Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
येणेप्रमाणे जन पहिले दिल्हे तेच करार करून हालीं तकरिरा लेहून मागीतल्या.
येणेंप्रमाणें तकरिरा हारदू जणांनीं लेहून दिल्हे.
तपशील. | |
अग्रवादी संताजी व सिदाजी बिन बहिरजी घारगे देशमुख क॥ निमसोड लेहून दिल्ही तकरिरा ऐसीजे, सिदोजी बिन बहिराटजी घारगे यामध्यें व आपणामध्ये प्रांत मजकूरचे देशमुखीचा कजिया आहे याकरितां आपण हुजूर येऊन उभे राहिलों की आपले वंशपरंपरेनें भोगवटा करीत आलों आहों, वडिलांनी भोगवटा करीत आहों, ऐसें असतां हें बळेच खाताती. शिकी याचे मालक खावंद आपण आहों; आपले वडिलांनी देशमुखीचा भोगवटा केला आहे. बितपशील. मूळ पुरुष बाळजी नाईक घारगे देशमुख, त्याचे लेक बाबाजी नाईक, त्यांचे लेक फिरंगोजी नाईक, त्याचे लेक काळोजी नाईक देशमुख, त्याचे लेक दोघे वडिल मुधोजी नाईक देशमुख, हरजी नाईक देशमुख धाकटे, हे वतनांचा कारभार करीत होते. कसबे निमसोंडात राहून प्रांत मजकूर येथील देशमुखीचा कारभार मुधोजी नाईक करीत होते. त्याजउपरी त्याचे पुत्र सूर्याजी नाईक देशमुखी करीत होते. त्यास काळानुरूप सूर्याजी नाईक देशमुख यास देवआज्ञा जाहली. त्याचे लेक सिदोजी घारगे देशमुख हे लहान तीन महिनियाचे होते. |
पश्विमवादी सिदोजी बिन बहिराटजी घारगे देशमुख यतिमायणी याणी लेहून दिल्ही तकरिर ऐशीजे, आपले बाप बहिराटजी घारगे, त्याचा बाप सूर्याजी घारगे, त्याचा बाप बहिराटजी घारगे, त्याचा बाप चंदजी देशमुख, सदर्हू पांच डोया सदर्हू देशमुखी व शिका क॥ निमसोड मायणी करीत आले. चंदजी घारगे देशमुखी करीत होते ते मृत्यु पावले. त्याचे पुत्र बहिराटजी घारगे देशमुखी करीत होते. विजापुरी पादशाही होती इनाम तिजाई वहा- |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
या विद्यमाने स्वस्तिश्री शके १६४० विलंबीनाम संवत्सर कार्तिक शु॥ द्वितीया भोमवासर ते दिनी सिदोजी बिन बहिरोजी घारगे क॥ निमसोड अग्रवादी याशी लेहून दिल्हा महजर ऐसाजे, - तुह्मामध्ये व पश्वमवादी सिदोजी बिन बहिराटजी घारगे देशमुख क॥ मायणी यामध्यें वेव्हार लागोन तुह्मी व ते भांडत दरबारांत राजश्री स्वामीचे शेवशी उभे राहून बरहाक धर्मता आपली मनसुफी करून विल्हे लाविले पाहिजे ह्मणून विनंती केली. त्याजवरून राजश्री समस्त गोतसभा मोक्षसर वतनदार बोलाऊन मज्यालशी केली आणि गोतावर शेफत घातली. वाराणशीत गोहत्या ब्रह्महत्याचें पातक आहे. धर्मता दोघाचे निवाडा तकरिरा मनास आणून करणें. त्यावर गोत नाइकांनीं जमानची तकरिरा लेहून द्यावी ह्मणून आज्ञा दोघां वादीयांस केली. मग तुह्मी दो वादी यांनी अर्ज केला कीं, पूर्वी जन, येणे पे॥ राजश्री प्रतिनिधींनी घेतले होते.
बतपशील | |
अग्रवादी संताजी बिन बहिरोजी व सिदोजी बिन मुधोजी व बजाजी बिन चंदजी व आनाजी बिन सूर्याजी घारगे देशमुख क॥ निमसोड १ |
पश्विमवादी सिदाजी बिन बहिराटजी घारगे देशमुख क॥ यणीं. १ |
यास जमान डोंगरोजी यादव देशमुख क॥ औंद. |
यास जमान सुलतानजी यादव देशमुख क॥ औंद. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१३५] श्री.
