Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब व रसीद मिळून पत्र कोनेर लेखांक ६२. १७१४ पौष शुद्ध ९.
हरि यास छ ७ जावल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कोनेरपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार, विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष तुह्मी छ २६ माहे राखरचे पत्र पाठविले ते छ १ माहे जमादिलावली पावले यात्रेत पोहचला मागाहून राजश्री तिमाराव याणी ऐवज पाठविण्याची निकडहि लिहिली त्यावरून पंधरा हजाराच्या तूर्त हुंड्या पुण्यावरील पाठविल्या ऐवज घेऊन रसीद पाठवावी बाकी ऐवजाच्या हुंड्या सत्वरच रवाना करितों ह्मणोन तपसीले लिो ते कळले त्यास एथे ऐवजाची निकड भारी एकंदर ऐवज झाडून पाठवावयाचा होता ते न करितां पंधरा हजाराच्या मात्र हुंड्या पाठविल्या त्यास हुंड्या सुमार आठ पुण्याच्या रु।। १५००० पंधरा हजार पैकीं वजा हुंडणावल हैदराबादी ऐवज घ्यावयाचा करार सा दर सो दोन का प्रो पुण्याची हुंडणावल का तीनसे बाकी रुपये १४७०० चवदा हजार सातसे सदरहू रु।। मा।। व्यंकटीदास भुकनदास पावले आसत आणखी ऐवज तुह्मी देणे आहे त्यास लवकर हुंड्या पाठऊन देणे विलंबावर पडू नये जोती जासूद ऐवजाकरितां तिमाराव यांचे समागमे दिल्हा आहे ऐवजाची निकड आसे तर झाड्यानिसी ऐवजाच्या हुंड्या लवकर पा रा छ ७ जावल सलास तिसईन सन १२०२ फसली बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र भीमराव श्रीपत यांस जासूद लेखांक ६१. १७१४ पौष शुद्ध ५.
जोडी समागमें पत्र पो छ ३ जावल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें विशेष ऐवजाकरितां राजश्री बालाजी व्यंकटेश यांस इकडून पो नवाब रणमस्तखान यांजकडून ऐवज तुह्मी आपल्यापासी घेतला त्यासही फार दिवस जाले अद्याप इकडे ऐवज पाठविला नाही अपूर्व आहे एथें ऐवजाची निकड जाणून लिो असे तर पत्र पावताक्षणी तुह्मापासील झाडून ऐवज व अलफखान बाहादूर यांजकडून येणे तो व्याजसुधा एकंदर हिसेबा प्रो राजश्री बालाजी व्यंकटेश यां समागमे सत्वर रवाना करून मारनिलेस पाठवावे ऐवजाचे हिसेब मारनिले समजावितील त्या प्रो झाड्यानिशी पाठवावा याउपरि दिवसगत लागो नये ऐवज व्याज व हुंडावणसुधां एकंदर ऐवज लौकर भारनिले समागमे हुंड्या देऊन रवाना करणे ह्मणजे ऐवज मार्गाने येण्याची व इंडणावळीची कटकट बालाजी व्यंकटेश यांजकडे न पडावी रा छ ३ जावल बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
आनंदराव मोरेश्वर यांस अमीनुलहक लेखांक ६०. १७१४ पौष शुद्ध ४.
पीरजादे परंडेकर यांस पत्र दिल्हे.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री अनंदराव स्वामीचे सेवेसी-
पोष्य गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीयें लिहित जावें विशेष अमीनुलहक हुसेनी पीरजादे परंडेकर यांचे ह्मणे की पेठ सिवपटण येथील चावडीवर मसिदीचे तेला बाबत दरमाहा च्यार रु।। प्र।। आठमाही आलीकडे ऐवज पावला नाही पा अष्टी जामखेड व इटकूर मांडवें एथे गांवगना एक रु।। प्रा सदरहू मामुल आसतां दोन वर्षे ऐवज पावला नाहीं ह्मणोन त्यावरून लिहिले असे तरी मसीदीचे तेला बाबत दरमाहाचा ऐवज मामुल बमोजीब व गांवगनाचा चालत आल्या प्रा यांचे यास पावता करावा ये विषी बोभाट नसावा मामुल चालत आलें असेल त्यास दिकतीचे प्रयोजन दिसत नाही याजकरितां लिहिलें असें रा छ २ जावल बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ५९. १७१४ पौष शुद्ध ४.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गिरमाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून वकीयें लिहीत जावें विशेष कसबे विसाद एथील जागीर मोहसनुदौला बाहादूर यांजकडे आहे तेथील मोकाशाचा आमल वाजबी मामुल प्रा फडच्या करीत असतां तुह्मी ज्यादा तलबी करून उपसर्ग देतां ह्मणोन कळलें त्यावरून लिहिलें असे त्यास सुदामत मामुल बमोजीब मोकाशाचा फडच्या सुरळीत करून घेत जाणे गैरवाजबी तोसीस लागो न द्यावा बोभाट न ये तें करावें रा छ २ जावल बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रवानगी पत्रें छ २ जावल लेखांक ५८. १७१४ पौष शुद्ध ४.
