लेखांक १९.
श्रीशंकर
१५९४ श्रावण शुध्द ४.
जाबिता मखलासी सुभा राजश्री राघो बलाल सुभेदार व कारकून नामजाद स॥ जुनर व मा।हाय सु॥ सलास सबैन अलफ मौजे चिंखली ता। हवेली प॥ पुणें एथील माली माऊमाली वगैरे नि॥ मोकदम इही सुभा एउनु फिर्याद तलेगांवीचे मुकामी केली कीं विसाजी बाबजी कुलकर्णी मौजे मजकूर हा कुलकर्ण चालवीत असतां आपणास हिसोब गावगतीचा समजाविला नाहीं लोकांचे देणेघेणे आहे ते मागत आहेत. विसाजी मुठेखोरियात जाउनु राहिला आहे तरी साहेबी यास तलब करुनु आणून त्याचा आपला हिसोब गावगतीचा साहेबी आपणा देखता मनास आणून विल्हे केली पाहिजे ह्मणऊनु फिर्याद केली त्यावरुनु सुभाहून विसाजी बाबजी मुठेखोरियामधे राहात होता तेथें सुभाऊन चौघजण रजपूत पाठउनु यास मसाला खुद्द नि॥ विसाजी टकें २० वीस
सोनजी न॥ खासा टके ५ | एससू काकडा टके ५ त॥ |
क॥ सरद २॥ | क॥ सरद २॥ |
क॥ सरद २॥ | क॥ सरद २॥ |
केरोजी टके ५ | सोनजी लोहारी टके ५ |
क॥ सरद २॥ | क॥ २॥ |
क॥ सरद २॥ | क॥ २॥ |
एणेप्रमाणे चौगजण रजपूत सुभाहून माळियाचे मालुमातीवरूनु पाठविले त्यास विसाजी गावी नव्हता याकरिता विसाजीची बाईल दस्त करुनु सुभ्यास आणिली. यावरी मागून विसाजीस हि आणिलेयावरी म॥ दादाजी कोंडदेउ मजमूदार सुभेमजकूर व कासीराम हावालदार प॥ चाकण व निळो वामन अजहती र॥ त्रिंबक हरी देसपांडे स॥ जुनर यास बैसउनु मोजेमजकुरीचा हिसोब अवघा कथला मालियाचा व विसाजी बाबजीचा मनास आणून कमलाची मखलासी केली बित॥
कि॥ कलम सन तिसामधे अनूपराउ करोडी पुण्यामधे होता त्याचे मागणे लागले त्यास माळी व मोकदमी दादावा गोडसे याचे कर्ज घेउनु अनूपराऊ त्यासी दिधले कि॥ त्यापैकी त्याची बाकी आहे नि॥ माळी व नि॥ मोकदम
नख्त रुपये | गला खंडी गहू |
९१![]() |
१॥ |