Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६१
श्रीगणेशाय नमः
श्रीभोवानी प्रसन्न
यादीदास्ती जागीर माहादाजी निंबाळकर पैकी खालिसा.
लेखांक ६२
श्रीराम.
यादिदास्त कानू मलिकअंबर व तनखा मोगलाई प्रा। पुणे सरकार जुनर मो। होन प॥ ९०६३२॥। = । वजा सोडीपायपोसी खर्चपटी.
डीपायपोसी खर्चपटी | सो व॥ मोईन प॥ |
७०००![]() |
८३६३२![]() |
दर होनास रुपये ३॥। प्रमाणें तनखा दिवाण मोगलाई | रुपये |
३३९८७६॥।.॥ | |
देह बदेही देहे २९० मो। कानू होन प॥ |
(पुढें गहाळ)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६०
(प्रारंभ गहाळ)
कागद तान्हाजीराम देसपांडिये पिसरानि मोरो तानदेऊ देसपांडिये यांसि देत गेलों नजरबाद लिहिली नाहीं तान्हाजीराम व मोरो तानदेऊ होनप देशपांडिये व नामाजी लांडा गुमास्ता हयातहकजा इंलाही फौत गुदरोन गेला बादज चंद रोज फर्जंदानी नामाजी गुमास्ते बइसीम आपाजी व तुकावा व अंतावा व यादव व रंगावा यैसे सदरहू दर सरकार सीवाजी भोसले नवकर सूद यादो नामदेऊ ममलकतमदारुलमाहामीं दिवाण संभाजी राजे भोसले दीगर बिराजरान आपाजी व अंताजी दर कार मुलिकगिरी व लस्करगै मामले करून बख्तावार होऊन आपलें वतन ह्मणौनि जोरावारी करूं लागले दीगर हिमाती निलो सोनदेऊ अज दिवाण सीवाजी राजे भासले यांचे सगे खेश सोइरे सदरहू अंमल फैला असतां दिलीहून पातशाही फौजा दक्षणेवरी मोहीमदारी कामा नबाब उमदतुलमुलुक अमीरउमराये दर कसबे पुणे दाखल (जाले) सा तरीके बाबाजीराम देसपांडिये असतां तमाम मोकदम व रयां कर्याती मावळ एऊन रुज होऊन मुलाअजमती व कौल सिरपाव सरफराजी जाली हक व लाजिमे सिरस्ते कागद तरफ मजकूर मुतसरफ असतां आपाजी व तुकावा पिसर नामाजी लांडियास मोकदम व पटवारी ह्मणत असेती कीं हक लाजिमा सिरस्ता कागद बाबाजीराम देसपांडिया कर्याती मजकूरीचा घेत असतां तुह्मी आह्मांसि नाहक घसघस करितां तरी हे गोष्टी वाजिब दिसोन येत नाहीं तों नवाब अमीरउलउमराये बमै सुबे मुलाजमत हजरती देहली कुच होऊन दिलीस गेले तो सुभे मिर्जा राजा पाईन केले पुरंधर बमै लस्कर घेरा घालून सिकिंदा केला ते वख्ती सिवाजी राजे भोसले मुलाअजमतीस एऊन किले व मुलूक दौलतकाहिरे मुबारक दाखल जाला तमाम जमीदारानी व देसमुखानी व देशपांडियानी व मोकदमानी प्रगणे पुणा व कर्याती मावळ व बारा मावळे ते वख्ती बहुजूर मिर्जा राजा व सिवाजी राजे अर्जदास बुलईल तमासा करून वतन होन ३००००० तीन लाख बर करार जाले पैकी अज दुमाले वतन कर्याती मावळ दाखल केले ते वख्तीं मोरो विठल व बाबाजीराम देसपांडिये याणी सिवाजी राजे साहेबांस अर्ज केला कीं तरफ कर्याती मावळ देसपांडेगिरी अहद (पुढें फाटलें आहे) हमेशा होत गेला बाद अज सिवाजी राजे फौत होऊन कैलासवास केला तो यादव पिसर नामाजी नोकर संभा भोसले बमै लस्कर चंदी व करनाटक मुलूक ताख्त ताराज करून जमीदार व पुंड पाळेगार यांचे सिरी तोफ ठेवितां दरमियान यादो नामदेऊ बखतवार होऊन मुदमगीम मबलग नजरबांदके लागली तो आपले करमबंदगेस मुखताले ए जिल्हे अज लस्कर मनूर ज्याफर असरके अवलियाये दौलतकाहेर मुकाम फर्मूद होउनी यादी अवरंगाबाद असतां सुबे गाजुद्दीखान बहादूर फेरोजंग दर पुणे आमदरफ्त सा तरीके बाबाजीराम देसपांडे तमाम मोकदमानी प॥ पुणे व कर्याती मावळ मुलाजमत बंदगानी नवाबसाहेब कौल सिरपाव व सरफराजी बवख्त हक व लाजिमा व सिरस्त कागद दस्तू साबीक बाबाजीराम देशपांडिये अमल दखल करून मुतसरफ असतां विजापूर व भागानगर फते करून सन १०९९ रायात अलियात बंदगान हजरती दिलसुभानी दर मौजे तुळापूर मुकाम जाला तमाम जमीदारानी व देसमुखान व देसपांडियानी व मोकदमानी व रयानी पा। पुणे व बारा मावळे वगैरे दर कचेरीवाला रुजू होऊन अरबाब अदालती बादरगाह अस्मान ज्यांहा दिलसुभानी बाहदूर करामतगदूर मुलाजमती होऊन सिरपाव व कौल सरफराजी जाली मं वख्ती हमराह देसमुखानी करजवणे व पायगुडे क॥ मावळ वगैरा विठल व रामचंद्र बावाजी देसपांडिये होनप ता। मजकूर सिरपाव व कौलसरफराजी जाली ते वख्ती आपाजी पिसर नामाजी हाजीर होता त्यास कर्याती मावळीचे देसमुख व मोकदम पटवारी ह्मणो लागले की (पुढें गहाळ)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५९
श्री.
हकीकती मोकदमी मौजे वडिगांव ता। नीरथड प्रा। पुणें मोकदम कदीम चोथे मचलियानी मारून काढिले मग मचाले करीत होते त्यावरी मचाले निंबाळकर वणंगपाळ यांनी मारून काढिले मग त्या निंबाळकरानी राजाळेकर निंबाळकर आले त्या घरास विठोजीस पाटिलकी दिधली त्यास विठोजीस पांचजण लेक वडील कान्होजी.
वडील कान्होजी | संताजी | मालोजी | निंबोजी | खंडोजी |
१ | २ | ३ | ४ | ५ |
यामध्ये कान्होजीचें बुडालें व निंबोजी व खंडोजीचें बुडालें यांमधें विठोजीचा चुलतभाऊ डाकोजी याचा लेक सिदोजी धाकटा त्याचे लेक मानाजी व सुभानजी हे दोघे जण हैबतरायाबराबर असती यांचा परामृश करणे सिदोजी निंबाळकर सदरहू संताजीचा लेक त्याचा यमाजी हाली असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५८
श्री.
कुलकट कसबे सासवड येथील व पाटिल जगथाप व कुलकर्णी व देशकुलकर्णी निजामशाही कारकीर्दीस मलिक दादर हवालदार किले पुरंधर याचे बापास आवशाचा हवाला होता त्यांचे कारभारी लाखोपंत आत्रे व रायबेल पातशाहा वेदरचा त्याजपासी ज्यामत पाटिल बिन हर्या पाटिल चाकर होते तेव्हां शाहाची दाई होती तिला बारा गांव मोकासा होते तिणे ज्यामतपाटलास व लाखोपंताचे पुत्र विठलपंत यांस मलिक दादराबरोबर देऊन बारा गांवचा अंमल करावयास सांगितला त्याणी एक साल अंमल केला दुसरे सालीं दाईजवळ अर्ज करून वतन मागितलें तेव्हा दाई बोलिी कीं नजरसिवाय वतन कसे होतें मग या दोघानीं दाईजवळ नजर अडीचशें होन करार करून देशमुखी व देशकुलकर्ण हीं दोघांनी दोन वतनें करून घेऊन पातशाही फर्मान करून घेतलें आणि स्वार ठेऊन जबरदस्तीनें गांवावर चढाई केली गांव बितपसील.
