[८३] श्री. १९ फेब्रुवारी १७२५
तीर्थरूप तपोनिधि महाराज राजश्री परशराम स्वामीचे सेवेशी.
सेवक राऊ रंभाजी निंबाळकर. चरणावरी मस्तक ठेऊन सं॥ दंडवत. विनंति. उपरी येथील क्षेम त॥ छ ७ हे रजब मु॥ पुणें स्वामीचें आशीर्वादेंकरून यथास्थित जाणोन स्वकीय लेखन करणें. यानंतर बहुता दिवसा स्वामीनीं कृपा संपादून आशीर्वादपत्र पाठविलें तें उत्तम समईं पावोन सनाथ जालों. लिहिला अभिप्राय अवगत जाला. मौजे पिंपरीच्या लोकांविषयीं लिहिलें. तरी आज्ञेप्रमाणें आपला कौल पाठविला आहे. आमचे तरफेनें स्वामीच्या गांवास कांहीं उजूर लागणार नाहीं. समाधान असो दीजे. सेवकास आपला प्रसाद पाठविला तो पावला. निरंतर आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. विशेष काय लिहिणें. दया असो द्यावी हे विनंति.