महजर बहुजूर हाजीर मजालस मुकाम सातारा व तारीख ३० जमादिलाखर सु॥ तिसा अशर मया अलफ.
राजमुद्रा सरकार | |
राजश्री श्रीनिवास परशराम पंडित प्रतिनिधी शिक्का |
राजश्री बाळाजी पंडित प्रधान शिक्का |
राजश्री बाळकृष्ण वासुदेव आमात्य शिक्का |
राजश्री नारो शंकर सचिव, शिक्का |
राजश्री नारोराम मंत्री वाकनीस शिक्का |
राजश्री सखो विठ्ठल न्यायाधीश शिक्का |
राजश्री माहादाजी गदाधर सुमंत शिक्का |
राजश्री मोरो शामराज नामजाद कारकून महालानिहाय सुभा प्रांत खटावमायणी शिक्का |
राजश्री रघुनाथ उमाजी किल्लेहाय शिक्का |
शेटे महाजन महालानीहाय बि॥ |
श्री शाहू राजे भोसले सरदेशमुख सुभेहाय शिका |
मोरो जिवाजी व गिरमाजी झुगो देश कुलकर्णी प॥ मजकूर |
देशमुख व देशपांडे व मोकदम व देशमुख देश कुलकर्णी प॥ वाई. राजश्री शाहूजी राजे भोसले देशमुख प॥ वाई शिक्का |
रामजी बिन सोन शेटे वाग शेटीया पेठ क॥ वाई तागडी |
चापशेटी व गोपाळशेटी शेटीया व जिवाजी बिन बहिरोजी चवधरी व भानशेटी बिन विठशेटी पाटणे क॥ वाई तागडी |
|
राजश्री रस्तुमराउ जाधवराउ शिका |
|
अजम शेख मिराजी शिकामोहर |
|
गोतहाकजबरी महालानिहाय. प॥ वाई. |
|
संमत हवेली पिरू बिन जमा संताजी बिन ल प॥ क॥ वाई तांगड प॥ शेंदूर बावधन दणे बु॥ |
संमत निंब मल्हारजी व दत्ताजी प॥ क॥ निहा. मानाजी प॥ मौजे गोंवें |
रायाजी पिसाळ व अबाजी भिंताडे प॥ क॥ म॥ संमत वाघोली |
गंगाजी प॥ गोंवे मौजे माहुलीसंगम कानोजी प॥ व मौजे भुईंज |
खंडोजी प॥ मौजे पांडे अनाजी प॥ मौजे आसले |
|
संमत कोरेगांव नाईकजी बिन बाजी प॥ व नाईकजी बिन बावाजी प॥ बरगे क॥ कोरेगाव |
|
निशाणी नांगर |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१३३] श्री.
महाराज श्री छत्रपती साहेबांचे सेवेशीं. सेवक वेंकाजी भास्कर सेवेसी विज्ञापना. सु॥ इसनें अशर मय्या व अलफ. साहेबांचे ठेवी आपणापाशीं आहे, बद्दल मुचलका. ऐसेयासि येकंदर कबिला साहेबापाशीं आणून ठेवितो. आपणास रजा देणें. पैका आणून देईन. वडील लेकही आणवीन. कबिला पंधरा रोजांत आणवितो. थोरला लेक अजोळी आहे तोही मनाभरां आणवितों. साहेबांचे सेवेसी श्रुत होय हे लिहिलें. सहीं. चंद्र २६ जमादिलावल.
[१३४] श्री. १३ जुलै १७०४.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३१ तारणनाम संवत्सरे श्रावण शुध्द एकादशी इंदुवासरे क्षत्रियकुळावतंस श्री राजा शिवछत्रपती यांनी राजश्री विठ्ठल गोपाळ देशाधिकारी प्रांत जावली याशि आज्ञा केली येशीजे- चंद्राजी चोरघा व यसाजी चोरघा व देवजी चोरघा दिंमत शंभर लोक सेवक राजमंडळ यांची घरें व शेतें.
