Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र आपाजी बाबजी यांस लेखांक ५२. १७१४ मार्गशीर्ष वद्य १२.
माहे राखर छ २६.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आपाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष मौजे आडगांव वगैरे देह पांच पा पिंपरी व मौजे सिंदबन पा सातारें व जवळी खुर्द वगैरे देह तीन पा कनड ए।। नउ गांव, जागीर रजा आलीखान यांजकडून कमाविसीने करून घेतले मौजे गणोरीस लगते जाणून केले आहेत त्यास नउ गांवचे कामकाज राजश्री माहादाजीपंत याणी वहिवाट करण्याविषई तपशीलवार राजश्री गोविंदराव तुह्मास सांगतील. त्याप्रो सदरहू गांवचा बंदोबस्त त्यांचे विच्यारें करून इकडे लेहून पाठवावे र।। छ २६ राखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब इंद्रमण विजयराम भट लेखांक ५१. १७१४ मार्गशीर्ष वद्य ९.
हरिद्वारकर याचे मार्गशीर्ष वद्य ९.
वो राजश्री इंद्रमण विजयराम भट स्वामीचे सेवेसी-
विद्यार्थी गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि तुह्मी पत्र पो ते पों गंगाजळाच्या कावडी सुमार च्यार सोमेश्वर ब्राह्मणाबराबर पो आहेत गंगाजळाच्या शिशा सुमार ३२ व प्रसाद इलाइची दाणे व पेढे एकूण गाडगी सुमार ५ सदरहु शिशा सुमार ३७ एणेप्रो पार ते पावले बहुत आदरेकरून वंदून ग्रहण केला सोमेश्वर ब्राह्मण याज बराबर दक्षणा रुपये ३५ पस्तीस पा आहेत मिती मार्गशीर्ष वद्य ९ शके १७१४ परिधावीनाम संवत्सरे बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब तिमापा यांचे पत्राचे लेखांक ५०. १७१४ मार्गशीर्ष वद्य ९.
सुरापुरास रवाना जासूदासमागमें
मारिनिलेचे छ २३ रााखर
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमापा स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष तुह्मी पत्र पो ते पावले राजश्री गोविंदआपा व सुभराव यांस घेऊन पुण्यास जातो तेथून लौकरच येतो तोपावेतो मंत्रीची मर्जी संस्थानावर राहे ऐसे करणे आपणाकडे फौज येण्याची मनाई व्हावी ह्मणोन तावार लिहिला तो समजला त्यास दरबारचे कामास जो जाबसाल करारांत आला त्याप्रा आमलांत यावे एणेकरून जाबसालाची पत राहून काम होते एक महिन्याचा करार त्यास तीन महिने होत आले अद्याप कांहींएक ठराव नाहीं एथून पुण्यास जाऊन आल्यावर मग ठरणार हे फार लांबण ये विषई इकडून बोलावयास जागा नाहीं याउपरि कोणता तो सिद्धांत ठरून ल्याहावें व तुमचे येणे व्हावे त्याप्रा मंत्रीसी बोलण्यांत येईल इकडून संस्थानचे कामाविषईं पहिले व आतां दुसरा विच्यार नाही येविषीं वारंवार काय ल्याहावे यांचे राजश्री सिवशंकर यांस तरी लवकर इकडे पाठवावयाचे होते ह्मणजे कांहीं दिवस त्याजवर ढकलावयासि येते तेहि न केले यास काय ह्मणावे आतां तरी सिवशंकर यास बरोबर प्यादे देऊन आह्माकडे पाठवावे विलंबावर न टाकावें राा छ २३ रााखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र राजे व्यंकटपा नाईक यांस लेखांक ४९. १७१४ मार्गशीर्ष वद्य ९.
