Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक ३५.

श्री.
१६११ आषाढ वद्य ९.

श्रीसके १६११ शुक्ल नाम सवछरे आशाढ वदि नवमी रविवार ते दिवसी राजश्री मुकुंद कान्हो देशपांडे प्रा। पुणे यासी रामचंद्र बावाजी देशपांडे प्रा। मजकूर लेहोन दिधले ऐसे जे इ॥ दवलतकाहिरेमधे मुलूक आला त्या ता। तुह्मी तिकडे होतेस आह्मी पातशाही खिजमत करीत आलो वतनाचे कस्ट मशागत बहुत करून वतनाचे संरक्षण केलेयावर तुह्मी एऊन हाजीर जालेत आणि तुह्मी आपणास आपली तकसीम मागितली तर तुह्मास आम्ही तुमची तकसीम कदीम दिधली असे तुम्ही आपली कदीम तकसीम कदीम खाणे तुमचा विभाग तुम्हास दिधला असे व तुमचे गावीच्या खंडणीकतबियावर आम्ही आधी आपलिया हाते x x x करून मग आमच्या दसखता खालते तुम्ही आपले दसखत करीत जाणे तुम्ही आपली तकसीम खाणे समाईक गावीचे एईल ते कदीमेप्रमाणे खाणे व आपले गावीचा कारभार करीत जाणे फिरमानाची दिकत आम्ही करणार नाही.

लेखांक ३६.

१६१४ आषाढ वद्य १.

महजर अज करार बतारीख छ १५ शहर सौवाल सु॥ सन हजार ११०२ सन ३६ जुलूसवाला बिहजूर शर्यतपन्हा काजी महमद वलद काजी इभराईम व शायादत सरफायत मवालीपन्हा सैद महमद ज्याफर नैब खान वालाशान ज्याहांबाजखान फौजदार पा। पुणे व देसमुख देसपांडिये व हाली मवाली का। मा। या हुजूर कान माली पासरा याणे एऊन जाहीर केले की आपण आपलें घर बांधत होतो त्यास नरहरि बावाजी वेव्हारा माहाजन का। मा। याणे एऊन दोही दिल्ही की घर मिरासी आपली आहे इ.इ.इ.

लेखांक ३४.

१६११ चैत्र वद्य १०.

तुमार वासिलाती जागीर खानवाशान फखरुदीखान जागीरदार पा। पुणें सु॥ सन हजार १०९८ इ॥ छ माहे ता। छ २३ माहे जमादिलाखर तहसील तहवेली ब॥ जैल मो। वसूल रु॥ ७००१ वजा तहसील व तहवेल माहादाजी निंबाळकर रुपये २८४६ बाकी वसूल मो। रु॥ ६७१६
त॥

तहसील काकडखान दर तहसील करोडी दर सरकार
सरकार खानवालाशान खानवालाशान फखरुदीखान
फखरुदीखान गिरीफतन गिरीफतन रुपये
रुपये ७६० २९७
तहसील गुमास्ते खान
ता। इ॥ तहवेली माहादाजी
रंगनाथ सेखदार रुपये
५६६९॥=
 
ता।
का। पुणे रु १२०१ वजा ता।
माहादाजी रु॥ १५ बाकी ११८५
ता। काकडखान ता। करवडी
दर सरकार खान     दर सरकार खान
मा। इ॥ रु॥ १८५     मा। इ॥ ४५
ता। तहवेली
माहादाजी रंगनाथ
९५६
 
