[५६] श्री. १२ मे १६९८.*
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २४ बहुधान्य संवत्सरे अधिक ज्येष्ठ शु॥ ११ भौम वासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपति यांणी राजश्री अण्णाजी जनार्दन देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी सुभा प्रांत वाई यास आज्ञा केली ऐसीजे. र॥ सूर्याराऊ पि॥ देशमुख प्रांत वाई यांस परगणे म॥चें देशमुखीचें वर्तन निमें पूर्वापार चालत आहे. त्यांस चंदीचे मुक्कामीं याचे पुत्र पदमसिंग पि॥ यावर स्वामी कृपाळू होऊन दत्ताजी केशवजीस निमें चालत होतें, ते दूर करून प्र॥ मजकूरचे देशमुखीचें सारें वतन यांस करार करून दिल्हें होतें, व देशमुखीस हाक लाजिमा व इनाम गाऊ पूर्वापार चालत होते, ते व नूतन गांव इनाम देविलें होते. त्यांस र॥ रामचंद्र पंडित अमात्य व राजश्री शंकराजी पंडित सचिव याहीं मनास आणून निमें वतन दत्ताजी केशवजी पि॥ यास व निमें पदमसिंग पिसाळ यांस करार करून दिल्हें असे, या प्रे॥ चालवीत जाणें. या वतनास पूर्वापार हक लाजिमा व इनाम गांव चालत होते. त्या प्र॥ करार करून दिल्हे असें. बितपशील.
देशमुखीस कदीम इनाम गाउ चालत होते, त्या प्रे॥ करार केले असे. |
मौजे जांब खु॥ संमत कोरेगांव नागोजी नाइकाकडे आहे, तो दूर करून दिल्हा. |
मौजे जांब हल्ली वर्धनगडाकडे दिल्हा तो दूर करून दिल्हा असे. |
मौजे बोरगांव जारेखोरें पिराजी गोळे याजकडे दिल्हा होता तो. |
मौजे तळपे वाघोली. | पदमसिंग पि॥ बिन सूर्या राऊ पि॥ यांस नूतन गाव दिल्हे आहेत. इनाम हक खेरीज हकवार इनामवार दिल्हा असे. |
इनाम चालत आहेत. | १ मौजे चिधोली संमत निंब हणमंतराव निंबाळकराकडे होता तो दूर करून दिल्हा. |
१ सोळशी, | १ मौजे वेलंग संमत हवेली किले वैराटगडाकडे होता तो दूर करून दिल्हा. |
१ व्याहाळी, | १ मौजे पांडे संमत हवेली किले वर्धनगडाकडे होता तो दूर करून दिल्हा. |
१ पानस. | १ मौजे कवठें संत हवेली दत्ताजी केशवजी याणीं जकाती र॥ जाधवराऊकडे आहे त्यास मोकासा आहे तो दूर करून दिल्हा. |
येणे प्रे॥ उभयतास आठ गाऊ करार करून दिल्हे असेत. याशी तुह्मी सदरहू गांवची कलपटी मनास आणून दस्त निमे पदमसिंग पि॥ यास गांव चालवीत जाणें. |
१ मौजे केंजळ संमत हवेली किले वंदनगडाकडे होता तो दूर करून दिल्हा. |
सदरहू गांववरील हकदार इनामदार खेरीज करून इनाम दिल्हे असेत. |
१ मौजे पाटखळ संमत निंब कण्हेरगावांस मोकासा आहे तो दूर करून दिल्हा असें. |
१ मौजे तडवळें संमत कोरेगांव हा गांव ह्माळोजी भोसले यांजकडे आहे तो दूर करून दिल्हा असे व निमे गडाकडे तो दूर करून दिल्हा असे. |