मीरअलम बाहादूर याणी
मागितले त्याजवरून दिल्ह
छ २३ राखर
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बेहरी बहादूर गोसावी यांस-
७ सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष मौजे मरचेडी पा रायचूर जागीर मीरअलम बाहादूर एथील बैल सुमार ३७ सदतीस आरकेरे एथील नायब याणी नेऊन मौजे मारचे रयतेपासोन च्यारशे रुपये नगद घेतले ते फिरोन देवण्याविषईं पेशजी आपल्यास पत्र पाठविलें असतां त्याचा फडच्या न होतां आणिक मौजे मार पैकी सवासे बैल व सत्तर बकरी आरकेरेकरानी नेली येविषीचा बोभाट आला त्या वरून हली लिो असे त्यास येविषीचा बोभाट एथे यावा हे नीट नाहीं याउपरि गुरे व नगदी ऐवज यांजकडील गांवचा तेथील अमील यांजकडे पावता करून रसीद घेऊन पाठवावयाचे करावे येविषीं वारंवार लिहिणे न पडता मवेसी व नगदी परतोन देण्याविषई आरकेरे एथील आमीलास निक्ष्णून ताकीद होऊन बंदोबस्त व्हावा मीर साहेब यांजकडील गांवची मवेसी व नगदी ऐवज नेल्याचा बोभाट हुजुरांत आल्यावरून अह्मास सांगितलें कीं तुह्मी पत्र पाठऊन मवेसी व नगदी माघारी देवावी त्यावरून सांप्रत लिो असे तरी मवेसी जराबजरा व नगदी ऐवज मीर साहेबाकडील आमिलाकडे पावता होऊन त्यांची रसीद घेऊन या पत्रासमागमे जरूर पाठवावी रा छ २३ राखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब आपाजी बाबजी यांचे पत्राचे लेखांक ४८. १७१४ मार्गशीर्ष वद्य ७.
छ २० राखर. टप्यावर
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आपाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकुशल लिहित जावें विशेष तुह्मी छ १५ रावलचे पत्र पाठविले ते छ २४ मीनहूस पावले मजकूर समजला.
तुह्मावर चिटी तीस हजार रुपयाची राजश्री गोविंदराव भगवंत यांची केली आहे जरूर जाणून दिल्ही आहे तरी चिटीप्रा ऐवज देऊन पावती घ्यावी त्यास आज्ञेप्रा ऐवज सिध करून ठेविला आहे ते आल्या वर ऐवज देतो गुंता पडावयाचा नाहीं ऋणून लिो ते कळले कलम १ पूर्वी जाधवाची वगैरे पत्रे पा ती पावली असतील जाब आला नाहीं त्यास जाब पाठवावयास आज्ञा जाली पाहिजे ह्मणून लियो येविसी गोविंदराव यास सांगितले आहे तुह्मी पुसावे झणजे बंदोबस्त करून देतील कलम १ बापु सिवदत यास ऐवज देऊन त्याची हुंडी विठलदास गोकुलदास याजवर १०००० दाहा हजार रुपयांची पा आहे मुदतीप्रा ऐवज देऊन उत्तर पाठविले पाहिजे ऐवज आपले नावे लिहिलो तेथे जमा करा- वयास आज्ञा जाली पाहिजे ह्मणून लिो हुंडी लागू करून मुदती प्रा ऐवज घेऊन जमा केला. कलम १ |
यंदा अवर्षणामुळे रा बाळाजी पंत यानी पागा बारगीर गणोरीस रा केली त्यास तिकडे प्रथम पाऊस पडोन पेरणी खरीफाची जाली होती भाद्रपदापासोन अगदीच पाऊस नाहीं रबीची पेर देखील जाली नाहीं वि- हिरी आताच आटल्या उंस वाळतात ह्मणून गांवकरी याचे पत्र आले तेच बजीनस आवलोकनार्थ रवाना केले माझी तरतूद ध्यानांत भरावी आसे होते परंतु दरसाल नालास्ता होतो यास इलाज नाहीं दोन्ही कुरणाची गवते कापून पागेस चंदी दाणा खरीदी करून देविला त्याची याद बाळाजीपंतानी सेवेसी रवाना केली आसल तीन सालचे हिशेब गांवचे तयार करून ठेविले आहेत आज्ञा येईल तसे करीन ह्मणोन लिो त्यास गांव तुमचे स्वाधीन केला तेव्हां त्याची उस्तवारी यथास्थित करुन दाखवाल ही खातरजमा आहे हिशेबविसी बाळाजीपंतास लिहिले आहे. कलम १ नवल विशेष वर्तमान आलीकडे तुह्माकडून लिहिले येत नाहीं. तर पत्र पाठवित जावे. कलम १ |
पाच कलमे रा छ २० राखिर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
दस्तक छ १७ राखर नारायण लेखांक ४७. १७१४ मार्गशीर्ष वद्य ४.
