Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

शेख इबादुलाचे पुत्रांनी पत्रें बळवंतराव सेळूकर                            लेखांक २२.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
व पांडुरंग रंगनाथ यांस मागितलीं सबब दिल्हीं.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील जाणून स्वकीये लिहित असावें विशेष मौजे कामटें वगैरे देहे पांच पा नांदेड जागीर बादुलाखान येथील बाबतीचा अमल तुह्माकडे दरसाल मामुल बमोजीब तीनसें ऐसी टके देऊन रसीद घेतात ऐसें असतां यासिवाय इजाफा दरसाल पंधरासे टके तुह्मी अलीकडे घेतां येविसीचा बोभाट नवाबाचे सरकारांत जाला त्यावरून लिहिलें असे त्यास कैलासवासी रावसाहेब यांचे कारकीर्दीस मामूल चालत आल्याबमोजीब ऐवजाचा फडच्या करून घेत जावा ते न करितां इजाफा ऐवज घेऊन गांवास उपसर्ग देता हा बोभाटा येणें नीट नाहीं येविषई पेशजी पानगलचे मुकामींहून पत्र पाठविलें परंतु अद्याप बंदोबस्त होत नाहीं त्यास या उत्तरी सुदामत मामूल प्रा पांच गांवचा फडच्या करून घेत जावा गैरवाजबी उपद्रव देऊं नये फिरोन बोभाट न ये ते करावें रा छ २ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

बापू सिवाजी जाफराबादकर यांस पत्र                                      लेखांक २१.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
सेना-साहेब-सुभा यांजकडे पाठविलें.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष मौजे आलंद पा जाफराबाद या गांवची पाटिलकी दारकोजी नाईक यांची आहे तेथील इजारा आंखा प्रो ठराऊन आबादी झाली. इजा-याप्रमाणें पैका देत आले सांप्रत मौजे मारीं तुह्मीं उपसर्ग करून ज्याजती ऐवज घेतां ह्मणोन कळलें त्यास मौजे मजकुराविषई राजश्री रघोजी भोंसले सेना-साहेब-सुभा यांणीं अगत्यपूर्वक लिहिलें त्यापक्षीं नाईक मार इजारा देत आल्याबमोजीब ऐवजाचा फडच्या करून घेत जावा ज्याजती तोसीस लागो न द्यावी गांवची आबादी राखून ऐवज नेमाप्रमाणें रयत रजाबंद ठेऊन घेत जाणें येविसीचा बोभाट मागती नये ऐसें करणें रा छ २ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

राजश्री बाबाराव गोविंद यांचे पत्राचे उत्तर                                   लेखांक २०.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
छ २ राखर राजे रायरायां यांणी मागितलें.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष तुह्मीं पत्र पाठविलें तें पाउन सविस्तर मजकूर अवगत जाहालाः मौजे भोगांव पा मारडी येथील पाटिलकी र।। बापू जनार्दन यांची आहे यांचे चालविणें याविषई कमाबिसदारास पत्र द्यावें व मारनिल्हेस आधार सर्व आपला आहे इत्यादिक मजकूर लिहिला त्यास येथून तो अंताजी निराजी कमाविसदार पा मा यांस पत्र लिहिलें आहे आणि बापू जनार्दन यांचे आह्मांस अगत्य आहेच आणि प्रस्तुत तुमचे संग्रहीं तेव्हां विशेष आहे रा छ २ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

ति॥ राजश्री पांडुरंगराव बाबा यांस पत्र                                    लेखांक १९.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
छ ३ राखर राजाजीनी मागितलें सबब.

तीर्थस्वरूप राजश्री पांडुरंगराव बाबा वडिलाचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति येथील कुशल जाणून सदैव लिहित असलें पाहिजे विशेष मौजे जवळें बु।। पा सिराढोण हा गांव राजश्री राये निळकंठराव सुंदर मुतसदी नवाब बंदगानअली यांचे सरकारचे व राजश्री राजे रायरायां बहादूर यांचे आप्त यांस नवाब बंदगानअली यांचे सरकारांतून जागीर आहे तेथील मोकाशाचे बंदोबस्ताकरितां मानिलेकडील राजेश्री जयराम पंत अमीन मौजे मार व राजश्री विश्वासराव पाटील मौजे मजकूर उभयतां आले आहेत सविस्तर वर्तमान निवेदन करतील त्यास मामूल प्रो मोकाशाचा तह ठराऊन जो वाजबी ऐवज ठरेल त्याची निषां जयरामपंत व विश्वासराव करून देतील येविसीचें अगत्य जाणून लिहिले असे रा छ २ राखर बहुत काय लिहिणें हे विज्ञापना.

