Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१३९] श्री.
गोपाळराव यांणीं क-हाडीं गोपाळ विठ्ठल व शिवराम विठ्ठल पळसुले देसाई यांसी कुल यख्त्यारी सांगोन ठेविलें. त्यांचे हातें कारभार चालवीत. मुख्यत्वें धणीपणा गोपाळराव यांचा. गोपाळराव सातारियासी असतां श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांसहि कांहीं राजकारण कार्य पडल्यास त्यासहि छत्रपतींकडे व पंतप्रतिनिधीकडे उपयोगी पडोन महत्कार्य करीत. असें असतां प्रधानहि त्यांचे ठायीं कृपा करीत. पुढें स्वामी छत्रपती व रावप्रतिनिधी यांचा काल जाहाला, जगजीवन परशराम प्रतिनिधी करूं लागले. मुतालकी यमाजीपंत आण्णा करीत असतां आण्णा यांचें व गोपाळराव यांचें वांकडें आलें व वैकुंठवासी नानासाहेब यांच्याहि चित्तांत यमाजीपंत याशी तंबी पोंचवावी असें होतें. तेव्हां तें विना मुख्य प्रतिनिधी यांसी स्वस्थ ठेविल्याशिवाय सिद्दी न पावे. जाणून हें काम गोपाळराव यासी सांगितलें. त्याणीं याविषयींचा उपयोग करून किल्ले विशाळगड येथें संधान लावून तेथून वैकुंठवासी भवानराव यांसी आणिलें. जगजीवन परशुराम यासी किल्ले पुरंधरीं व यमाजी आण्णा यासी किल्ले कावनईवर जप्तींत ठेविलें. भवानराव यासी शके १६७० विभवनाम संवत्सरे, सन तिस्सा अर्बैनांत विशाळगडाहून आणून, त्यांस प्रतिनिधींची वस्त्रें देऊन आपण मुतालकी केली. त्यापासोन दीड दोन वर्षेंपर्यंत एकसानपणें यख्त्यारीनें कारभार चालविला. राज्य यथास्थित चालत असतां शके १६७२ प्रमोद संवत्सर, सन खमसैन, वैशाखमासीं गोपाळराव यांसी कोणी द्वेषबुध्दीनें वैरभावकापटय केलें. ते एकाएकीं सात प्रहरांत रात्रौ गतप्राण जाहले, त्यासमयीं अंतकाळीं आपलें कोणी जवळ नाहीं आणि आपण तर वांचत नाहीं, हें जाणून वे॥ नरसिंहभट लाटकर विश्वासूक समीप होते त्यांजपाशीं राव याणीं सांगितलें कीं आमची तर अवध पूर्ण जाहली. तुह्मी आमचे तीर्थरूप यांसी व पितृव्य व बंधू यांसी सांगावें कीं तुह्मीं युक्तीनें आपला संसार केल्यास जन्मजन्मान्तरीं पुरे असें मेळवून ठेविलें आहे, याजवर कालहरण करावें आणि नांवरूप रक्षावें, आह्मीं जीं कर्में उद्योग केले त्या कारभारांत तुह्मीं पडों नये, तुह्मास उरकणार नाहीं. याप्रमाणें भटजीपाशीं बोलोन देहविसर्जन जाहालें. उपरांत लाटकर यांणीं सांगितल्या अन्वयें वर्तमान तीर्थस्वरूप बाबाजी यांसी सांगितलें. पुढें बाबाजी कारभार करावयासी उदित जाहाले. ते वेळेस आमचे तीर्थस्वरूप देशमुख यांणीं बाबाजीस सांगितलें कीं चिरंजीव गोपाळराव यांणीं सांगितलें असतां तुह्मी यांत पडतां हें ठीक नाहीं, तुह्मीं यांत पडूं नका, हें तुह्मास उरकावयाचें नाहीं, दादा व भवानराव प्रतिनिधी एकच आणनावू आहेत, यांत आपण पडों नये, भवानराव मुतालकी हरकोणासहि सांगोत, पंतप्रतिनिधी यांचा दरबार थोर, घडीचें घडयाळ, विश्वास नाहीं, फिरावयासी उशीर नाहीं; पैक्यास मात्र खालीं याल हें ठीक नव्हे, चिरंजीवांचे सांगण्याप्रमाणें मानून चालावें हें उत्तम. असें अनेक प्रकारें सांगणें अलक्ष करून पुन: मुतालकीचा उद्योग आरंभिला. आपले पदरचा पैका तरी खर्च करूं नये हें सांगितलें तेंहि न ऐकिलें. मुतालकीचीं वस्त्रें घेऊन गेले, तेव्हां नानासाहेब वस्त्रें यास न देत. गोपाळराव यास जर पुत्र नाहीं तर त्यांचे बंधूस आणावें, त्यासी वस्त्रें देऊं, ह्मणून वस्त्रे तटविलीं. तेव्हां बाबांनींहि सांगितलें कीं बंधू केवळ लहान आणि तीर्थरूप दु:खेकरून केवळ विह्वळ; यास्तव नानासाहेबींहि सांगितलें कीं गोपाळराव यांचे पिते बंधू व तुह्मी एकत्र आहां त्यापक्षीं वस्त्रें तुह्मास देतो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१३८] श्रीशंकर. २७ आगष्ट १७५६.
