[५०] श्री. १५ नोव्हेंबर १७३२.
दसकतदोस्ती नरस माळी व सोनजी तांबेडकर व रामजी दोलार वस्ती मौजे असगणी त॥ खेड सुहुरसन सलास सलासीन मया व अलफ. कारणें साहेबांचे सेवेशीं लिहून दिल्हा कबूल कदबा ऐसाजे : हरजी न्हावी वस्ती मौजे पेढें याचे घरीं आमचे हस्तकें भूतें येऊन नास करितात. व याचा बेटा मयत जाहला. त्यास हल्लीं आह्मी येऊन हरजी मजकूर याचे घरीची भूतें वोवाळून नेतों, आजिलग भूतें येऊं देणार नाहीं. जरी आली तरी दर असामीस गुन्हेगारी रुपये येकशे येकशे देऊन. हा करार. सही छ ७ जदिलावल.
गोही
बिदस्तूर गणेश बल्लाळ आप्पा जोशी चिपळोणकर
कारकून श्रीभार्गव. महादेवभट गणपुले
दाद३८ गुरव वस्ती पेढें.