का। लोहगाऊ ६०१ वजा
ता। माहादाजी ५२ बाकी ५४९
ता। काकडखान ता। माहादजी
 दर सरकार खान रंगनाथ रु॥
मा इ॥ ६५         ४८४
मौजे हडपसर रु॥ ८६४
ता। काकडखान      ता। कवरडी
दर सरकार खान    दर सा। खान
मा। इ॥ १३५ मा। इ॥ ३३॥
मौजे लोणी काळभर रु॥
 १००१ वजा ता। माहादाजी
 निंबाळकर १८६
=
बाकी सा। खान मा। इ॥
८१४॥। =
माहादाजी रंगनाथ
६९५॥
ता। काकडखा         ता। माहादाजी
 १५०                    रंगनाथ
                           ६६४॥। =
मौजे फुरसुंगी रु॥ ५०१ मौजे बाणेरे रु॥ १३०१
ता। करवडी दर         ता। माहादाजी
सरकार खान            रंगनाथ
मा। इ॥ रु॥             ३८५॥
११५॥
ता। काकडखान      ता। करवडी
 दर सा । खान       दर सरकार
मा। इ॥              खान मा। इ॥
 १३५                  ४५
ता। माहादाजी
रंगनाथ ११२१
मौजे चिंचवड रु॥ १२५१
वजा माहादाजी निंबाळकर
१५ बाकी १२३६
मौजे दापोडी रु॥ २८१
वजा ता। माहादाजी निंबाळकर
 रु॥ १६ J बाकी २६५
ता। काकडखान ता। करवडी ता। काकडखान ता। करवड
दर सा। खान  दर सा। खान दर सा। खान दर सरकार खान
वालाशान ७५  मा। इ॥ रु॥  मा। इ॥  मा। इ॥
  ४४ १५ १४
ता। माहादाजी   ता। माहादाजी  
रंगनाथ रु॥   रंगनाथ  
१११७    २३६  

लेखांक ३२.

१६०९.

हकीकत देहझाडा देहाय पा। पुणे सु॥ १०९७ अज देह २९० पैकी फौजदार याचे तालूक
तर्फ

४३      ता। पाटस
३७      ता। नीरथडी
-----
८०

देहे २१० पैकी आबाद
जुजजुजी देहे

४०     ता। हवेली
५       सांडस
१३      कर्‍हेपटार
१२      मावळ
--------------
७०     + + + +
------------------
रा देहे १४०
साबीक वइरान ६३
ता।

लेखांक ३३.

१६१० माघ शुध्द ३.
(फारसी शिक्का)

द॥ बे॥ मोकदमानि मौजे चिचवड ता। हवेली प्रा। पुणे सु॥ सन १०९८
कारणे साहेबाचे बांदगीस कतबा लेहोन दिधला ऐसा जे साहेबी हुजूर बोलाऊन खंडणीची रजा फर्माविली की जमाबंदी मुशकस करणे म्हणऊन रजा सादर केली तरी आपले बाबे अंताजीराम गु॥ रामचंद्र बाबाजी देसपांडे प्रा। पुणे याणी दुकळे रयतीचा हालहवाल जाहीर केला जे सन हजार १०९६ चे अखेर साली दकळ पडिला याकरिता रयती कुल मेली काही परागंदा जाली मिरासदार कुळ कोण्ही नाही उख्ती पाख्ती रोड दुबळी कुळे मेळऊन कीर्दी केलियास उंदिरानीं कुली सेते खादली व लस्कर पायमालीने रयतीचा हाल राहिला नाही जरी जीवनमाफिक खंडणी केलिया सालमजकुरीची उगवणी करितील म्हणऊन मालूम केले बराय मालुमाती खातिरेसी आणून कुलबाब कुलकानू माल व सायर साल तमाम कुलबाब बिलमख्ता खांडणी केली ते कबूल असोन उगवणी करुन मोकरा

बेरीज              रुपये                  १२५१
                     म॥ बारासे एकावन रास
     तेरीख १ माहे रबिलाखर
         रबिलाखर

लेखांक ३०.

१६०८ ज्येष्ठ.

''तुमार जमा बेशकसी मुतालब बार जमे देसमुख व रामचंद्र बाबाजी देसपांडिये पा। पुणे सा। जुनर सुभे अवरंगाबाद सु॥ सन हजार १०९७ अज बा। रुसूल बइतफाक शंकराजी कृष्ण गुमास्ते आऊजी कान्हो नाईक रकूयतपन्हा मिर्जा सुकुरुलाबेग बा। परवाना पो। इ॥ अबल साल ता। अखेर साल अज देह २९०

पैकी वइरान मुतलख देह बाकी
आबाद देह जमा
मोकरा साल तमाम जमा बेरीज
  रुपये
  ३६२॥

मो। तीनसे साडबासटी रुपये रास बो। अंतोजी राम गुमास्ता रामचंद्र बाबाजी देसपांडिये पा। मा। महलग तीनसे साडेबासटी रु॥ रासि.''

लेखांक ३१.

