[५१] श्री.
सहस्त्रायु चिरंजीव विजयीभव. महाराज छत्रपती यां प्रती.
आज्ञा वीरडकर पाटील यांणी आश्रा करून कितेक आपले मुद्दे लिहोन दिल्हे, तितके आह्मी मान्य केलें. परंतु पाटील गांवांत येऊन, त्यांणी गांवावर आलियावर अंताजी कारकून ठेविला होता, त्यास गांवातून बाहेर घातलें, त्याचे बायको, प्रसूत समय, आठ दिवस राहोद्या ह्मटलें. ते राहों न दिलें. शेजारी आनेवाडीस मेंगोजीचे शेजारी राहिला. तेथून ही जा ह्मणतात. गांवात शेरीवर चाकर होते ते बाहेर घातले. हल्ली बावाईचे शेतावर रखवाली नाहींत. आंब्यास पाणी घालावयास निंबाजी चाकर होता त्यास दबविले. जे आंबे गें खांदले ते चूक झाली. तू बावापाशी सांगोन मसाले रयतेपासून घेतले ते तूं आमचे देणें. गांव आह्मांकडे जाहलियापासून गावांत अन्यायानें चिटी मसाले घेतले. ते रुपये ३५० बेरीज करून आह्मांजवळ चाकरास द्या ह्मणतात. आंबे त्याचे शिवारांत x x x जातात त्यास दबावतात. रेडे बांधाळेचे इकडील तिकडे तोंड घातले ह्मणजे तुह्मांस मारून ह्मणतात. या धास्तीनें चाकर पळाले. आंबे लाविले ते पाण्याविणा मरतील, याजकरितां तुह्मांस लिहिलें होतें जे :- विरडें गांव आपला घ्यावा. आपण लिहिलें जें :- पाटील गांवावर आणून नशेद पोंहचऊन नांदवावें. त्यास ह्मटले तें आइकोन कौल देऊन गांवावर आणिलें. हल्ली नानाप्रकारें आह्मांस छडितात. याजकरितां विरडें आपला घ्यावा. आह्मांस मु॥ नलगे. वरकड ही गाव घेऊ ह्मणाल. तर हेही नलगत. परंतु आमचेणें याचें सोसवत नाहीं. तुमचें पुण्य आमचे पदरी आहे. तो रामेश्वराकडे हरकोठें जाऊन तुमचें कल्याण इच्छून. खाले३९ आंबे फणस लाऊन सर्व टाकिले. तैसें येथें आंबेझाडें लाविली आहेत. ते आटोप करवावा.४०आह्मांस याजउपरी येथें राहवत नाही. तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें आहे.