Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१११] श्री. १० सप्टेंबर १७४२
आज्ञापत्र राजश्री यमाजी१ शिवदेव ताहा मोकदम यांणीं मौजे अनेवाडी तर्फ कुडाळ सु॥ सलास अर्बैन मया अलफ. मौजे मजकूरचा पाटील हुजूर चाकरीस आणविला असे शिताब पाठविणें या कामास लोक ब॥ सारी पाठविली आहे याशी मजुरा रु. .॥. निम्मे
देणें. जाणिजे. छ २१ रजब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[११०] श्रीराम.
सेवेशी अपत्यें शिवाजी हरी कृतानेक स॥ नमस्कार. विनंति. उपरीं स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. ब्राह्मणाचा म॥ लिहिला. त्यास तुळाजी आंगरे हुजूर येणार आहेत. आलियावरी मनोदयावरून नीट करून देऊं. तुळ्याविशी व शालाविशी लि॥ तर तुळ्या सिध्द आहेत. गाड्या पाठवून देणें. शालजोडीचा तल्लास करून पाठवितों.अंतर सेवेशी पडणार नाहीं. येविशी सविस्तर स॥ बाईसाहेबी लिहिलें आहे, त्यावरून विदित होईल. सेवेशक्ष श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०९] पोवाडा
॥ बुधीहाळ किला बाका ॥
॥ दुरून टाकी तोफाचे गोळे ॥
॥ जसा अग्नीचा दिसतो लोळ ॥
॥ श्रीमंताचें पुण्य प्रबळ ॥
॥ सोडी तकटी निशान ॥
॥ जातां जातां बसे वलगण ॥
॥ चिनकहाळ्ळी हाबळ्ळी जेर केली मौजेनें ॥
॥ किल्ला घेतला तमाशानें ॥
॥ भोवतीं जेर करोनी कशी घेतली विशाळ ॥
॥ अवघा प्राक्तनाचा खेळ ! ॥१॥
॥ तेथून पुढ नंदिगड घेतलें बाळापूर ॥
॥ नागमंगळ जागा थोर मुळ बागल ॥
॥ किल्ला बाकां घटकेंत केला जेर ॥
॥ शहा दिला बेंगरुळावर ॥
॥ बहिरवदुर्ग आणि मांगडी पाहतां फिरती डोळे ॥
॥ भोंवतीं झाडी अतीप्रबळ ॥२॥
॥ देवराय - दुर्गभोंवते किल्ले घेतले प्रतापान ॥
॥ पुढुनी जंगल महा- दारुण ॥
॥ हाला करितां बहुत पडिले लोक तमाशानें ॥
॥ खराबी फार केली किल्यानें ॥
॥ मारुन गोळ्या झोळिस लोळ्या लाविल्या तुंबळ ॥
॥ शेवटीं जेर केलें स्थळ ॥३॥
॥ नळ- वाटेनें पोटें फुगतीं, प्राण उरतो डोळा ॥
॥ ह्मणती कसें आलें कपाळा ? ॥
॥ हागवणेनं व्याकुळ झाले गांड वाहे बुळबुळा ॥
॥ भारी कर्नाटक उन्हाळा ! ॥
॥ जेव्हां घरची आठवण होती तेव्हां रडे मुळमुळा ! ॥
॥ कशी आठवती मुलेबाळें ! ॥४॥
॥ आजपासुन कर्नाटकची नको चाकरी, हारी ! ॥
॥ शेत करुनि राहू घरीं ॥
॥ रेती खातां पाणि लागते सुख नाहीं शरीरीं ॥
॥ मोठि माहागाइ पडली भारी ! ॥
॥ बाबु सवाई रामापाई कविमत वाला खेळ ॥
॥ जबुन हें कर्नाटकचे जळ ॥५॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०८] श्रीभार्गवराम.