भट राजश्री नानाकडील यास
गुटुरास करून दिल्हे ते.
श्रीमंत राजश्री पंत प्रधान- सिका
दस्तक राजश्री गोविंदराव कृष्ण दि॥ सरकार राजश्री कमाविसदार व मोकदमानि व रहदारानि व चौकीदारानि व बाजे लोकानी जकाती माहाला निहाय सा सलास तिसईन मया व अलफ राजश्री नारायण भट वगैरे ब्राह्मण मंडळी आह्माकडील भागानगरीहून आपले घरी तालुके गुटुरास जात आहेत तर मार्गी कोणेविषई मुजाहीम न होणे जेथे राहतील तेथे चौकी पाहारा करून समागमे बादरका देऊन आपलाली सरहद पार करून देत जाणे जाणिजे छ १७ राखर मोर्तब सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ४६. १७१४ मार्गशीर्ष वद्य ४.
पुा राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी-
विनंति उपरि स्वामीचे पैसे लवकरच पावत आहेत रुपये घरामध्यें आहेत ह्मणोन जाणावें सेवक पदरचा आहे स्वामीचे रुपये स्वामीस पावत आहे यास धोका नाहीं सेवकाने स्वामीचे नुकसान करणार नाहीं सत्य समजावें इत्यादिक तपशील लिहिला तो समजला ऐसियास बाळाजी व्यंकटेश एथून ऐवजाकरितां तेथें आलेत त्याचे येण्याचे तुह्मी एक अक्षर लिहिले नाहीं व त्याचें पत्रहि घेऊन पा नाहीं तेव्हा काय समजावें मारनिले तेथें आलेत किंवा नाहींत तुह्मी मात्र धातुपोषण करून ऐवजाचे लिहिता की ऐवज घरांत आहे धोका नाहीं त्यास हा कोठील अर्थ याउपरि ऐवज लौकर रवाना करावा तुह्मासहि तेथील स्वभाव गुण लिहिण्याचा लागलासा वाटतो धातुपोषणाच्या गोष्टी आजपरियंत सदैव तुमचे पत्रात लिहिल्यांत येतात अनुभव कांहींच नाहीं हे बहुत आश्चर्याची गोष्ट बाळाजी व्यंकटेश यांस पत्र लिहिलें तें पावते करून उत्तर पाठवणे रा छ १७ राखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
भीमराव श्रीपत करनुलकर यांचे लेखांक ४५. १७१४ मार्गशीर्ष वद्य ४.
पत्राची उत्तरें रा छ १७ राखर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणें विशेष तुह्मी छ ३ राखरचे पत्र पा ते छ ७ माहे मारी पावले नवाब माद रणबस्तबान बाहादूर याचा छ २७ रावलीं यमे प्रहर दोन घटिका रात्र गेल्यानंतर इंतकाल जाला याजपूर्वीच सावध अस्तां नवाब माद अलफखान बाहादूर यांस सर्व सोंपून दिल्हे त्याचा विस्तारें मोर नवाब माद रणदुलाखान बाहादूर याणी नवाब अजमुलउमेरा बाहादूर व मीर अलम बाहादूर व आपल्यास लिहिला आहे त्यास यांची आपली बिरादरी त्या अर्थी या प्रसंगी सर्वश्रीं साहित्य केले पाहिजे व पुण्यासहि पत्रें लेहून तिकडोनहि पत्रें आणवावीं इत्यादिक मजकूर विस्तारें लिहिला तो सर्व समजला ऐसियास नवाब मरहुम यांचा इंतकाल होणे मोठी गोष्ट वाईट जाली थोर उमदा सरदार व ज्यांहादीद होते याचा आपसोस आह्मास फार जाला तो विस्तार काय लेहावी आसो ईश्वरसत्तेस उपाय नाहीं तुह्मी आमचे तरफेने नवाब महमद अलफखान बाहादुर यांची तषफी व दिलज्याईं करावी आह्मी एथून नवाब महमद रणदुलाखान बाहादुर यांचे पत्राचें उत्तर लिहिलें व नवाब माद अलफखान बाहादुर यांस मामतीचें पत्र व रक्थीपात दुषाला सफेद पा आहे तुह्मी जाऊन पत्र देऊन दुषाला द्यावा व विस्तारे मार एथून पुण्यास लिहिण्यांत आलाच आहे अजमुलउमरा बाहादुर व मीर अलफ बाहादुर व राजे धरमयंत याणी पत्राचे जाब माद रणदुलाखान बाहादुर यांस लिहिले आहेत त्याजवरून समजले असेल माद अलफखान बाहादुर यांचे साहित्यविसीं आह्माकडोन किमपि अंतर व्हावयाचे नाहीं प्रसंगोचित सर्व घडेल येविसीं चिंता नाहीं तुह्मी वरचेवर तेथील प्रसंगाचे वर्तमान लिहित जावें रा छ १७ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमाजी कृष्ण सुरापूरकर यांस लेखांक ४४. १७१४ मार्गशीर्ष वद्य ३.