मौजे खलद प्रांत पुणें १ | मौजे कोढीत बुद्रुकु प्रांत पुणें १ |
मौजे दियें प्रांत पुणे १ | मौजे सासवड प्रांत पुणें १ |
मौजे बेलसर पो। सुपें १ | मौजे बाबुर्डी पो। सुपें १ |
मौजे कारखेल पो। सुपें १ | मौजे माढवें पो। सुपें १ |
मौजे काळोली पो। सिरवळ १ | मौजे रांक पो। सिरवळ १ |
मौजे मोरवें पो। सिरवळ १ | मौजे पिंबुर्टी पो। सिरवळ १ |
एकूण बारा गांवावर चढाई केली पैकीं मौजे मारवें व मौजे पिंबुर्टी हे दोन गांव हस्तगत जाले नाहींत बाकी दाहा गांव हस्तगत करून देशमुखीचा व देशकुलकर्णाचा अमल बसऊन मौजे संवत्सर प्रांत पुणें एथें आले तेव्हां उभयतांनीं विचार केला कीं या दाहा गांवांत एक कसबा असला पाहिजे तेव्हां पुणेंप्रांतींचे गांव मोडिले बितपसील.
मौजे संवत्सर १ | मौजे हिंगणें १ |
मौजे सरंडी १ | मौजे सासवड १ |
मौजे तरंडी | लग ० |
मौजे पिंपळगाव १ | लग ० |
एकूण साहा गांवची जमीन एक करून एक सासवड कदबा व पेंठ सोमवार ऐसें केलें त्याचा संवत्सर शके १४०१ विकारी नाम संवत्सरी कसबा केला सदरहू साहा गांव मोडिले तेथील पाटिलकी कुंटे यांची व कुलकर्णी गिधवे व ज्योतिषी राखे असे होते पैकीं जगथापाचे कुंटे मावसभाऊ होते ते जगथापानीं बाहेर घालून पाटिलकी व देशमुखी करूं लागले गिधव्यांचें संतान नाहीसें जालें एकच ह्मातारा निपुत्रिक होता त्यांचे वतनाचे गांव आठ होते त्यापैकी सदरहू गांव पुणेंप्रांतींचे मोडले ते सहा व सोनोरी व दिये हेही पुणेंप्रांतींचेच दोन एकूण आठ त्या पै॥ गिधव्यांनीं आपली कन्या पानसियांसी दिल्ही होती तिजला आंदण दिल्हे गांव सोनोरी व दिये हे दोन गांव दिल्हे बाकी साहा गांव मोडले सबब कुलकर्ण मौजे सासवडचे करीतच होता कितेक दिवस त्याणें कुलकर्ण केलें मग त्याजला बुध्दि काशीयात्रेस जावें असी जाली तेव्हां विठलपंत आत्रे याजपासून कांहीं द्रव्य घेऊन कुलकर्ण त्याचे स्वाधीन केलें आणि काशीयात्रेस गेला तेव्हांपासून आत्रे याचें कुलकर्ण कसब्याचे जालें राखियाचें ज्योतिष कसबे मजकूरचें त्यास राखियाचा हि वंश बहुत नव्हता परंतु राखियांनीं जगथापाची देशमुखी पाटिलकी व आत्र्याचें कुलकर्ण देशकुलकर्ण जालीयावर बहुत दिवस त्याची ज्योतिष केलें त्यांत एकच पुरुष राहिला तो काळादुकाळामुळें उठोन गेला तेव्हां गांवाचे ज्योतिषपणाचें वतन चालवावयास कोणी नाहीं तेव्हां देशमुखांनीं व देशकुलकर्णियानीं विचार करून पुरंधरे यांचे हवाला केलें जे समाईं जगथापानीं देशमुखी व आत्रे यानीं देशकुलकर्णीपण साधिलें ते समई बरोबर जे जे कामाकाजास आले त्यांस वतनें करून दिल्हीं बितपसील.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५७.