श्रीमंत परमहंस स्वामी यांहीं चिरंजीव धोंडूस आज्ञा केली ऐशीजे :- चिमणाजीस तुह्मी दोहों भावें पाहिलें, ह्मणजे तुह्मांस अन्न न मिळे. जो चिमणाजी तोच आह्मीं आहों, असें जर लक्षिलें, चालविलें तरी तूं आणि बापूनें स्नेहानें चालोन उजूर न करावा. पुत्रापौत्रीं बरें होईल. जें काय लागेल तें सांगोन पाठवणें. गोठणें, माहाळुंगे यांचे दैव आईकलें, तसेंच आमचें आईकलें, तेव्हां तुला पाया वेगळे न करू. कोणी घालमेल करील तरी न आइकावी. असें लिहिलें तरी तुह्मी तिघेजण येका आईचे. यावर घालमेल कोणाची चालणार नाहीं. येणेंकरून तुमचा आब राहील, आणि तुमचें बरें होईल, हे आज्ञा. घालमेल केलियास त्रैलोक्यांत बरें होणार नाहीं. तुह्मी जे कागद पाठवले, ते दादास दाखवले होते कीं नवते ते लेहोन पाठविणें. हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०७] श्री. २३ मार्च १७११
राजश्री देशमुख व देशपांडे प्र॥ वाई गोसावी यांशी. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ जोत्याजी केसरकर सर खवास रामराम. सु॥ इहिदे अशर मया अलफ. प्र॥ मजकूरची फौजदारी राजश्री मोरो जिवाजी सेनाखासकील याचे हवाला केली असे. तरी तुह्मी याचे रजेतलबेंत वर्तोन वसूल देत जाणें. नि॥ जमीन आकार निम्में व मोहत र्फाबाब निम्में व जकाती निम्में, येणे प्र॥ मशारनिल्लेकडे उसूल देत जाणें. पेशजीजे कुलकैफीयत दाखल करून पेस्तर याचे रजेंत वर्तत जाणें. निम्में जमीनपैकीं जो उसूल राहिला असेल तो मजूरा घेऊन बाकी जो ऐवज निघेल तो मशारनिल्लेकडे उसूल देणें. देखील शेरी निम्में सरंजास दिला असे. तरी मशारनिल्लेकडे वसूल देत जाणें. जाणिजे. र॥ छ १४ हे सफर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०६] श्री. २४ एप्रिल १७१८
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४४ विलंबी संवत्सरे वैशाख शु॥ नवमी रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहूछत्रपती स्वामी यांणीं देशमूख व देशपांडे प॥ वाई यांशीं आज्ञा केली ऐसीजे :- राजश्री जगजीवन हजारी याजवर स्वामी कृपाळू होऊन क॥ रहिमतपूरपैकीं जमीन चावर ५ याचें इनाम देऊन सनद अलाहिदा सादर केली आहे. तेणे प्र॥ स्वाधीन करून वंशपरंपरेनें इनाम चालवणें. लेखनालंकार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०५] श्रीभार्गवराम.
श्रीमंत परमहंस स्वामी यांहीं सहस्रायू चिरंजीव धोंडोपंत यासी आज्ञा केली जे :- तुह्मीं लिहिलें कीं अनेवाडीची पहाणी आली, वीरमाडें मोजीत असों, एका दो रोजीं मोजणी होईल, पुढें समजाविशीस व हिशेबास आठ पंधरा दिवस लागतील; व मनुष्यांविषयीं चिंता केलीत, व आणीकही कित्येक आह्माकडील वर्तमान लिहिलें, तें विदित जालें. तुमचीं मनुष्यें तुह्माकडे पाठविलीं आहेत. अनेवाडी, वीरमाडें धावडशी येथील वेठे आणून तुह्मी तिघेजण कारकून ओळीनें घरें बांधून सुखरूप राहणें. जे काय न्यूनता असेल त्याची पूर्णता करूं. कोणेविशीं चिंता न करणें. गांव तो फुटले आहेत. तुह्मी खालीं न येणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें हे आज्ञा. जीव गेला, धाशत वारली; यांही आतां आमचे काय करावें ? राधा व तूं व बापू हीं तुह्मी खालीं याल तर तुह्मांस माझ्या पायाची आण आहे. महादाजीपंत येतील त्यास येऊं देणे. तुह्मांस जें पाहिजे तें पाठवून देऊन तुह्मांस रुपये १५, व बापूजीपंतास रुपये १५, व चिमणाजीपंतास रुपये वीस, बकशीस, याची तुलवटें घेणें. तुह्मांस दुबतें नसेल तर वाड्यांतून ह्मशी दोन, बापू व तुह्मी घेऊन जाणें. हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०४] हू. ३ सप्टेंबर १७४४
ब्रह्मेंद्र फकीर हमेशा खुषवख्त१५ बाशंद.
