Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ९२. १७१४ पौष वद्य ४.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मी छ २७ माहे रबिसानीचें पत्र पाठविले तें छ १३ जावली पावलें पेशजी तुमचे लिहिण्यांत च्यार दफे पत्रें रवाना केली पैकी तीन दफे पोंहचून एक रवानगी न जाल्याचें लिहिलें ती पत्रें गैरविल्हे पडून तुह्मापासी फिरोन आलीं याचा ता। लिहिला तो समजला राजश्री नाना यांचे नावें तुह्माकडून पत्राचा लाखोटा आला तो व आमचे पत्रांत अखबार पाठविली ते पुणियास रवाना केली पहिलीं पत्रें व हलीची याचे उत्तराविषई लिहिलें आहे उत्तरें येतांच तुह्माकडे रवाना होतील वरचेवर तिकडील कचे पकें वर्तमान लेहून पत्रें पैहाम रवाना करीत जावी काळा वाळा वास न जातां बंदोबस्तीने पाठवितो ह्मणोन लिा उत्तम आहे पालखी वगैरे सरंजाम तयार जाला आठ दिवसांत रवाना करितों ह्मणोन लिा त्या प्रा सरंजाम रवाना केलाच असेल नवाब उमदतुलउमराबाहादूर यांचे जोबसालाविषी लिहिलें त्यास हा मार पुर्ता समजण्यांत आल्यानंतर इकडून अनमान व्हावयाचा नाही येविषी विस्तारे लिहिणे नलगे वरचेवर पत्र पाठवून वर्तमान लिहित जावें र।। छ १७ जावल बहुत काय लिहिणे हे आसिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटराम पिला चिना-पटणकर लेखांक ९१. १७१४ पौष वद्य ४.
याचे पत्राची उत्तरे दोन र।।
छ १७ जावल.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण असीर्वाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष तुह्मी छ १७ माहे राखरचें पत्र पा ते पाऊन सविस्तर मा अवगत जाला श्रीमंतास अर्जी व अखबार बेगोंद पा आहे हे पाहून पुढे रवाना करावी आजपावेतो सात पत्रें पाठविली असे परंतु जवाब न आला याजमुळें पुढे लिहिण्यास अनमान व पुढें नवल विशेष लिहिण्यास आंगेज पुरत नाही इत्यादिक मार लिहिला तो सर्व समजला ऐसियास पत्रें पावलीं मार समजला एथून जाबहि रवाना जाले आहेत पावले असतील याउपरि पत्रें रवाना करण्याविसी अलस न करावा र।। छ १७ जावल बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद भोंसले यांजकडील रामचंद्रपंत यांचे पत्र तुह्मी पाठविलें त्याचा जाब त्याणी दिल्हा तो पाठविला असे हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
भवानी दुर्गाजी याचे पत्राचे उत्तर लेखांक ९०. १७१४ पौष वद्य ४.
रा छ १७ जावल डांकेवर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री भवानीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष तुह्मी छ २२ माहे राखरचें पत्र पाठविलें तें छ १ जाविली पावलें कार्तिक वद्य एकादसीस पुणियास तुह्मी पोंहचून राजश्री नाना व तात्या यांच्या भेटी घेतल्या मामलतप्रकर्णी जाबसालाचा आरंभ आहे ह्मणोन लिहिलें तें कळलें त्यास अलीकडे मामलतसमंधी बोलणी होऊन काय निश्चयात आलें हें ल्याहावें तुह्मी आपल्याकडील वरचेवर वर्तमान लिहून पाठवीत जावें रा छ १७ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सखाराम अनंत याणी कल्याणराव लेखांक ८९. १७१४ पौष वद्य ४.
निंबालकर यांस पत्र मागीतलें सबब
छ १७ जावली दिल्हे.