पत्राचे उत्तर रा छ १५ राखर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमापा स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष तुह्मीं दोन पत्रें पाठविली ती पावोन लिहिल्या प्रा। तावार मार समजला राजश्री श्रीपतराव यांस समाधान नाहीं सबब घरास गेले ह्मणोन लिा तें कळलें राजश्री गोविंद आपा व सुबराव उभयतां चिणमेल्यास गेले तिकडून आल्यावर पुण्यास घेऊन जातों ह्मणोन लिा त्यास सिवापा याणी लाखाची पावती व सिबंदी बाबत ऐवज मागों नये याप्रा पत्र आणोन देण्याचा करार बहिरी बाहादुर यांसी करून चिणामेल्यास गेले ऐसे तुमचे लिहिण्यांत त्यास कराराप्रा दोन्ही जाबसालांविषयीं पत्र आणिलें कीं नाहीं हें तावार ल्याहावें गोविंदआपा व सुबराव यांस इतक्यावर तुह्मीं पुण्यास घेऊन जाणार मग जाबसाल ठरणार या गोष्टीस लांबण फार पडती मंत्रीसी बोलण्यांत आल्याप्रा जाबसालाचा ठराव लौकर होऊन आल्यांत केले कामाचें सार्थक याजकरितां लौकर जाबसाल व्हावा यांत चांगले बहिरी बाहादर यांचेहि शरीरीं स्वस्थ नाहीं ह्मणोन तुह्मीं लिहिलें त्यास हली मारनिलेचे प्रकृतीस समाधानाचें वर्तमान कसें तें लेहून पाठवावें रा छ १६ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र नागोपंत चिनापटणास लेखांक ४३. १७१४ मार्गशीर्ष वद्य २.
नारायण भट तेलंग राजेश्री नाना कडील
यांनी मागितले त्यावरून दिल्हे छ १५ राखर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नागोपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जावे विशेष राजश्री नारायण भट बीन लिंगन भट वगैरे चेरूवारू कारचेर उमर सरकार मुर्तिजानगर याची व मलपराज कोनवारू या उभयतांचा कजिया को मारचे कुलकर्णाविषईं लागला आहे त्याजवरून नारायण भट याणी राजश्री नाना यांस विनंति केली कीं आपण सर्व अधिकारी मलपराज मार यास आपण आणून ठेविला कुलकर्णाचे लिहिण्यास कारकून ठेऊन कांहीं दिवस वहीवाट केली पुढें कोनवारू मार सदरहु वतन आपले ह्मणून लागला ऐसी यास को मारी इंग्रजाकडील अमील मेस्तर ऊंस आले त्याणी उभयतांचा कजिया मनास आणून चेरूवारू यांचे वतन याजकडे चालते केले पुढे दुसरे अमील को मारी कांकरेल आले त्याणी कोनवारू याजकडे चौकसी न करता कुलकर्णाचे वतन चालते केले येविषईं स्वामीनी इंग्रज याजकडील आमीलदारास ताकीद करऊन आमचे वतन आह्माकडे चाले सुदामत प्रा ते करवावे त्यावरून राजश्री नानानी मेस्तर मालीट यांस सांगून त्यांचे पत्र हालीचे कमाविसदार चेटलो यांजला देविले आहे व राजश्री बहिरोपंत याणीहि तुह्मास पत्र लिहिले आहे त्याप्रो चेटलो यांस ताकीद करऊन नारायण भटजीचे वतन यांचे याजकडे चालते करवावे मेस्तर किनवी यांचीहि पत्र येविषईं देविली आहेत रा छ १५ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.