१६०९ माघ शुध्द ७.

महजरनामा बतारीख ५ शहर रबिलाखर सन

१०९९ बहजूर शर + + + + + + + + + +
देसमुख व देसपांडिये ता। + + + + + + + + +
पुणा हालिमवाली मु॥ तुळापूर लस्कर + + + + + + +
गवरोजी बिन बाबजी लोहकरा मोकदम मौजे + + + + + +
अज कदीमलया पुस्त दर पुस्त + + + + + + + +
दमीस काबीज मुतसरीफ आहे + + + + + + + +
रोहूमकहुराचे तर्फेने बनाम बकाजी फर्जंद याने जाहालनापुरावरी दौड केली आणि खानज्याहा बाहादूर यासी लडाई केली आणि तेथून सीकस्ते मकहुरापासी बकाजी मा। आला मकहुराने बकाजी म॥ सरफराजी करिता बकाजी म॥ वख्त पाहोन मौजेमजकुरीची मोकदमी मागोन घेतली त्या तागाईत गवरोजीमजकूर परागंदा जाला होता हाली किबिले ज्यांहाज्याहानी यानी जिलसुभानजीने मयुरक कतल करून मुलकास कौल दिधला त्यावरून गवरोजी लोहकरा दरबारीं बहजूर- पुरनूर दरगाह हजीर होऊन मदारुलमहामी दिवाण दक्षण यासि हकीकत जाहीर करून बाहालीचा परवाना हासील केला सिरपाऊ बयरका देऊन कीर्दीचा हुकूम फर्माविला त्यावरून हजीरमज्यालसीने करारवाकई हकीकत मनास आणून गवरोजीमजकुरास मौजेमजकुरीची मोकदमीचा महजर करून दिधला असे लेकराचे लेकरी पिढी दर पिढी मोकदमीचा कारभार करणे हकलाजिमा व इनाम खात जाणे यासि कोण्ही हिलाहरकती करील तो दिवाणीचा गुन्हेगार व गोताचा खोटा अन्याई हा महजर सही.

कृष्णाजी बिन पिलाजी खेउजी बिन सोमाजी
चांधरे मोकदम मौजे माझेरा मोकदम मौजे
सूस ता। म॥ भूकुम त॥ म॥
भिकाजी जवळकर मोकदम नाईकाजी शाहाडा मोकदम
मौजे खानापूर मौजे वडदर ता। मा।
साऊजी सुरवा मोकदम जाखोजी पायगुडे मोकदम
मौजे मालखेड मौजे मांडवी बु॥
पिलाजी वाजळा मोकदम जानोजी पायगुडे मोकदम
मौजे आईरे ता। म॥ मौजे आगळंबे
भिवजी व बाळोजी पाटिल  सीवाजी व बहिरजी
मोकदम मौजे भूगाऊ ता। मा। पायगुडे मोकदम मौजे
  कुडीज
कृष्णा जीवडा मोकदम हिरोजी मर्‍हाटा मोकदम
मौजे बुधन ता। म॥ मौजे मांडवी खुर्द
जनाजी बिन काउजी गिरजोजी मते मोकदम
चावट मौजे हिंगणे खुर्द मौजे खडकवासले ता। मा।
तान्हाजी पाटिल मोकदम संभाजी पाटिल आगठे
मौजे धाईरी ता। मा। मोकदम मौजे वडिगाऊ
एल्होजी रानवडा मोकदम एसजी पायगुडे मोकदम
मौजे नर्‍हे ता। मा। मौजे डोणीजे ता। मा।

लेखांक २८.

१६०८ वैशाख शुध्द १२.

इजती असार देसमुखानि व देसपांडियानि व मो। सेटियानि माहाजनानि प्र॥ पुणे सु॥ सीत १०९५ इनहाये आंकी आमची स्वारी प्रा। मजकुरी एउनि तुह्मी भेटावयासि न आलेली ऐसे सुस्त आणि पा। म॥ करारवाके अमल होत नाही खालसे फैल टाकीत नाही तरी हे खूब नाही पा। म॥ तहसील महलग राहौनि तुह्मी तगाफली करिता तरी पैसे खु॥ नि॥ तुह्मास देणे लागतील आता इजती दस्तगाह सीपदतमाहा सैद सुलतान पुढे पाठविले आहेती तरी तुह्मी सामानसीर राहाणे आह्मी पा। मा॥स स्वारी करुनि एतो तो पौतो तयार करुनि ठेवणे तगाफली केलिया आपले केले पावार खबर + + असे

तेरीख १० जमादिलाखर सन २९ जुलूसवाला

लेखांक २९.

