लेखांक १७.
१५९१ भाद्रपद वद्य १२.
ता।
''कौलनामा अज दिवाणा खासा बजानेबु कडतोजी बिन हिरोजी माहाजन व सेटिया मुकाम पेठ मूर्तजाबाद पा। किले पुरंधर बिदानद सुहुरसन सबैन अलफ बाद कौलनामा ऐसा जे तुवा हुजूर एऊन बंदगीस हजरती मालूम केले जे पेठमजकुरी पूर्वी प्रजा दिवेलाविणी वस्ती यावेरी शाहाजी भोसले परमुलकी एऊन पेठ जाळिली फितरिताकरिता रोडीदुबळिया प्रजा होत्या त्या परागंदा होऊन एकएक जागा गेलिया शक धरून पेठेवरी एत नाही याचा मुदा आहे की आपणास पेशजी रायारराव याचे तसविसेकरिता खराबा होऊन आपली जितरबे बुडाली दो वरीस बाहेर होतो यावरी तुह्मी एऊन आपली खातीरनिशा करून पेठेवरी आणिले आपण कर्जवाम घेऊन मागती घरे दुकाने केली ते वेळे शाहाजीचे फितरीत जाली घरे जाळिली मागती परागंदा होऊन एकएक जागा राहिलो कोनाचा आसिरा देखो न याजवरी आपणास हुजरून सा सालांचा कौल मर्हामत जालिया पेठेवरी एऊन कीर्दी मामुरी करून ह्मणौन प्रजांचा मुदा घेतला आहे तरी साहेबी नजर अनायत फर्माऊन सा सालांचा कौल मर्हामती जालिया आपण कौल सिरी धरून प्रजासमजावीस करून पेठ कीर्दीमामुरी करून सदरहूप्रमाणे आपण हक लाजिमा आहे सवे पसकई आहे ते कौल पुरलियावरी घेईन कौल मर्हामत होए ह्मणऊन मालूम केले तरी बराय मालुमाती खातिरेस आणून सदरहूप्रमाणें बदल मामुरी कौल दिल्हा असे तरी पेठमजकुरी प्रजा आणून मामुरी कीजे. कोन्हे बाबे तालीक अंदेशा न कीजे इस्तावा साले सा पुरलियावरी बरहुकूम कानू कदीम कमावीस होईल मोर्तब सूद छ २५ रबिलाखर.''