[८४] श्री. तालिक ६ आगष्ट १७४०
राजाश्रियाविराजित राजन्य राजश्री बापूजी श्रीपत स्वामी गोसावी याशी.
पोष्य बाळाजी बाजीराऊ प्रधान. नमस्कार. विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष राजश्री जगंनाथ चिमणाजी यांची नेमणुक तुह्माकडे दोनशे रुपये वर्षास करार केली आहे. हल्लीं जाजती रुपये १०० एकशे करार केले असेत. एकूण तीनशे रुपये वर्षास पावतें करीत जाणें. जाणिजे. त॥ छ २३ जमादिलबल सु॥ इहिदे अर्बैन मयाव अलफ. हे विनंति.
[८५] श्री. १९ सप्टेंबर १७५३.
अज४६ सुभा राजश्री दमाजी पिसाळ ताहामोकदमानीं मौजे धावडशी प्रांत सातारा सुहुर सन अर्बाखमसेन मयाव अलफ. मौजे मजकुरीं सरकारचे पागेचा तटु बाहेर गेला आहे. त्याचा थांग लाऊन माणसें आलीं आहेत. दरी देखत पत्र घोडा पागेस घेऊन येणें. हैगई केलिया पागेचा तटु गांवीं राहिल्यावरि पैका भरावा लागेल. जाणिजे छ २१ जिल्काद. मोर्तबसूद.