१६०९ ज्येष्ठ शुध्द १२.

बाद जालीक जागीर तुलोजी सीदे जागीरदार पा। पुणे सु॥ सन १०९७ बमी साल गुदस्त सन हजार १०९६ बा। तुमार रु॥ २१७॥। = दोनीसे सतरा रु॥ चउदा आणे रास पैकी वजा साल गु॥ मारुफाते विठल गंगाधर सेखदार व कारकून गुमास्ते मा। इले ब॥ साल देहे बाद ई रु॥१०८ एकसे आठ रुपये पंधरा आणे रास बा। गा करार रुपये १०८

दर्या अंताजीराम गु॥ रामचंद्र बाबाजी देसपांडिये पा। मा। एकसे आठ रु॥ पंधरा आणे रास

लेखांक २६.

१६०७ वैशाख शुध्द ९.
दोरागे बीदर

दर्या बे॥ मोकदम मौजे जेजूरी ता। करेपटार प्रा। पुणे सु॥ सन ११०७ कारणे कतबा लेहोन दिधला जे साहेबी हुजूर बोलाउनु रजा फर्माविली की स॥ मा॥ कारणे मौजे मा। जमा बेरजी मुशकस करणे ह्मणउनु रजा फर्माविली यावरी आपले बाबे देसमुक व देसपांडिये पा। मा। इही हालहवाल जाहीर केला की धामधुमेने गाव वैरान जाला व करारवाके कीर्दी जाली नाही ह्मणउनु मालूम केले बराये मालुमाती खातिरेस आणुनु आबादानीवरीनजर देउनु मौजेमजकूरची जमा. बंदी मोकरर केली कुल बाब कुल कानू साल तमाम दिले ह्मणौन नाहीसीं केली व कबूल असो उगणा करून रु॥ ३७५

मे॥ तीनसे पंच्याहातरी रुपये रासि तेरीख ७ माहे सौवाल
दर्या मालोजी नरसिंवराऊ व गोविंदराऊ सितोले देसमुख पा। पुणे
दर्या होनप देसपांडिये पा। मा। प्रा। पुणे रयानीस रु॥ रासि

लेखांक २७.

श्री.
१६०८ वैशाख शुध्द १.
तालीक

श्रीशके १६०८ क्षयेनाम संवत्सरे वैशाख शुध्द पाडवा दिनी धनको नाम धर्मोजी कासार कसबे तळेगाउ रिणकोनाम मोकदम व समस्त दाहीजण मौजे वाघोली ता। हवेली तुह्मांपासून घेतले कर्ज रु॥ ३५० साडे तीनशे रुपये घेतले हे पैके देऊन यासि ब्याज दर माहे दर रुपये ५ प्रमाणें देऊन हे लि॥ सही यासि उगवणीस दत्ताजी पा॥ व जावजी स॥ व कृष्णाजी स॥ लालजी स॥ यांसि गहाण आपली मोक + + + + + +

लेखांक २५.

श्री.
१६०५ कार्तिक शुध्द १०.
राजश्री विनायक उमाजी शुबेदार व कारकून सुभा प्रा। पुणे गोसावी यासि

 अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक केसो त्रिमळ नमस्कार सु॥ अर्बा समानैन अलफ प॥ मजकुरीचे देशकुलकर्णी संनिध एउनु विनंति केली की देशमुखास व देशकुलकर्णियांस पेशजी राजश्री दादाजी कोंडदेऊ सुबेदार तिही इनामती खंडणी दर सालास दिधली होनु पातशाही ४००

