[४७] श्री. १९ मार्च १७११
(शेख मीरा याजकडील).
स्वतिश्री राज्याभिषेक३५ शके ३७ खरनाम संवत्सरे चैत्र शुध्द एकादशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणीं ईजतमहा शेख मीरा यांसी आज्ञा केली ऐसी जे स्वामीनीं वाईच्या ठाण्यास तुह्मांस पाठविले आहे. ऐशास, शेख अजमतुला यांणीं हुजूर लेहोन पाठविलें जे आपण साहेबाचे हुकुखेरीज नाहीं, परंतु आपली अब्रू रहावी. ह्मणून त्यावरून हें आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुह्मी राजश्री जोत्याजी केशरकर मिळोन त्यास कौल देऊन ठाणें आपले स्वाधीन करून घेऊन xxxxx आपली अब्रू राखोन हुजूर xxxxx वणें. पोहोंचल्याची रसीद मागितली तर लिहोन देणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें. मर्यादेयं विराजते.
[४८] श्री. ७ मे १७४०
सेवेशी विज्ञापना३६. तीर्थ रूप राजश्री राऊस्वामीचे वर्तमान छं. २१ सफरी बुधवारी प्रात:काली तीर्थरूप राजश्री आपास्वामीस व श्रीमत् राजश्री नानास्वामीस वर्तमान श्रुत जाहलें. त्याचें पत्र येथें आलेलें, त्यावर तिकडून वर्तमान लेहून पाठविलें. त्याची नकल सेवेशी पाठविली आहे, विदित होईल. कृपा करून श्रीचा प्रसाद अनानसे २ दोन पाठविली ती पावली. सेवेशी श्रुत होय. विज्ञापना.