राजश्री कल्याणराव बापू गोसावी यास-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष राजश्री अंताजी बाजी देशपांडे पुणेकर पाटस एथें देशपांडपणाचे वृत्तीवर आहेत मारनिलेकडे तेथील दोन सेतें रुसुम ऐवजी इशा पासोन चालत आहेत व रामनवमीचे उछहाकरितां मारनिलेस देशमुखाचे गुमास्ते व गांवकरी पाटीलकुळकर्णी याणी गांवचे नजीक जमीन बरड सिवाय रकबा गायराण फुलें शाकभाजीकरितां दाखविली त्या जाग्यावर फुलें तुलसी शाकभाजी लाऊन उछहास अनभवीत असतां अलीकडे तेथील कादार राजश्री गोपाळपंत याणी दिकत करून सेतचे मालास अडथळा केला ह्मणोन कळलें त्यावरून लिहिलें असे त्यास पेशजीपासोन मारनिलेकडे जमीन बहुत दिवस चालत आली त्या प्रा चालावी गैरवाका कोणी समजाविल्यावरून सेत व जमिनीस दिकत कादारानी केली त्यास राजश्री पाटीलबावा यांचे पत्र देवऊन चालत आल्या प्रा! सुरळीत चाले ऐसें व्हावें रा छ १७ जावल अगत्य याविषईंचा बंदोबस्त करून द्यावा बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
छ १७ जावली पत्रें रवानगी लेखांक ८८. १७१४ पौष वद्य ४.
डांकेवर त्रिंबकराव विश्वनाथ सबनीस यांजला.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिंबकराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष एथील तैनाती व डांकेचे जासुदाचे रोजमरे फार तटले रोजमन्याचा ऐवज येत नाही याजकरितां जासुदाची खर्चावांचून फार अडचण माहागाईचा कडाखा या प्रकारचा दरगापटण चरुरुद्रवारं एथील डांकेचे जासूद उठून जात होते त्यांस खर्चास देऊन तूर्त राहविले त्यास तैनाती व डांकेचे जासुदाचे रोजमरे पाठवण्याविषी पेशजी लिहिलें परंतु अद्याप ऐवज येत नाही त्यास येविषई दिवसगत न लागतां रोजमन्याचा ऐवज सत्वर रवाना करावा व तैनाती जासूद रा छ १७ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे है विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र भीवराव श्रीपत करनूलकर लेखांक ८७. १७१४ पौष वद्य २.
यास छ १५ जावल ऐवजाचा मार
वांकू जासूद याजसमागमे.
राजश्री भीवराव स्वामीचे सेवेसी-
विनंति उपरि अलीकडे तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही तर वरचेवर पत्र पाठवीत जावे बाळाजी व्यंकटेश आले ह्मणजे ऐवजाचा निकाल लवकर करून देवितो गुंता नाही ह्मणोन पेशजी तुमचे लिहिण्यात त्यास मारनिलेहि तुह्मापासी पोहोचले लवकर ऐवजाच्या हुंड्या करून मारनिले यांची रवानगी करणे फार दिवस जाले कालहरण करूं नये रा छ १५ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब भगवानदास याचे पत्राचे लेखांक ८६. १७१४ पौष वद्य २.
ऐवजाचा मार गदवालप्रकणीं छ १५
जावल.
राजश्री भगवानदास मुरलीदास गोसावी यांस-
७ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीरवाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित जाणे विशेष तुह्मी पत्र पो ते पाऊन मार समजला राजश्री राजे सोमभूपालराव बाहादूर याणी आपले देणे बाबत रु।। २२८०० बावीस हजार आठशे आह्माकडोन देविले त्यास सदरहु रु।। आह्मी आपणांस पावते करून देऊन हा कागद घेऊन प्रस्तुत आतां रु।। १२५०० साडेबारा हजार रु।। नगद पा याचे उत्तर आल्यावर दाहा हजार रु।। पाठवितो तीनसे रु।। पैकीं कांहीं राजश्री बाळाजीपंत याणी खर्चास घेतले व काही एथील मुतसदीचा दंडक आहे ते पंतमार याणी लिो आहे त्यास जसी आज्ञा कराल तसी होईल ह्मणोन लिो ते सर्व समजले ऐसियास साडेबारा हजार रु।। पावले बाकीचा ऐवज लवकर यावा मुतसदी याचेविसीचा मजकूर राजश्री बाळाजीपंत यांस लिहिला आहे त्यांचे सांगितल्या वरून कळेल रा छ १५ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ८५. १७१४ पौष वद्य २.
