लेखांक ११.
१५८७ माघ शुध्द ६
(पुणें देशपांडे दप्तर)
''म॥ अनाम राजश्री बावाजीराम देशकुलकर्णी प्र॥ पुणें राजश्री जिजाबाई सु॥ तिसा सितैन अलफ म॥ मकुंद कान्हो देशकुलकरणी प्रा। मा।र त्याचे तकसिमेस तुह्मी खलेल करून मा।लेसी घसघस करितां ह्मणउनु हुजूर मालूम जालें. तरी तुमची तकसीम तुह्मी चालऊन हालखुद वर्तनूक करणें. सालाबाद चालिलें आहे त्यास घसघस केल्या काहीं उज राहे ने. जेणेकरितां आपले भाउबंद एक नेट करून गहदम सालाबाद चालिले आहे तैसी वर्तनूक करणें. नशेत कथळे केल्या, चिरंजीव कांहीं कोन्हाचा मुल्हाजा करणार नाहींत. ऐसें समजोन म॥ मुकुंद कान्होजी घसघस न करणें. पेस्तर बोभाटा आला ह्मणजे बोल नाहीं छ ४ साबान.''
लेखांक १२.
१५८७ फाल्गुन शुध्द ३
''द॥ बे॥ मोकदम व समस्त रया मौजे मांजिरी बु॥ त॥ हवेली प॥ पुणा सु॥ सीत सन १०७५ साहेबाचे बंदगीस कतबा लेहून दिधला ऐसा जे, साहेबीं हुजूर बोलाऊन साल मजकुरीची जमाबंधी फर्माविली तरी साल गु॥ प॥ म॥ नामजादी ब॥ चा साहेब सुभा आले. ते वख्तीं रयतीवरी कही होउनु लुटिली, गांव जाळिला. यावरी गाऊ कुल खराब होउनु प्रजा पोट भरावयासि देसावरी गेलिया. यावरी गणीमाचा तह होउनु भेटला. तव मौजे मजकुर खराब पडिलेयावरी जागीरदारी आपला तपवास घेउनु खंडिला. कौल रुपये ५०० देउनु गांवावरी आणिले. आपण एका दोनीस गितीस मेलउनु जुजवी कीर्दी केली. यासि जुजबी पीक जालें. एणेप्रमाणे आपला हालअहवाल खातिरेसी आणितां साल गु॥ जमाबंदी रुपये ९०० यासीं गऊ लुटिला, जाळिला, खराब पडिला होता. यावरी खंडिला कौल् देउनु गांवावरी आणिले आहेती. अमल खातिरेसी आणुउनु बेमारुफाती मागुस्ते जागीरदार रजाबंदी करारती बमय माळव सायेर तमाम सालउगवणी करणे रुपये ८००
तेरीख ह॥ राघोजी
रमजान कुलकर्णी पे + +