श्रीमंत राजश्री बाबूरावजीदादा स्वामींचे सेवेसी :-
पोष्य गोविंद बखले कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम स्वामीचे कृपेकरून भादो शुध्द २ पावेतों छत्रपुरीं सुखरूप असो. यानंतर श्रीमंत राजश्री पंत स्वामीकडून पत्रें आलीं, लाखोटे दोन. ते छत्रपुरीहून मुजरत अजुरदार काशिदाची जोडी करून स्वामीकडेस लाखोटे पाठविले आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर सत्वर पाठविलें पाहिजे. बहुत जलदीनें श्रींमंतीं उत्तर आणविलें आहे. तर कृपा करून उत्तर सत्वर पाठविलें पाहिजे. पेशजी दोनदां मिळोन दोन जोडिया काशिदांच्या पाठविल्या आहेत. पत्रें तों स्वामीस पावलींच असतील. परंतु, उत्तर श्रीमंतास न आलें. अजुरदार पावले न पावले हें कांहींच कळत नाहीं. सविस्तर उठिलें पाहिजे. पुणेयाहून आपण रुपये देविले ते छत्रपुरीं येणेप्रमाणें आह्मी श्रीमंतांचे लिहिल्याप्रमाणें देऊन त्यांची पावलियाची कबजें घेऊन पाठविलीं आहेत.
७००० देणें सातप्पा चव्हाण व दादशेट दि॥ मोरशेट वीरकर, मित्ती श्रावण वदि २
२००० देणें बहिराप्पा गाढवे दि॥ वर्धप्पाशेट वीरकर श्रावण वदि २ संवत् १८१२.
-------
९०००
येणेप्रमाणें नवहजार रुपये उत्तम, पुराणे छत्रपुरी देऊन, कबजें घेऊन आपणाकडे पाठविलीं आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर पाठविलें पाहिजे. श्रीमंतास लिहावें कीं, छत्रपुरीहून कबजें नवहजारांची पाठविली ते पावलीं ह्मणून जरूर जरूर श्रीमंताचे पत्रीं लिहिलें पाहिजे. वरकड वर्तमान सर्व श्रीमंतांचे पत्रावरून विदित होईल. पत्राचें उत्तर सत्वर पाठवून अजुरदारांची विदा केली पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ कीजे. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
मठडी एक जागा असती तर स्वामीस कळतें कीं, चाकरी फलाणेयानें केली. असें स्वामीस विदित होतें. आतां स्वामीची आज्ञा शिरसा वंदून येथील बंदोबस्त करून सेवेसी येतों. उरूबरू येऊन विनंती करीन. मजला मोठी उमेद आहे, स्वामीची चाकरी उमदेपणें करावी, आणीक जागा, मुलूक स्वामीचे घरीं फार आणून घालावा हें आहे. त्यास माझी नालीस नानाप्रकारें स्वामीस लिहिणार लिहितात. त्यास जर मी एकनिष्ठपणें स्वामीची सेवा करीत असलों तर आमचें कल्याणच आहे. जर कांहीं दगाबाजी करून, तर ईश्वर आह्मास शिक्षा करील. आह्मास एक स्वामीची कृपा. हिमायत ह्मणावी तर, वशिलावगा ह्मणावा तर, स्वामीखेरीज आमचा आमची गोष्ट बरी सांगेसारखा कोणी नाहीं. बकरुलाखान पातशाहींत नामी सरदार होता. त्याजला परम संकटें परम उपायें जीवाकडे न पहातां बुडविला. त्यास मराठा सरदार हें कर्म करिता तर जमीनीवर न माता! आह्मी स्वामीचे ब्राह्मण, आमची शिफारस कोण करणार? आज दोन लाख रुपयांचा तोफखाना स्वामीस मेळवून दिल्हा. कुरा व कडा, अठरा परगणे, लहान थोर स्वामीचे घरीं आले. पातशा कोठील? वजीर कोठील? जे जागा घेतली ते स्वामींनीं कोणास दिली? हे चाकरी सेवकापासून झाली. कांहीं नादांनीं आह्मापासून न जाली. येथून लिहितां विस्तर आहे. आह्मी कानधरली शेळी आहों, हुकुमी आहों, खावंदाची अहिर्निशी सेवा एकनिष्ठपणें करावी हें जाणतों. नालीस आमची हजारों कोणी लिहू, करू. आह्मीं त्रिशुध्द एकनिष्ठपणें वर्तणूक केलियास कांहीं फिकीर नाहीं. मीही येथील बंदोबस्त करून सेवेसी येतों. सेवेसी येऊन तपशीलवार वर्तमान विदित