लेखांक ३७. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री तिमापा व श्रीपतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावे विशेष तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें सुरापुरास पोहोंचून राजे बहिरीबहादर यांस सर्व वर्तमान सांगितलें रा गोविंद-अप्पा व सुभराव उभयतांस पुण्याकडे पाठवितात आह्मी आपल्यापासी यावें त्यास श्रीपतराव यांचे शरीरी सावकाश नाहीं जाणून दिवस-गत संस्थानिक आपले भरवशावर ह्मणोन तपशिलें लिहिलें तें समजलें त्यास राजे मारनिले यांचे पत्र आले त्यांत गोविंद-अप्पा यांचे समागमे तुह्मा उभयेतांस देऊन पुण्याकडे पाठवितों याप्रो आणि तुमचे लिहिण्यांत गोविंद-अप्पा व सुभराव पुण्यास जातात श्रीपतरायास समाधान नाहीं याजकरितां येण्याची दिवसगत ह्मणोन त्यास नाइक यांचे लिहिणे येक तुमचे लिहिणे दुसरेच यांत काये समजावे लिहिण्यांत असा व्यत्यास तेव्हां हा तर मोठा कारभार जाबसाल बोलण्यांत आले त्याचे काये ठरलें हैं कांहींच लिहिलें नाहीं अपूर्व आहे येथे मंत्री हटकितात येक महिन्याचा करार करून गेली कांहीं येक उत्तर समजावे ते न होतां मोहगम पुळपुळीत लिहिले जाबसाल दीर्घसूत्रावर पडला मंत्रीसी उत्तर देण्याचे ठिकाण नाहीं तुह्मा उभयेंतापैकी येकाने इकडे येऊन येकाने तिकडे जावयाचे केले असते तरी काय तें समजण्यांत येते याउपरि जाबसाल कोणता तो निश्चयांत आणून लौकर ल्याहावें अथवा तुह्मी यावे त्याप्रो बोलतां येईल बहिरीबहादूर यांचे पत्राचे उत्तर इकडून पाठविलें आहे रा छ ११ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)