पु।। राजश्री बाबूराव स्वामीचे शो-
विनंति उपरि वांकू जासूद एथून बाळाजी व्यंकटेश यांजकडे करनुळास पाठविला आहे त्यास गदवालाहून पुढे करनुळास जाईल ते समई त्याजबरोबर प्यादा देऊन बाळाजीपंताकडे पाठवावा. रा छ १५ जावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
बाब बापूराव व्यंकटेश गदवालकर लेखांक ८४. १७१४ पौष वद्य २.
याचा छ १५ जावल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत असावे विशेष तुह्मी पत्र पो ते पाऊन सविस्तर मार अवगत जाहला ऐवज रवाना करण्याविसी च्यार दिवस आळस जाला सारा च सांप्रत राजश्री बाळाजीपंत यांचे विद्यमाने व्याज मुदलसुधा ऐवज राजश्री भगवानदास मुरलीदास याचे दुकानीहून देविला आहे पावता होईल आह्मी आपले आहोंत व हें संस्थान देवाब्राह्मणाचे आहे पूर्ण अभिमान असावा ह्मणोन लिो ते सर्व समजलें ऐसियास साडेबारा हजार रू।। शेटजीनी पो बाकी रुपये लवकर पाठवावे ह्मणोन सांगावे संस्थानचे अत्यगवाद सर्व प्रकारे आहे याविषई उपरोधिक लिहिणे प्रयोजन नाही राजश्री कृष्णाजीपंत लिहितील त्याजवरून कळेल तुह्मी आपले चिरंजिवास आह्माकडे पाठविणार ह्मणोन राजश्री बाळाजी व्यंकटेश यांचे लिहिल्यावरून व कृष्णाजीपंत यांचे सांगण्यावरून कळले त्यास उत्तम आहे परंतु प्रस्तुत एथील हवा बिघडली आहे तुमचे चिरंजिवाची प्रकृत बहुत नाजूक आहे त्याजकरितां च्यार दिवस पाठऊ नये अमळसी हवा चांगली जालियावर चिरंजिवास पाठवावे चिरंजिवास घरी बसऊन ठेवल्याने तरबियत होणार नाहीं तरी त्यास श्रवण करवीत असावे रा छ १५ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब गदवालकर यांचे पत्राचे लेखांक ८३. १७१४ पौष वद्य २.
ऐवजाचे वगैरे मार छ १५ जावल.
राजे यांस पत्र.
राजश्री राजे सामभूपालराव बाहादूर गोसावी यांस- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत असिले पाहिजे विशेष पत्र पो ते पावले मार समजला प्रस्तुत राजश्री बालाजीपंत यांचे विद्यमाने व्याजाचा ऐवज हिशेब करून रु।। अज रु।। हिशेब १२८०० बारा हजार आठशे राजश्री भगवानदास मुरलीदास यांचे दुकानीं देविले आहेत याचा तपसील बालाजीपंत लिहितील त्याजवरून ध्यानास येईल आपले पदरचे जाणावे राजश्री कृष्णाजी नरसिंह संस्थानाचा मार विनंति करतील ती ध्यानांत धरून संस्थानचे संरक्षण करणे आपणास लागले आहे ह्मणून लिो त्यास साडे बारा हजार रुा भगवानदास याणी आपले गुमास्ता याजबराबर पाठविले बाकी ऐवज लवकर पाठविण्याविसी भगवानदास यांस सांगावे वरकड संस्थानविषईंचा अगत्य-वाद आह्मास आहेच ये विषई वारंवार लिहावे असे नाहीं राजश्री कृष्णाजीपंत लिहितील त्याजवरून कळेल रा छ १५ जावल बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.