करीन, तेव्हां स्वामी ऐकोन संतोषी होतील, आमचे श्रमाचें सार्थक होईल. सविस्तर चिरंजीव बाबूराव याजला लिहिलें आहे, ते विदीत करतील. राजश्री दत्ताजी शिंदे यांची मदत जरूर स्वामींनी करावी. राजे माधोसिंग यांणीं तजी जिवें मारला; आणि दहाहजार फौज सागरेकडे गेली ह्मणून वर्तमान आहे. बिजेसिंग याचें साहित्य करावें ह्मणून गेले आहेत. आहे वर्तमान तें लिहिलें आहे. वरचेवर लिहीत जाऊन. आह्मास उजूर तिळमात्र नाहीं. प्राणसुध्दां स्वामीचे आज्ञेवर हजर आहे. आज्ञेशिवाय नाहीं. जागा ते कितेक जीवसुध्दां हजर आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१३७] श्री. २३ सप्टेंबर १७५५.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक गोविंद बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना त॥ आश्विन वद्य ३० पावेतों स्वामीचे कृपेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमान एक दोन पत्रीं सेवेसी लिहिलें आहे त्याजवरून विदित जालेच असेल व चिरंजीव बाबूराव याणें विनंति केलीच आहे. रा. गोपाळराऊ याजविशीं आज्ञापत्र सादर जाले. त्यास राजश्री दादास्वामीचें आज्ञापत्र आले. त्यास आह्मास श्रीमंत रा. दादास्वामींनी आज्ञा केली ते प्रमाण गोपाळराऊ याजला राजी करतों. मीहि येथील बंदोबस्त करून येतो. इकडील नवा मुलुख. रा. जयाजी शिंदे यांस मारवाडकरांनी दगा केला. हें वर्तमान जमीनदारास कळताच मनमाने त्याप्रमाणे लबाडीस आले. सकुराबाद, इटावे याजकडे जमीदारांशीं झुंज मातबर आह्मासीं जालें. पंधरा सोळा घोडीं पडली. भले माणूस ठार जालें. स्वामीचे प्रतापे गवार मारून कहाडिले. परंतु हा मुलूख कोता. देशी गवार आहे. सभोवतें पठाण. जागा बिकट. रयत ह्मणावी तर रजपूत. हे गत आहे. आमचे तैनातीस फौज रा. अंताजी माणकेश्वर याजकडील देविली. त्यास त्याजला रा. दत्ताजी शिंदे याजकडे मारवाड प्रांत जाणें. तेथेहि जरूर गेली पाहिजे, जाणून निरोप दिल्हा. श्रीमंत रा. दादास्वामींनीं रसदेचा ऐवज चार लाख पासष्ट हजार त्याजला देविला. त्याप्रमाणें निकडीने त्याजला जाणें. सबब सत्वर भरून दिल्हा. चार लाख पासष्ट हजार याशिवाय नव्वद हजारांची वरात फफुंद व इटावे, सुकुराबाद ऐवजी तेहि दिल्ही. सालमजकूरची रसद सकुराबाद, इटावे, फफुंद येथील रसद भरून दिली. त्याची कबज सेवेसी पाठविली आहे. मी चाकर बारगीर स्वामीचा आहे. जे मेहनत कुराकडा येथें केली, जिवाकडे न पाहिले आणि मोगलाशी झुंजलो, स्वामीचे प्रतापें बोलबाला जाला. सुभा मातब्बर होता. त्यास जागा सुटली. स्वामीचे घरी आली. जर जागा गोपाळराव यास देणें होती तर मजला बोलावून हजर नेऊन जे आज्ञा करणें ते करावी होती. मी हुकुमी स्वामीचा. आह्मास उजूर काय? परंतु कारागडेयांत माझी प्रतिष्ठा, आबरू स्वामींनींच वसविली. स्वामीचें जोराने वजीर, रजवाडे यांजला मी खातरेस आणीत नाहीं. त्यास अबरूने जालियास स्वामीचाच नक्ष राहतो. श्रीमंत राजश्री दादास्वामींची आज्ञा ते आह्मास प्राणादाखल आहे. त्यांचें आज्ञेत उजूर करीत नाही. मी त्यांचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक करून पुणेयास येऊन श्रीमंत राजश्री दादास्वामीजवळ विनंती करणें ती करीन. आह्मी चाकर स्वामीचे कमाऊ आहे, स्वामीचे चार पैसे खराब करावयाचे नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१३६] श्रीजगद्गुरूप्रसन्न. ११ जून १७५१.