श्री.
यादी पेठ नारायणपूर किले पुरंधर एथील सेटियापासी कागद साधनाचे आहेत एणेप्रमाणें.
वराता व पावत्या आहेत एणेप्रमाणें.
कित्ता कागद सन मया व अलफ ११०० यास सन खमस समानीन
मया व अलफ या साला पावेतों वर्षे ८५ त्यांत अन्वय.
रामचंद्र नीळकंठ अमात्य याणी छ १५ जिलकादी बाळाजी विश्वनाथ सरसुभेदार यास पत्र लिहिलें त्यांत अन्वय कीं बाबसेटी सेटिये बिन गोपाळसेटी सेटिये इ.इ.इ.
बाळाजी विश्वनाथ सरसुभेदार व कारकून प्रा। पुणें व माहालनिहाय यांचें पत्र माणकोजी बिन दतसेटी सेटिया पेठ नारायणपूर ता। करेपटार यास आहे. त्यांत अन्वयकीं सालगुदस्ता सन तिसामध्यें राजश्री पंतसचीव यांचें आज्ञापत्र सुभाच्या नावें सादर आहे तेथें आज्ञा कीं इ.इ.इ. छ ५ जिल्हेज, सन मया व अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५६.
+ + + + + + + + + सिरपावं काजकीर्द माहाराज छत्रपति व बाजीराव व चिमाजीआपा ता।
मौजे वरवड ता। पाटस गाव स॥ मोकासा मातुश्री राधाबाई यास यांचे तरफेनें कमावीस र॥ नारो बाबाजी ते वेळेस फिरंगोजी प॥ व बाबाजी प॥ देईकर यांस सिरपांव.
मौजे खडकी त॥ पाटस र॥ बापूजीपंत नाना दि॥ पेशवे याच्या वेळेस खंडणीस मकाजी प॥ काके यानीं यावें सिरपावं द्यावा.
मौजे सोनवडी हा गांवहि मोकासा मातुश्री राधाबाई पेशवी यास ते कमावीस नारो बाबाजी तेव्हां बाबाजी देईकर कारभार करीत होता हाली जयापा सिंदे मोकासा दरोबस्त हरबाजी प॥ पोवार कुळकर्णी गटाणे मौजे दउंड
मौजे दहीठाणे त॥ पाटस माहाराज छत्रपति याणी दरोबस्त गांव मोकासा फत्तेसिंगबावास दिल्हा.
मौजे आठगांव तरफ पाठस निमे पाटिलकी वडीलपण माहाराज छत्रपति निमे दरेकर चौगुले च्यार होने मोरे बाराते आगस्ते ए॥ सिरपावं ६ कुलकर्णी राज्यउपाध्ये.
मौजे सिरापूर पाटिलकी निमे र॥ रघूजी भोसले आधी सिरपावं या मागे सिरपावं माहाराज राजश्री छत्रपति माहाराज त्यांचे तरफेनें राजजी प॥ ठोंबरा कारभार करीत होता रघूजी भोसले यांचे तरफेनें बापुजी भोसला होता व कुलकर्णी राज्योपाध्यें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५५.
