लेखांक ३५. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.
पु।। राजेश्री व्यंकटराम पिला गोसावी यांस-
विनंति उपरि.
वाला-ज्याहा-बाहोदूर व उमदुतुल- उमरा-बहादूर यांची मर्जी आपले मारफतीने जाबसाल अनुकूल करून घेण्याची फार आहे ह्मणोन लिो ते कळले. कलम १ |
इंग्रजाचे विलायेतीतील अंतरंग वर्तमान लिहिण्याचें तें लिहावें याविषीं जवाब आल्यास लिहितो ह्मणोन लिो त्यास लिहून पाठविणे. कलम १ |
येकूण दोन कलमे रा छ ११ राखिर हे असिर्वाद.