देसमुख होनु ३०५                   देसकुलकर्णी होनु ९५

एकूण च्यारसे होनु खंडणीचा तह दिधला त्याप्रमाणे गलबलिया आधी उसूल होत आला आहे हाली दाहा पाच साले गलबला जाला आहे. माहाल खराब पडला जुजबी गाऊ वसाहत थोडेबहुत आहेत त्यास आपणास व देसमुखास हकाचे दस्त बहुत थोडे होते त्यास दस्त माफीक देशमुखास व आपणास पोटास देउनु वरकड दिवाणांत घेत आहेत. एणेकरून आपला अवकात चालत नाही स्वामीची सेवा करावी लागत आहे. त्याहिमधें आपण वृतिवंत आहो आणि स्वामीची सेवा एकनिष्ठपणे करीत आहों तरी स्वामीने कृपाळु होउनु राजश्री दादाजीपंती इनामती खंडणी होनु ४०० च्यारसे केली आहे ते जे वेळेस सारा परगणा कीर्दी होता तेव्हा च्यारसे होनु खंडणी घ्यावी ऐसा तह केला होता. हाली परगणा कूली खराब जुजबी थोडेबहुत वसाहती आहेती आपणासहि हकउसूल होत नाही तरी स्वामीने कृपाळू होउनु च्यारसे होनु सारा परगणा कीर्दी होता त्या समई दस्तरकमप्रमाणे होते होते. त्या हिसेबे हाली दस्तमवाफीक चौ श्या होनाची तकसीम बसेल ते देसमुखापासुनु व आपणापासुनु जे तकसीम असेल ते घेतलियाने आपलाहि अवकात चालेल व स्वामिसेवेस वृत्तिसंमंधें एकनिष्ठ सेवा करून तरी स्वामीने कृपाळूं होउनु सदरहू विनंति मनास आणून इनामती खंडणीचा तह विनंतिप्रमाणे करून दिल्हा पाहिजे ह्मणउनु देशकुलकर्णियानी विनंति केली. ऐसियास याच्या हकाचाहि हिसेबु पाहातां हाली मुलुक खराब जुजबी वसाहत आहे हक पुरा उसूल होत नाही या निमित्य च्यारसे होनु इनामती खंडणी आहे ते पेशजी प्रमाणे घेतां इनामदार म॥ दिलगीर होताती व त्याच्याहि अवकात चालत नाही याबद्दल हाली यांचा इनामती खंडणीचा तह केला ऐन दस्त साल ब साल होईल त्यास दस्तमाफीक चौश्यां होनाची बेरीज दस्तांप्रमाणे बसेल ते यापासुनु घेत जाणे हाली दस्तहि कमी आहे याबद्दल एणेप्रमाणे तह केला आहे तरी लिहिले प्रमाणे इनामती खंडणी दस्तमाफीक घेत जाणे. जे दिवाणबेरीज इनामती खंडणीची घ्यावयाची असेल ते देसमुखाचे तकसिमेस जे बेरीज बसेल ते त्यापासुनु घेणे. जे देशकुलकर्णियाकडे बेरीज बसेल ते देशकुलकर्णियापासुनु घेणे याहून विषेष तोसिस नेदणे. एविसी राजश्री स्वामी कैलासवासी व राजश्री पंत वैकुंठवासी यांचीहि पत्रे माहालीच्या कारकुनास आहेती तरी तुह्मी लिहिलेप्रमाणे इनामती खंडणी घेणे तालीक लिहून घेउनु असल देसकुलकर्णियापासी देणे रा। छ ८ जिलकाद आज्ञा प्रमाण सुरू सूद

लेखांक २४.

श्री.
(पुणे देशपांडे-दफ्तर)

ताळेबंद झाडा एणेप्रमाणें :-

अबदुलखान मारिले सन सितैन अलफ अवत्सर विकारी शालिवानशके १५८१ सन हजार १०६९ कलम १०६९ कलम मार्गेश्वरवद्य पंचमी इंदुवासरे कलम १

सन सबा समानीन अलफ सवछर क्षयनाम सके १६०८ सन हजार १०९६ मधें इदलशा सुलतान शिकंद दस्त केला अमल पादशा अवरंगशाचा जाहाला
कलम १

राजश्री कासी द्यानतराव मृत्य पावले सन सबा सबैन अलफ नल नाम संवछरे सके १५९८ सन हजार १०८६ मधें
कलम १
सन समान समानीन मधें प्रभव सवछरे सके १६०९ सन हजार १०९१ मधें भागानगर घेतलें तानाशा दस्त केला