ताराज मुलुक होता ते वख्ती मुकासी साहेब मलिक नेब व शाहाभाई खोजे सदरेस बैसोन देसमुख व देसपांडे मोख्तसर बारा गावीचे बोलाऊन पातशाही हुकूम वाचिला ते वख्ती बोलिले जे जागा जागा चारणकरू वाडे घालून बैसले आहेत त्यास बोलाऊन आणने. त्यावरून जे चारणकरू वाडे घालून होते ते हाजीर जाले त्यास हुकूमप्रमाणे दिवाण बोलिले जे त्यास हुकुमाप्रमाणे वतन करून देऊन कीर्दी अबादानी करणे. ते वेळेस विठोजी व माहादजी गरूड उभे राहिले. अर्ज केला की आपणास वतन करून दिल्हे पाहिजे ह्मणौन अर्ज केला. त्यास देसमुख व देशकुलकर्णी यानी दिवाणास अर्ज करून बेलसर कर्यात सासवड येथील मोकदमीची सनद करून दिली. सिवधरा पेडोला घालून दिल्हा बारा बलुते मेलऊन गाव आबाद करून हकलाजिमा खाऊ लागले. यावर बहिरजी गरूडढ मोकदमी करीत होता तो ह्मातारा जाला. कसाला उरकेनासा जाला. याबदल माउजी माली व काउजी भाली हे दोघे भाऊ मुतालिक ठेविले. बावाजी गरूड याचे लेक मलिक अंबर साहेबापासी चाकरी करीत होते ते जंजी पडिले. खबर गावास आली ह्मणौन मालियानी दुखवटियाचे जेवण केले. ते वेळेस ४२ बेतालीस माणूस मारिले. आपण पलोन गेले. दरोडा पडिला ह्मणौन नाव केले. मारा जाला ह्मणौन गाव वोस जाला तेव्हा देसमुख व देसकुलकर्णी याणी कौल देऊन गावास आणिले. त्यावर विज्यापुरी संभाजी गरूड होता त्यास खबर कळली. तो तेथून गावास आला त्याणे पुसिले जे तुह्मी मुतालिक गावात असता मारा काय बदल जाला ? त्यास त्याणी फिरोन जाब दिल्हा की तुझा मुतालीक कोण ? आपण खावंद आहो. त्या दिवसापासून वेव्हार लागला. मग त्यवर्त देसमुखापासी ठाणा गेले. तेथून मिरासाहेब पुणा होता त्याजवळी उभे राहिले. तेथू खुर्द खत घेऊन मौजे बेलसरचे पांढरीवर श्रीसिधेश्वरापुढे दिव्य केले. खरा जाला हाती पिसविया घालून श्रीच्या दरशनास जेजोरीस गेले. तेथून साकुर्डियावरून सिवरीस गेले. तेथे एक माहार व दोघे कुणबी घेतले व सदूभाई व मिराभाई बराबरी होते ऐसे सासवडास जाता वाटेत खलदर्या रानांत चिचलियाजवळी मालियानी दबा धरून संभाजी गरूड यास मारिले. यावर कितेक दिवस वेव्हार राहिला. त्यावर विज्यापुरी याकूदखान होते त्याजवळी खंडोजी व काउजी गरूड उभे राहिले. त्यास माली गैरहाजीर जाला. यावर बाजी नाईक देसमुख व रामाजी त्रिमल देसपांडे कर्यात सासवड याणी हाती धरून गावास आणिले. त्यावर विल्हे करावी ती केली नाही त्यावर मौजे गाधडी उर्फ सिकरापूर तेथे गरूड उभे राहिले वेव्हार केला तेथे हि माली गैरहाजीर जाला. त्याजवर राजश्री छत्रपती स्वामी थोरले कैलासवासीचे कारकीर्दीस राजश्री बाजी घोलप व हवालदार किले पुरंधर व त्रिंबक गोपाल सुभेदार प्रा। पुणे यानिध वेव्हार केला परंतु निवाडा जाला नाहीं. त्यावर कारकीर्दी मोगलाई जाली. तुलापुरास हजरत पातशाहा होते त्याचा हुकूम अमीन कर्डे व सासवड या दो माहालास एक होता त्यास आणून दिल्हा त्याणी जावजी माली जगथाप यास आणून करीना मनास आणावा तो जावजी माली गैरहाजीर जाला. त्यावर राजश्री संताजी घोरपडे सेनापती त्यापासी आपण जाऊन उभे राहिलो. सेनापतीनी रामाजी माली व मैसा माहार व देसमुख देसपांडे व पाटील कर्यात सासवड हे बोलाऊन आणून जमानती घेऊन गोत दिल्हे तेथून गैरहाजीर जाला त्यावर माउजी नाईक देसमुख व भगवंत कासी देशुकुलकर्णी व फिरगोजी पाटील क॥ सासवड याणी हाती धरून आपणास क॥ मजकुरास आणिले परंतु विल्हे केली नाही. यावर राजश्री नरहर आपदेऊ सुभेदार प्रा। पुणे यापासी उभे राहिलो. परंतु निवाडा जाला नाही. त्यावर राजश्री राजाराम छत्रपती स्वमी यापासी जाऊन उभे राहिलो. त्याणी राजश्री संकराजी पंडित सचिव यास आज्ञा केली जे याचा निवाडा करणे. त्यास राजश्री सचिवपंतीं देसमुख-देशपांडे यांस हुजूर आणून करीना पुसिला आणि राजश्री बालाजी विश्वनाथ सुभेदार प्र॥ पुणे यास आज्ञा केली. त्याणी समस्त गोत मेलऊन मनसुफी करीत होते. त्यावर तान्हाजी माली राजश्री पंतसचिव यापासी जाऊन फिर्याद जाला की साहेबी आपणापासी निवाडा करावा त्यावरून राजश्री सचिवपंती हुजूर बोलाऊन नेले देसमुखदेशपांडे व राजश्री जाधवराऊ सेनापती व राजश्री मल्हारराऊ बाबाजी व बजाजी नाईक निंबालकर व गोत ऐसे बैसोन गोताच्या गला बेलाच्या माला व भंडार व तुलसी माथा ठेऊन पुसिले. त्यास गोताने दोघापासून राजीनामे व तकरीरा घेऊन जमान घेऊन मनास आणून गोताने सांगितले की गरूड खरा आहे यापासी मलिक अंबर याची कारकीर्दीस मुलुक वैरान जाला होता त्या समईची सनद आहे व मारा हि खरा जाला आहे व झगडा हि साथत आला आहे ह्मणौन सांगितले. त्यावरून पांढरी व काली दो ठाई करून तश्रीफ देऊन गावास पाठविले. त्यावर अजमगडी खान सैद किलेदार याणे बोलाऊन नेऊन नारायणपेठेस करीना मनास आणून निवाडा केला. देसमुखदेशपांडे व गोत मेलऊन हकीकत मनास आणिली तेथें खरे जालो. त्याणी पांढरी व काली दो ठाई करून दिली आणि कौल देऊन सिरपाव दोघास देऊन मौजेमजकुरास पाठविले. त्यावर राजश्री पंतअमात्यास जिल्हे जाली ते समई हरदोजणास बोलाऊन नेऊन निवाडपत्र मनास आणिले व त्याचे तर्फेने रामाजी बाबाजी सुभेदार प्रा। पुणे होते त्याणी मनास आणून राजश्री अमात्यपंताचें पत्र व सिरपाव देऊन रवाना केले. यावर प्रतापगडीचे मुकामी महाराज राजश्री शिवाजी राजे छत्रपती याजपासी माली जाऊन उभे राहिले त्यावरून आपणास तलब करून हुजूर नेले मग राजश्री स्वामीनी तान्हाजी माली यास हुजूर नेऊन आपला व मालियाचा करीना मनास आणून माली खोटा जाला, आपली पत्रे मनास आणून मनसुफी करून आपणास पत्र करून दिल्हे. तश्रीफ देऊन गावास रवाना केले. मग राजश्री बालाजी विश्वनाथ व खंडेराऊ दाभाडे यास आज्ञा केली की काली पांढरी दो ठाई वाटून देणे. त्यावरून देसमुख व देशपांडे व गोत व खानचंद किलेदार याचा अमीन मेलऊन राजीनामे तकरीरा घेऊन गाव दो ठाई वाटून दिल्हा. यावर महाराज राजश्री शाहूराजे छत्रपती स्वामी याणी करीना मनास आणून पुर्वील पत्रे मनास आणून आपले पत्र करून दिल्हे. आपला करीना ऐसा आहे हे तकरीर केली सही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५३.