त॥ सोनाटखोलसें प्रांत मजकुर येथे आहेत. ऐशियास तिघाजणांची शेतसनद पेशजी खावंद असता त्याचे घरी उसुलाचा तगादा लाऊन उसूल घेता ह्मणून विदित झालें. तरी हे हुजूर चाकरी करीत आहेत व शेत सनदही सादर आहे. ऐसे असतां उसूल घेतला ह्मणजे काय? या उपरी ऐसें न करणें. पेशजी शेतसनद सादर असेल तेणेंप्रमाणें वर्तणूक करणें. फिरोन बोभाट येऊ न देणें जाणिजे. वसूल घेतला असेल तो परतोन देणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१३१] श्री.
राजश्री चिमणाजीपंत व राजश्री धोंडोपंत व राजश्री बापूजीपंत गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य कृष्णाजी दाभाडे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष आपला प्रसंग आहे तो तुह्मांस लिहिला असतां महाराज श्री परमहंसस्वामीचे पत्रीं बहुत विषादें लिहिलें ऐसें उचित नाहीं. आह्मी स्वामीचे सेवक आहों. यथासामर्थे अंतराय न होय. तुह्मी कळेल ते सविस्तरें सांगणें. साता-यासी येतच आहों. दर्शन घेऊन भेटीनंतर सकल वृत्त विदित करून मग जे आज्ञा करितील ते प्रमाण असे. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. हे विनंति.
[१३२] श्री.
श्रियासह चिरंजीव विजयीभव. मार्कंडीचे आयुष्य राजमान्य राजश्री बळवंतराव याशि प्रती बाजीराव यादव कृतानेक आशीर्वाद. उपरी येथील कुशल तागायत फाल्गुन वद्य त्रयोदशी पर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहिणें विशेष. तुह्माकडील बहुत दिवस वृत्त नाहीं. तुह्मी पंचमीस येतों ह्मणून लिहिलें परंतु आलां नाहीं. तरी सविस्तर काय आहे, कधीं येणार तें लिहिणें. मल्हारी गायकवाड गेला तो अद्यापि आला नाहीं हेंही लिहिणें. तुह्माकरितां बहुत चिंता वाटते. येकवेळ भेटी घेऊन मग काय विचार करणें तो विचार करावा. हे विनंति. परंतु येकदा अगत्य येणें. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१२९] श्री. २ डिसेंबर १७५४.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जगंनाथ चिमणाजी गोसावी याशीं. सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार, सु॥ खंमस खमसेन मया व अल्लफ. श्री परशराम देवालय चिपळूण याजवर चुना घालणें होता तेविशीची विवचना भार्गवराम बावा करीत असतां त्याचा काल जाला. ऐशियास देवालयांस चुना घालावयास पैका किती लागेल त्यांची वरावर्द करून शाहणे कारकून यासहित हुजूर पाठवून देणें. दिरंग न लावणे. जाणिजे. छ १७ सफर. आज्ञा प्रमाण.
[१३०] श्रीभार्गवराम.
श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं, मन निर्मल गंगाजल सौभाग्यादिसंपन्न वज्रचुडेमंडित मातोश्री सगुणाबाई याप्रती आज्ञा येशीजे :- बाई ! तुह्मी माझे काळजाचें काळीज. ह्मणून तुह्मांस पोर पाठविली आहे. लहानाची थोर करून सेवा घ्यावी. वरकड आहे तें मजमागें तुमचेच आहे. सूज्ञाप्रति विशेष काय लिहिणें. हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१२८] श्री. १२ एप्रिल १७२०.
राजश्री चिमणाजीपंत व त॥ बापूजीपंत गोसावी याशी :-
गअखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य बसवंतराऊ१ खासखेल हुजुरात दंडवत. सु॥ अशरीन मया व अल्लफ. राजश्री मल्हार नरसी यांनी मौजे इरमाडे येथें बिघे
४ चार शेत केलें आहे तरी पूर्वी आमचा कौल आहे त्याप्रमाणें वसूल घेणें. गांवकरी यांच्या बळे आकस करून जास्ती उपद्रव न देणें. चाकर आमचा असे येविशी फिरून बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ १३ जमादिलाखर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१२७] श्री. १९ आगस्ट १७४९.