कलम १

तुळापुरीं तेच वर्षी मुकाम जाहाला मग सन तिसा समानीन अलफ सवछर विभव सके १६१० सन हजार १०९८ मधें राजश्री संबाजीराजे दस्त गत केले ते सवछर जालें
(कलम १)

पादशाह अवरंगजेब तुलापुरीहून स्वार जाले ते मोकाम गलगल येथें मोकाम येणेंप्रो।

१०९९ सन तिसैन सवछर शुक्ल सके १६११ मधें
१०० इहिदे तिसैन प्रमोदी सवछर सके १६१२
११०१ इसन्ने सवछर प्रजापति सके १६१३
-----------
एकूण वरसें ३

सलास संवछर अंगिरा गलगले येथून स्वारी + + + + + + विज्यापुरी + + + से मोकाम केले एणेप्रों।

११०२ सलास तिसैन संवछर अंगिरा सके १६१४
११०३ अर्बा तिसैन सवछर श्रीमुखा सके १६१५
११०४ खमस तिसैन सवछर भावा सके १६१६
---------
एकूण वरसे ३

विज्यापुरीहून स्वार जाले ते बरमपुरीस मोकाम केले वरसे ४ एणेप्रों।
सन सीत तिसैन अलफ सवछर युवा सके १६१७ सन हजार ११०५
सन सबा तिसैन अलफ सवछर ध्याता सके १६१८ सन हजार ११०६
सन समान तिसैन सवछर ईश्वरा सके १६१९ सन हजार ११०७
सन तिसा तिसैन सवछर बहधान्य सके १६२० सन हजार ११०८
-----------
ए॥ वरसे ४
(कलम १)

शाहूराजे पातशाहीतून सुटून आले सन सबा मया सवछर शालिवान सके १६२८ सन हजार १११६ मध्यें राज्यास आले हे चाळीस वरसें राज्य केलें सन खमसै मया मधें सन हजार ११५९ सवछर शुक्ल शक १६७१ मार्गेश्वर वद्य तृतीयेस मृत्यु पावले
(कलम १)
सन मया अलफ संवछर प्रमाथी शके १६२१ सन हजार ११०९ मधे सातारा फते केला
सन इहिदे मया अलफ संवछर विक्रम सके १६२२ सन हजार १११० मधें पनाळा घेतला
सन इसन्ने मया अलफ संवछर वृशा शके १६२३ सन हजार ११११ मधें विशाळगड घेतला

सन सलास मया अलफ संवछर चित्रभान शके १६२४ सन हजार १११२ मधें कोंढाणा घेतला
सन अर्बा मया अलफ संवछर सुभान शके १६२५ सन हजार १११३ मधें वाधिनगिरा पाल घेतले (कलम)
नगरी येऊन मुकाम
१ खमस
१ सीता
१ सबा मधें मृत्य पावले
-----

लेखांक २३.
*

अखंडित-लक्ष्मी-आळंकृत राजमान्य राजश्री मोरो त्रिमल गोसावियांसि

पोष्य राघो बदलाल नमस्कार विनंति उपेरी गोसावि पाठविळे तें पाऊन अभिप्राय कळों आला की स्वमीचे आज्ञेवरुनु लिहिले की मौजे चिखली तेथील पाटिल व कुणबी व कुलकर्णी हिसेबाबदल भांडत आहेती त्यास दाहा वरसे जाळी आहेती. कुणबी ह्मणताती कीं निवाडा राजश्री पंतीं सन सलासांत केला आहे, तो निवाडियाचे कागद हारपले ऐसे कुणबी ह्मणताती. तरी हा निस्चय तुमच्या पत्रावरी आला आहे तरी हा निवाडा जाला ऐसे आपणास कलले असिले तरी उतर तैसेच लिहिले पाहिजे. तेणेप्रमाणे यांस वर्तउनु जरी आपणास ठावके नसेल तरी सिवाजी कुलकर्णी व कुणबी आणुन हिसेब पाहाता कुणबियाचे हिसेबे सिवाजीवरी पैके निघो लागले. इतकियामधे कुलकर्णी पलौनु गेला तो हा कालपर्यंत आपण देखिला नाही. परंतु कुलकर्णी खोटा आहे विदित असावे हे विनंति लक्ष एक

लेखांक २२.