तारीख १६५४ कार्तिक शुध्द १३
खरीदीखत श्रीशके १६५४ परिधावी नाम संवत्सरे कार्तिक सुध त्रयोदसी सुक्रवार त दीनी खरीदी खत लिखीते खरीदकर्दे राणोजी बीन जनकोजी पाटील सीदे साकीन कन्हेरखेड समस्त कोरेगाऊ प्रांत वाई यासी फरोक्तकर्दे सूर्याजी बीन कोडाजीये बीन रखमाजी व त्रीबकजी बीन रखमाजी पाटील राजवडे मोकदम मौजे आऊध तर्फ हवेली प्रांत पुणे सु॥ सन सलास सलासैन मया व अलफ सन हजार ११४२ कारणे खरीदखत लेहोन दिल्हे ऐसेजे आपणावर कर्ज बेमोबलग जाले फेडावयास ऐवज नाहीं व पेसजी वतनामुले कित्येक खाले पडिले यामुले आपली नातवानी बहुत झाली याकरितां आपण तुमच्या गला पडोन तुह्मास भाऊ केले आणि आपली मोकदमी मौजे मजकुरीची दरोबस्त आहे त्यापैकी निमे मोकदमीचे वतन खुष रजावंदीने विकत दिल्हे किमत रुपये करार करून सदरहू रुपये घेऊन मिे मोकदमीचे वतन तुह्मास विकत दिल्हे असे. याउपरी पांढरीची लावणीसंचणी तुह्मी व आपण करून सदरहु वृत्तीच्या मानापानाची वाटणी तुमची आमची एणेप्रमाणे बि॥
नाव नागर | |
राणोजी बिन जनकोजी पा। सिंदे निमे मोकदम |
सूर्याजी बिन कोंडाजी एबिन रखमाजी व त्र्यंबकजी बिन रखमाजी पा। राजवडे निमे मोकदम |
नि॥ नांगर |
सीरपाउ दिवाणीचे पागोटी दोघानी बराबर घ्यावी व विडे बरोबर १
गावात कुळास कउल देणे अगर गावातील टिळा विडा आधी सिंदे मग राजवडे. १
अर्जदास व कागद हरकोण्हास लि॥ तो सिंदे व मागून राजवडे या पधतीने ल्याहावा १
नागपंचमीस वारुळाची पूजा आधी सिंदियाच्या बाइकानी करावी, मग राजवडीयाच्या बाइकानी करावी १
सिरलसेटी आधी राजवडे याचा पुढे चालावा, मागे सिंदीयाचा चालऊन नदीत टाकावा १
गणेशचौथीचा गणेश पुढे राजवडीयाचा मागून सिंदियाचा १
जोसियाचे पातडे :- दसरा व गुडियाचा पाडिवा आधी सिंदे मग राजवडे दिवाळी व संक्रांती आधी राजवडे मग सिंदे.
दसरियाचे आपट पूजन दोघानी बराबर करावे १
संवत्सर प्रतिपदेस आढियाचे पूजन दोघानी बरोबर करावे १
घरठाणा वाडा. आपला मोकदमीचा आहे तो निमा उजवीकडे आपला आपले डावीकडे निमे तुह्मास दिल्हा १
पोलियाचे बैल बरोबर दोघाचे चालावे उजवीकडे सिंदे डावीकडे राजवडे १
दिवाळीचे ओवालणे वाजंतर आधी सिंदे मग राजवडे १
दरनागराची पूजा दोघानी बरोबर करावी १
कुंभारानें मातीचे बैल पोलियाचे दिवसी दोघास दोनी बरोबर आणून द्यावे १
दसरियाचे वाजंतर आदी राजवाडे मग सिंदे १
दसरियाचा घट श्रीचे देऊली बसेल त्याची पूजा दोघानी बरोबर करावी १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५१.