राजश्री दिनकर महादेव गोसावी यांसी :-
सु॥ इसने खमसैन मया व अलफ. रा. गणेश बल्लाळ आज मंगळवारी प्रविष्ट जाहले. त्यांनी वर्तमान सांगितलें. तेथें भावार्थ कीं, गुजराथ निम्मे व सिहीगड मात्र करार कर्नाटक न द्यावें, कारभार राजश्रीनीं खातरेस येईल ते करावे. ऐशीयास, राजश्रीस अटकाव गडावर जाहाला, यासाठी इतके दिवस भांडलों, ज्यांनी अटकाव केला त्याचे दावेदार जालों. सर्व मातब्बरांचा डौल एकीकडे. एक आमचा त्र निश्चय की भांडून अथवा सलूखाने राजा सुटावा, ज्याचे चाकर ह्मणविलें त्यासाठी मेहनत करावी, मग तो बूज करून कृपा करील तेच विशेष. याअर्थे लाखो रुपये खाऊन आपले मनसबे बुडवून, राजा सुटावा या थरास आणिलें सर्व बाईसाहेबांचे पक्षी मिळाले होते. एक आह्मी मात्र राजश्रीचे पक्षीचे जाणून आमचे पारिपत्यास सर्व राज्यांतील सरदार प्रेरिले. गायकवाड तो सर्व देश लुटीत सातारियासच आला, याजमुळे भागानगर व कर्नाटक प्रांतीचीं कामें अफ्तर जाहालीं. इतके पदार्थ राजश्रीचे सुटकेचे उपयोगास लागलों यास्तव प्राप्त जाहालें. आता गडावर सर्वाध्यक्षता राजश्रींची जाहालियाउपर आमचे मनोरथ बाकी राहिले नाहीत. मतलबाचे यादीवर करार त्यांनी संतोषेंकरून देणें उचित. यद्यपि न दिल्हे तरी आह्मी त्यासाठीं अडवावें असें नाहीं. जेव्हा खाली येतील तेव्हां सर्व सेवकांच्या रीतीं व आमचे स्थितीची तुळणा करितील. तेव्हां जे त्यांचे खावंदगिरीस व कदरदानीस उचित तेंच करितील. राजास वर बसविलें होतें यास्तव आह्मीं किल्ल्याशी भांडत होतों. आतां राजाचा यख्तियार परिच्छिन्न जाहाला असिला तरी एके दिवसांत आमची फौज उठोन येईल. आपलें पदरचें खाऊन बसावयाचे प्रयोजन काय? परंतु सांगोल्याहून राजे गेले ते समयीं चिरंजीव नाना व चिरंजीव भाऊंनी अर्ज राजश्रीस केला होता की गडावर न जावें. परंतु आमचा अविश्वास यामुळे गेले. शेवटीं कर्मभोग अपकीर्ती येथपावेतों जाहाली आतां राजे वर राहिले, आमचे फौजेस उठवून लाविले, तरी मागती अनेक कल्पना व्हावयास अंतर होणार नाहीं. करवीरकरांकडील वगैरे पेंच बहुत आहेत. खावंद लोकांनी व जे हालीं तेथें मंत्र सांगणार असतील त्यांसी दीर्घ विचारून जे करणें ते करावें. सर्वोत्तम पक्ष हाच कीं तिळमात्र संशय न धरता राजश्रींनीं खाली यावें. दिल्ली, इरान, तुरानापासून रामेश्वरापावेतों दुर्लौकिक जाहाला आहे तो दूर करावा. कारभाराचा अर्थ जर जोरावादीने आजपर्यंत कोठेहि कारभार शेवटास गेले नाहीत. सर्व योग खावंदाची रजावंदी राखावी, हेच आमची इच्छा. खावंदांनी आपले आवडीने कारभार घेतील तेव्हांच करूं. कारभार करितां बहुतांचा दावा पदरीं पडतो तो कारभार कशास पाहिजे ? खावंदांनी दिल्हे दौलतींत कारभार बहुत आहेत. नवा तोतया लबाडी करील यास्तव ठेविला, त्यास जिवें न मारावें, वरकड खातरेस येईल तेथे ठेवावा. आमचा गुंता तिळमात्र नाहीं. खावंदांनीं सुखरूप राज्य करावें. याप्रकारें बोलोन हवालदारास समजोन सांगोन खाली प्रतिपदेस येत तें करणें. वेरझारेवर काम पडल्यास अनेक विघ्ने उपस्थित होतात. यास्तव रंग भरून त्यांची निशा करून खाली येत, आह्मी श्रम केलियाचें सार्थक होय, तें करणें. छ २७ रजब, मंगळवार, संध्याकाळ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