महबत व मजमू आईबादत मलाज दोस्तां इस्तिजादार मुखल्लिसां बादज दुवा सलाम खेरीयत अंज्याम माहुवलमराम आंकीं येथील खैर सला जाणून आपली खैरखुषी हमेशा कलमे करीत असिलें पाहिजे. दिगर चंद मुदत गुजस्त जाहली. आंमा आमहबतपन्हाकडून खैरियतखत खलितवारीद होत नाहीं. आज कदीम मोहिबांचा व इजानेहांचे बुजरुगांचा येखलास कमाल चालोन आला आहे. त्या बमोजीब हालीं हि चालावा असें इजानेहा च्याहात असों. आण पेष आजिचे याहून आमहबतपन्हांहीं हे खानदानावर जियादा लुत्फ व महबत राखावी, हें मोहिबांबर लाजीम असतां खतकियाबतीनें खबरगिरी करावयास हि याद होत नाहीं हें थोर लोकांस नामनासीब असे. हमेशा रवाबीतहू स्नेह सुलूख राखोन दोस्तीचा तरीका दिन बदिन जिआदा मजबूत होय ते केलें पाहिजे. दिगर आमहबतपन्हां आज दस बारा बरस आपले कदीम ठिकाण सोडून घाटावर जाऊन राहिले. उपरची फौज नीचे उतरून तमाम मुलूक वैराण जाहाला. आजपावेतों गोरगरीब अलम तफरका व परशान आहे, हे बातेचा तरस मोहिबांसारिखे हकत आलाचे इबादती लोकांस कांहींच नये हें अज्याईब आहे. मोहिबां आपले मकानास परशरामीं येऊन कदीमबमोजीब आबादी केलियानें ते प्रांतीचे आलंमही आपले ठिकाणचे ठिकाणीं येऊन तकवीयेतेनें आबाद होऊन आराम पावेल. येणेंकरून मोहिबांस ही सबब अजीम असे. बिनाबरापेष आजी सेख महमद आली यांचे बराबर मोहिबांस निविस्ताही मरसूल जाहाला होता. आंमा जवाब येऊन पोहोंचला नाहीं. आलबालशाहामनत व अवालीमर्तबात सिद्दी याकूब सुभेदार सुभा मामले दाभोळ व प्रांत राजापूर यांहीं कदीमबमोजीब मोहिबांचे इनामती गांवाच्या सनदा व पन्नास बैलांचें दस्तक ऐसें मरहमत करावया बाबे लेहून पाठविलें. त्यावरून बुजरुगांचे इनायतीवर व महबतपन्हांचे खातीरदास्तीवर नजर देऊन कदीमबमोजीब पेढें तर्फेची पुलण व मीचे अंबडस तर्फ खेड हरदू गांवचे इनामतीच्या सनदा व पन्नास बैलांचें दस्तक ऐसें इसदार करून पाठविलें असे. ते कागद सुबेदार माजुन इलेह मोहिबांकडे पाठवितील. तर मोहिबीं दिलजमीयतीनें आपले कदीम ठिकाणास यावयाचें करून अवलसारिखी ते प्रांताची आबादी होय ऐसें केलें पाहिजे. मोहिबांचा अवसाफ होऊन येईल. जियादा काय लिहिणें. रवाना छ ५ हे शाबान, सन २६ जुलूसवाला हे किताबती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०२] श्री. १७२८