मीर मोहसन अलीखान याणी मागीतली
सबब बळवंतराव लक्ष्मण सेकूकर
व गिरमाजी विठल यांस.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष कसबे विसाद सरकार नांदेड एथील जागीर मोह सनुदौला बाहादूर यांजकडे आहे तेथील सालाबाद मामुल प्रा फडच्या सुरळीत करून देत असतां तुह्मी ज्यादा तलबी करून इजाफा दोन हजार च्यारसे रुपये घेतले व कसबे मारची मवेसी गुरें व बकरी नेली मन माने तसा हंगामा करून नुकसानी व पायमाली केली याचा बोभाट नवाबाचे सरकारांत जाला त्यावरून येविषई आह्मास सांगितले कीं हा ऐवज बेमामुल घ्यावयाची सबब काय मामलतीचे ऐवजी सदरहु ऐवज मजुरा घेउ या प्रा बोलण्यांत आलें त्यावरून लिहिलें असे त्यास गैरवाजबी मामुलासिवाय ज्याजती ऐवज घेतला तो यांचे यांस फिरोन देऊन रसीद घ्यावी व पुढें सालाबाद सुदामत पेशजीपासोन मामुल चालत आल्याबमोजीब फडच्या करून घेत जावा बोभाट येउ नये रा छ २ ज्ञावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र बापु सिवाजी यांस लेखांक ५७. १७१४ पौष शुद्ध ३.
हरबाजी नाईक वानवले यांनीं मागितलें
सा दिल्हे जाफराबाद प्रकर्णी
छ १ जावल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बापुजीपंत स्वामीचे सेवेसी--
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष पा जाफराबाद एथील वर्तमान तुह्माकडील पत्र येऊन आलीकडे कांहीच कळत नाही त्यास सविस्तर लेहून पाठवावे पा मारचा वसूल गांवगना तुह्मापाशी आजपर्यंत जमा जाला आहे तो पत्र पावताच हैदराबाद एथे पाठऊन द्यावा ऐवजाचे प्रयोजन एथे जाणून लिो असे तरी झाडून वसूल जमा असेल तो लवकर पाठवावा यास दिवसगत लागो नये नाईकाचे हिशासुद्धा ऐवज झाडून वसूल जाला असेल व होईल तो एथे पाठवावा फर्मास नाईकाचे हिशाची त्याजकडे देत जाणे धारण सात आठ रुपये धारण पल्ला असे असल्यास पांच हजार सात हजारपर्यंत समाईक घेऊन गला खरीदी करून ठेवावा पुढे फरोख्त करावयासी नीट पडेल याचा आलस न करणे ॥ छ १ जावल सलास तिसईन बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
र।। आनंदराव मोरेश्वर यांचे लेखांक ५६. १७१४ पौष शुद्ध १.
पत्राचा जाब,
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आनंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पाऊन मजकूर समजला राजश्री गोविंदरावआणी इंदापुरास आले त्यांची भेट जाली आह्मी आपले वर्तमान सविस्तर त्यांस सांगितलें त्याणी अजमुलउमरा बाहादूर व राजे नेमवंत यांस पत्रें लिहिली आहेत त्यास ही पत्रें लिहिली आहेत त्यास ही पत्रें त्यास पाऊन आमचा साहित्य उपराळा व्हावा नाही तरी तनखादार आबरू राहू देणार नाहींत इत्यादिक मार लिहिला होता तो सर्व समजला ऐसियास पत्रें पावती जाली एथील ध्यान रीत हे सर्व तुह्मास माहितच आहे ल्याहावे असा अर्थ नाहीं राजश्री गोविंदराव यांचे पत्राची उतरें पा आहेत त्याजवरून कळेल र।। छ २९ राखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रघुनाथ गोविंद कादार पा कलबर्गे लेखांक ५५. १७१४ मार्गशीर्ष वद्य ३०.