उभयतां वादी मान्य जाहले. त्याप्रमाणे शिदोजी बहिरोजी उभयतां वडिलभाऊ शिक्का नांगर दस्तकाचा खावंद त्याचा दुमाला कर्यात निमसोड गांव ३२ बत्तीस खेरीज मायणी तर्फ गांव ८ आठ वतन दुमाला केले असे. तरी या वतनाचा हक्क लाजीमा, इनाम गाऊ व इनाम जमीन व बलुत्याची राहणुक, पटी, पासोडी, सनवार, बिज, बकरा, खलेती, दिवटी, बजार, चाऊका, ठग, शेलधार, पानमान, तशरीक, सुदामत भोगवटिया ब॥ चालत आले असेल त्या प्रे॥ कर्यात निंबसोड गांव ३२ येथील देशमुखीचें वतन अनुभवून सुखरूप रहाणें व मायणी कर्यात गांव ८ येथील देशमुखीचें वतन शिदोजी बहिराटजी यांनी कर्यात मजकूरचे शिक्का व मानपान, तश्रीफ, नांगर, दस्तक, हक्क लाजिमा, व इनाम गांव व इनाम जमीन, व बलुत्याची रहाणूक, पटी, पासोडी, सनवरा, बीज, बकरा, खळोती, दिवटी, बाजार, चाऊका, ठग, शेलधार, सुदामत भोगवटिया ब॥ चालत आलें असेल त्या प्रे॥ कर्यात मायणी गांव ८ येथील देशमुखीचे वतन अनभवावें. निमसोड मायणी परगणा एक त्यापैकी उभयतांस सदर्हूप्रमाणें आलाहिदा तालुका तोडून वांटणी करून दिल्ही आहे त्या प्रों चालणे. निमसोडकरांनी आधी पानमान घ्यावा, मग मायणीकरांनी घ्यावा. एकांनी एकास कथळा करावयासी गरज नाहीं. हरदूजणापासून दिवाणे समजाविशी ब॥ शेरणी घेतली रुपये ५००० पांच हजार त॥
शिदोजी बिन बहिरोजी देशमुख क॥ शिदोजी बिन बहिराटजी पश्विमवादी
निमसोड देशमुख क॥ मायणी.
३३३४ १६६६
ए॥ तेहतीसशे चवतीस ए॥ सोळाशे सहासष्ठ
येणेप्रमाणे हरदूजणापासून शेरणी घेऊन वतन दुमाला केले असे. सदर्हू वाटणी प्रें॥ वतन अनुभवून गंगाजल निर्मळ असावें. परस्परें कथळा करील तो गोताचा अन्यायी, दिवाणचा गुन्हेगार. हा मजर सहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
ऐसे सभानायकांनीं विचार करून हेहि गोष्टीस वतन पश्विमवादी यास साधत नाहीं ऐसे समस्त गोत नायकांचे मत जाहले. शिदोजी बहिरोजी देशमुख खरा. शिदोजी बहिराटजी पश्विमवादी यास वतनास तालुका नाहीं हा सिध्दांत जाला. मग राजश्री पंत प्रतिनिधी यांनी निकाल काढिला कीं हे वतनाची गोष्टी आहे, याचा निवाडा राजश्री स्वामीच्या विद्यमाने करावा. ह्मणून राजश्री स्वामीपाशी सातारियाच्या मुक्कामी येऊन विनंति केली कीं साहेबी यास कायते विल्हे लाविले पाहिजे. त्याजवर महाराज राजश्री स्वामी यांनी सभेस बैसोन गोत मिळवून गोतनायकास आज्ञा केली की अग्रवादी शिदोजी बिन बहिरोजी, पश्विमवादी शिदोजी बिन बहिराटजी यांच्या तकरिरा मनास आणणें. तकरिरा घेऊन पहिले गोतांनीं व पाटलांनी कयास केला हे मनास आणून विचार केला कीं राजसभा ह्मणजे इंद्रसभा, धर्मपरायण, सिध्दिप्रमाण, मर्यादा रक्षणार, यांनी उभयतांच्या तकरिरा मनास आणून पूर्वी प्रतिनिधी यांचे विद्यमानें शिदोजी बिन बहिरोजी ज्याप्रमाणें खरा केला त्याप्रमाणें हल्ली इनसाफ जाहले. त्यावर राजश्री प्रतिनिधींनी महाराज राजश्री स्वामीस विनंती केली की यदर्थी साक्षी कर्यात म॥रचे पाटलांनी श्रीत दिल्ही ह्मणून सदहर्हू प्रमाणे तपशीलवार साक्ष विदित केली. एकूण प्रतिनिधीच्या विद्यमानें शिदोजी बहिरोजी अग्रवादी खरा, परंतु महाराज साहेबमजालसीं यास विचारलें की इनसाफ तो कलोन न गेला परंतु पांच पिढीया शिदोजी बहिराटजी वतन खात आला. याचा वतनास कलंक लागला. जैसा चंद्रास कलंक तैसे जाहले. एक तरी पोसणा घेतला होता. दुसरी गोष्ट भोगवटाही जाहला याकरितां निमसोड मायणी कर्यात गांव ४० चाळीस त्यापैकी मायणी तर्फ गाव ८ आठ दरोबस घ्यावे. उरले निमसोड कर्यात गांव ३२ बत्तीस शिदोजी बहिरोजी अग्रवादी यास द्यावे आणि गर्गशा तोडून टाकावा ह्मणून विचारिले. मजालशी यांनी उत्तर दिल्हें की महाराज साहेब ह्मणजे हिंदुपती बादशाही ईश्वराचें आधी ध्यान आहेत. जे इनसाफ कराल त्यांत कुसूर ठेवू नये ह्मणजे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कीर्त राहील. उभयतांची सजाविशी निकाल साहेबी काढिला येणेंकरून हारदुजणाचा गर्गशा तुटला. हे गोष्टी आह्मा गोतास मानिली. मग सदर्हूप्रमाणें हासदुजणास सांगितलें की शिदोजी बहिरोजी अग्रवादी यानें कर्यात निमसोड गांव ३२ बत्तीस रक्कम जमीन चावर ४०० चारशे याचे देशमुखीचें वतन अनुभवून असावे. शिदोजी बहिराटजी पश्विमवादी यांणी मायणी कर्यात गांव ८ आठ एकूण रकम जमीन चावर २०० दोनशे येथील देशमुखी वतन अनुभऊन असावे. ह्मणून समजावीस केली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
निमसोडास शिदोजी देसाई याच्या घरास पाठविला नाहीं. दोघे वडील लेक बहिराटजीचे आंबरखानाजवळ चाकरीस ठेविले. त्यास आंबरखान बरोबर घेऊन माहालीं नायब ठेऊन आपण खडकी अवरंगाबादेस गेले. त्याजबरोबर दोघे भाऊ जात होते. ते पळाले. दूर कसेंहि जावे ह्मणून बगर रजा पळोन आले. मागें खजाना आंबरखानाचा येत होता तो लुटला. वाटेस दगा जाहाला. ह्मणून खानानें माहाली नायबास लेहून पाठविलें कीं बहिराटजीचे लेक पळाले, त्यांनी वाटेस खजना लुटला, तरी बहिराटजीस कैद करून ठेवणें. त्याजवरून दिवाणानें बहिराटजीस कैद करून मार देऊन गुन्हेगारी व्होन पादशाही चार हजार खंड बैसविला, द्यावयास ताकथ नाहीं. मग शिदोजी देसाई याजपाशीं येऊन बजिद जाहला कीं मी तुझा चाकर आहें, आपणावर बला आली, आपण मरतों, तरी हल्लीं कुमक करणें. ह्मणून निमसोडास येऊन शिदोजी देसाई यास सांगितलें. मग शिदोजी देसाई यांनीं गांवगन्नाचे पाटील मिळवून दुसाक हक्क पदर पसरून मागून घेऊन चार हजार व्होनाची पट्टी करून दिली आणि आपला चाकर सोडविला. याखेरीज कांहीं नागवण पडली नाहीं. अगर आमचे गुजरातीनें कधी तकसील देशमुखीची लेहून दिल्ही नाहीं. येणेप्रमाणें करिणा देशमुखीचा आपले वडिल वडिल सांगत आले आहेत. हें लेहून दिल्ही साक्ष समस्तांनीं सही, येणेप्रमाणें गोताच्या जाहल्या. त्याजवर सभासद गोतनायकांनी सिध्दांत केला की पूर्वी तकरिरावरून इनसाफ पाहोंत. शिदोजी बहिरोजी खराच जहाला. शिदोजी बहिराटजी पश्विमवादी याचे वडील चंदजी बहिराटजी मुतालिकीच करीत होते हे खरे. सूर्याजी त्याचा लेक पोष्या घेतला. यामुळे देशमुखी करू लागला. परंतु चंदजीचा लेक बहिराटजी याचे वैरियाचा वंश ह्मणून देशमुखी करूं लागला. शिदोजी देसाई यानें पोशीक घेतला मात्र. परंतु याचे घरी राहून याचा लेक ह्मणून देशमुखी करावी ते केली नाही. जबरदस्तीमुळें देशमुखी करू लागला. परंतु देशमुखीचा मलक नव्हे. मुतालिकीचे देशीचा वतनस तालोखा नाहीं. ऐसें मजालसीचे मते जाहले. गोहिमुळें ही तालुका नाहीं ऐसे जाहले. अग्रवादी याचे वडिलाचे कागद लेहून घेतला ह्मणोन पश्विमवादी याने तकरीर केली. व गोही गुदरल्यावर आशंका घेतली कीं कागद आहेत ते पाहणें. त्याजवर राजश्री पंतप्रतिनिधी यांनी कतबा लेहून घेतला कीं कागद दाखविणें. त्यास तो बोलिला कीं चौकामाचे कागद आहेत ते घेऊन हाजर करितों त्यास कागद गोतास दाखविले नाहींत. तेव्हां