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री मोरो शिवेदेव गोसावी याशी सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ खमसेन मया अल्लफ. येथील अर्थास निखालसतेस वाकीफ होऊन गेला. सांप्रत तुह्मी केलिया सर्व होतें, असें असतां विलंब व संशय ठेविला हें अपूर्व दिसलें! या उपरी सविस्तर दिनकर महादेव यास लिहिले आहे. ते समजाऊन घेऊन त्याप्रमाणे करणें. आमचे इतबारी प्रामाणिक जाणून तुम्हास म॥निलेशी बोलावल्याविषी लिहिले आहे. जेणेंकरून आईसाहेबांचे मनोदयसिध्दि आमचे ठायीं पहिल्यापेक्षा विशेष कृपा, राजश्री राजी, लौकिक उत्तम, हे तिन्ही अर्थ करणें. इतके लिहिले असतां न करा तर ईश्वर इच्छाप्रमाणें! जाणिजे. छ॥१६ रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१२५] श्रीशंकर.
श्रीमत राजश्री बलवंतराव स्वामीचे सेवेशी. सेवक त्र्यंबक पर्वतराव सरदेशमुख प्रांत अक्कलकोट. कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष आपणाकडून राजश्री कृष्णाजीपंत आले. पत्राच्या नकला पाहिल्या. आह्माकडून स्वामीच्या कार्यास अंतर कदापि होणार नाही. पूर्वीपासून वडिलांनी आमच्या वडिलांचा सांभाळ केला तदनुरूप आपण करित जावा. आह्मी कुटुंबातील आहों. अवांतर सर्व अर्थ पंत म॥निले लिहितील. आपण समर्थ आहो. कोणता प्रकार अगाध नाहीं. बहुत काय लिहिणें. कृपा चिरकाल असावी हे विनंति.
[१२६] श्री.
आज्ञा केली ऐसीजे. तुह्मी विनंती पत्र पाठविलें व राजश्री बलवंतराव आले त्यांणी हुजूर तुह्माकडील सर्व अर्थ येकनिष्ठेचे निवेदन केले, त्याजवरून कळलें. येथील लक्षाचे अन्वयें खंबीर तुमचा बळकट आहे. असो देणें. जाणिजे. चं॥ ११ रमजान बहुत काय लिहिणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१२३] श्री. ३० अक्टोबर १७१७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४४ हेमलंबी संवत्सरे कार्तिक बहुल नवमी मंदवासरे क्षत्रिय कुळावंतास श्रीराजा शाहू छत्रपती यांनी मोकदमानी कसबें बावधन तालुके हवेली प्रांत वाई याशीं आज्ञा केली ऐसीजे :- भावगिरी गोसावी वास्तव्य डोंगरगड श्री कसबे म॥ हे बहुत थोर तपस्वी आहेत. यांचे चालविणें स्वामीस अवश्यक ह्मणोन यांस इनाम डोंगर कसबें म॥ पैकीं जमीन खालिसा पडप्रतीची बिघे १० दहा कुलबाव कुलकानू खेरीज हक्कदार याशी व शिष्यपरंपरेने इनाम दिला असें. तरी तुह्मी सदरहू जमीन डोंगरपैकी खालिसा असेल त्यापैकी पड जमीन दहा बिघे नोंदून चतु:सीमा करून इनाम शिष्यपरंपरेने चालविणे. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणें. याप्रत लेहोन घेऊन खुद्दपत्र भोगवटे याशी गोसावी म॥ पाशी परतून देणें. जाणिजे. लेखनालंकार मोर्तब सूद.
[१२४] श्री. (शांताश्रम) २३ मे १७२१
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक्के ४७ प्लव संवत्सरे. वैशाख बहुल त्रयोदशीं भृगु वासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांनी देशमुख व देशपांडे प्रांत वाई यास आज्ञा केली ऐसीजे :- श्री संन्यासी याचे वृंदावन सोनगीरवाडी येथें कृष्णातीरीं आहे. तेथील पूजा, नैवेद्य, नंदादीप, अन्नछत्र व पुजारी याचा योगक्षेम चालविला पाहिजे. येविशी राजश्री यादव गोपाळ यांनीं विनंति केली, त्यावरून श्रीच्या वृंदावनास कसबे वाई स॥ हवेली प्रांत मजकूर येथे पडजमीन तीन प्रतीची चावर १ येक, दुतर्फा कुलबाब कुलकानू खेरीज करून हक्कदार करून इनाम दिला आहे. श्रीकडील पुजारी दुमाले करून इनाम चालविणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची पत्रलेखना घेऊन खुद्द पत्र भोगवटी यास या जवळ परतोन देणें. लेखनालंकार.