यांस पत्र शर्फुल उमरा बाहादुर याचे कर्ज
च्यार हजार रुपये शाह केसूदराज पीर
जादे दंडवतीकर यांजकडे येणे येविसी
रा छ २८ रााखर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष नवाब शर्फु उलउमरा बाहादूर यांजकडोन आमचे च्यार हजार ४००० रुपये येणे त्याचा तगादा यांस केला त्यास याणी सांगितले की आमचे च्यार हजार रुपये शाहासाहेब शाहगेसुदराज यांजकडे ठेविली बा कर्ज वाजवी येणे आहेत ते कमाविसदारास लेहून तगादा करून आणऊन घ्यावे त्याजवरून हे पत्र तुह्मास लिहिलें असें की च्यार हजार रुपयांचा तगादा तुह्मी शाहासाहेब यांस करून सदरहू च्यार हजार रुपये मौजे दंडवती व मौजे भागेवाडी एथील ऐवजी वसूल करून पाठवावें येविसीं शाहासाहेब उजुर करतील तरी त्यास सांगावें की तुह्मी आपले तर्फेनें कोणास नवाब मवसूद याजपाशीं पा जाबसाल करून घ्यावा ऐवज वसुलास कोन्हाची मुर्वत न धरावी येविसीं नवाब मवसूद याणी आपले पत्रं शाहासाहेब यांस लेहून जुरत हरकारा पाठविला आहे त्यात शाहाजीस निक्षून लिहिले आहे घराउ काम लिहिल्याप्रो जरूर करावे उत्तर पाठवावें र॥ छ २८ रााखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र सदासीवराव महिपत कमाविंसदार लेखांक ५४. १७१४ मार्गशीर्ष वद्य ३०.
पा इंदापूर गु।। कोन्हेर बाबुराव.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री सदासीवराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष राघोजी सिंदे कसबे इंदापूर एथे राहतो याचे मळ्यांत भिकाजी अभंग माळी चोरी करावयास गेला सिंदे मार याचा भाऊ रखवालीस होता त्याची दगड लागला त्याजवर कांहीं दिवस जाल्यानंतर अभंग मार वारला त्याचे भाउबंद याणी गैरवाका समजाविले दगड लागल्यामुळें मेल्याचे निमित्य ठेऊन सिंदा मार याचे घरची चीजवस्त गुरें नेली व मुलें माणसे कैदेत ठेविली आहेत ह्मणोन कळले त्यावरून लिो असे त्यास अभंग मार धोंडा लागोन मेला ऐसेहि नाही गैरवाका समजाविल्यावरून चीजवस्त व गुरें नेली ती याचे यास माघारी देवावी व मुलेमाणसे कैदेतून सोडावी येविषीचा बोभाट न ये तें करावें रा छ २८ राखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र आपाजी बनाजी यास, लेखांक ५३. १७१४ मार्गशीर्ष वद्य ३०.
राजश्री आपाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहिणे विशेष राघोजी सिंदा इंदापूरकर याचे मळ्यांत भिकाजी अभंग माळी चोरी करावयास गेला रात्रीचा समय चोराचे रखवालीकरितां सिंदे मार याचा भाउ तेथे रखवालीस होता याने दगड फेकला तो यास लागला त्याजवर अभंग मार कांहीं एक दिवस आपले घरी होता नंतर वारला त्याचे भाउबंद याणी कमाविसदारास गैरवाका समजाविलें कीं दगड लागून अभंग मार मेला आहे ह्मणोन कमाविसदारानी निमित्य ठेऊन सिंदा मार याचे घरची चीजवस्त व गुरे ढोरे वगैरे निपंगी नेउन यांची मुलेमाणसे कैदेत ठेविली आहेत ह्मणोन वर्तमान कळले त्यावरून हे पत्र तुह्मास लिहिले असें की सिंदा मार याचा भाउ आपले मालाचे रखवालीकरितां आपले मळ्यांत रात्री जागल करून होता चोर चोरीस आला त्याजवर दगड टाकिला केवळ भिका अभंग आहे असे समजोन दगड फेकला नाही तथापि दगड लागूनच मेला असेहि नाही यानंतर कांहीं एक दिवसानें मेला असे अस्तां सिंदे मार यांचे घरची चीजवस्त गुरें वगैरे नेऊन मुलेमाणसे कमाविसदारानी अभंग याचे भावाबंदाचे गैरवाका समजाविल्यावरून कैदेत ठेविली आहे त्यास येविसीं तुह्मी कमाविसदारास सांगून याची चीजवस्त गुरें वगैरे देवऊन मुले माणसे सोडऊन देवावी र।। छ २८ राखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.