[७७] श्री. १ जुलै १७५०
अजम शेखमिरा दाममहबतहू.
मोहीबान मुखलीसान दस्तागाही अजी बाळाजी बाजीराव प्रधान दुवा येथील खैर अफीयत जाणोन आपली खैर अफीयत कलमीं करीत जाणें विशेष. किताबत पाठविली ती पोहोंचली. महारो फलदरजे साहेबाचा फर्मान खास दस्तकाचा दर्शनास यावयाचा सादर जाहला. त्यास साहेबाचे काय सला ते फर्माविली पाहिजे, ह्मणोन तरकीम केले. ते आया होऊन शादमानी जाहली. मोहीम येथील इतल्याशिवाय कांहीं अमलांत आणणार नाहीं हे निशा आहे. त्यास खावंदाचे जनाबांत सेवकलोकांनीं हजर असावें, हें तो लाजीम आहे. लेकीन किल्लेबंद असतां या उमदे उमदे राज्यभार चालविणार ईज्यानेवासारिखे हजर नसतां इतरानें जाणें हा विचार सल्लाह नाहीं. वाईंत असावें. साहेब मेहेरबान महाराजे फलकरजे खालीं उतरलियावरी ईज्यानबास इतला द्यावा. उपरातीक जैशी आज्ञा होईल तैसें करावें. सारांश. हुकुमाशिवाय तेथें न जावें. र॥ छ ७ शाबान. ज्यादा काय लिहिणें.
लेखनसीमा.