बीटल.
१६४२
दर्या बै॥ मोकदम देहू त॥ हवेली प्रा। पुने स॥ ११३० साहेबाचे बांदगीस कतबा लेहून दिधला ऐसा जे सटवोजी व बालोजी व॥ चापसेट सेटे यास आपण हाजीरजमान असो सबब मौजे म॥र श्री आहे त्यास इनाम सेटे मजकुराच्या मिरासीच्या सेतात कास मन । = ॥ साडे सात मो। बिघे १५ पंधरा आहेत त्याची कीर्द श्री नारोबा गोसावी करऊन भोगवटा श्रीच्या खर्चास करीत आले असतां दरमियान सेटिया गोसावियासी भांडो लागला की आपल्या थलांत सेत इनाम नाही त्यावरून साहेबी मौजेमजकुरी मुकाम करून सुमाकुल पांढरीच्या मुखे करीना मनास आनिला श्रीचे इनाम खरेखुरे जालेयाउपरि सेटियास भांडावयास दरकार नाही. गवामधे कीर्द करून सुखरूप असावे ह्मनऊन जमान मागितला त्यांवरून आपन हाजीरजमान जालो असो जाए पले तर सेटीमजकुरास हाजीर करून नाही तर याचा जाब करून हा कतबा सही
नि॥ नागर बि॥ कुलकर्नी मौजे म॥र
लेखांक ५२.
श्री.
१६५० आश्विन वद्य ३
श्रीमत् माहाराज राजश्री नाना स्वमींचे सेवेसी
विनती सेवक तान्हाजी सोमनाथ साष्टांग नमस्कार स्वामीचे कृपेकरून ता। छ १७ माहे रबिलावलपर्यंत सेवकाचें वर्तमान यथास्तित असे. विशेष-राजश्री आपास पत्र पाठविले तें उभयतास निवेदन करून उत्तर पाठविलें आहे. सांप्रत दरबाचें वर्तमान तरी रा। आपाची स्वारीस पूर्वी जावयाची बोली होती प्रस्तुत घालमेल जाली आहे खासा राव जाणार आहेत एक बोली की गुजरातप्रांतें जावें एक बोली की कर्नाटकप्रांतें जावें असे दोन विचार आहेत अद्यापि सिध्दांत जाहाला नाहीं. राजश्री आंबाजीपंत तात्या पूर्वी बागनीस राजदर्शनास घेऊन गेले होते त्याचे राजदर्शन करून आले. मागती छ १५ रोजी मंगलवारीं दीड प्रहर रात्रीं रायाचा राजश्रीपासी निरोप घ्यावयास सातारियास रवाना केले आहेत तेथोन निरोप घेऊन आलियाउपरी दोही विचारांतून एक विचार होईल. उदाजी पवार मंगलवारी बागणीस आले त्यास हि कर्नाटकप्रांतें बराबरी नेणार आहेत. आश्विनबहुल सप्तमीचा मुहुर्त पाहिला आहे. परंतु सप्तमीचें जाणे होता दिसत नाहीं कदाचित् डेरे मात्र बाहेर देतील तर स्वामीनीं शुक्रवारी आलें पा। सेवेसी श्रुत जालें पा। सेवेसी विनंति बहुतेक प्रधानपंताचें प्रतिपदेपावेतों राहणे जालें हे विनंति
अपत्य सदाशिवानें चरणावरी मस्तक ठेऊन सिरसाष्टांग नमस्कार राजश्री तान्हाजीपंत यानीं वर्तमान लिहिलें आहे त्यावरून सेवेसी निवेदन होईल हे विज्ञापना.