Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

तेज्या पांडे याचे मागितल्या प्रो                                                    लेखांक ४२.                                             १७१४ मार्गशीर्ष वद्य १.
दस्तक रा। छ १४ राखर.

श्रीमत् राजश्री पंतप्रधान-
दस्तक राजश्री गोविंदराव कृष्ण दी।। सरकार राजश्री कमाविसदार व मोकदमानी व रहदारानी व चौकीदारान व बाजे लोकानी जकाती माहालानी देहाय सु॥ सलास तीसईन मया व अलफ राजश्री राजे तेजसिंग बाहादूर हाजारी यांचे पौराणिक वा राजश्री बालकृष्ण व्यासजी हे हैदराबादेहून आपले देशास जैनगरास जातात समागमें तंटे पडत कंची ४ चार व मनुष्य बा आहेत यांस मार्गी कोण्हेविसीं मुजाहीम न होणें जेथे राहतील तेथे चौकी पाहारा करून समागमें बदरका देऊन आपलाली सरहाद पार करून देणे जाणिजे छ १४ राखर.

रा रघुनाथ गोविंद कमाविसदार                                                   लेखांक ४१.                                             १७१४ मार्गशीर्ष वद्य १.
कसबे मुरम याचे नांवें पत्र
आजम साहेब याणी मागितल्यावरूने
लिहिले रा छ १४ राखर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून खकीयें लिहीत जावें विशेष कसबे मुरुम एथील काजीपणा पेशजी महमद हफीजुदीखान याजकडे होता हाली महमुद यास मुकरर होऊन आले आसेत त्यास काजीपणाची जमीन मशरुत कसबे मुरुम एथें आहे व निका खानी वगैरे काजी मार यांस दखल देऊन कोणे विषईं इजा न पोंहचे ते करणे व जमीन वगैरेचा हकलवाजिमा जो राहिला असेल तो वाजबी प्रो देवऊन पुढें हरकत न पडे आसे करावें येविसीं मेहरबान माद अजीमखान आजमल मुलीक बहादूर याणी आगत्यवादें सांगितलें सबब लिहिलें असे सदरी लिहिल्या प्रो अमलांत आणावें रा छ १४ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

रा रघुनाथ गोविंद कलबर्गेकर कमाविसदार                                    लेखांक ४०.                                             १७१४ मार्गशीर्ष वद्य १.
याचें नावें पत्र रा छ १४ राखर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असलें पाहिजे विशेष मौजे पदापूर प्रा कलबर्गे हा गांव राजश्री राय नारायणराव मुतसदी बादशाही दिवानीकडील यास बहुत दिवसांपासोन इनाम आहे म।।रनिलें राजश्री रायरायां याचे व्याही याजकरितां राजश्री मा यांचे सांगण्यांत आलें कीं रघुनाथपंत मोकासा-बाबतीकडील कमाविसदार मौजे मारचे रयत लोकांस हरयेक विसी उपद्रव करून मामुल आख आहे त्याजपेक्षां ज्याजती आमल घेतात त्यास येविसीं आपण पत्र ल्याहावें त्याजवरून हे पत्र लिहिलें असे राय मार राज्याजीचे आप्त तेव्हां आमचेहि आप्त व गांव इनाम आसे समजोन मामुलाप्रो स्वराज्याचा आमल घेऊन कोन्हेविसीं मौजे म॥रचे रयत लोकांस उपद्रव न देणे फिरोन याचा बोभाटा येऊ न देणे रा छ १४ राखर बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

राजश्री विठ्ठलबावा यांचे पत्राचा                                                   लेखांक ३९.                                             १७१४ मार्गशीर्ष वद्य १.
जाब रा छ १४ राखर.

राजेश्री विठ्ठलबावा स्वामीचे सेवेसीं-
पो गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जाणें विशेष तुह्मीं पत्र पा ते पाऊन सविस्तर मार समजली शरीरप्रकृतीचे वर्तमान ल्याहावें कीं संतोष होईल आमचे प्रकृतीचे वर्तमान च्यार दिवस आराम जाला होता मागती सीतज्वराचा उपद्रव जाला आहे. यावरून वैद्यास उदगिरीहून आणून उपच्यार करवितों ह्मणोन लिा तें कळलें ऐसीयास आमचे प्रकृतीस आतां कांहीं येक आराम आहे परंतु नकाहत फार उभे राहून वागण्यास आयास होतात याउपरी ईश्वरकृपेकरून आराम होईल तुह्मीहि शरीरास वैद्याचे औषध घेऊन उपचार करवावा आणि वरचेवर वर्तमान लिहीत जावें पुण्याकडील वर्तमान गोविंदराव जाऊन पोहोचले भेटी जाल्या राजेश्री नानाचा हेत कीं प्रस्तुत श्रीमंताचे सरकारासी आणि सर्वासी सलूक आहे स्वस्थतेचा समये असा मागती यावयाची नाहीं याजकरितां कासीयात्रा करून लौकर यावें तोंपरियंत राजश्री हरिपंत तात्या आटोपावयासी आहेत याप्रो निश्चये केला परंतु सर्वांचे बोलण्यांत व प्रस्तुत सुस्ती खाले पडल्याप्रो गोविंदराव यांचे लिहिण्यांत विशेष आहे वरकड यथास्थित रा छ १४ राखर हे विनंति.

