लेखांक ४१.
१७०१ पौष शुद्ध १४. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. भोंसले यांणीं बंगाल्याची मसलत कबूल केली. राजश्री खंडोजी भोंसले उंदरीचे घाटाखालीं फौज जमा करण्यास आले. पंचवीस हजार फौजचा जमाव केंला. एका दो दिवसीं कूच करून, छत्तीसगडावरून बंगाल्याचे सुमारें जातील. सरकारचे वकील राजश्री लक्ष्मण गोविंद सुरतेस होते, त्यांस हुजूर आणविलें. ते पुणियास येऊन पोहचले. इंग्रजास बिघाड हें साफ समजलें. इकडील फौजा पुढें रवाना जाल्याच आहेत. वकील आलियानंतर सिंदे होळकरही छ ६ मोहरमीं डेरेदाखल जाले. सत्वरच गुजराथ प्रांतीं जातील. ईश्वरसत्तेनें इंग्रजांनीं मैदानांत यावें. मग होईल तें द्रिष्टीस पडेल. हें वर्तमान नवाबबहादूर यांस सांगावें. र॥ छ १२ मोहरम. हे विनंति.
पै॥ छ २७ मोहरम, सन समानीन श्रीरंगपट्टण.