी केली नाही यावरी रामपाटिल पडिलियावरी. रामपाटिलाचा लेक बालपाटिल त्याणें मोकदमी केला. धाकटे घर साकपाटिल. त्याच कोन्हे पाटिलकी केली नाहीं. बालपाटिल मेलियावरी त्याचा लेक सीऊपाटिल मोकदमी केली. तै साकपाटिलाचे घरीं कोन्हे मोकदमी केली नाहीं. मग सीऊपाटिलाचे लेक जाऊपाटिल त्याणें मोकदमी केली. दुसरे धाकटे घरे कोन्हे केली नाहीं. यावरी जाऊपाटिल तुटकपणें पोट भरेना ह्मणउनु खालता गेला. यावरी जाऊपाटिलाचे कोन्ही गावावरी नव्हते, यावरी हरिया पाटिल धाकटे घरिचा त्यास हि कधी भोगवटा नव्हता चालिला, व कधी कोन्हे मोकदमी केली नव्हती. हर्या पाटिल मोकदमी करू निघाला यावरी जाऊ पाटिल गांवास आला. यावरी मोकदमी हरिया पाटिल याची यास दिधली नाहीं, आपणच करीत असे, यावरी जाऊ पाटिल मेलियावरी जाऊपाटिलाचा लेक सीऊपाटिल होता त्यास हि दिधली नाहीं. यावरी जाऊ पाटिलाचा धाकटा भाऊ नाऊ पाटिल त्याचे नातू २ दोघेजण हिरोजी व मालजी ह्मणों निघाले जे :- सीऊजीचा मोकदमी हिसेबी होए ते तूं काय बदल खातोस, ते खाऊं नको ह्मणउनु हिरोजीचा व मालोजीचा +++ डबोजी सांगत गेला जे सीऊजीची मोकदमी हिसेबी होऊ तुझ्या घरीं कोन्ही खादली नाहीं. तूं खाऊं नको ह्मणउनु ह्मणत गेला, परी त्याचे ह्मटलें नाइकेंच. मोकदमी बलेच खात असे. यावरी हिरोजी व मालजी ह्मणत असेत जे, तूं खाऊं नको. त्याचेहि ह्मटले नाइकेच. मग हिरोजीनें व मालजीनें हर्या पाटिल व हर्या पाटलाचा फर्जंद ऐसे दों मारिले, आणि मारून मालजी हुजूर जाउनु सदरहूप्रमाणें हुजरून कागद आणिला. तरी हर्या पाटिलाचे घरे कोन्ही मोकदमी खादली नाहीं. आणि हर्या पाटिल मोकदमी करूं निघाला ह्मणौउनु सीउजीच्या घराण्यांतील हिरोजी व मालजी तिहीं हर्या पाटिल व हर्या पाटिलाचा लेक मारिला आतां हर्या पाटिलाच्या फर्जंदासी मोकदमीसी कांही समंध नाहीं. तिही आपलें सेत कुळवाडी करून असावे. मोकदमीची नांव गोष्ट करील तरी गोताचा हा अन्याई व साहेबांचा गुन्हेगार. हिरोजी व मालजी हे सीऊजीच्या घराणांतील, पण मोकदमीचा धणी सीऊजी. सीऊजीनें आपली मोकदमी करावी नांव नांगर व टिळा विडा व मान माणुसकी व इनामती जें असेल तें साऊजीचें साऊजीनें खाणें. हिरोजीनें व मालजीनें सेत कुळवाडी करून सुखें असावे. हिरोजी व मालजी इही पाटिलकिची नांव गोस्ट करितील तरी गोताचे अन्याई व दिवाणीचे गुन्हेगार हा महजर सही.''
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६
१५६० माघवद्य ७.
(तालीक)
+ + + + बहुधान्य संवछरे माघवद्य सप्तमी बृहस्पतिवार सुहुरसन तिसां सीसन अलफ छ २० माहे सवाल बिहुजूर
ठाणे कर्याती सासवड | |
त्रिंबक मलनाथ हवालदार शिक्का |
राजश्री नागोजी दादो मुजुमदार |
बाजी व ताऊजी देशमुख शिक्का |
होनाजी व हिराजी मोकदम क॥ मजकूर |
गोविंद त्रिमळ देशकुळकरणी | संतसेटी व तुकसेटी सेटिये व संतसेटी महाजन |
प्रा। पुणे | |
मौजे गराडे | मौजे चांबली |
धाक मोरोजी पाटिल मोकदम काऊ प॥ घारा चौगुला मौजे हिवरे |
चाऊ पाटिल मोकदम मौजे भिवंडी |
दसप॥ सोनाजी मोकदम गोमाजी निभोरा चौगुला |
जयंतप॥ मोकदम रावजी व राघोजी चौगुला चांदजी चौधरी |
मौजें काढीत कर्यातीं मजकूर | |
बाबाजी राजिवडा तुक पाटिल फंड | भिकाजी राजिवडा चौगुला |
सोमाजी दादो कुलकर्णी व जोसी | हरजी दिघा |
लुख माहाला न्हावी व कान्हो माहाला | राम दरणा गुरव |
न्हावी | नाऊ सुतार |
बहिरो कुंभार भिका बिन काळा | महार विर्तीकार |
भाऊ परिट | भिका बिन काळा बंका |
सोम ठाकूर |
सदरहू काळी व पांढरी दो ठाई केली असे. बापदेवाचे उजवीकडे गाधा या दुतर्फा जमीन मौजे कोढीत कर्यात मजकूर केले. तमाम मौजे मजकूरचे भूमगणे थळे सखर निखर पाहून, मनास आणून मौजा अज कास रुके .। =
दो ठाई काळी व बरड बरहक केले
तपसील
तरफ सूर्याजी बिन दाद तरफ सूर्याजी बिन माहाद
सदरहूप्रमाणें बारहक वाटून दिल्हे असे. एणेप्रमाणें वर्तावयास जो हरकत करील तो दिवाणाचा गुन्हेगार व गोताचा अन्याई. केले मोडील त्यास नवखंडी याची क्रिया मोर्तब असे.
पहिले जे कागद निवाडियाचे असतील ते रद असेती. मोर्तब असे.
तेरीख छ २० माहे.
रबिलावल