गोतानें चर्चा केली कीं कागद असतां तरी दाखवितां. यद्यपी असला तरी तकलुबी असेल. सभेस कशास काढावा. ऐसा अर्थ पाहून कागद दाखविले नाहीत. पश्विमवादी साधक खळवादी नसती आशंका घेतो. तरी ते कागद प्रसंगास दाखवून शानिशा जाली नाहीं. तेव्हां झुटबाता असतील. ऐसे गोतमते जाहले. हक्क चौथाई व इनाम तीजाईचा खंड पडला. ह्मणून पश्विमवादी यांनी तकरीर केली. त्यास पहिले गोताचें मतें जाले कीं इदलशाई दिवाणांत हक्क चौथाई व इनामतीजाईच नव्हती व गोताचेही साक्षीनें जाले कीं इनाम इनामतीजाई व हक्क चौथाई पडली नाहीं. हारामखोरीचाही खंड पडला तो शिदोजी देसाई यांनी पाटलास पदर पसरून दुसाक हक्क भरीस घालून खंड वारिला. परंतु पश्वमवादी यास पडो दिल्हा नाहीं. यामुळे गोतमतें जाहले कीं पेशमवादी यास वतनास संबंध नाहीं व खस्त जाहली ह्मणून तकरिर केली. त्यास खस्त जबरदस्तीमुळें बईद जाहली. देशमुखीमुळें कांही जाहले नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
येणेंप्रणे गोहिदार समस्त मिळोन व क॥ मायणी बाळुतेव नाइकवडी याणी साक्ष दिली कीं सिदोजी बिन बहिरोजी घारगे अग्रवादी व सिदोजी बिन बहिराटजी घारगे पश्चिमवादी या दोघांत कर्यात मजकुरचे देशमुखीचा लथळा लागला ह्मणून तमाम गांवगन्ना कर्यात म॥ रचे मोकदम बोलावून विचारलें कीं उभयतांचा लथळा कैसा वाढला आहे तो आपले बेताळीस स्मरोन सत्ये न्यायें सांगणें. ह्मणून श्रीचा बेल माथा ठेविला. तरी शिदोजी बिन बहिरोजी घारगे अग्रवादी व सिदोजी बहिरोजीचा बाप सिदोजी व सिदोजीचा बाप सूर्याजी मयत झाले. त्याची बाईल बुवाईअवा तिचा लेक लहान होता. ते वेळेस आबरखान दिवाण होते. त्याने बायकोस बोलावून सांगितले कीं तुझा दादला मरोन गेला. तुझा लेक लहान दिवाण चाकरीस आपला कारभारी ठेऊन देणें. त्यास तिनें विचार मनास आणून चंदजी घारगा मौजे विखळे यास चाकरीस ठेवून मुतालकीचें काम सांगून कारभास दिल्हा त्याची हकीकत तरी, बुबाईआवाचा दादला सूर्याजी देसाई, त्याचे वडील-वडील नीमसोड मायणीची देशमुखी खात आले सूर्याजी देसाई यांचे बदे दोघेजण करोजी व चापजी हे दोघे अवक्रियेस येऊन सूर्याजी देशमुख रात्री वडगावांत जिवे मारिलें त्या दिवसापासून हारामखोरी करून गेले ते आज तागाईत गेले. सूर्याजी देसाई मेल्यामुळें शिदोजी नेणता, त्याचा मोडता काळ आला. दर्याजी नायकवाडी हाळीं होता. तो बोलावला. त्यानेंच दिवाणांत सांगोन बुबाईआवास बोलावून मुतालीक विखळेकर चंदजी आणून ठेविला. चंदजीने बाजारची वाट कितेका दिवसांनी मारिली, हारामखोरी केली. ह्मणून त्यास दिवाणानें जिवें मारिलें. त्यावर दहा पांच वर्षे देशमुखीचा कारभार बुबाईआवाच करीत होती. चंदजी विखळेकर मारिला, त्यास पुत्र दोघे, एक बहिराटजी, दुसरा वणगोजी होता. पोरवडा जहाला. कितेका दिवसांनीं त्याचे सोयरे कडेगांवकर पाटील यांनी बहिराटजीस आणून बुबाईआवास व शिदोजी देसाई यास भेटविला. ह्मणो लागले कीं, यास अन्नास लावणे. त्याजवरून त्यांनी चाकरीस ठेविला. त्यास कर्यात मायणी तर्फेस आठ गांवींचे देशमुखीचे मुतालकीचा शिक्का देऊन मुतालकीस ठेविला. शिदोजी देसाई कैफी, हमेशा धुंद, निमसोडांत राहिला. त्याच्या पोटी संतान नाहीं. तिही बायका होत्या परंतु संतान जाहलें नाहीं. मग बहिराटजी विखळंकर यास पुत्र तिघे होते. त्यांतून धाकटा पुत्र सूर्याजी शिदोजी यांनी