नकल
१६००

पहिला बंद फाटून गेला

अज रख्तखाने राजश्री सवाजी राजे साहेब दामदौलतहू तो। पायगुडे व करंजवणे देसमुख व मोकदम व कुलकर्णी व यां कर्याती मावळ प्रा। पुणे सु॥ सन तिसा सबैन अलफ मालूम दानद की मोरो विठल होनप देसकुलकर्णी कर्याती मजकूर हे हुजूर एऊन आपली हकीकत जाहीर केली की, आपली वडीलवडिलांची मिरास देसकुलकर्णी तर्फ पुणे बित॥

ता। हवेली देह ८२ ता। कर्याती मावळ देह ३६
ता। सांडस बु॥ ता। सांडस खुर्द
देह २९ देह २ एकून देह २०
ता। करेपटार देह ४१ ता। पाटस देह ४३
ता। नीरथडी देह ३७  

एणेप्रमाणे पिढी दर पिढी कारकीर्दी दर कारकीर्दी देसकुलकर्ण चालत आलें आहे. ऐसीयासि माहाराजसाहेबासी निजामशाह यानीं प्रा। मा। मोकासा दिधला ते वख्ती तर्फतर्फानी माहाराजसाहेबीं ठाणी ठेऊन हवालदार व कारकून तर्फतर्फास सतंतर कमावीस करीत असेती ते वख्तीं आपलेया वडिलीं गुमस्ते तर्फतर्फास कारभारी कारभारास दिधले असतां कर्याती मावळास गुपचुप पुणाहून पाठविले. याणी कितेक दिवस मुतालकी करीत असतां कागदपत्रांचा सिरस्ता आपणाजवळी आणानै देत असेती व हकलवाजिमा आणौन चाकरीचे रबेसीने आपल्या वडिलांसी वर्तत रयतीस बदसुलूख केला ह्मणौन त्यास दूर करून नामाजी लांडा पुणाहून गुमस्तगिरी देऊन कर्यात मावळास पाठविला. नामाजी हयात असतां आपला हकलाजिमा व कागदाचा सिरस्ता ऐसे आपणास देत गेला ऐसें माहाराजसाहेबांचे कारकीर्दीस चालत आले असतां निजामशाही गुदरोन गेली. एलिशाही तर्फेने विज्यापुरीहून मुर्‍हारी जगदेव सुभा एऊन पुणे जाळून लुटून तलाख केलें ते वख्तीं दौलतमंगल उर्फ भुलेश्वर एथें मुर्‍हारीनें किल्ला साधोन शाहार वसविलें तेथे आपले वडील राहावयासि गेले. कितेक मुदती भुलेश्वरी कारभार पडिला त्याकरितां कर्यात मावळीं नामाजी लांडा कारभार करीत असेती तो आपला हकलाजिमा व कागदाचा सिरस्ता देत असे. एलिदशाहीतून माहाराजसाहेबास पुणे मोकासा जाहाले ते वख्ती साहेबांस कर्याती मावळ व राजश्री मंबाजी राजे भोसले यांसि सांडस खुर्द माहाराजसाहेबीं आपणापासून मोकासा दिल्हा. साहेबांचे तर्फेने कर्याती मावळांस हवालदार व कारकून आलाहिदे गेले तयास जागजोरा करून नामाजीने आपणासी बेइनाम होऊन नजर बदलली ऐसीयासि आपण एऊन साहेबांपासी हकीकती जाहीर केली तों निळो सोनदेऊ साहेबांचे मजमूदार त्याणी आपाजीची पाठी राखिली. आपाजीस व आपणासी रुजू होऊन देत नाहीं. तरी साहेबी मेहेरबान होऊन देसमुख व मोकदम व कुलकर्णी व रयतीस ताकीद करून खुर्दखत दिले पाहिजे ह्मणौन तुह्मी मालूम केले त्यावरून तुह्मास बोलाऊन हकीकती पुसिली तुह्मी सदर्हू प्रा। सांगितले. हाली मोरो विठल देसकुलकर्णी यांचे देसकुलकर्णाचा व कर्याती मावळ यांचे देसकुलकर्णाचा अमल यांचे दुमाला करणे आपाजीस दखल न करणे याचा हकलाजिमा यांसि देणे तकरार फिर्यादी एऊ न देणे तालीक घेऊन असल फिराऊन देणे.

