एकूण रुपये एक्याणव व गला खंडी १॥ दीड याची पटी घेऊनु दादोवाचे देणें राहिले आहे त्याचा जागा कुलारग आहे कुलारगाचा बाकीचा कागद मुकाम कोट गऊ तेथे कुलाकर्णीयाने नि॥ माऊ माळी व नि॥ मोकदम दिधला आहे तेणेप्रमाणे त्याकुळानी मुदल व कलोत्तर जो हिसोब दादावा नाइकाचा खतप्रमाणे होईल तो दादावास नि॥ माळी व मोकदम देऊन खत फाडावे नि॥ माळी व मोकदम कलम १
कि॥ कलम सन सबैनामधे गलबला जाला ते वख्ती मोगलाचे ठाणे उठिले र॥ साहेबाचे लोक आले त्यास र॥ संताजी जगथाप व राजश्री खंडोजी जगथाप तिहीं गावामध्ये पैकियाबदल स्वार पाठविले त्या स्वारानी गावामधे बहुत मारामारी केली त्यास पैकेकर्ज घेउनु दिल्हे त्या कर्जाची पटी जाली नाही. कर्जदाराची नावे ए॥ बेरीज
नख्त होनु १२ एैन जिन्नस. |
|
गलाखंडी गहू ७ |
गूळखंडी ४ |
जानसेटी बतीर क॥ पुणा याजपासून घेतले होनु १६। त्याचा काढा त्यास देउ केला बि॥ |
गणसेटी वाहकरी क॥ पुणा याजपासून घेतले होनु १५ घेउनु दिवाणात दिल्हे त्याचा काण त्यास देऊ केला बि॥ |
गलाखंडी | गूळखंडी | गलाखंडी | गूळखंडी |
गहू ५ | २ | २ | २ |
कि॥ कमल सिवाजी बाबाजी यास हुजरातीस सबनिसीची पारिखी होती त्यास सिवाजी बाबाजी पुण्यास आला होता याणे आपल्या मुशाहिर्यात होनु १२ संताजीपाशी वरात मागितली त्याणी मौजेमजकुरीचे होनु १२ सुभा जमा धरून सिवाजी बाबाजीस गावावरीच देविले गावास खंडणीमधे मजुरा पडिले सिवाजी बाबाजीस पावले नाहींत होनु १२
एकूण होनु १२ बारा व गला व गहू खंडी ७ व गूळ खंडी च्यार ए॥ कलमे २ याची पटी करूनु सदरहू देणेदार वारावे तो तिघे भाऊ माळी आपणामधे आपण भांडो लागले त्याकरिता पटी ठेऊनु देणेदार वारावे ते वारिले नाहींत ए सालीचे कुलकर्ण पिलाजीने चालविले आहे त्याची पटी नी॥ माळी मोकदम करावी आणि कर्जदार वारावे वरातीचे होनु बारा घ्यावे नि॥ मोकदम ९ माळी वारावे कलम १ कि॥ कलम मोकदम व कुलकर्णी औरंगाबादेस देसका ब॥ गेले होते तेथे मोकदम व कुलकर्णी यास खर्च जाला आहे त्याचा हिसोब गु॥ पदाजी मोकदम मौजे पोचे गु॥ माळी निमे मोकदम यास समजाविला आहे बि॥ खर्च रुपये
४॥ नि॥ मोर मोकदम
२१॥ नि॥ माळी निमे मा।
८॥ नि॥ कुलकर्णी
-------
३४॥
एकूण रुपये साडेचवतीस याचा जागा णावनि॥ ने करुनु देसपांडिये त्याचे कर्ज फेडावे नि॥ मोकदम व निमे मोकदम माळी -----------------------
कलम सन सबैन
कि॥ कलम सन समानामधे विस्णु बनायक डांगरा सेफीन पुणे याचे कर्ज पेसजीचा हवाला घेतला आहे त्याचे कर्ज पटीस घालून जागा तोडिला आहे नि॥ माळी कर्ज बेरीज होनु
२७ मुदल
७॥ कलोत्तर
-------
३४॥