चिरंजीव धोंडूस आज्ञा केली ऐसीजे :- तुह्मीं लिहिलें कीं गोसावी जावें. कर्मगतीनें दुष्टाची गांठ पडलियास फिरोन संकट स्वामीस ह्मणून लिहिले. तर आमच्या कुडींत आत्मा आहे तों तेथेंच करणें. तुमच्या मिरासा खाणोन कोणी नेत नाहीं ! श्री अनुकूल आहे तेव्हां आपले मिराशीस येऊन राहणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें. आज्ञा. तुह्मी एके जातीचे लोक भाऊबंद असोन आपल्यामध्यें भांडू नये हें बरें नसे. या उपरि भांडलेत ह्मणजे आह्मीं देशांतरास जाऊं. तुह्मी शामळाचा घेऊन खुशाल कोकणांत येऊन रहाणें. पानभारे येता जे येतील ते येतील. आणीक लागतील ते विकत घेणें. थोडेसे तुह्मी चुकलेत. कारवीचे घट्ट वोंवण बांधोन त्यावर कौल घातले असतेत तर धुळी वारें याचें भय नवतें. काय तुमचे बुध्दीस पालट जाला ?
[१०३] श्रीभार्गवराम.. १७२८
श्रीमत्परमहंस स्वामी यांही
चिरंजीव बापूजी व चिमणाजी व धोंडू यांसी आज्ञा केली ऐसीजे : तुह्मी वरती गेलींत. कोकणची तुह्मास खंत लागली. तर त्या प्रांतांतून लौकर सुटका होऊ ऐसी अहर्निशिसी देवास प्रार्थना करतां. अशी तुह्मांस कां दुर्बुध्दि होते? पुढें येथील काय अवस्था ते काय ल्याहावी? याजकरितां देवें तुमची सुटका केली आहे. तिकडेच रहाणें. इकडील वर्तमान दिवसेंदिवस विशक आहे. याजकरितां मागें येईन ऐसी बुध्दी करावयासी प्रयोजन नाहीं. तुमचें इकडेच लक्ष! देणें घेणें असेल तें लेहोन पाठवणें. त्याची विल्हे करून४८. कळलें पाहिजे. तुह्मी तिघे आपले मुलांची आबाळ न करणें. जाणिजे बहुत काय लिहिणें हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०१] श्री. २४ जान्युआरी १७०६
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३२ पार्थिवनाम संवत्सरे माघ बहुल सप्तमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणीं राजश्री सुभेदारांनीं व कारकुनांनीं सुभे लष्कर यासीं आज्ञा केली ऐसीजे :- वाईचे बेलदार एक जागीं जात येतात. त्यास तुह्मी मार्गीं उपसर्ग देता. सुखरूप आमदरफ्त होऊं देत नाहीं ह्मणून हुजूर विदित. त्यावरून तुह्मास हें आज्ञापत्र सादर केलें आहे. तरी तुह्मी कसबे मजकूरचे बैलास येतां जातां एकंदर उपसर्ग न देणें. जकातीचा हांशील घेणें तो जकातीवर कमाविसदार ठेविले आहेत ते घेतील. हें जाणून तुह्मी लिहिलेप्रमाणें वर्तणूक करणें जाणिजे. लेखनालंकार मर्यादेयं विराजते रुजू सुरु रुद्र बार.
श्री श्री
राजा शाहू छत्रपति हर्षनि- श्री आई आदिपुरुष श्री राजा
धान मोरेश्वर सुत निळकंठ प्रधान. शिवछत्रपति शाहू कृपानिधी तस्य
परशराम त्र्यंबक प्रतिनिधि