एणेपमाणे हककती गुदली तो उदयभान राठवड अज तर्फे पातशाही किलेदार किले कोंढाणा त्याणे छावणी बदल जमीदारानि व मोकदमानि व रयानि प॥ पुणा कर्याती मावळ वगैरे किलेमजकुरी जमा असतां आपाजी बिन नामाजी लांडा हाजीर होता बाबाजीराम देसपांडे ह्मणो लागला की, तुझा बाप नामाजी आपलिया वडिलाचा गुमास्ता कागदाचा सिरस्ता व हकलाजिमा आमचा आह्मास देत गेला आहे, ऐसे असोन फितरतीकरितां आमचा कागदाचा सिरस्ता तुजपासी राहोन गेला आहे तो देणे. त्यावरून हालीमवाली किलेमजकूरी जमा होते त्याहुजून पेशमान होऊन आपाजीने आपल्या बदस्तुरें करंजवणे व पायगुडे देसमुख व मोकदम व मोकदम कर्याती मजकूर यांचे शाहिदीनसी कागद लिहून दिल्हा एणेप्रमाणे :-

श्रीसके १५८१ कीलक नांव सवछरे वैशाख शुध प्रतिपदा तेदिवसी राजश्री बावाजी राम होनपदेसपांडिये प॥ पुणा यास आपाजी नामदेऊ लांडे यानी लेहोन दिधले की आपला बाप नामाजी लांडा तुमच्या वडिली तर्फ कर्याती मावळीची देसकुलकर्णाची गुमस्तगिरी देऊन ठेविला असता तुमचा हकलाजिमा व कागदाचा सिरस्ता तुमचे वडिलास देत गेला आहे. आपला बाप नामाजी मरोन गेला त्यावरी आपण तुह्मासी नजर बदलून तुमचा हकलाजिमा व कागदाचा सिरस्ता द्यावा तो दिधला नाही ह्मणऊन तुह्मी आपल्या गळा पडोन आपणास पदरी धरिले ते वख्ती किले सिंहगडीचे छावणीबदल उदेभान राठवड किलेदार त्याणी कर्याती मावळीचे देसमुख करंजवणे व पायगुडे व मोकदम व कुलकर्णी किलियास बोलाविले होते त्यांस आपण दरम्यान घालून आपला अन्याय मागोन घेऊन जैसा आपला बाप नामाजी तुमच्या वडिली गुमास्ता ठेविला होता तेसे आपणास संतोशे ठेवाल तर राहोन दूर कराल तेवख्ती दूर होऊं हे आपले लिहिले सही.

जैतजी करजवणे देसमुख क॥ मजकूर
 दुर्गाजी पायगुडे देशमुख क॥ मजकूर
कन्होजी धावडा मौजे कोंढ ता। क॥ मा।र
विसोजी मोझेरा मोकदम मौजे भुकूम ता। मा।र
रामजी ससर व पिलाजी चायरा मोकदम मौजे वासर
तावजी विंगळा व माणकोजी चौधा मोकदम मौजे भूगाव
खेवजी व रेखोजी चौधे मोकदम मौजे आंबेगाव
सुभानजी व संभाजी पायगुडे मोकदम मौजे वतळबाब कुडीस
विठोजी पिंजण मोकदम मौजे किन्हई  

सदरर्हूप्रमाणे निविस्ते आपाजी की पिदर मन ब इस्म नामाजी नोकर शुमा बूद मुककिता होऊन गेला तो छावणीचा कारभार दुणावला कर्याती मावळ पडिला त्याचा हि सरबरा बाबाजी राम देसपांडे पा। पुणे यानी करून दिधला. पातशाही अंमलफैला मोरोजी व बाबाजी राम देसपांडेगिरी खुद पुणाची व कर्यातीं मावळची काबीज मुतसरूफ असतां बाजद फितून मुलुक बदस्त सीवाजी राजे भोसले रयती बैरान पेरोशानी परागंदा मुलुक वैरान बेचिराख सबब पातशाही फौजा दौड एऊन मुलुक ताराज

(पुढें एक बंद गहाळ)