पत्र व्यंकाजी शामराव यांस                                                        लेखांक ३८.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १५.
धाराशीव-प्रकरणीं बळवंतराव हरी
यांजकडून पाठविलें छ १३ राखर.

राजेश्री व्यंकाजी शामराव खामी गोसावी-
पो गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें विशेष मौजे बावी व मोरडे या गांवचा सिवेचा कजिया फार दिवस आहे कजियाचे राणांत हरदो गांवांनीं पेरूं नये पुढें निर्णय ठरेल त्या प्रा वर्तावे ऐसें असतां मोरडेकर दुईचे रानांत नांगर धरून खटला करितात ते नांगर धरूं नयेत धरले ते सोडावे याप्रो तुह्मांस समक्ष राजश्री गोविंदराव यांणीहि सांगितले परंतु अद्याप गांवकरी यांचे नांगर सुटत नाहींत ह्मणोन कळलें हे गोष्ट चांगली नाहीं येणेकरून कजिया होईल या उपरि गांवकरी यांस निक्षून सांगोन कजियाचे जमिनींत नांगर धरले ते सोडून नेणें बोभाट येऊ न द्यावा या पत्राचें उत्तर पाठवणें रा छ १३ राखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

                                                                                      लेखांक ३७.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री तिमापा व श्रीपतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावे विशेष तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें सुरापुरास पोहोंचून राजे बहिरीबहादर यांस सर्व वर्तमान सांगितलें रा गोविंद-अप्पा व सुभराव उभयतांस पुण्याकडे पाठवितात आह्मी आपल्यापासी यावें त्यास श्रीपतराव यांचे शरीरी सावकाश नाहीं जाणून दिवस-गत संस्थानिक आपले भरवशावर ह्मणोन तपशिलें लिहिलें तें समजलें त्यास राजे मारनिले यांचे पत्र आले त्यांत गोविंद-अप्पा यांचे समागमे तुह्मा उभयेतांस देऊन पुण्याकडे पाठवितों याप्रो आणि तुमचे लिहिण्यांत गोविंद-अप्पा व सुभराव पुण्यास जातात श्रीपतरायास समाधान नाहीं याजकरितां येण्याची दिवसगत ह्मणोन त्यास नाइक यांचे लिहिणे येक तुमचे लिहिणे दुसरेच यांत काये समजावे लिहिण्यांत असा व्यत्यास तेव्हां हा तर मोठा कारभार जाबसाल बोलण्यांत आले त्याचे काये ठरलें हैं कांहींच लिहिलें नाहीं अपूर्व आहे येथे मंत्री हटकितात येक महिन्याचा करार करून गेली कांहीं येक उत्तर समजावे ते न होतां मोहगम पुळपुळीत लिहिले जाबसाल दीर्घसूत्रावर पडला मंत्रीसी उत्तर देण्याचे ठिकाण नाहीं तुह्मा उभयेंतापैकी येकाने इकडे येऊन येकाने तिकडे जावयाचे केले असते तरी काय तें समजण्यांत येते याउपरि जाबसाल कोणता तो निश्चयांत आणून लौकर ल्याहावें अथवा तुह्मी यावे त्याप्रो बोलतां येईल बहिरीबहादूर यांचे पत्राचे उत्तर इकडून पाठविलें आहे रा छ ११ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

जाब सुरापुराकडील पत्राचे छ ११                                             लेखांक ३६.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.
राखर जासुदा समागमें.

राजेश्री राजे व्यंकटप्पा नाईक बळवंत बहिरी-बहादूर गोसावी यांस-
5 सकल गुणालंकरण-अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्नो गोविंदराव कृष्ण असिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावें विशेष पत्र पाठविले ते पावले राजेश्री गोविंद अप्पा यांस तिमाप्पा व श्रीपतराव समागमे देऊन पुण्याकडे रवाना करितो तेथून आल्यावर उभयेतास सांगावयाचें ते सांगोन पाठऊन देतों सर्वविषईं आधार आपला ह्मणोन तपसिले लिहिलें त्यास नवाब मंत्रीपासी संस्थानचे अहवालाचा बयान करावयाचे रीतीनें करून जो जाबसाल ठरावांत आला त्याचा तपसिल तिमाप्पा व श्रीपतराव यांनीं सांगितल्यावरून समजला असेल येके महिन्यांत आपल्याकडून ठराऊन येण्याचा करार त्यास आधिक दिवस जाले हाली गोविंद अप्पा व उभयतां पुण्यास जाणार तेथून आल्यावर इकडे येण्याचा बेत लिहिला लांबण फार फार पडली यांत मंत्रीची मर्जी कसी राहील पाहावें सिवशंकर-पंत यांस हजूर पाठविण्याचा करार येथे ठरला त्याप्रो मार-निलेची रवानगी व्हावी ऐसे असोन अद्याप येणे होत नाहीं याजकरिता मंत्रीचे बोलण्यांत येक दोन वेळां आलें यास्तव सिवशंकरपंत यांची रवानगी सत्वर करावी ह्मणजे पुढील जाबसालास नीट पडेल छ ११ साखर बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.