पोष्या घेतला. त्याजवर शिदोजी देसाई यांनीं चवथी बायको केली. त्यास चवघे लेक जाहले. ते वेळेस आंबरखान दिवाण होते. बहिराटजी मुतालिकी आठगांवची करीत असतां कारभाराचा फैलाव बराच केला. त्यास त्याचे खुद्द लेक दोघे, तिसरा पोष्या शिदोजी देसाई यास दिल्हा, ऐसे तिघेजण आंबरखानास नेऊन भेटविले. आंबरखान नेकजाद वली होता. त्यास सांगितलें कीं पोष्या लेक सूर्याजी दिल्हा तो दरबारिया आहे, उपयोगाचा होईल. ऐसें बहिराटजीस सांगितलें. त्याजवरून बहिरटजीनें सूर्याजी तिसरा लेक शिदोजी देसाई यास दिला होता तो अविद्या मनांत आणून आपले घरी नेऊन मायणीस ठेविला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
यास साल गु॥ राजश्री पंतप्रतिनिधी यांनी हरदुज्याच्या तकरिरा लेहून घेऊन कुलपरगण्याचे पाटील जमा करून त्यास श्रीकृष्णावेणीसंगमीं माहुलिक्षेत्रीं कर्यात मजकुरच्या पाटलास श्रीत घालून साक्ष विचारिली कीं हे दोघे जण भांडतात. यांच्या वतनाची हकीकत आपले बेतालिस स्मरोन सत्य सांगावें, हे गोष्टीस तुह्मी भीत असला तर न भीणें, आपण तुमचे जिवाचे खावंद आहों, तरी तुह्मास जें ठाऊक असेल ते साक्ष सत्य वदणें, भीड कोणाची न धरणें, स्वर्गी तुह्मास कोणी कार्यास नेणार नाहींत ऐसें समजोन इमानपूर्वक साक्ष देणें, तुह्मास गोहत्या ब्रह्महत्याचे पातक असे. ऐशी शपथ घालून साक्ष विचारिली पाटील येणें प्रमाणें बित॥.
कसबे निमसोड धावजी बिन संताजी व संताजी बिन तुलबाजी प॥ घारगे क॥ म॥ १ |
मौजे चितळी सुलतानजी बिन मुराजी व बहिरजी बिन लखमोजी प॥ पवार मौजे म॥ १ |
मौजे सिरसवाडी ह्मसाजी बिन कुमाजी व देवजी बिन खेळोजी प॥ इंगळे मौजे म॥ १ |
मौजे वडगांव हणगोजी बिन नागोजी प॥ घारगे मौजे म॥ १ |
मौजे उपाळवे निळोजी बिन मालोजी प॥ घारगे मौजे म॥ १ |
मौजे तोंडोळी सुभानजी बिन तुकोजी प॥ जाधव मौजे म॥ १ |
मौजे आंबवडे भुतोजी बिन मोतजी प॥ पवार मौजे म॥ १ |
मौजे गुलसर संताजी बिन भिकाजी व शेटयाजी बिन शहाजी प॥ जाधव मौजे म॥ १ |
मौजे गारडि न-होजी बिन बापोजी प॥ बाबर मौजे म॥ १ |
मौजे चोरडि मानाजी बिन बापोजी व मानाजी सेखोजी प॥ ढिसळ मौजे म॥ १ |
मौजे आंबरापूर सुलतानजी बिन जुमाजी व विठोजी बिन नागोजी अमळे प॥ मौजे म॥ १ |
मौजे राहाटणी शिवाजी बिन दंताजी प॥ खुळे मौजे म॥ १ |
मौजे वेळी थडोजी बिन ह्मसाजी प॥ जगताप मौजे म॥ १ |
मौजे कडेगांव बाबाजी बिन जानोजी प॥ यादव मौजे म॥ १ |
मौजे उचमणे देवजी बिन आनाजी व तुकोजी बिन सखोजी प॥ सिंदे मौजे म॥ १ |
मौजे वाजोळी उदाजी बिन व्होनाजी प॥ मगर मौजे म॥ १ |
मौजे पळशी नरसोजी बिन जानोजी प॥ पवार मौजे म॥ १ |
मौजे गोपुन खंडोजी बिन सोनजी प॥ जाधव मौजे म॥ १ |
मौजे खरशींगे रघोजी बिन माणकोजी प॥ घारगे मौजे म॥ प॥ शिंदे मौजे म॥ १ |
मौजे चिखली नऱ्होजी बिन मळजी १ |
मौजे होळिचे गांव रुद्राजी बिन देवजी व एकोजी बिन लखमोजी व इठजोजी बिन धाराजी प॥ शिंदे मौजे म॥ १ |
मौजे अलंपूर राणोजी बिन संताजी प॥ प॥ यलनार मौजे म॥ १ |
मौजे सासपडे धनाजी बिन चरताजी प॥ पोळ मौजे म॥ १ |
मौजे कोतिन सोनाजी बिन अनाजी शिंदे प॥ मौजे म॥ १ |
मौजे जखगाउं चत्रोजी बिन गोपाळजी प॥ घाटगे मौजे म॥ १ |
अबाजी बिन बमाजी नाईकवडी शिंदे कर्यात निमसोड मायणी १ |
क॥ माईणी बलुते रुपाजी बिन राहुजी परिटवकोड नाईक बिन तुकनाक महार क॥ म॥ . १ |
लंग ० |