लेखांक २०.
श्रीशंकर
१५९७ ज्येष्ठ शुध्द १.
राजश्री राघो बलाल सुभेदार माहालनिहाय ता॥ जुनर गोसावी यासि
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री सेवक मोरो त्रिमल नमस्कार विनंति सु॥ खमस सबैन अलफ देसकुलकर्णी पा। पुणें इही एउनु वर्तमान सांगितलें की देसमुखास व आपणास पेसजी र॥ दादाजी कोंडदेऊ सुबेदार तिही इनामती खंडणीचा तह दरसाल दिधला बेरीज होनु प॥ ४००
देसमुख होनु | देशकुलकर्णी होनु |
३०५ | ९५ |
एणेप्रमाणे खंडणीचा तह दिधला त्याप्रमाणे गलबलिया आधी उसूल होत आला आहे हाली सात पाच साले माहाल खराब पडिला जुजबी गाववसाहत थोडीबहुत आहे त्यास आपणास व देसमुखांस हकाचें दस्त थोडेसे हों व त्यास दस्तमाफीक देसमुखास व आपणास पोटात देउनु वरकड दिवाणांत घेत आहेत ऐसियासि स्वामिने एक कागद आपला माहालास दिधला पाहिजे की पेसजी यासि राजश्री दादाजीपंती इनामती खंडणी होन ४०० च्यारसे दर साल खंडणी केली आहे ते बेरीज जोवर पा। म॥ वसाहत होती तोवर सारी बेरीज उसूल होत होती हाली गलबलियाकरिता सारी बेरीज उसूल होत नाही तरी जे हकाचे दस्त होईल ते बेरीज मसमू धरून पेसजी माहाला मामूर असता च्यारसें होनु उसूल होत होता ते वख्ती यासि दस्त होते होतें ते मनास आणून त्यांत दिवाणांत च्यारसें होनु देत होते ते वजा करून यांस काय पावत होतें त्या हिसेबें हाली दस्त होईल त्यासि च्यारसें होनुपैकी घ्यावयाची बेरीज होईल ते दिवाणांत दस्तमाफीक घेत जाणे वरकड यासि देत जाणे दिवाणांत घ्यावयासि बेरीज जे साधेल ते चौं श्या होनावर वाटून देसमुखाचे निसबतीने जे तकसीम एईल ते त्यापासून घेत जाणे व देसकुलकर्णी याचे निसबतीने दस्तमाफीक जे जे तकसीम एईल ते देसकुलकर्णि याजपासून घेत जाणे पेस्तर प॥ म॥ मामूर जालियावर सारी बेरीज च्यारसे होनु नि॥वार घेत जाणे ऐसा एक कागद दिधला पाहिजे ह्मणौउनु त॥ समाचार सांगितला तरी तुह्मी आपला कागद परगणे मजकूरच्या कारकुनास सदरहूप्रमाणे इही समाचार सांगितला आहे तेणेप्रमाणे वर्तणूक करणे ह्मणौउनु आपली सनद करून देणे आणि जे हकाचे दस्त होत जाईल ते चौ श्या होनावर वाटून देसमुखाकडे घेत जाणे देसकुलकर्णियाकडे एईल ते देसकुलकर्णि यापासून घेत जाणे तालीक लेहोनु घेउनु असल देसकुलकर्णियापासि फिराउनु देणे छ २९ सफर प॥ हुजूर
सुरू सूद