राजश्री व्यंकटराव घोरपडे तालुके गजींद्रगड यांस पत्र                     लेखांक १८.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
छ २ राखर राजे राय-रायां यांस दिल्हें.

राजश्री व्यंकटराव घोरपडे गोसावी यांसी-
अखंडित-लक्षुमी-अलंकृत राजमान्य स्नो गोविंदराव कृष्ण आशिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष नवाब बंदगानअली यांचे फर्माविण्यांत मजकूर आला कीं तालुके गजींद्रगड येथील आमचे आमलापैकीं आह्मी आपले सरकारांतून सादुलाखान बहादूर यांस कसबे गोऊर ही गांव जागीरीत दरोबस्त दिल्हा आहे त्यास टिपु सुलतान याजकडोन तालुका सुटला तो दरोबस्त आमचे सरकारांत आला असतां व्यंकटराव घोरपडे यांस चौथ मागावयास प्रयोजन काय त्यास येविसी आह्मीं येथून राव पंतप्रधान व मदारुलमहाम व हरि पंडतजी यांस पत्रे लिहिली आहेत त्यास तुह्मी घोरपडे यांस पत्र द्यावें याजवरून हें पत्र लिहिले असे कीं गजींद्रगड किल्ला व किल्याखालील देहात हे सरकारांत आहेत बाकी तालुका नवाब बंदगानअली यांचे सरकारांत त्याजपैकीं कसबे गोहूर खानमजकूर यांचे जागीरींत आहे तेथील चौथाईचे अमलाविसीं आपण मुजाहीम ने होणे येविसीं नवाब बंदगानअली यांची पत्रे सरकारांत गेलीं आहेत तिकडोन ही परभारें आज्ञा येईल तसे व्हावें सरकारआज्ञेस उजूर असूं नये रा छ २ र।।खर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

मीर आलम यांणीं मागितलें.                                                लेखांक १७.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
राजेश्री राजे व्यंकटपा नाहक बळवंत बहेरी
बहादूर यांस पत्र छ २ राखर.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरी बहादूर मुतहवरुदौला राबेजंग गोसावी यांसि-
5 सकल-गुणालंकरण-अखंडित-लक्षुमि-अलंकृत राजमान्य स्रो गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असणें विशेष मीर अलम बहादूर यांणीं वर्तमान सांगितलें कीं मौजे मीरचेल वगैरे देहात पा रायचूर येथील येक असामी धरून नेऊन त्याजपासोन नख्त साडेतीनसें ३५० रुपये घेऊन वे मवेसी वगैरे गुरे सततीस रास दोन तीन वेळा राजे बहेरी बहादूर याजकडील लोकांनीं घेऊन गेले आहेत ह्मणून आमचे आमीलाचें पत्र आलें त्यास आपण पहिलें पत्र लिहिलें असतां त्या प्रो अमलांत आलें नाहीं सांप्रत पत्र लेहून द्यावें त्याजवरून हें पत्र लिहिलें असे कीं सर्व दृष्ट मीर मजकूर याजवर आहे आपल्याकडील लोकाकडून हरकत जाली असेल त्यास याजकडील साडेतीनसे रुो असामी ब॥ व सततीस गुरें नेली आहेत ते असामीस देऊन त्याची रसीद घेऊन पाठवावी व पुढें यांचे जागीरीस उपद्रव न होय तें करावें र॥ छ २ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे विनंति.

रामराव ज (ना) र्दन                                                     लेखांक १६.                                             १७१४ कार्तिक वद्य ३०.
देशमुख मार्डीकर यास.