                                         लेखांक ३५.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.

पु।। राजेश्री व्यंकटराम पिला गोसावी यांस-
विनंति उपरि.

वाला-ज्याहा-बाहोदूर व उमदुतुल-
उमरा-बहादूर यांची मर्जी आपले
मारफतीने जाबसाल अनुकूल करून
घेण्याची फार आहे ह्मणोन लिो ते
कळले. कलम १ 
इंग्रजाचे विलायेतीतील अंतरंग
वर्तमान लिहिण्याचें तें लिहावें
याविषीं जवाब आल्यास लिहितो
ह्मणोन लिो त्यास लिहून पाठविणे.
कलम १

येकूण दोन कलमे रा छ ११ राखिर हे असिर्वाद.

                                                       लेखांक ३४.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.

पु।। राजेश्री व्यंकटराम पिला गोसावी यांस-
आसिर्वाद विनंति उपरि तुह्मी पत्री मार लिहिले त्याची उत्तरें.

काल-हास्ती तिमाना येड व बेम-
राज पालेकर नारसिंव्ह ध्वज यांजला
पत्रें व वस्त्रें आपण दिल्ही ती प्रविष्ट
केली तिकडून जबाब वस्त्रे येणार
ह्मणोन लिहिले उत्तम आहे. कलम १
सुभानराव यांस कार्यभाग अनुकूल
करून सत्वर रवाना करावे ह्मणोन
लिो त्यास मारनिल्हेस इकडून पत्र
देऊन पुणियास रवाना केले आहे
त्याजकडून अद्याप पत्रें आली नाहींत
आल्यानंतर लेहून पाठऊ सुभराव
यांचे नांवे पत्र पाठविलें तें पुणियाकडे
रवाना केले. कलम १
 जाबित्यो बमोजीब सर्व संरजाम
पालखी सुध्धां तयार जाला मागाहून
रवाना करितों त्यासमागमे हुजुरात
नवाब अजमुल-उमरा बाहादूर व
रायेरायां यांस हि जिनस पाठवितों
ह्मणून लिहिलें उत्तम आहे सरंजाम
रवाना करावा येथे पोहोचल्यानंतर
ज्याचे त्यास पावती करून आपल्या
कडील ठेवितां येईल. कलम १
राजेश्री रामचंद्रपंत निा भोंसले यांव
जला तुमचे पत्र पावतें करून त्यासी
बोलण्यांत आले मारनिलेकडून दर
जबाब घेऊन पाठविला आहे. कलम १
पेशजी खर्चाकरितां दोनसे रुपयाचा 
तमसुक लिहून पाठविला होता
या-दरजवाबांत आह्माकडे रवाना
करावा ह्मणोन लिो त्यास कुशल-पुरी
येथून गेले त्याणी मार्गीहून मनुष्याकरितां
समागमे पत्र व दोनशाचा तमसुक
पाठविला त्याजवरून सुभराव याचे
मारफात दोनसे रुपये माणसापासी
दिल्हे परंतु ऐवजाची निभावणी
मार्गी होणार नाहीं सा माणसाने
ऐवज समागमे न घेतां माघारा दिल्हा
तमसुक सुभराव यांणी परतोन घेतला
त्याजपासी आहे. कलम १

राजेश्री रघोत्तमराव यांस कुशल
पुरी यांणी पत्र पाठविलें तें त्यास
द्यावे ह्मणोन लिो त्याप्रो त्याजकडे
पत्र रवाना केलें उत्तर आल्यावर पातो
ठविता येईल. कलम १

सुभराव यास पांचसे रुपये खर्चा
देवावे ह्मणोन लिो त्यास
मानिल्हेस खर्चास द्यावे याप्रो रो
गोविंदराव यांस सांगितले आहे
पुणियांत खर्चास देतील. कलम १


९ कलमे सुध्धां सात रा छ ११ राखर हे असिर्वाद. 

                                                                                 लेखांक ३३.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.

पुा व्यंकटराम पिला गोसावी यांस-

आसिर्वाद विनंति उपरि तुमची पत्रें व अखबारा राजश्री नाना यांचे नांवें आल्या त्या वाचून पाहून लाखोटे करून पुण्यास रवाना केल्या पत्रांत लिहिलें आहे की सविस्तर मजकूर राजश्री गोविंदराव बापू यांचे पत्रीं लिहिला त्यावरून कळेल त्यास याउपरी तुह्माकडून पत्रें नाना यांचे नांवे येतील त्यांत ऐसे लेहू नये अखबार आमचे पत्रांत घालून पाठवीत जावी आणि नाना यांचे पत्रीं ल्याहावें की इकडील वर्तमान अखबार गोविंदराव बापूकडे पाठविली आहे त्याजवरून सर्व अर्थ ध्यानास येईल याप्रा नानाचे नांवे पत्रांत मजकूर लेहून पत्र खुलें बेगोंद इकडे पाठवीत जावें रा छ ११ राखर हे असिर्वाद.