राजश्री रामराव जनार्दन देशमुख पा मार्डी स्वामी गोसावी यांस सेवक गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि मौजे म॥र येथील गुरें खानगी ऐवजाकरतां तुह्मी पेशजी नेली ती देण्याविषई तुळजापुरचे मुक्कामी समक्ष सांगितलें व राजश्री अंताजी निराजी यांणी तुह्मांस सांगितले असतां अद्याप गुरें मौजे म॥रचे रयतेची दिल्ही नाहींत ह्मणोन समजलें त्यास हे नीट नाहीं या उपरी गुरे झाडून मौजे म॥रचे रयतीची असतील त्यास देऊन पावती घेणे फिरोन या गोष्टीचा बोभाट येऊ न देणें र॥ छ २८ र॥वल सलास तिसईन हे विनंति.

रामचंद्र तिमाजी देशपांडे                                                     लेखांक १५.                                             १७१४ कार्तिक वद्य ३०.
सोलापूरकर यांस.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामचंद्रपंत देशपांडे स्वामी गो-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जाणें विशेष मौजे कारंबें प॥ मार्डी या गांवचे खाजगी देशमुखीचा ऐवज राजश्री अंताजी निराजी याजकडे देविला असतां मौजे मा॥रचे चौथाईची मामलत तुह्मी करून वसूल चौथाईचा तुह्माकडे गांवकरी देतात त्यापैकी खानगीचा ऐवज वजा करून उपद्रव देता ह्मणोन कळलें त्यास खानगीचा ऐवज अंताजी निराजी घेत जातील येविषी तुह्माकडून मौजे मारीं उपसर्ग लागो नये चौथाईचे मामलतीचा सुदामत वाजबी प्रो गांवकरी फडच्या करून देत जातील गावांस तोसीस व उपद्रव न लागावा या पत्राचें उत्तर पाठवावें र॥ छ २८ र॥वल बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

रामचंद्रपंत सुभेदार सोलापूरकरास.                                         लेखांक १४.                                             १७१४ कार्तिक वद्य ३०.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामचंद्रपंत सुभेदार स्वामीचे सेवेसीं-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष मौजे भारंबे प॥ मार्डी येथील रखवाली राजश्री अंताजी निराजी यांजकडे असावी याप्रमाणे समक्ष ठरून आपलीं पत्रे सोलापुरीं पाठविलीं त्याप्रमाणे कांहीं दिवस तिकडून गांवास उपसर्ग न लागतां रखवालीचा बंदोबस्त म॥रनिल्हेनीं केला ऐसे असतां सांप्रत कोणी गैरवाका समजाविल्यावरून मौजे म॥रास रखवाली विषई उपसर्ग होतो ह्मणोन कळलें त्यावरून लिहिलें असें त्यास येविषई पेशजी ठरल्याप्रमाणें ताकीद निक्षून देऊन गांवास तोसीस न लागे ऐसा बंदोबस्त व्हावा पेशजी बंदोबस्त आपण पत्र पाठविलें त्याजवर जाली हालीं आपण स्वस्थानास आल्यावर गांवास उपद्रव लागणें आश्चर्य आहे र॥ छ २८ र॥वल बहुत काय लिहिणें लोभ असो दिजे हे विनंति.

रवानगी पत्रें छ २८ र॥वल.                                                   लेखांक १३.                                             १७१४ कार्तिक वद्य ३०.
महमद अनवर जागीरदार कारंबेकर यास उत्तर. 

साहेब मेहरबान दोस्तान महमद अनवर दाम मोहबतहु.
अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आकी येथील खैर आफियत जाणून आपली खैर खुष हमेषा लिहित जावी दिगर मजमुन खत पाठविले तें पोहोचून कैफियत जाहीर जाली राजेश्री रामराव देशमुख यानें गुरें नेली ती देत नाहींत त्यास ताकीद व रखवालीविषईं सोलापूरकर यांस पत्र व खाजगी ऐवजाकरितां रामचंद्र तिमाजी याजला पत्र याप्रो पाठवावी ह्मणोन लिहिल्यावरून तीन पत्रे प॥ आहेत पावती करून बंदोबस्त करून घ्यावा साहेब मिया यांजकडील म॥र मुफसल लिहिला तो समजला येविषी तपसिलें राजश्री अंताजी निराजी यांस लिहिल्यावरून कळेल र॥ छ २८ र॥वल.